मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्वासगंध

सार्थबोध ·
श्वास गंध तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ||१|| सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ||२|| चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ||३|| कधी नीज लागली, न कळे मुळी मला सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ||४|| जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ||५|| -सार्थबोध

कुंदन मोर

इशा१२३ ·
कुंदन मोर r नमस्कार मंडळी! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची खरेदी केली असेलच. कपडे खरेदी , भेटवस्तू याबरोबरच महत्त्वाची खरेदी असते ती गृहसजावटीच्या वस्तूंची. मोठ्या वस्तूंपासून ते छान छान पणत्या, दिवे, तोरण, लाइटच्या माळा इ.

स्पंदना 29/10/2014 - 04:35
अप्रतिम!! मी कोयर्‍या आणलेत लाकडाच्या. आता हे पाहून, नक्की कस बनवायचं ते समजल. धन्यवाद.

शुभ्र मोगर्‍याची कळी

मिसळलेला काव्यप्रेमी ·
शुभ्र मोगर्‍याची कळी शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही कधी? --- पहाटेच्या दवात भिजलेली आता उमलावं की नको या विवंचनेत गुंतलेली शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- पाहता पाहता पहाटेची सकाळ झाल्यावर हलकेच डोळे मिचमिचे करुन हिरवे हिरवे जग बघून शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- सकाळ कलंडतांना आळसाने भरलेले डोळे चोळत त्या एका वेड्याची वाट पाहणारी शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- तो आल्यावर पटकन त्याच्यासमोर उडी घेणारी लाजरी बुजरी शुभ्र मोगर्‍याची कळी पाहिलीये का हो तुम्ही? ---- तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना ग

बहुगुणी 21/10/2014 - 22:11
वाचणं वसूल! अर्थातच आवडली...तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना गोळा करुन एका सुंदरश्या गजर्‍यात माळून जेव्हा तिला देतो तेव्हा त्याच्या समोरची शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? पाहिलीय, पाहिलीय, ओंजळीतल्या कळ्या फिक्या पडतील इतकी लाजली होती :-) कंबख्त, तुमने भी क्या याद दिलाया?

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

माहितगार ·

मदनबाण 20/10/2014 - 16:19
धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे हिंदूंची हजारो मंदिर पाडुन त्यावर अनेक ठिकाणी मशीदी उभारल्या गेल्या, हजारो स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि त्यांनी जनान खान्यांची शोभा वाढवली. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका असे सांगणारे "महात्मा" हिंदूच होते आणि एव्हढे होउन सुद्धा जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. या पेक्षा अधिक सहिष्णूतेचे ? उदा. मला तरी देता येणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by बाबा पाटील

मदनबाण 21/10/2014 - 12:20
आपण इथे प्रकट होणार याची खात्रीच होती ! http://www.misalpav.com/comment/448681#comment-448681

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

बाबा पाटील 21/10/2014 - 20:34
तत्कालिन वृत्तपत्रे,इतर दृकश्राव्य माध्यमे अथवा तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही.

In reply to by बाबा पाटील

माहितगार 21/10/2014 - 21:14
मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय मिपावर दोन्ही बाजूने बरेच चघळून झाले असणार त्या साठी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी भरपूर धागे आहेत. हिंदू मुस्लीम या शिवाय सुद्धा पार्सी ज्यू इत्यादी इतरही धर्म विचार भारतात होते/आहेत त्यांचे काही चांगले अनुभव भारतात असणार. या धाग्यावर शक्यतो विवादात न अडकता केवळ सौहार्दाची इतर प्रमाण स्रोतांचे संदर्भ देऊन दखल घेण्यात सहकार्य हवे आहे.

In reply to by बाबा पाटील

@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही. >>> पुरावा म्हणताय ना?,मग मी पुरावा ठेवतो.फक्त परत गांधीबाबाच नाव घ्यायचं की नाही? ..ते तुमचं तुंम्ही ठरवा. (मला त्याच्याशी काहिही कर्तव्य नाही. :) ) संदर्भ :- आचार्य अत्रे यांचं, यंग मॅन्स हिंदू एसोसिएशनच्या, गणेशोस्तवातील दिनांकः-२३/९/१९४७ रोजीचं "मी मुळीच बदललो नाही" हे भाषण. (पुस्तकः- हशा आणि टाळ्या,पानः-२२४.) प्रसंगः- बंगाली स्त्रीयांनी गांधीना विचारलं:- गुंडांनी आमच्यावर हात टाकला,तर आंम्ही काय करायचं?. गांधींचे वक्तव्यः- श्वास रोखुन धरा म्हणजे तुमचे प्राण जातील,आणि अब्रू वाचेल. यावर (काहि) डॉक्टर लोकांनी असे सांगितले,की (अश्या वेळी) श्वास रोखुन धरल्यावर,प्राण न जाता शुद्ध हरपेल,आणि गुंडांचं दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येइल.(मरणार नाही.) यावर गांधिंचं वक्तव्यः- (स्त्रीयांनी) विषाची कुपी जवळ बाळगावी. (आपल्या समोरील जनसमुदायाला)सदर प्रसंग सांगून (ज्याला फाळणीच्या वेळचा हिंदू-मुस्लिम दंगलीचा संदर्भ आहे.) भाषणात आ.अत्रे अत्यंतीक त्वेषानी आणि तीव्र दुखा:नी जनसमुदायासमोर काय म्हणतात??? आ.अत्रे:- "अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. स्त्रीयांनी विष खाऊन मरावे,आणि (दंगलखोर मुस्लिम) गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये, हे जर का गांधिजिंच्या अहिंसेचे भयानक तत्वज्ञान असेल,तर आग लागो रे त्या गांधिजिंच्या अहिंसेला! (पुढे भावविवश झालेला जनसमुदाय या निर्भिड वक्तव्यावर काहि काळ टाळ्या वाजवत रहातो.) ============================================================= बाबा पाटील सदर भाषण हे फाळणी केल्यामुळे गांधींवर चिडलेल्या आणि काँग्रेसी व गांधी तत्वज्ञानाला सोडचिठ्ठी दिलेल्या (एकेकाळच्या कट्टर गांधी/काँग्रेससमर्थक) आत्र्यांचे आहे. आपण ज्या अनुषंगानी प्रश्न विचारला अगर मत व्यक्त केले आहे.ते पाहू जाता आपण सदर पुस्तकातील ते छापिल भाषण संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.(असे मला वाटते. :) )

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 22/10/2014 - 08:21
संघर्षकालीन लैंगिक हिंसा विषयावर उशिरा का होईना युनायटेड नेशन्सला जाग आलेली दिसते. UN Action Against Sexual Violence in Conflict हि संस्था या विषयावर काम करते आहे. पुरुष मंडळी धर्मग्रंथ स्वतःस सोईस्कर राहतील हे बघतातत आणि संधी मिळाली की पुरुष सुटतात. अयोग्य ते अयोग्यच यात उजवा डावा कसचं काय. अबकड समुदायाचे पुरुषच केवळ वाईट वागतात हळक्षज्ञचे पुरुष वाईट वागत नाहीत असे नसावे. Category:Wartime sexual violence हि इंग्रजी विकिपीडियावरील कॅटेगरीत सगळे एकाच तराजूत असतात हे दाखवणारे पुरेसे लेख आहेत. आपणही एखादा लेख त्या कॅटेगरीत जोडू शकलात तर संघर्षकालीन लैंगिक हिंसा या बद्दलचे दस्तएवजीकरणात मदतच होईल. या बद्दल अधिक चर्चा इतर धाग्यातून करता येईल. या धाग्याचा उद्देश मर्यादीत आहे त्या दृष्टीने धागालेखास अनुसारून प आपल्या सक्रीय सहभाचा अभिलाषी आहे.

माहितगार 21/10/2014 - 13:15
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. मला नक्की माहित नाही की आता पर्यंत आलेल्या प्रतिसादातील चर्चा "आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान" या धाग्यात अधिक सयुक्तीक असेल किंवा कसे.

मदनबाण 21/10/2014 - 13:28
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. अहं... असे अजिबात नाही ! पण हा देश हिंदूस्थान आहे आणि एक हिंदू म्हणुनच मी माझे व्यक्त केले आहे.सहिष्णूतेच्या नोंदींची दखल ही हिंदूस्थानातील हिंदू लोकां पासुनच करायला हवी ! या हिंदूस्थानाने हिंदूं व्यतिरिक्त सर्व धर्मांना या हिंदूस्थानात त्यांच्या {इतर} धर्मावर कोणतीही बंधने न आणता सर्व स्तरांवर / पदांवर आणि जगण्यात मो़कळीक दिलेलीच आहे की. अहो इतके सहिष्णूता {?} भिनलेला हिंदू समाज जगात विरळाच बघा ! जाता जाता :- लांगूलचालन हा फारच सौम्य शब्दप्रयोग वाटतो. असो.

