अतिशय जिवंत मास्तर. व्वा पिडांकाका. फार जिवंत व्यक्तिचित्रण. मास्तर साक्षात डोळ्यांसमोर उभे ठाकले आणि आम्हीही तुमच्याबरोबर त्यांच्यासंगे शाळेत वावरलो मिनिट-दोनमिनिट. दूरदर्शनवरील माझ्या लाडक्या 'संस्कार' मालिकेतल्या देव सरांची आठवण झाली पुसटशी.
(स्मरणशील वाचक)बेसनलाडू
काका, लई जबराट लिवता तुम्ही.....
एकदम शाळेत जाऊन आलो बघा.....
मनात तासाची घंटा देखील वाजली.....
जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर.........
तर आपल्या या हरामखोर राजकारण्यांना जाती-पाती चे राजकारण करता आले नसते.....
(मास्तरांनी फेकुन मारलेले डस्टर बर्याच वेळा चुकवण्यात यशस्वी झालेला)
मदनबाण>>>>>
देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?
सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले....
"अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....."
आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!"
कधी गावंढळ तर अचानकच मध्ये शहरी भाषेत बोलणारे मास्तर - त्यांचे त्यातल्या त्यात घेतलेले कलंदर बेअरिंग - चुटकीसरशी डोळ्यात पाणीबिणी आणि शेवटी निरगाठ - उकल या तंत्राबरहुकूम 'जाळुनि टाका या भिंती' असा एक फडके खांडेकर संदेश - तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा...
सन्जोप राव
कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!!
हेच जर अत्यंत सकस लिखाण असेल तर हा लेख निव्वळ "मसाला मिक्स" कसा काय?
असो आपापले मत, ज्याची त्याची आवड!!
मला लेख आवडला. व्यक्तीचित्र, भेदभाव, आठवणी सगळे छान गुंफले आहे
कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!!
कोणत्या लेखकाने हेच लेखन केले असते म्हणजे या पेक्षा सरस लेखन किंवा दर्जेदार कथा होऊच शकत नाही, असे कोणी कोणास म्हटले असते ? ;)
अवांतर : सहजराव, उत्तम निरिक्षण !!! चालू दे, चालू दे !!! कधी कधी आपले विचार काय जूळतात राव !!! :)
कुणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे हे बघून त्यावर मत देणे असे वस्तुनिष्ठ रहाणे कठीण आहे. ते जमले नाही, तर त्यात शल्य मानून घेऊ नये. ज्याची त्याची आवड हे तर आहेच.
सन्जोप राव
असेच लेखन [आय मीन प्रतिसाद] वाचुन तर कळले हे असे वस्तुनिष्ठ रहाणे खरचं कठीण आहे. अगदी भले भले देखील भ्रमात असतात व गंमत ही की आपण फसलो गेलो हे देखील त्यांना कळत नाही. :-)
तू माझ्याकडे चित्रासाठी का आला? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!"
संजोपराव आपली प्रतिक्रिया वाचून हे वाक्य उद्धृत करावसं वाटलं :)
अर्थात हे चलनी नाणे आहे
कोणतेही नाणे उगाच चलनी होऊ शकते पण ते हमखास चालण्यासाठी त्यात काहितरी खास असावेच लागते.
बाकी,
डांबिसराव,
मला हा लेख फार फार आवडला. मास्तर आणि शाळा डोळ्यासमोर अतिशय ताकदिने जिवंत उभे केलेत
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
अहो प्रत्येकाची आपली निष्ठा असते. दैवतं असतात. त्यांना आपापल्या चष्म्याबाहेरचं काहीच दिसत नसतं. त्यांना माफ करा. दोष त्यांचा नाही, नजरेचा आहे.
लेख आवडला. शैली सुरेख आहे. पु.ले.शु
तुमचा
न चालणारा
(खोटा पैसा) तेज
डोक्यावर केसांची चहासाखर झालेली............मस्त शब्द निवडलेत हो काका.:)
तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा... :(
सन्जोप काका तुम्ही भडकमकर मास्तरांच्या वर्गातुन बाहेर पडलेले समिक्षक आहत का हो.? बाकी म्हणा तुम्हाला तिथे प्राचार्यशिपच असेल.
