विज्ञान लेखक सर आर्थर क्लार्क यांचे निधन
आत्ताच एक ब्रेकींग न्यूज पाहिली.
विज्ञान लेखक सर आर्थर क्लार्क यांचे निधन
स्त्रोत : http://www.esakal.com/esakal/03192008/TajyabatmyaInternational342E13C29C.htm
------------------------------------------------------------------
नवी दिल्ली - अवकाश आणि विज्ञान विषयांवर प्रदीर्घ काळ लेखन करणारे जागतिक किर्तीचे लेखक सर आर्थर सी. क्लार्क यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. कोलंबोमध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना पहाटेपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. क्लार्क यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले होते. विज्ञान आणि अवकाश याविषयांवरील त्यांची 100 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उपग्रहाद्वारे संज्ञापनांची संकल्पना सर्वप्रथम क्लार्क यांनीच मांडली.
------------------------------------------------------------------
या महान लेखकाचे अखिल विज्ञान जगताने आणि सर्वच जगानेही ऋणी रहायला हवे असे माझे मत आहे.
आज जे डिश टीव्ही / टाटा स्काय यांचा उपग्रहांवरुन धुमाकूळ चालू आहे आणि आज उपग्रहाच्या माध्यमातून विज्ञानाची जी प्रगती होते आहे, त्या कल्पनेसाठीचे श्रेय सर आर्थर क्लार्क यांचेच आहे. एवढ्या महान लेखकाने आयुष्याची शेवटची वर्षे घालवण्यासाठी आपल्या शेजारीच श्रीलंकेची निवड केली होती. असे असूनही आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी वा लेखकांनी याचा किती लाभ घेतला हे माहित नाही...
सर आर्थर क्लार्क यांची अनेक गाजलेली तसेच मराठीतून अनुवादीत झालेली पुस्तके मी वाचलेली आहेत, जसे २००१: अ स्पेस ओडीसी
यांच्या जीवनाबद्दल विकीवर येथे माहिती मिळेल : http://en.wikipedia.org/wiki/Arthur_C._Clarke
अशा या महान विज्ञान लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली...
विज्ञानप्रेमी (सागर)
वाचने
4243
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
माझी विनम्र
In reply to माझी विनम्र by सुधीर कांदळकर
सुधीरकाका, ई-पुस्तके शेअर करा
स्पेस ओडिसी
In reply to स्पेस ओडिसी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्कीटराव,
आदरांजली..
सर आर्थर