वेल्लाभट 30/10/2014 - 17:06
तुमचे वरील सगळे प्रतिसाद जबर आहेत. भावार्थी मी त्यातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे हे वे सां न ला. पण त्यातील उल्लेखिलेली पुस्तके आता वाचली पाहिजेत. ***!

In reply to by माहितगार

माहितगार 21/10/2014 - 19:27
काय बाते पाक माध्यामातून बदला बदला आवाज कशामुळे सर्व ठिक असेल अशी आशा करून, आणखी एक दुवा http://www.dawn.com/news/1138373

आपला काहितरी गैरसमज होत आहे. भारतातच काय किंबहूना अखंड जगातच धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा नावाची चीज अस्तीत्वात नाही. तसा समज होण्याची कारणे खालीलप्रमाणे. १. बहूसंख्य जनता ही कायद्याला घाबरते. २. बहूसंख्य जनतेकडे बाहूबल नसते. ३. बहूसंख्य जनतेला स्वतःचे डोके नसते. ४. बहूसंख्य जनतेला दुसर्‍याच्याच काय पण आपल्या धर्माविषयी पण पुर्णपणे माहिती नसते. योग्य संधी मिळाली, आपण पकडले जाणार नाही अशी यांची खात्री किंवा गैरसमज होतो तेव्हा हाच समाज धार्मिक सहिष्णूता आणी सलोख्याला हरताळ फासतो. वरील वक्तव्ये अतिरंजीत असली तरी तेच वास्तव आहे. अन्यथा दर १०-२० वर्षांनी जातीय दंगली झाल्या नसत्या. अवांतरः प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तो येथेही गृहीत धरलेलाच आहे.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार 21/10/2014 - 20:04
मला वाटतं मी या धाग्यासाठी फार मोठा म्हणजे काही हजार वर्षांचा काळ लक्षात घेतो आहे आणि एवढा मोठा काळ म्हटल्यावर सहाजीकपणे पूर्ण भारतीय उपमहाद्वीपाबद्दलही. ब्रिटीशपुर्व काळात राज्यकर्त्यांच्या कडेलोट, हत्तीच्या पायी देणे, चौरंग करणे अशाही अघोरी सजा होत्या (ब्रिटीशांनी काळेपाणी आणि फाशी असे प्रकार केलेच नाही असे नाही) तरी सुद्धा ब्रिटीशपुर्वकाळात ग्राम व्यवस्थेत राज्यकर्त्यांची दैनंदीन ढवळा ढवळ होती असेही नसावे. किमानपक्षी धार्मीक सौहार्दात कमी पडला म्हणुन सजा झाल्याचे भारतीय प्राचीन इतिहासात वाचनात नाही. संघर्ष प्राचीन इतिहासातही झाले असतील नाही असे नाही. पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. इतरांबद्दल कशाला, माझ्या व्यक्तीगत बाबीतही, एखाद्या व्यक्तीशी माझे सौहार्दाचे संबंध आहेत जेव्हा संघर्ष होतो तेव्हा आधीचे चांगले मी सगळेच विसरतो, संघर्ष मला स्वतःला विसरण अवघड जात. शिवाजी महाराज धार्मीक सद्भभाव पाळतात हा आदर्शच इतरेजनांसाठी पुरेसा असु शकतो प्रत्येकवेळी कायद्याचा धाकच असेही नसावे. दंगलींची कारण वेगळीही असू शकतात. नरहर कुरुंदकरांनी डेमॉग्राफीक चेंजेसचा उल्लेख केला आहे तो विचारात घेण्या जोगा आहे साधारणतः अत्यल्प मायनॉरिटीज या मेजॉरिटीच समर्थन करतात. एखादी मायनॉरिटी डेमॉग्राफिकली वाढते तसा सुप्त संघर्ष आकारास येत जातो. मुंबईत दक्षीणेच्या लोकांनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्या बद्दल अस्वस्थता निर्माण होते, बिहारींनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्याबद्दल अस्वस्थता निर्माण होते. अर्थात या धाग्याचा प्रमुख उद्देश हिंसेची चिकित्साकरणे नाही. तुमच्या मतानुसार शांतता अपवाद आहे तर अपवाद म्हणूनच ठिक पण त्या अपवादातील का असेना शांतता आणि सौहार्दाची नोंद घेणे असा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

अर्धवटराव 21/10/2014 - 21:32
स्वातंत्रोत्तर काळात भारतात लोकशाहि डेव्हलप व्हायला सर्व धर्मीयांनी अगदी मनापासुन हातभार लावला. हे सर्वात मोठं धार्मीक सहिष्णुतेचं उदाहरण. मनोरंजन क्षेत्रात, विशेषत: बॉलीवुडने धार्मीक असहिष्णुतेला अजीबात थारा दिला नाहि. लोकांनिही कला क्षेत्रात पंडीतजी आणि उस्तादजींना अगदी समान मान दिला.

इतर कट्टर देशांत प्रत्येक धर्म पाळायचा अन न पाळायचा एक खाका असतो , भारत त्या बाबतीत लिबरल आहे, धार्मिक सहिष्णुते ची उदहारण आपल्याला इतिहासात आदि मुग़ल काळात भरपूर सापडतील (हवीअसल्यास)कृपया "सतीशचंद्र भाग १,२ अन जे एल मेहता भाग ३" ही पुस्तके वाचावी संदर्भ म्हणून

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहितगार 22/10/2014 - 11:50
सतीश चंद्र यांचे हे एक पुस्तक गुगलबुक्सवर मिळाले, वाचतो आहे. माहितीपुर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

असंका 30/10/2014 - 17:55
पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात
करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?

In reply to by असंका

माहितगार 03/11/2014 - 09:21
करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी (विद्यासागर राव) पुण्यातील ज्यू धर्मीयांच्या लाल देवळाच्या दीडशेव्या वर्धापनदिनी हजेरी लावून "देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊन ज्यू नागरिक राहात आहेत." असे तोंड भरून कौतूक केले. अशा नोंदी उपलब्ध होत असतात. कुणी याकडे शासकीय अथवा राजकीय भूमीका म्हणून पाहू शकेल. पण कस आहे तुमच्या माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या जीवनात एखाद्या वेगळ्या धर्मीयांशी संबंध आल्यास सहसा सौहार्दपुर्ण वागतात हे वास्तव असूनही याची बातमी होऊन येत नाही म्हणून असे संदर्भ मिळण्यास वेळ लागतो. काही उपयूक्त संदर्भ याच धाग्यावर दिले गेले आहेत ते अभ्यासतो आहेच (अर्थात हे मी सवडीने, सावकाश करतो आहे). आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by असंका

माहितगार 11/11/2014 - 20:57
"मुस्लीम कवींची मराठी कविता" हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरास सादर केलेला किशोरकुमार कांबळे यांच्या प्रबंधात प्राचीन मुस्लीम (मराठी) कवींची काव्यपरंपरा हे प्रकरण आत्ताच वाचले. या धागा विषयास अनुसरुन खूप चांगली माहिती आहे. आणि अमुक तमुक समाजात बदल होतच नसतात या धारणेस एक छोटासा धक्का आहे यात.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 31/10/2014 - 15:39
हे फक्त हिंदूंसाठीच झाले का त्या शाळेत??? उत्तर नाही असेल तर त्यांनी केलेले बरोबरच आहे उत्तर होय असेल तर त्याबद्दल त्या शाळेला एकदा लेखी निवेदन दिले पाहिजे (ते हिसका दाखवणे नंतरपण करु शकतो) उत्तर माहित नाही असे असेल तर....जौध्या...मीप मिपावर गळा काढणारे कोणी ना कोणी येईलच

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 03/11/2014 - 09:27
मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक क्षेत्रातील अभिप्रेत शीस्त आणि मल्टीकल्चरीझमचा समतोल साधला जावयास हवा. सर्वच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना ते व्यवस्थीत जमत असे नव्हे पण अशा ठिकाणी सुधारणा हा वेगळ्या चर्चेचा महत्वपूर्ण विषय आहे.

In reply to by वेल्लाभट

माहितगार 02/11/2014 - 22:40
वस्तुतः धाग्याच्या कक्षे बाहेरचे विषय इथे चर्चा करून मनातली भडास व्यक्त करणे आणि तू मला सांग मी तूला सांगतो पलिकडे फारसे काही होणार नाही. त्या पेक्षा इंग्रजी विकिपीडियावरील असे सुयोग्य लेख शोधणे आणि माहिती संदर्भा सहीत जोडणे अधिक उचीत होऊ शकेल. किंवा अगदी इनटॉलरन्स इन कॉन्व्हेंट स्कूल्स असा लेख अद्यापतरी इंग्रजी विकिपीडियावर नसावा पण संदर्भासहीत तो तसा काढण्यास हरकत नसावी. किमान पक्षी भारतीय भाषी विकिपीडियांवर आपण असा लेख करून नोंदींची संदर्भासहीत ज्ञानकोशीय दखल घेऊ शकताच. बादवे आपण दैनिक सकाळची बातमी दुवा जो दिला तो अनुवादीत होऊन येई पर्यंत शिळा झाला असावा असे दिसते. दैनिक सकाळ ची दुव्यावरील बातमी वेळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 - 10:56 AM IST अशी दिली आहे. पण तत्पुर्वीच By Paras Ramoutar Port-of-Spain, Oct 30 (IANS) 14:30 दुपारी Mehndi on hands, Indo-Trinidadian girl back in class अशी बातमी IANS ने दिली आणि दैनिक सकाळला शिळ्याबातमीचा अनुवाद देईपर्यंत आदल्या दिवशीच्या दुपारच्या बातमीची दखल घेऊन अद्ययावत कराविशी वाटलेली दिसत नाही. एनी वे या दुव्यावर हि बातमी विस्तृतपणे वाचण्यास उपलब्ध दिसते आहे. धन्य तो दैनिक सकाळ

मदनबाण 31/10/2014 - 16:51
बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण! हिंदूस्थानात राहुन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांचा असा अपमान ! कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की

In reply to by मदनबाण

hitesh 03/11/2014 - 14:24
१९८४ साले इंदिराजीना जगन्नाथ पुरीच्या मंदिरात तिथल्या पुजार्‍याने प्रवेश नाकारला होता.. तेंव्हा तुमच्या पंतप्रधानाचा अपमान झाला नव्हता का ? बुखारीनी मोदीना नाही बोलावले तर इतका दंगा कशाला ? शाही इमामाचे पद जहांगिराने तयार केले होते. भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही.. पाकिस्तान मात्र स्वतःला मोघलांचा फॉलोअर समजतो.. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही हे बुखारी ठरवतील.

In reply to by hitesh

प्रचेतस 03/11/2014 - 17:22
इंदिरा गांधींना विरोध त्यांनी पारशी इसमाशी लग्न केल्यामुळे झाला होता. पारशी अग्यारींमध्ये इतर धर्मीयांना आजही प्रवेश नाही. हल्ली त्यांचे नियम बदलले असल्यास माहित नाही. बाकी धर्माचा मुद्दा सोडून दया. मोदींना बोलवणे अथवा न बोलावणे हा इमामांचा प्रश्न त्याला आक्षेप नाहीच. पण पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलावणे हे भारताला मुद्दाम खिजवण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

In reply to by प्रचेतस

hitesh 03/11/2014 - 17:43
यात खिजवायचा संबंध कुठे आला ? मोदी चीनच्या प्रमुखाला भेटु शकतात.. इमाम पाकिस्तानच्या प्रमुखाला का भेट शकत नाहीत ? पाकिस्तानला होणारी निम्मी निर्यात मोदींच्या गुजरातमधुनच होते.

In reply to by hitesh

प्रचेतस 03/11/2014 - 17:52
पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे की. बाकी ह्यात व्यापाराचा तसेच २ राष्ट्रप्रमुखांच्या भेटीचा बादरायण संबंध जोडलेला पाहून गंमत वाटली.

In reply to by प्रचेतस

+१ . . . शिवाय मोगलांना आपले का म्हणावे? याबद्दल काहिच उत्तर आलेलं नाही. आणि गंमत म्हणजे मोगालच स्वत:ला परकीय समजत होते, त्याचं काय?

In reply to by अत्रुप्त आत्मा

hitesh 04/11/2014 - 03:20
मोगल परकीय होते तर त्या मोघलानीच बसवलेल्या इमामाने मोदीना बोलावलेच पाहिजे हा हट्ट तरी कशाला हवा ?

In reply to by hitesh

खटपट्या 04/11/2014 - 03:27
हा इमाम बुखारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलावताना स्वत:ला समस्त भारतीय मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणवून घेतोय. कोणी दिले याला समस्त भारतीयांचे मुखत्यारपत्र? (म्हणे मोदी भारतीय मुसलमानांना जवळचे वाटत नाहीत) खालील लिंक बघा http://www.firstpost.com/india/who-said-you-represent-us-angry-muslims-ask-shahi-imam-after-he-snubs-modi-1783695.html हेच जर पाकिस्तानातल्या एखाद्या पुजाऱ्याने (किती शिल्लक आहेत माहित नाही) तेथील राष्ट्रप्रमुखांना न बोलावता, मोदींना बोलावले तर चालेल?

In reply to by प्रचेतस

hitesh 04/11/2014 - 04:34
हायला गंमतच आहे. बाईने पारशी पुरुषाशी लग्न केले तर तिला पारशी बनुन अग्यारीत जाता येते. त्या हिंदु पुजार्‍याने त्यांच्या नवर्‍यालाही हिंदु मानुन देवळात घ्यायला हवे होते की ! इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?

In reply to by hitesh

अर्धवटराव 04/11/2014 - 09:40
इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?
कधि येणार हिंदुंना अक्कल...

In reply to by hitesh

आजानुकर्ण 03/11/2014 - 20:45
पद कोणीही केलेले असो. भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण नाही आणि पाकिस्तानला निमंत्रण हा जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा आहे. इमामाची अक्कल जगन्नाथपुरीच्या पुजाऱ्यांइतकीच दिसते.

In reply to by hitesh

hitesh 04/11/2014 - 03:31
तपशीलात दुरुस्ती : शाही इमामाचे पद शाहजहानने निर्माण केले. सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा

In reply to by hitesh

माहितगार 04/11/2014 - 10:20
सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा
मोहरम आणि गूडफ्रायडेच्या शुभेच्छा संदेश देण्याची काही विशेष पद्धत असते का ? - अनभिज्ञ माहितगार

In reply to by hitesh

मदनबाण 04/11/2014 - 09:28
कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही ! या बद्धल २ शब्द टंकण्याचे कष्ट आपण का टाळलेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

नाखु 04/11/2014 - 10:38
बाणराव जिथे मिपावर रा.रा."ओवेसी" बद्दल अवाक्षर न काढणारे भंपक विचारवंत आणि स्वघोषीत स्व(माज) सुधारक आहेत तिथे तुमच्या रोखठोक प्रश्नाची काय पत्रास??? नेहमीप्रमाणे "इस्लाम" खतरेमे अशी बांग द्यायला तयार व्हा बरे!!!

In reply to by नाखु

माहितगार 04/11/2014 - 11:08
भारतातील धार्मीक असहिष्णूता आणि तणाव या स्वरुपाच्या चर्चा आधीच होऊन गेल्या असाव्यात म्हणून तसा धागा न काढताच पुढे गेलो. पण आवश्यकता असल्यास अजूनही तसा धागा काढता येईल. जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे. या धाग्यास कोणत्याही घाणीचे समर्थन करावयाचे नाही पण केवळ घाणच मोजत बसलो तर आपणही त्यातच बरबटले जाऊ असे वाटते. असो. या धाग्याचा उद्देश भारतातील जेनुआईन चांगल्या परंपरांची दखल घेणे एवढा मर्यादीत आहे. धागा लेखास अनुलक्षून प्रतिसादांचा अभिलाषी आहे. धन्यवाद.

In reply to by माहितगार

मदनबाण 04/11/2014 - 12:31
जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे. बुखारींचे उदा. मुद्दामुन दिले आहे, कारण हे शाही इमाम इथे हिंदूस्थानात राहुन असे वर्तन करु शकतात कारण तसे करण्याची "मोकळीक" त्यांना आहे, परंतु हे करत असतानाच ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवणे करुन ज्या हिंदूस्थानात राहतात त्याच देशातल्या पंतप्रधानांना मात्र मुद्धामुन आमंत्रण देत नाहीत हे निश्चितच अवमान करणारे आहे. त्यांचे हे उध्योग कोणत्याही कारणास्तव असोत, पण त्यांना असे वर्तन करण्यास मूभा आहेच ना ? सहिष्णुता असणे म्हणजे मोकाट सुटण्याचा परवाना असतो काय ? आणि म्हणुनच कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही ! असे मी म्हंटले आहे. हा उध्योग याच शाही इमामाने अरब राष्ट्रात केला असता का ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येइल. जर उत्तर नाही असे येणार असेल तर त्या मागचे कारण काय ? मुस्लिम राष्ट्र असुन सुद्धा भलतेच लाड तिथे खपवुन घेतले जाणार नाहीत ही खात्री, शिवाय अल्लाला प्यारे व्हायची भिती असते हे मुख्य कारण. इथे हिंदूस्थानात या दोन्ही गोष्टी नाहीत, त्यामुळे हे असले माज सहिष्णुतेच्या नावाखाली सहज सहन केले जातात. जाता जाता :- परवा कमला नेहरु पार्क मधे फोटो काढण्यासाठी गेलो असताना, तिथे अनेक मुस्लीम समुदायाचे लोक सुद्धा फिरायला आले होते, त्यात अनेक बुरखा परिधान करुन आलेल्या स्त्रीया देखील होत्या. थोडा वेळ फिरुन झाल्यावर आणि १-२ ठि़काणांचे फोटो काढुन झाल्यावर अचानक लक्षात आले की, बागेतल्या सगळ्या मुस्लीम स्त्रीया {१५-२० तरी असाव्यात} बागेतच नमाज पठण करु लागल्या ! ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ?

hitesh 04/11/2014 - 13:36
कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही. अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो , त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे. बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो. मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ?

In reply to by hitesh

बाळ सप्रे 04/11/2014 - 14:03
बुखारींनी बोलवावे काहीच हरकत नाही.. मोदींना बोलवु नये हे ही ठीक.. पण ही सरकारी भेट नसल्याने शरीफ यांनी राष्ट्रप्रमुख असुनही रीतसर व्हिसा काढुन सरकारी परवानगीने यावे..

In reply to by hitesh

मदनबाण 04/11/2014 - 14:23
कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही. अर्थातच... पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे. अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे. अहो इमाम मुसलमानांचे आहेत म्हणुनच इस्लामी राष्ट्रांचे उदाहरण देउनच प्रश्न विचारला आहे. हिंदूंची सहिष्णुता म्हणजे माज करण्याची मुक्त मुभा नव्हे. बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो. हॅहॅहॅ... ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ? हा प्रश्न नीट वाचला नाही का ? मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ? अरे व्वा... याच मुस्लीम समुदायाने आझाद मौदानात कायद्याच्या चौकटीत बसुन काय बांग दिली होती का ? स्त्री पोलिस अधिकार्‍यांवर हात टाकणारे कुठल्या चौकटीत बसुन हे अघोरी कॄत्य करत होते ? तेव्हा तुमची वाचा बसली होती का ?

नाखु 04/11/2014 - 14:52
पुन्हा विनंती.. आझाद मैदानातील "दैदिप्यमान" पराक्रमावर मिपावर कुठेही एकोळी धागा/चर्चा माझ्या पाहण्यात तरी नाही.त्यानुसार सोईस्कर्/बोट्चेपी धोरण कुरवाळणी असल्यावर अशा अदखलपात्र घटनेचा बागुलबुवा करू नका बरे!! "ओवेसींचे" फुत्कार आणि एमायएम प्रवेश ही त्याचीच वि़खारी फळे आहेत. स्वघोशीत वकिलांचे/हितचिंतकांचे स्वागत आहे.

In reply to by नाखु

मदनबाण 04/11/2014 - 15:02
ह्म्म... त्या दिवशी हिंदूस्थानातील सहिष्णू मुस्लिम समुदायाने केलेला पराक्रम :- हे सगळ कायद्याच्या चौकटीत बसुन ?

मदनबाण 04/11/2014 - 15:18
एक सांगायचे राहिलेच की, इथे शाही इमामांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलवणे केले आहे तर आझाद मौदानातील दंगलीत सहिष्णू मुस्लिम लोक पाकिस्तानचे ध्वज मिरवत फिरत होते. म्हणजे यांनी रहावयाचे इथे खावयाचे इथे, मात्र प्रेम पाकिस्तानाशी ठेवायचे !

hitesh 04/11/2014 - 16:32
तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता. आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु.

In reply to by hitesh

मदनबाण 04/11/2014 - 16:53
तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे. आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता. नक्की ना ? मग जरा सांगा ना, की त्यांची सहिष्णूता तेव्हा कुठे पेंड खायला गेली होती ? आणि त्यावर तुमचे मौलिक विचार देखील आम्हाला कळु दे. आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु. मी काय म्हणतो... सही करण्या पेक्षा तुम्हीच पत्र पाठवुन का पाहत नाहीत ? म्हणजे आम्हाला देखील तुम्ही सेक्युलर असल्याची खात्री पटेल. कसे ?

hitesh 04/11/2014 - 17:00
हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ... ..... आँ ! हे राष्ट्र हिंदुराष्ट्र !साआसाडेतीनशे वर्षे मोघल साडेतीनशे वर्षेक्ख्रिश्चन इंग्रज आणि नंतर साठ वर्षे काँग्रेस ! देशाचा विकास याच काळात झाला ना ? अआणि हे राष्ट्र म्हणे हिंदुराष्ट्र ! गंमतच की !!

In reply to by मदनबाण

माहितगार 04/11/2014 - 17:30
तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे.
@बाणराव, प्रार्थनेच्या पद्धतीचे स्वातंत्र्य हे खरेतर हिंदुसंस्कृतीचे खरेच मोठेपण आहे. एखादी व्यक्ती नमाज किंवा चर्ची किंवा अजून इतरही पद्धतीने प्रार्थना करूनही हिंदु असू शकते. हि सहिष्णूतेच्याही वरची पायरी आहे ह्याचा हिंदूनाही विसर पडतो कधी कधी. धन्यवाद

In reply to by hitesh

नाखु 04/11/2014 - 16:55
आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे.
आत्ता कश्शी खरी वळख दावली !! म्हणजे फक्त हे सरकार आमचे आणि आधीची सरकारे (बहुवचन काय रे बॅटोबा)तुमची काय ??? आम्ही सगळीच सरकारे आमची समजत होतो, म्हणून काम न केल्याबद्दल वेळोवेळी टिका करीत होतो. चुकलेच आमचे! स्वारी बरं का? जाता जाता: गुन्हेगाराना शासन करावे हे कुठल्याही मु.म.आणि पं.प्र. ला सांगावे लागत नाही.

In reply to by नाखु

hitesh 04/11/2014 - 19:08
आझाद मैदानच कशाला , कधी हिंदुत्व , कधी मराठीत्व असे मुद्दे घेऊनही तोडफोड झालेली आहेच.. त्याच्याबद्दलदेखील कुणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. मुद्दे वेगळे. पण तोडमोड आमच्याच मालमत्तेची झाली.

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ 04/11/2014 - 15:25
पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे
ही शक्यताच नाही. मोदी/भाजप सोडुन दुसरे कोणी असते तर निमंत्रण नक्कीच गेलेच असते. आणी निमंत्रण गेले नसते तरी ते पंतप्रधान न बोलवता गेले असते.

In reply to by प्रसाद१९७१

hitesh 04/11/2014 - 16:55
आणि काँग्रेसचे पंतप्रधान इम्मामाना भेटले असते तर मिपावरचे हेच लोक, ' काँग्रेसवाले बघा कसे लांगुलचालन करतात ' म्हणुन रडले असते.

In reply to by hitesh

अर्धवटराव 05/11/2014 - 00:16
कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे..
अजीबात नाहि. तो एका धर्मपीठाधीशाचा प्रश्न आहे. समस्त (वास्तवात समस्त नाहि) समुदायाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. सतत एकमेकांवर बंदुका रोखुन धरणार्‍या आणि एकमेकांप्रति कटुत्व बाळगणार्‍या अत्यंत संवेदनाशील राष्ट्रांचा देखील संदर्भ येऊ शकतो इथे. पेडगावला मुक्काम करायला हरकत नाहि, पण मग मनोरंजनाचं प्रयोजन तरि स्पष्ट करायचं ना.

In reply to by अर्धवटराव

hitesh 05/11/2014 - 02:51
इतकं पोटात दुखतच असेल तर कधीतरी शंकराचार्यांच्या एकसष्टीला तुम्ही पाकिस्तानी शंकराचार्यअंना बोलावून घ्या..

In reply to by अर्धवटराव

hitesh 05/11/2014 - 02:52

जेपी 03/11/2014 - 16:38
भीष्माचार्य किती वर्षाचे होते?>>>>> काय माहित नाय ब्बॉ. लै जुन ते. आश्यातला उदा.देतो. दे दी हमे आझादी,बिना खड़ग बिना ढाल वाला म्हातारा लढताना काय वयाचा होता.

माहितगार 04/11/2014 - 10:46
बुखारी पुराण हे ह्या धाग्याच्या कक्षेत येत नाही. सर्वच धर्मांमध्ये स्वतःची टिमकी वाजवून घेणारे काही असतात. काही लोकांच्या भाग्यात विरोधकांमुळेच प्रसिद्धी लिहिली असते आणि तुम्ही प्रसार माध्यमे असलेल्या राजधानीच्या ठिकाणी असाल तर प्रसिद्धीचा सोस चटकन भागवून घेता येतो. एखाद्या तथाकथीत धार्मीक व्यक्तीची अध्यात्मिक उंची त्याच्यातील सहिष्णूतेने ठरते का असहिष्णुतेने ठरते ? बुखारींचे वर्तन धार्मिक व्यक्तीकडून अभिप्रेत अध्यात्मिक उंचीचे दर्शन देणारे नाहीच. बुखारींच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांमध्येही विरोधाभास असतील नाही असे नाही परंतु एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही. एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन हा तर्कदोष आहे. भारतात धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत व्हावयास हवी हे खरे परंतु चुकीच्या असहिष्णू वर्तनाचे समर्थन अथवा लांगूलचालनाने धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत होण्यास हातभार लागत असावा असेही होत नसावे. राजकीय उद्दीष्टांनी चुकीच्या लांगुलचालनाने भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या परंपरांचे नुकसानच अधिक होत असावे आणि आतातरी हे लांगुलचालनाचे प्रकार थांबवावयास हवेत. आणि सोम्या गोम्यांची अनावश्यक चर्चा करून त्यांना अधिक प्रसिद्धी प्राप्त करून देणे किती श्रेयस्कर हा ही विचार व्हावयास हवा असे वाटते. ह्या धाग्यात कबिरांचे गुणगान जरूर करा. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद देतानाच, बुखारींप्रेमाचा कुणाल बुखार आलाच असेल तर संत कबीरांसोबत बुखारींची उंची एकदा तापासून बुखारी पुराण थांबवून भारतातील खर्‍याखुर्‍या धार्मीक सहिष्णूतेच्या उदाहरणाची दखल घेण्याच्या दिशेने या धाग्याची चर्चा जाईल अशी अपेक्षा करतो.

In reply to by माहितगार

प्रसाद१९७१ 04/11/2014 - 15:30
भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच. प्रश्न फक्त एकाच धर्माचा आहे. Odd Man Out अशी परिस्थिती असली की प्रॉब्लेम त्याचाच असतो बाकीच्यांचा नाही.

In reply to by प्रसाद१९७१

मदनबाण 04/11/2014 - 15:35
भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच. हिंदूस्थानातला मुस्लिम समाज हा पहिल्या पासुन स्वतःला वेगळा ठेवुन आहे,त्यामुळेच ते जिथे राहतात त्यांना मुस्लिम मोहल्ला म्हंटले जाते. मुंब्रा, ठाण्यात राबोडी भाग, कुर्ला, नागपाडा इं. हे इतक्या संख्येने एकत्र राहतात, पण इतर समाजा पासुन अंतर ठेवुनच असतात.

hitesh 04/11/2014 - 16:39
आमच्या गल्लीचे नाव ब्राह्मणपुरी आहे. आहे म्हणजे होते. आता नवीन वोटर आयडीवर जैन वस्ती परिसर असा पत्ता आहे.

In reply to by hitesh

मदनबाण 04/11/2014 - 16:53
किती टक्के मुसलमान ब्रामणांच्या आणि जैनांच्या { वरील दोन्ही तुमच्याच प्रतिसादातुन घेतले आहेत.} वस्तीत / बोळात /गल्लीत राहतात ? तुमच्या राहत्या जागी किती टक्के मुस्ल्मीम कुटुंबीय राहतात ? जाता जाता :- खर्‍या आयडीने लिहणे जमत नाही का ? ;)

संदीप डांगे 04/11/2014 - 12:30
एवढ्यातच कुठेतरी वाचले, महाराष्ट्रातले एक गाव जिथे एकही मुसलमान नाही पण ताजिया काढून मोहर्रम का काय साजरा करतात म्हणे. बहुतेक महाराष्ट्र टैइम्स वर वाचली.

भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे. [[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे.

नागोबा डुलाया लागला...

आशु जोग ·

In reply to by कंजूस

आशु जोग 20/10/2014 - 13:17
फोटो प्रेम आणि नावे यांना लटकून झोके खेळू नका जमल्यास पुढील पॅरेग्राफपासून वाचायला सुरुवात करा

संग्राम 20/10/2014 - 14:12
पक्षांतर बंदी कायद्याबद्दल अधिक माहिती नाही ... पण माझ्या मते निवडणूकीवेळी पक्ष बदलणार्‍या उमेदवारांना कमीत कमी १ निवडणूक लढण्याची बंदी असावी किंवा किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत :)

In reply to by संग्राम

किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत आणि एकाहून अधिक पक्षांचे सभासदत्व कायद्याने नाकारावं.

In reply to by संग्राम

सुनील 20/10/2014 - 14:29
किमान ५ वर्षे पक्षाचा सभासद असलेले लोकच निवडणूक लढवण्यास पात्र ठरावेत
तसे झाले तर कुठलाही नवा पक्ष पहिले पाच वर्षे निवडणूकाच लढवू शकणार नाही. मग पाच वर्षे पक्ष पोसायचा कसा? म्हणजे निवडणूका लढवायच्या आतच पक्षाचा मृत्यू ठरलेला!

In reply to by सुनील

NGOs कशा पोसल्या जातात तसाच पोसायचा पक्ष. 'शिवसेना राजकारणात पडणार नाही' असे वक्तव्य बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात केले होते. नक्की आठवत नाही पण ५ पेक्षा जास्त वर्षे शिवसेना राजकारणात नव्हती. महाराष्ट्रातून 'लुंगी हटाव', उपहारगृह धंद्यातून 'उडप्यांना हटाव' आणि महाराष्ट्रात मराठी माणसांना ८० ट्क्के जागा राखीव असाव्यात ह्या कार्यक्रमात शिवसेना व्यस्त होती.

आशू, काय रे हे? तुझ्यासारख्या मुत्सद्द्याकडून ही अपेक्षा नव्हती. 'याला राजकारण ऐसे नाव' म्हणतात ना! असो. ७०च्या दशकात प्रकार होताच. ज्या संघाने बाबू जगजीवन राम ह्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांना नंतर पावन करून घेतले.

पुर्वी मराठे सरदार आदीलशाही-निजामशाही करत बसायचे आजकाल पक्षांतर करत बसतात. स्वतःची मीठ-भाकरी स्वतःलाच कमवावी लागते, हेच सत्य. बाकी दुनिया गेली तेल लावत.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचा एक मित्र. घराणं पूर्वापार काँग्रेसी. घराच्या भिंतीवर नेहरु, इंदिरा गांधी याच्या तसबिरी. घरातल्या मोठ्या माणसांची नावे संजय राजीव अशी तर मुलांची नावे राहुल प्रियांका अशी. मी एवढ्यात या मित्राला फोन केला. त्याचे घराणे पिढ्यानपिढ्या काँग्रेसनिष्ठ. आजोबा सरपंच. याचे वडिल काँग्रेसकडून आमदार. बंधू काँग्रेसकडून आमदार. पुढे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकता येत नाही असं ध्यानात आल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण मोदीलाटेत वाहून गेले. आता याने आपल्या पत्नीला भाजपाकडून उभे केले. ती आमदार बनली. आता हे लोक आम्हाला जम्मू-काश्मीर, कलम ३७०, अखंड हिंदूस्थान याबद्दल सांगणार का ?

"आज म्हणलं माती व्हावं"

वैभवकुमारन ·

मुजोर झालेल्या पक्षांना त्यांची जागा दाखवून द्यावं आपल्या पोटात जागा देऊन आपणही थोडं पुण्य घ्यावं .......... आज म्हटलं माती व्हावं

"आज म्हणलं माती व्हावं" कुंभाराच्या पोटासाठी त्याला एक मडकं द्यावं कधीतरी कोणासाठी मातीच एक घरट द्याव ........आज म्हणलं माती व्हावं भिंतीला त्या पुसायाला पोते-याच फडकं व्हाव चूल बनून तापलेल्या तव्याच ते बुडक घ्यावं ........आज म्हणलं माती व्हावं कोंब कोंब शरीरावर पिकांची मी माय व्हाव मूळ घट्ट पकडुनी पोटात त्याचं पाय घ्याव ........आज म्हणलं माती व्हावं कुणब्याच्या सुखासाठी अंगावरी शाण घ्याव नांगरुनी शरीराला स्वताच ते प्राण द्याव ........आज म्हणलं माती व्हावं आकारुनी कुणी मला देवाचं ते नाव द्यावं बसुनीया देवळात मानसाचा खेळ पहाव .........आज म्हणलं माती व्हावं

ते दोघ

पिंपातला उंदीर ·

जेपी 20/10/2014 - 12:01
दोन लोकांची चांगली ओळख करुन दिलीत. गंगाखेडच राजकारण तिथल्या बेसुमार वाळुउपसा आणी त्यातुन येणार्या प्रचंड काळ्यापैशाने बदलल. गंगाखेड मध्ये जर तुमची 10 मते असतील तर तुम्हाला HERO PASSION PRO गाडी मिळेल.

मित्रहो 20/10/2014 - 13:51
विषयी एकले होते पण सविस्तर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. राजकारणात सुद्धा चांगल्या हेतुने काम करनारी माणसे आहेत हे बघितले की आनंद होतो. दुसरा आणि थोडा वेगळा मुद्दा असा की रॉबीन हुड पद्धतीने समस्या सोडवण्याची तऱ्हा काही काळानंतर फारसी प्रभावी राहत नाही. विशेषतः तुम्ही आमदार, खासदार म्हणून निवडले गेल्यानंतर लोकांना समस्यांचे समाधान हवे असते फक्त आंदोलन नाही. तुम्ही ज्या सिस्टिमधे काम करता ती समजून घेउन रचनात्मक काम करणे गरजचे असते. प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात रस्ते बांधायचे असतात पण त्यासाठी आमदार किंवा खासदार निधीतून मिळनारा पैसा पुरेसा नसतो तेंव्हा तो कुठुन मिळतो हे समजून तो पैसा आणून कामे करावी लागतात. हे जर नाही समजले तर बऱ्याचदा चांगला उद्देष असनारी माणसेही काही कालाने मागे पडतात. समाजाला बच्चू कडू किंवा ज्ञानोबा गायकवाड यासारख्या चांगला हेतु ठेवनाऱ्या माणसे राजकारणात यशस्वी व्हावे हेच वाटते.