आमच्या डाम्बीस काकाचा लेख उगाच त्या चश्म्यातून पाहु नका. "सोड्याने पातळ" वगैरे असली फडकी त्या ला गुंडाळु नका.
हे म्हणजे उगाच आमरस चाखत असताना त्यात हिंगाचे खडे आल्यासारखे वाटते.
:::::::डाम्बीस काकांचा लेख वाचुन आनन्दीत झालेली बकुळफुले
आमरस कुठला आणि हिंगाचे खडे कुठले हाच प्रश्न आहे. 'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?"
हा उलगडा जोवर होत नाही तोवर आपण सुहास शिरवळकर जरुर वाचत रहा. आमची काहीही हरकत नाही...
सन्जोप राव
'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?"
एक लहानशी सुधारणा..!
वरील वाक्य हे माधवरावांनी बापूंना उद्देशून म्हटलेले नसून रामशास्त्र्यांनी गंगोबातात्यांना उद्देशून म्हटले होते असे आठवते!
बाकी चालू द्या! :)
आपला,
तात्या देसाई.
डांबिसखान हे व्यक्तिचित्रे लिहीण्यात खरोखरच चँपियन आहेत हे वाचताना पटले. एखाद्या व्यक्तिचे काने-कंगोरे टिपणे , त्याचे चित्रदर्शी वर्णन करणे , आणि या सार्याला एका कथानकाच्या एका धाग्यात बांधणे याचे १०० गुण सुलेशबाबूना द्यायलाच हवे. उस्ताद डांबिसखां ,
आप यूंही अगर ऐसे लिखते रहें, देखिये एक दिन दिवान्-ए-डांबिस बन जायेगा ! :)
अवांतर : संजोपरावांच्या मताचा एक वाचक म्हणून मला आदर वाटतो. प्रस्तुत लेखाला प्रतिक्रिया देताना त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेतला आहे ही गोष्ट खरी. माझी सदर लेखकाला अशी विनंती राहील की त्यांनी या उक्तीमधले काटे बाजूला काढून त्यातील वर्माकडे लक्ष द्यावे. माझी खात्री आहे की डांबिसखानाना त्यात स्वत:च्या गुणवत्ता असणार्या लिखाणाला अजून कलादृष्ट्या चांगले बनविण्याबद्दलशी सूचना दिसेल.
गावित मास्तरान्चा आणि तुमचा संवाद अगदी नजरेसमोर घडतोय असंच वाटतं...
आपल्याला अगदी शाळेच्या दिवसांची आठवण झाली...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
फार सुंदर लिहीले आहे. आवडले. अभिनंदन.
"आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!'
"असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?"
हृदयाला भिडणारे शब्द आहेत.
कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या.
शेवटी खरे उत्तर देण्याचे शिताफीने टाळलेत. ते दिले असतेत तर निदान आमच्या ज्ञानात तरी भर पडली असती. ह्हा:.... ह्हा:...ह्हा:..
गावित मास्तरांचं व्यक्तिचित्रं ठीक वाटलं रे डांबिसा. परंतु फारशी पकड घेतली नाही असं माझं व्यक्तिगत मत...
कोई बात नही, औरभी जरूर लिख्खो...
पुलेशु..
आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
चर्चा करायची संधी मिळेल अशा अपेक्षेत
श्री राव
आपला रोख नेमका कुठल्या मुद्द्यावर आहे ते स्पष्ट झालेले नाही. आपण आपल्या प्रतिसादात 'एक फॉर्म्युला' दिला आहे तो बर्याच प्रमाणात ह्या लेखनाला लागू पडू शकतो पण तेवढाच जर आक्षेप असेल तर बहुतेक सर्व लेखन हे ह्याच गटात मोडते असे आपल्याला आढळून येइल. वेगळी वाट चोखाळणारेही अर्थातच आहेतच पण अल्पसंख्य आणि 'चलनी' असतीलच असेही नाही. मग नेमका आक्षेप कशावर ?
