राम राम मंडळी,
येत्या शनिवारी मिसळपावकरांचा पहिलावहिला कट्टा पुण्यात साजरा होतो आहे, ही मिसळपावच्या दृष्टीने आणि मला वैयक्तिकरित्या खूप खूप आनंद देणारी गोष्ट आहे.
गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम सुरू झाले आणि आजमितीस मिसळपाव इथपर्यंत वाटचाल करू शकले, याचे सर्व श्रेय केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच जाते!
मंडळी, अहो शेवटी तुम्हीआम्ही सर्वजण संगणकाच्या, आंतरजालाच्या या आभासी दुनियेतली माणसं! तरीही या आभासी दुनियेत रोज आपण घटकाभर एकमेकांना भेटतो, भांडतो, रडतो, हसतो-खिदळतो, मजा करतो!
परंतु काही हौशी, तरूण मिपाकरांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष भेटायचे ठरवले आहे, कट्टा करायचे ठरवले आहे, हीच मोठी समाधानाची बाब आहे. अहो शेवटी माणसं जोडणं महत्वाचं आणि तेच हे हौशी मिपाकर कट्टा भरवून करत आहेत!
काही महत्वाच्या घरगुती कारणांमुळे मला या कट्ट्याला उपस्थित राहता येणार नाही याचा खूप खेद वाटतो. जर मला या कट्ट्याला हजर राहता आले असते तर मला निश्चितच खूप आनंद वाटला असता!
कोई बात नही, पुन्हा केव्हातरी!
असो..!
'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा!'
असं अण्णा माडगुळकरांनी म्हटलं आहे. माणसांचा मेळ हा क्षणिकच आहे परंतु त्या मेळाचे काही क्षणच अत्यंत आनंददायी ठरावेत, स्मरणात राहणारे ठरावेत,हीच माझी मिपाच्या पहिल्यावहिल्या कट्ट्याला मनापासूनची शुभेच्छा!
सोबत खास मिपा कट्टेकरींकरता एक शुभेच्छाकार्ड जोडले आहे तेवढे गोड मानून घ्या!
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
आपला,
(आनंदीत) तात्या अभ्यंकर.

वाचने
13821
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या तुम्ही नाही निदान अनुष्का वहीनीना तरी पाठवुन द्या
:(
:(
तात्याबा, ख
प्रयत्न करतो..
In reply to तात्याबा, ख by धमाल मुलगा
वृत्तांत कळवा !!!
In reply to प्रयत्न करतो.. by विसोबा खेचर
माझ्याकडूनही शुभेच्छा!
पावसाची सर
In reply to माझ्याकडूनही शुभेच्छा! by मनस्वी
पावसाची सर! ? ? ?
In reply to पावसाची सर by मनस्वी
तुम्ही
In reply to पावसाची सर! ? ? ? by विजुभाऊ
मजा करा!
माझ्याकडूनही शुभेच्छा!
माझ्याही
हेच म्हणतो.....
In reply to माझ्याही by प्राजु
शुभेच्छा!!
शुभेच्छा!
हार्दिक
कट्ट्यावरल्या दोस्तानो,
हेच म्हणतो
In reply to कट्ट्यावरल्या दोस्तानो, by चतुरंग
अप्रस्तुत
In reply to हेच म्हणतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मिपा करांच्या कट्ट्याला आमच्याही शुभेच्छा!!
आम्ही इथे
कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!
जुनी खरूज
In reply to कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा! by झंप्या
झंप्या,
In reply to कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा! by झंप्या
ये हुई न बात !
In reply to झंप्या, by विसोबा खेचर
पाणि?
In reply to ये हुई न बात ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कट्ट्याला माझ्याहि .......