पैसा 20/10/2014 - 16:15
बच्चू कडू हा एकदम इंटरेस्टिंग माणूस दिसतो आहे. आणि अजून अशी माणसे निवडून येऊ शकतात याचं आश्चर्यच वाटलं. दुसरे गायकवाड पण ग्रेट! मात्र लोकांना साधेपणापेक्षा हातात प्रत्यक्ष येणार्‍या नोटा जास्त महत्त्वाच्या वाटतात, हा आपल्या सिस्टीमचा दोष आहे. त्या पैसे घेऊन मतदान करणार्‍या लोकांनाही नावे ठेवता येणार नाहीत. कारण तेही बरेचदा पैशाच्या अभावी असली कामे करतात. या दोघांची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद!

अजया 20/10/2014 - 16:49
सगळीकडे कमी वाईट उमेदवार शोधण्याची चर्चा असताना राजकारणातल्या या चांगल्या माणसांची ओळख वाचुन हायसं वाटलं.अगदीच चिखल नाही म्हणजे सर्वत्र.धन्यवाद ओळख करुन दिल्याबद्दल!

@ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेबु वर टाकलेल्या एका पोस्ट मुळ . ज्ञानोबा गायकवाड >>> हे फेबु वर वाचलवतं.. बच्चु कडू हे फक्त ऐकलेलं नाव होतं. ते आज समजलं. लैच भारी आसामी म्हणायची ही सुद्धा! *good*

लेखन आवडले. या निमित्ताने एक जुनी आठवण लिहितो. ऑगस्ट १९९९ च्या शेवटचा आठवडा - मी कॉलेजच्या प्रथमवर्षात होतो. अमरावतीपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या करजगाव येथे यूथ कँपला गेलो होतो. त्यावेळच्या लोकसभा व विधानसभेची एकत्रित निवडणुक आठवड्यावर येऊन ठेपली होती. सगळ्या वर्तमानपत्रांत एकाच प्रकारच्या बातम्या पुन्हा पुन्हा येत होत्या.
काँग्रेस / भाजप / शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अमुक अमुक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.
करजगाव हे अचलपूर विधानसभा मतदारसंघात येते. त्यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री विनायकराव कोरडे अचलपुरचे आमदार होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी आमदार वसुधाताई देशमुख यांना तिकिट दिले होते. बच्चू कडू तेव्हा नुकतेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावारूपास येऊ लागले होते. त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून अचलपूर मतदारसंघातून उभे होते. तो युथकॅंप पालकमंत्र्यांच्या गावात असूनही लोकांकडून बच्चू कडू या अपक्ष उमेदवाराबद्दल कौतुकाने बोलत होते. ते निवडणुक जिंकतील असे मात्र खात्रीने कुणीच शकत नव्हते. ती निवडणुक मतपत्रिका वापरून महाराष्ट्रामधली कदाचित शेवटची निवडणुक होती. मतदानाच्या वेळी मतदाराला दोन मतपत्रिका दिल्या जात होत्या (बहुधा फरक कळण्यासाठी पिवळ्या व लाल रंगाच्या). काही आठवड्यांनी निकाल लागला. अचलपूरहून वसुधाताई देश्मुख विजयी झाल्या. आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या क्रमांकाची मते कोरडेंना न मिळता बच्चू कडू यांना मिळाली. मतांमधला फरक होता केवळ २२३१. मतदानाच्या वेळी लोकसभेसाठी अमरावती मतदारसंघातून उभ्या असणाऱ्या अपक्ष उमेदवारालाही तेच चिन्ह मिळाले होते जे बच्चू कडूंचे होते. दुर्दैवाने ग्रामीण भागातल्या अनेक मतदारांनी कडू समजून लोकसभेतल्या अपक्ष उमेदवाराला मत दिले अन थोडक्यात कडूंचा विजय हुकला. वसुधाताई त्या विधानसभेतील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार होत्या अन विनायकराव कोरडेंची राजकीय कारकीर्द त्या निवडणुकीनंतर संपली. २००४ पासून बच्चू कडू सलग तीन विधानसभा निवडणुका अपक्ष म्हणून जिंकले अन २००४ लोकसभेमध्ये थोडक्यात खासदार होता होता राहिले.

मी-सौरभ 22/10/2014 - 20:00
सगळेच अपक्ष धनदांडगे असतात आसा माझा आजवर समज होता तो तुम्ही बदललात धन्यवाद!!

अर्धवटराव 23/10/2014 - 00:05
बरं झालं अशी छान ओळख करुन दिलीत ते. असच काहि राजु शेट्टींबद्दल पण ऐकलय. धनदांडग्या शुगर लॉबी विरुद्ध ते अथक लढत होते. एकदा त्यांच्यावर मारेकरी देखील घातले गेले. खुप मारलं त्यांना. आणि मेले म्हणुन एका शेतात फेकुन दिलं. पण ते वाचले आणि परत लढले. शेवटी सामान्य भाजीविक्रेत्यांकडुन वर्गणी गोळा करुन निवडणुक लढवली व जिंकली.

In reply to by अर्धवटराव

बच्चू कडू पण लोक वर्गणी वर निवडणूक लढवतात . निवडणुका कोट्यावधीची उड्डाण घेत असताना हे असे लोक विरळेच

विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता .

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुक-२०१४: विश्लेषण

क्लिंटन ·

विटेकर 20/10/2014 - 11:18
नेहेमीप्रमाणेच उत्तम आणि सुरेख विवेचन ! ( मी तर तुमचा फ्यानच आहे!) मोदीनां भारतीयांनी स्वीकारले आहे असा एकूण मतितार्थ आहे आणि तिसर्या पर्वाची सुरुवात असावे असे आपले म्हणने आहे. त्याचे अन्वयार्थ काय असू शकतील असे वाटते? १. म्हणजे संघाचे सर्वसमावेशक हिन्दुत्व भारतीयांनी स्वीकारले आहे असे म्हणायचे का ? हा आयडियालॉजीचा विजय आहे का? २. त्यातील संघाचे तळा-गाळीतील काम / सेवाकार्ये याचे यश किती ? ३.की जागतिक परिस्थिती ( मुस्लिमांचा दहशतवाद, मुस्लिम राष्ट्रातील अराजकता ) यांमुळे सामान्य हिंदू अस्वस्थ झालाय ? त्याला ही आपल्यासाठी तारणहार हवा आहे ? ४. कि हा कॉन्ग्रेसचा नाकर्तेपणा आणि खाबूगिरी ? ५. कि मोदींचा गुजरातेतील विकास ?

