Skip to main content

अथांग सागर

लेखक सुवर्णमयी यांनी गुरुवार, 20/03/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग सागर येती लाटा सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली गतीमान जसा जसा सागराचा श्वास होई ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई भावनांच्या आवेगाने क्षणक्षण उचंबळे थरथरले वाळूचे कण कण इवलाले नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली एकामागे एक येते खळाळत लाट लाट लपाछपीमध्ये होते दिनरात नि पहाट थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा!

वाचने 10992
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया