मी पुन्हा आपला पावसात भिजलेल्या, बावरलेल्या कुत्र्याच्या पिलासारखा तिथेच जरा वेळ उभा राहिलो. कार्यक्रम तर सुरू झाला होता. अगदी दयनीय, रडवेली अवस्था झाली होती माझी! :)
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.छान आठवण आहे.
मला तात्यांचा जितका हेवा वाटतो त्याहून अधिक त्या द्वारपालाचे कौतुक वाटते.'खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविनं राई राई एवढ्या' ची आठवण जागृत झाली.
एव्हाना त्या द्वारपालातला पुणेकर जागा झाला होता!
हा हिणकस शेरा अनाठायी वाटतो.
अनुभव कथन थोडं पाल्हाळीक असलं तरी चांगल रंगवले आहे. पण तुमची पंडीतजींची ओळख असल्याने तुम्ही त्यांच्या वशील्यावर आत घुसु शकलात त्यात आपले काम चोख बजावणार्या त्या द्वारपालाला का बोल देता? ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला. आजकालच्या जगात सगळे वशिले लावुन काम करत असताना कोण आपली जवाबदारी इतकी चोख पार पाडतं? तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना? पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते.
स्वातीजी,
त्यात आपले काम चोख बजावणार्या त्या द्वारपालाला का बोल देता?
आपण माझ्या लेखातलं खालील वाक्य पाहावं!
मला त्याही परिस्थितीत त्याचं कौतुक वाटलं! तो बापडा आपलं काम अगदी चोखपणे बजावत होता!
मलादेखील त्या देशमूख द्वारपालाचे कौतुक वाटले असेच मीही लिहिले आहे!
ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला.
का बरं? तो द्वारपाल जर एवढा चोख होता, कुणाचीही भीडभाड बाळगणारा नव्हता, तर त्याने पंडितजींपुढे तरी शेपूट का घातलंन/घालावंन हे सांगा पाहू! का नाही त्याने पंडितजींना तेवढ्याच तेखात चोख उत्तर दिलंन?? सांगा पाहू! :)
तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना?
मान्य! मी ती कुठेही नाकारलेली नाही..
पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते.
मला जे करायचं होतं ते मी केलं, द्वारपालाला जे करायचं होतं ते त्याने केलंन, आणि पंडितजींना जे करायचं होतं ते पंडितजींनी केलं! :)
असो.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
आपला,
(पंडितजींचा भक्त!) तात्या.
आपुलकीने प्रतिसाद देणार्या सर्व मंडळींचे मनापसून आभार..
ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार.. :)
तात्या.
प्रतिक्रिया
वा तात्या वा!
सही आहे आठवण !
+१
असेच म्हणतो
खरंच..
तात्या
केशवाशी सहमत आहे!!!
हेच म्हणते.
छान आठवण आहे.
छान वर्णन
वा तात्या
जबरा!
भाग्यवान खरे
तुम्ही
खरोखर
चारशे जन्म .......
काढून टाकला आहे..
खूप छान...
धन्य
कौतुक..
वा
अनुभव कथन
स्वातीजी
तात्या भाग्यवान आहात
आभार..