ह्याच बरोबर जर आपण काही 'सकारात्मक मार्गदर्शन' केले असतेत तर आमच्याही ज्ञानात थोडी भर पडली असती. शिवाय मला असेही वाटते की 'पिडा' नेही ती 'टीका' 'विधायक सवरुपातच स्वीकारली असती. आपल्या लेखांचा मी चाहता आहे आणि ते विविध ठिकाणी वाचून त्यांचा आनंदही मिळवला आहे पण ह्या ठिकाणी थोड्या अधिक खुलाशाच्या अपेक्षेत...
आणि जाता जाता - सु. शि बद्दल आपले मत काहीही असो - आम्हाला तो आवडतो - आवडत राहील. अहो 'क्लासेस' आणि 'मासेस' मधे तेवढातरी फरक शिल्लक राहू द्या की. :)
गावित मास्तरांवर मी लिहिलेली प्रतिक्रिया हे माझे वैयक्तिक मत आहे. मास्तरांचा शीघ्रकोपीपणा, त्यांचे इतर सहकार्यांविषयीचे मत (मॅडम, देशमुख मास्तर) यावरुन हे पात्र मला मुद्दाम चितारलेले - उबवलेले वाटले. त्यांच्या भाषेत सलगता नाही. लेखकाने 'कठीन, आनुन, शेन्या' वगैरे शब्द जाणीवपूर्वक मास्तरांच्या तोंडी - त्यांचा ग्राम्यपणा अधोरेखित करण्यासाठी घातले आहेत. पण हेच गावठी मास्तर मधूनच खांडेकरांच्या पात्रांच्या तोंडी शोभावी अशी भाषा बोलून जातात, हे खटकण्यासारखे आहे. शेवटचा जातीयवादाचा उल्लेख तर अगदी प्लॅस्टीकसारखा आहे. या व्यक्तीचित्राचा शेवट कसा करावा याबाबत खुद्द लेखकच गोंधळल्यासारखा वाटतो. पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे - म्हणून तो चलनी नाण्याचा उल्लेख.
व्यक्तिचित्रे ही प्रत्यक्षातली माणसे असलीच पाहिजेत असे नाही. पण ती प्रत्यक्षातल्या माणसांसारखी वाटली पाहिजेत. 'व्यक्ती आणि वल्ली' मधील पात्रे जर तुम्हाला प्रत्यक्षात भेटली तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न पु.लंना विचारला तेंव्हा ते म्हणाले की 'मी त्यांना कडकडून भेटेन!' (यावर 'कुठे पु.लं आणि कुठे आम्ही सामान्य लेखक... कशाला चिकित्सा करताय दादा..आम्हाला चार घटका इथे मजा करु द्या की राव... का डोकं पिकवताय ...असे म्हणणार्यांनी खुशाल म्हणत रहावे) 'नंदा प्रधान' पासून 'रावसाहेब' पर्यंत प्रत्येक व्यक्तिचित्रात पु.लंनी आपला मसाला घातला आहेच, पण तो त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ' बांगड्याचा आब राखून तिरफळाने झणझणावे' असा. गाबित मास्तरांच्या बाबतीत मला मसाला फार आणि आत बांगडाच नाही- दाढी हातभर आणि आत बुवाच नाही - असे वाटले.