In reply to by विटेकर

क्लिंटन 21/10/2014 - 17:21
मोदीनां भारतीयांनी स्वीकारले आहे असा एकूण मतितार्थ आहे आणि तिसर्या पर्वाची सुरुवात असावे असे आपले म्हणने आहे.
नाही. तिसर्‍या कालखंडाची सुरवात झाली आहे हे खात्रीने म्हणायला अजून दोनेक वर्षे जावी लागतील आणि त्या काळातील विधानसभा निवडणुकांचे निकाल बघायला लागतील. डिसेंबर २०१४ मध्ये झारखंड आणि जम्मू-काश्मीर तसेच बहुदा दिल्लीत निवडणुका होतील. झारखंडमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले, जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू भागात स्वीप करून ८७ पैकी ३० पर्यंत जागा जरी जम्मू-काश्मीर विधानसभेत मिळाल्या आणि दिल्लीत दोन-तृतीयांश बहुमत मिळाले तर तिसरा कालखंड जवळ आला आहे हे नक्कीच आतापेक्षा अधिक खात्रीने म्हणता येईल. त्यानंतर पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.या निवडणुकांमध्ये मोदी-भाजपची खरी कसोटी लागेल.एकतर मे २०१४ मध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतरची हवा तोपर्यंत नक्कीच ओसरली असेल.तसेच बिहारमध्ये नितीश कुमारांची साथ सुटल्यानंतर भाजपला विधानसभा निवडणुका जिंकणे नक्कीच सोपे जाणार नाही. नितीश कुमार-लालू-काँग्रेस यांचे संयुक्त आव्हान जर भाजपने परतावून लावले तर तिसरा कालखंड आणखी जवळ आला असे म्हणता येईल. या दोन टप्प्यातून भाजप-मोदी पार पडले तर तिसरा कालखंड खरोखरच चालू झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर मे २०१६ मधील केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील निवडणुका देतील. या तिनही राज्यांमध्ये भाजपला मुळात फार स्थान नाही तेव्हा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुक जिंकायची अपेक्षा नक्कीच नाही.तरीही जर पक्षाने किमान १०% जागा स्वबळावर या तिनही राज्यांमध्ये मिळविल्या (केरळात १४, तामिळनाडूत २४ आणि पश्चिम बंगालमध्ये ३०) तर मात्र तिसरा कालखंड नक्कीच सुरू झाला आहे असे म्हणायला हवे.
त्याचे अन्वयार्थ काय असू शकतील असे वाटते?
अजून तिसरा कालखंड सुरू झाला आहे असे मला तरी वाटत नाही.तरीही मोदींच्या लोकप्रियतेमागे माझ्या मते स्वतः मोदींपेक्षा इतरांचा हातभार जास्त आहे. एकतर तिस्ता सेटलवाड आणि इतर मंडळींनी सतत मोदी-मोदी हा घोष चालू ठेऊन नरेंद्र मोदी हे नाव लोक कधीही विसरणार नाहीत याची व्यवस्था करून ठेवली.विशेषतः युपीए-२ मध्ये इतकी प्रचंड अनागोंदी माजली होती की लोकांचे "परफॉर्मन्स स्टॅन्डर्ड" बरेच खाली आले.या पार्श्वभूमीवर मोदींसारखा कणखर आणि कार्यक्षम वाटणारा नेता लोकांना नक्कीच उजवा वाटला. बाकी तुम्ही जे पाच पर्याय दिले आहेत त्यावरून महाभारतातल्या द्रौपदीची आठवण झाली.तुला कोणत्या प्रकारचा नवरा हवा या प्रश्नाला द्रौपदीने मला गदायुध्द, धर्नुयुध्द, धर्माचरण असणारा, दिसायला देखणा इत्यादी पाच मुद्दे द्रौपदीने सांगितले. हे पाचही मुद्दे कुणाही एका व्यक्तीत मिळणार नाही म्हणून तिला पाच पती मिळाले अशा प्रकारची कथा महाभारतात वाचल्याचे आठवते (चू.भू.दे.घे). तशाचप्रकारे संघाचे हिंदुत्व मानणार्‍या, संघाचे हिंदुत्व मानले नाही तरी सेवाकार्य मानणार्‍या, जागतिक दहशतवादामुळे तारणहार बघत असलेल्या, काँग्रेसच्या नाकर्तेपणा आणि खाबुगिरीला कंटाळलेल्या आणि मोदींच्या गुजरातमधील विकासामुळे मोदी हवे असलेल्या अशा पाचही प्रकारच्या मतदारांनी मोदींनाच मते दिली. माझ्यामते यातील चौथा मुद्दा (काँग्रेसचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार) नसता तर मोदींना पंतप्रधान होणे तसे कठिणच होते.

तिमा 20/10/2014 - 11:22
निकालानंतर अनेक लेख येतील हे अपेक्षितच होते. पण वाट पहात होतो ती तुमच्याच लेखाची. अतिशय पटणारे आणि सुसंगत विवेचन तुम्ही केले आहे. फक्त, एका छोट्याशा, परंतु महत्वाच्या घटनेचा उल्लेख झाला नाहीये. आणि ती घटना म्हणजे, एम.आय.एम. या विषवल्लीचा महाराष्ट्रात झालेला चंचुप्रवेश. ती वेळीच उपटली नाही तर पुढे अनर्थ होऊ शकेल.

कलंत्री 20/10/2014 - 11:31
अतिशय सुंदर आणि विचाराला चालना देणारा, भूतकाळ आणि भविष्याचा वर्तमानकाळातून आढावा घेणारा असा लेख आहे. अभिनंदन. काही भागावर सर्वांनीच विचार करायला हवा की देशासाठी आणि राज्यासाठी काय घडायला हवे, उदा. पक्ष आणि कार्यकर्ते हे हवेतच, भले ते कोणत्याही पक्षाचे असोत. यावर परत एकदा विचार व्हायला हवा. आपण एक मतदार म्हणून प्रचाराची जी पातळी खालावत चालली आहे त्यावर काय करु शकतो.

मदनबाण 20/10/2014 - 11:31
मस्त विश्लेषण ! :) सेना-भाजप युती तुटायला सेनेच्या १५१ जागांचा हट्ट नडला ! तर मनसेचे इंजिन पार यार्डात जाउन बसले ! अर्थात याला कारणीभूत अनेक गोष्टी आहेत :- १} मागच्या वेळी १३ जण या पक्षाचे निवडुन आले आणि दादर ह्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्थान मिळवण्यात यश मिळाले, पण यश डोक्यात गेले आणि विधायक काही करुन दाखवता आले नाही. २} ब्लू-प्रिंटचा वापर करुन त्याचा फायदा मिळवता आला असता, पण ती येयला आणि सर्वसामन्य लोकांपुढे न्यायला बराच काळ गेला, जेव्हा ती वेळ आली तेव्हा लाइव्ह फीडचा टिआरपी भाजपने युती तोडण्याची "टायमिंग" साधुन खाल्ला. ३} आधी उद्धव ठाकरेंची करुन दाखवले वरुन मनसोक्त खल्ली उडवली आणि निवडुक जवळ आल्यावर दिलजमाइच्या गप्पा झाल्या,तसेच ज्या मोदी आणि मोदींच्या गुजरातची स्तुती केली केली त्याच मोदींवर टीका करण्याची घोडचूक ते सातत्याने करत गेले. मोदींच्या करिष्म्याला भारवुन जाउन त्यांना फॉलो करणार्‍यांना दुखावण्याचे काम त्यांनी केले आणि त्याचा फटका मिळाला ! जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया असे म्हणणार्‍या मनसेच्या वाटेला केवळ ३% मते आली आणि इंजिन मेंटेन्स करण्यासाठी थेट यार्डात पोहचले. ४) एमआयएम ची महाराष्ट्रातली एंन्ट्री ही कट्टरपंथी पक्षाला एक गठ्ठा मतदान होउन मिळाली आहे, हे अजिबात दुर्लक्ष करण्यासारखे नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

नंदन 20/10/2014 - 13:23
याच लेखाची वाट पाहत होतो. अपेक्षेप्रमाणेच उत्तम विवेचन!

अक्षरमित्र 20/10/2014 - 14:12
उत्तम विश्लेषण. मात्र
शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्की कोणाचे सामर्थ्य जास्त ही झाकली मूठच राहिली असती.
याबद्दल असहमत. प्रत्येक पक्षाने कोणत्या का कारणाने होईना पण स्वबळ आजमावावयास हवे होते. जे झाले ते उत्तम झाले. आता आपले बळ कोठे आहे व कोठे जास्त काम केले पाहिजे याचा अंदाज प्रत्येकाला येईल. (डोक्यात अक्कल असेल तर). शिवसेनेना जर भुतकाळ सोडून वर्तमानकाळात आली तर त्याचा त्यांना अजून फायदा होऊ शकतो. मात्र एकंदरीत वाचाळपणा करुन त्यांनी स्वतःचे फार नुकसान करुन घेतले. गोड बोलण्याची कला यांना कधी साधणार काय माहित ? यांचे ठाण्याच्या दाढीवाल्या साहेबांची मागील लोकसभा निवडनूकीतील मोटरसायकल प्रचारफेरी पाहिली. जनतेला अभिवादन करायचे सोडाच पण सगळे मोठमोठ्याने हॉर्न वाजवत सुसाट चालले होते. यांची नजर तर अशी की मला मत द्या नाहितर बघून घेईन. खरेच यांना पण घरी बसवायला पाहिजे होते. त्यापेक्षा आपले सरनाईक लाखपटीने बरे. सदा हसरा चेहरा. मागून काय सगळेच मारतात पण कमीतकमी तोंडावर तर गोड बोला. की त्याचेही पैसे पडतात तुम्हाला ?