हेच सगळे मी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत - थोड्याशा सांकेतिक भाषेत लिहिले होते. ( मला जे म्हणायचे होते, ते फक्त मुक्तसुनीतांना समजल्यासारखे वाटते) सुहास शिरवळकरांचा उल्लेखही असाच होता. इथे 'क्लासेस-मासेस' असे वर्गीकरण करण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न असा आहे, की हे सगळे का लिहावे? किंवा इतका विचार तरी का करावा? तर यात लेखकाच्या लेखनकष्टाला मान देण्याचा भाग आहे. लेखक ज्या गंभीरपणे लिहितो, त्याच गंभीरपणे वाचकाने ते वाचले पाहिजे. आणि आपल्याला जे वाटते, ते स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे. एकंदरीत संकेतस्थळांवरील लिखाणाचा शब्दढाळ पहाता प्रत्येक लेखकाच्या बाबतीत हे शक्य आहे असे नाही, पण 'पिडां' सारख्या लेखकाचे लेख, अगदी त्यांच्या प्रतिक्रिया, मुद्दाम वाचण्यासारख्या असतात - आवडणे , न आवडणे हा वेगळा भाग झाला - म्हणून इतका खटाटोप. नाहीतर उथळ व्यक्तीचित्रांची आणि त्यांना फेटे, रुमाल उडवत 'माशाल्ला, सुभानल्ला' म्हणणार्यांची वानवा नाही. त्यांनी - शिरवळकर वाचणार्यांप्रमाणे - तसे करत रहावे. ते तसे करत असतातच.
सन्जोप राव
पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे -
वरवरचा वाचक? हा काय नवीन प्रकार आहे हो राव साहेब? :)
आपला,
(खालखालचा वाचक) तात्या साने.
नविन प्रकार नाही तात्या. मागे कधीतरी सर्किट काकांनी ह्यावर संशोधन केलेले होते बघा.. लेख प्रकाशित झाल्यावर अर्ध्या मिनिटाच्या आत लेंड्यासारखे वा!वा! प्रतिसाद टाकणारे म्हणजेच 'वरवरचे वाचक' बहुदा!
-कोलबेर वरकरणी :)
शिरवळकर वाचणार्यांप्रमाणे =))
जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे.
कोणी चांगल्याला चांगले म्हंटले तर त्यात वाईट काय. सौंदर्य हे सौंदर्य असते . त्यात जात पात आणु नये क्लासेस आणि मासेस या जाती निदान मासेसच्या तरी डोक्यात नाहीत
मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज.
सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात.
खरं आहे.. डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे. सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय?
डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे.
वरील वाक्य वाचून एक विचार मनात आला तो इथे मांडत आहे -
मी पुढारलेला की मागासलेला, तसेच क्लासेस मधला की मासेस मधला हे मला माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची गरजही नाही, परंतु सत्यजित रे चे एकापेक्षा एक बोअर अन् कंटाळवाणे सिनेमे पाहण्यापेक्षा डेव्हिड धवनचे सिनेमे कितीतरी चांगले वाटतात आणि छान टाईमपास करणारे असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे!
सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय?
त्या उत्तान गाण्यातील करिश्माच्या कामूक हालचाली पाहून साली वासना अंमळ चाळवते एवढं मात्र खरं! उगीच खोटं कशाला बोला?! अर्थात, हेही माझं व्यक्तिगत मत! :)
आपला,
तात्या धवन..
जाउ द्या ना पाटील, कशाला मनावर घेऊन राह्यले, चालायचच. :)
कोणाला एखांदा लेखक लै भारी वाटतो, अन् एखांदा लेखक लै फालतू लिव्हतो अस्स बी वाटू शकतं.
खरं म्हण्जी काही लोकायले वाटते, आपून जे वाचतो ते सा-यात भारी वाचतो, अशा भ्रमामधी फिरत राहत्यात ती लोकं . खरं म्हण्जी अशाच समीक्षकायनी मराठीत काही लिहू पाहण्या-या, लिव्हणा-या लेखकाची पीढीच बर्बाद केली, अस्स वाटून जातं. नवं काही लिव्हण्याची हिम्मत गमावून बसलेत लेकाचे.
खरं म्हण्जी इथं हाटेल म्हणल्यावर लै येगयेगळ्या गुणाचं लोक येत राहतीन, काही लोकांमधी गूण जसे राहतेत तसे दोष बी अस्तेन का नाय. खरं म्हणजी तुम्ही लोकं अस्सं दांगडू घालतेत म्हुन मिसळपाववरुन माणसाचं मन उडून जातं अशी तक्रार दुस-या गावात वाचाला मिळते ना भो !!!
मिसळपाव खेडूत
(रोहिण्या बरसल्या नै म्हणुन नाराज मिसळगावचा शेतकरी )
डागदर सायेब असल्या समीसक्षकांच्या समीक्षा वाचुन शान हिम्मत गमावुन बसलेली पुचाट पीढी बरबाद झालेलीच बरी की राव!
काही का इशय असेना पण लिव्हणा-याची पीढी बर्बाद झाली तर चालते, पण समिक्षा जीवंत राह्यला पाहिजे, असे म्हणाचे का आपल्याला.
मंग काय बोलु भौ आता !!!
-पुचाट लेखक
डागदर बिरुटे
व्ह्यय! असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल..
समीक्षा जिवंत राहीलीच पाहिजे...पण प्रसंगी मुक्तसुनित ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे त्यातले वक्रोक्तीचे काटे बाजुला करुन आपले वर्म ओळखुन पुढे जाता आले पाहिजे..
बरबाद होणे सोपे आहे!
असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल..
हा, हे बाकी खरच बोलला की राव, पण अशी हिम्मत किती लोकामधी हाये हे आधी सांगा !!!
साहेब, तुम्ही इशय काढला म्हुन सांगतो, आमच्या गावाकडं ग्रामीण साहित्यातला एक लै मोठा लेखक त्याचं नाव 'बंकट पाटील' त्याची दहा, बारा पुस्तकं प्रसिद्ध हायेत. एकापेक्षा एक जोमदार लिव्हले. पण तुमच्या या समिक्षकायनी त्यायच्या लेखनाकडे पार डोळेझाक केली. आता कुठं कुठं ऐकतो आम्ही त्यायचे नाव ग्रामीण साहित्याचा आढावा घेतांना. पर ते जीवंत असतांना अस्स सूख नाय मिळालं तेन्ला. तरी बी ते लिव्हीत गेलेच, लोकायनी तेन्ला मोठं केलं !!!
जाउ द्या, आधीच ह्यो इषय लै पांगला बोला दुसरं काही तरी !!! :)
जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे.
इथे जी.एं. चा उल्लेख करण्याचे प्रयोजन स्पष्ट आहे. पण हे 'पुढारलेले' व 'मागासलेले' हे वर्गीकरण कुणी केले हे स्पष्ट झाले तर बरे होईल. हा दांभिक समज असणारे 'अस लोकं'- पक्षी असे लोक - कोण हेही कळाल्यास बरे.
'क्लासेस आणि मासेस' हा मुद्दा श्री. वाचक यांनी उपस्थित केला आहे, त्यामुळे तेच त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील, असे वाटते.
मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज.
असहमत. मराठी साहित्यात ढीगभर उदाहरणे आहेत. इंग्रजीत ताबडतोब आठवणारा वुडहाऊस आहे. हिंदीत प्रेमचंद, बच्चन, महादेवी वर्मा, हरीशंकर परसाई आहेत. अमोल पालेकर, जब्बार पटेलांचे सिनेमे आहेत, वळू आहे, टिंग्या आहे, बिमल रॉय, गुलजार, हृषीदा आहेत... ही न संपणारी यादी. त्यामुळे हा असलाच तर गैरसमज आहे.
सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात.
खरे आहे. सु.शि. सोडून इतर वाचणारेही त्या त्या वाचनाचा लगेच - लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक- आनंद घेऊ शकतातच.
सन्जोप राव
लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक
अहो राव साहेब, लगेच म्हणजे शब्दश: लगेच!
जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं! ;)
बाय द वे, सुशी आणि चंका या नावांची निदान मला तरी ऍलर्जी आहे हे या निमित्ताने नमूद करू इच्छितो. बाकी चालू द्या... :)
आपला,
तात्या कुलकर्णी.
जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं!
हे कुणी सांगीतलं? जी एं च्या कथांमधील काही काही वाक्य इतका आनंद देऊन जातात की अक्षरशः पुस्तक बंद करुन सावकाश पणे मनात ती वाक्ये घोळवुन पुढे जावेसे वाटते.
आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात?
अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!
कोलबेरराव,
हे कुणी सांगीतलं?
कुणीच नाही! कदाचित विजूभाऊंना तसं वाटत असावं असा आपला माझा अंदाज! तेव्हा चूभूदेघे! :)
आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात?
इन्सटंट आनंदाचा मी पुरस्कर्ता झालोय असं मी कुठे म्हटलंय? मी फक्त विजूभाऊंना काय वाटत असावं याचा अंदाज बांधून रावसाहेबांना उत्तर दिलं आहे. कदाचित, विजूभाऊंना तसं वाटत नसेलही! तेव्हा पुन्हा चूभूदेघे! :)
अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!
मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद! :)
तात्या.
<:P अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!
मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद!
खाण्यात तर इंस्टंट आनंद असतोच की. :)
आता बघा तिखटजाळ सँपलमधे नुसता पावाचा तुकडा बुडवून नुसता बघा. त्या पावावर अशी काही लाली चढलेली असते, आहाहाहा. अगदी गालावरच्या गुलाबी लालीएवढीच ही पण लाली आकर्षक असते. इंस्टंट आनंद आहे की त्यात. कदाचित रस्सा आणि मिसळ बनवण्यात कष्ट असतील पण खाण्यातला आनंद किंवा दु:ख आहे की इंस्टंट.
राहीला गाण्यातला इंस्टंट आनंद. 'इंद्रायणी काठी', 'रम्य ही स्वर्गाहून लंका', 'बगळ्यांची माळ' ,गीत रामायणातील हरएक गाणे. आहेत की इंस्टंट आनंद देणारी.
(गाण्यातले काही न कळणारा खादाड)
पुण्याचे पेशवे
व्यक्तिचित्र आवडले. खास शैलीत कथेतील इतर पात्रं आणि सुत्रधार रंगवायची हातोटी वखाणण्याजोगी. पण शेवट मात्र थोडास ऍब्रप्ट आणि कृत्रिम वाटला. तरीही दुरावा पेक्षा हे कथानक जास्त आवडले हे नक्की. अब्दुल खान > गावित मास्तर > दुरावा.
अवांतर : उद्गारवाचक चिन्हांचा थोडासा अतिरेक झाल्यासाराखा वाटतो!!!!!
प्रतिक्रिया
केवळ अप्रतिम
खरच खुप
गेले ते दिन गेले.....
वपु आणि साने गुरुजी
अच्छा?
:)
रायटिंग, नॉट दी रायटर
अगदी खरे बोललात
तू
(बद)चलनी
हिंगाचे खडे
आमरसातला हिंग
एक किंचित सुधारणा!
हीहीही!
खुमासदार चित्रण
मला आवडला....
खूप छान लिहिलंय राव...
हेच सांगते..
वा ! छान
व्वा..
मस्त !!!
मस्त !!!
सुंदर...
आवडलं
माझी तर
हम्म!
आवडले.
झकास ........
ह्या निमिताने श्री संजोप रावांशी
हार्दिक आभार!
वैयक्तिक मत
एक प्रश्न! :)
नविन
हा हा हा :)
क्लासेस आणि मासेस
खरं आहे..
सत्यजित रे चे एकापेक्षा एक बोअर अन् कंटाळवाणे सिनेमे..!
जाऊ द्या ना भौ :)
खरं
डागदर
व्ह्यय!
हे बाकी पटलं
खरे आहे
लगेच म्हणजे...
जी ए वाचून
धन्यवाद,
मला याची
काय हे तात्या! असहमत. :)
लगेच म्हणजे वाचत असतानाच
व्यक्तिचित्र आवडले