चौकटराजा 20/10/2014 - 14:43
एका अन्य धाग्यात मी जागा नाही पण प्रत्येक पक्षाची निवडणूकीनंतर काय स्थिती होईल हे लिहिले होते ते १०१ टक्के बरोबर ठरले आहे. भाजपचा आलेख वर जाईल पण १४४ नाही हे माझे म्हणणे खरे ठरले आहे. आता मी विश्लेषक अभ्यासक आहे का ? तर नाही. पण माझी काही निरिक्षणे इथे ठेवीत आहे. ये मशाल है आजादीकी कांगरेस के आदर्शोंकी वीर जवाहर के गांधीकी ( इ स . १९६३ ) नंतर कौन करेगा देश अखंड भारतीय जनसंघ ( इ स १९६६ /६७ ) अशा वातावरणात माझे बालपण गेले.अख्या महाराष्ट्रात कृष्णराव भेगडे व रामभाउ म्हाळगी हे दोनच जनसंघीय आमदार. कधी मधी दत्त्तोपंत ठेगडी , जगन्नाथ राव जोशी अशी तुरळक नावे. काही काळ मीही संघात . पण केवळ खेळण्यासाठी. पण कार्यकर्ता कसा असावा हे संघातच शिकावे. १९६९ पर्यंत कॉग्रेस पक्ष बरा होता. नेहरूनी अनेक चुका केल्यातरी त्या चुका आहेत हेच मुळी लोकाना कळत नव्हते. नेहरूच्या नंतर त्यांच्या पक्षाचे विघटन व अशुद्धीकरण चालू झाले. आयर्न लेडी इंदिराजी याना काही काळ अतिशय लोकप्रियता मिळाली खरी पण संघटन हुकुमशाहीकडे झुकू लागले . गांधी टोपी घालून परीट घडीच्या गाद्या घालून मेज वापरून संसदीय बैठका नुसत्या नावाला होउ लागल्या. सर्व निर्णय इंदिराजी म्हणतील तसे.मग त्याच अध्यक्ष ही पायरी. मग चांडाळ चौकडीचे राज्य, आणीबाणी, बाईंचे देहावसान, गांधी घराण्याला लाभलेला त्यागाचा स्पर्श (?) लांगूलचालन व घराणे निष्ठा याना उत. परिणामी महाराष्ट्रात थेट घराण्याशी निष्ठा ठेवण्याचे तंत्र विकसित, शिवाजी राव निलंगेकर, अंतुले, बाबासाहेब भोसले, ...ते प्रुथ्वीराज इथपर्यंत इम्पोर्टेड मुख्यमंत्री. वाय बी ते पी ए चव्हाण केवढी ही अधोगति ! उलट भाजपाची अवस्था पहा. १९७७ पर्यत जवळ जवळ नगण्य असलेला जनसंघ. जनता पक्ष आला त्यावेळी त्याचा भाग झाला. पण त्यांची आर एस एस ही जणु हिटलरची एस एस आहे असा डांगोरा पिटून नादान समाजवाद्यानी सत्ता गमावली. ( समाजवादी विचाराच्या केजरीवालने अशीच गाढव चाल दिल्लीत केली ). बाकी पुढे हळूहळू वाढत वाढत बाजपेयी १३ दिवसांचे प्रधान मंत्री होईपर्यंत मजल आली. मला आठवते भाजपा सत्तेवर राहू नये म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर सर्व खासदार एकत्र आले होते. पण भाजपा पुन्हा अटलना घेउन कधीतरी सत्तेवर आलेच. इंडिया शायनिंग चा जुगार अंगाशी आला. मोबाईल क्रांति म्हणजे काही धवल वा हिरवी क्रांति नव्हे हे न कळण्याइतकी भारतीय जनता मूर्ख नाही हे भाजपाला देखील कळले. ३७० , मंदिर सर्व मुद्दे गुंडाळून त्यानी पक्ष वधेनाला प्राधान्य दिले. सैद्धांतिक चर्वीतचर्वण करणार्‍या समाजवादी पक्षांची आज काय अवस्था आहे ? प्रत्येक अनुभवातून शिकत सुधारत जायचे हे भाजप या पक्षाचे तंत्र आहे. विकास का मॉडेल हे त्याचेच एक पिल्लू आहे. आता हा पक्ष जिथे रुजत आहे तिथे मांड जमवून बसेल. जनतेशी जवळीक साधणारे अनेक मोदी ( प्रसंगी खोटे बोलणारे सुद्धा ) आता विकसित होतील. पाच वर्षातून एकदा आपले थोबाड दाखविणारा आमदार भाजपात नसेल याची ते काळजी घेतील. एका मुद्यावर मात्र भाजपा अपयशीच राहील तो म्हणजे महागाईचा. कारण त्याची कारणे अर्थशास्त्रीय जास्त आहेत राजकीय कमी. नवीन श्रीमंत वर्ग, इंधनाचे वाढते भाव व शेतीमालाला वाढवून मिळालेली किंमत मागणीच्या मानाने धान्याचा पुरवठा कमी ही ती कारणे आहेत. ती मनमोहन सिंग यानी विशद केली होती. पण त्यांच्या माध्यमांशी असलेल्या " प्रगाढ प्रेम" संबंधामुळे त्याची दखलच भारतीय जनतेने घेतली नाही. आता दलितांच्या मतात, मुस्लीमांच्या मतात अनेक वाटेकरी झाल्याने कोणत्या समाजाच्या जोरावर राजकारण करायचे असा पेच काँग्रेस पुढे पडला आहे. मुस्लीम व मराठा आरक्षणाची तर पुरती वाट लागल्याचे चित्र दिसते आहे. आत प्रशन उरला मनसे चा . राज ठाकरे व ऊद्धव ठाकरे हे एकाकी लढत देतात असे त्यांचे कवतिक करून मतदारानी त्यांचा मामा बनविला आहे. एकाकी राहून राजस्थानी ऐक्तिहासिक पुरूषानी स्वत: चे कसे वाटोळे करून घेतले हा इतिहास या बंधूना माहीत नाही का ? महाराष्ट्र म्हणजे जयललितांचा तामीळनाडू नव्हे हे या वीर बंधूना कळू नये ? नुसते माझे सैनिक माझा म्हाराष्ट्र अशी अनोखी भाषा वापरून उपयोगी नाही हे त्यांच्या डोस्क्यात शिरेल तो सुदीन !

In reply to by चौकटराजा

प्रसाद१९७१ 03/11/2014 - 20:03
भाजप २००४ साली का हरला ह्याचे उत्तर अंध(?) श्रद्धेत आहे. कोणत्याही केंद्र सरकार ने वेळेच्या आधी निवडणुका घेतल्या तर ते पुन्हा निवडुन येत नाही. बाजपाईंना कधी सत्ता सो.गा च्या हातात देतो याची घाई झालेली. आणि ( भाजपचे श. प.) प्रमोद महाजनांची आर्थिक गणिते काही वेगळीच असणार.

In reply to by प्रसाद१९७१

क्लिंटन 03/11/2014 - 21:36
कोणत्याही केंद्र सरकार ने वेळेच्या आधी निवडणुका घेतल्या तर ते पुन्हा निवडुन येत नाही.
१९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने वेळेआधी निवडणुका घेतल्या आणि तरी ते परत आणखी जास्त बहुमताने निवडून आले :)

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 04/11/2014 - 21:07
अपवाद एखादाच असेल तर हे वाक्य लागू पडते. मुदतपूर्व निवडणुक घेऊन जिंकल्याची अनेक उदाहरणे आहेत. २ उदाहरणे देतो. (१) ओरिसा विधानसभेची २००० साली निवडणुक झाली होती. त्यात नवीन पटनाईकांनी भाजपबरोबर युती करून बहुमत मिळवून सरकार बनविले होते. २००४ मध्ये १ वर्ष आधी विधानसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुक घेतल्यावर त्यात पुन्हा एकदा याच युतीला बहुमत मिळून सरकार बनले होते. (२) डाव्या पक्षांनी प्रथमच १९७७ मध्ये प. बंगाल विधानसभेत बहुमत मिळविले होते. त्यानंतर १९८२ व १९८७ मध्ये पुन्हा एकदा बहुमत मिळविले होते. १९९१ मध्ये १ वर्ष आधी विधानसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुक घेतल्यावर त्यात पुन्हा एकदा डाव्या पक्षांना बहुमत मिळून सरकार बनले होते. मुदतपूर्व निवडणुक हा जुगार आहे. २००४ साली वाजपेयींनी ५-६ महिने आधीच लोकसभा निवडणुक घेतल्यावर त्यात सर्व पक्षांचा पराभव झाला होता. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या व काँग्रेसलाही फक्त १४५ जागा होत्या. म्हणजे काँग्रेसचाही पराभव झाला होता. परंतु सर्व विरोधी पक्ष भाजपविरूद्ध एकवटल्याने व डाव्या पक्षांनी आपल्या ६२ खासदारांचे पाठबळ काँग्रेसमागे उभे केल्याने काँग्रेसचा पराभव होऊनसुद्धा युपीएला सरकार स्थापन करता आले होते. २००४ मध्ये मुदतपूर्व निवडणुक घेण्यामागे वाजपेयींपेक्षा महाजनांचा जास्त आग्रह होता. डिसेंबर २००३ मध्ये झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म.प्र. मध्ये जवळपास तीनचतुर्थांश बहुमत, राजस्थान व छत्तीसगड मध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेथील भाजप लाट विरून जायच्या आतच निवडणूक घेतली तर भाजपला फायदा होईल या हेतूने मुदतपूर्व निवडणुक घेतली गेली. परंतु त्या निवडणुकीत भाजपला उ.प्र. मध्ये ८० पैकी १०, दिल्लीत ७ पैकी १ व बिहारमध्ये ४० पैकी जेमतेम ५-६ जागा मिळाल्यामुळे भाजप १८२ वरून १३८ वर उतरला होता. भरीत भर म्हणून द्रमुक, चौताला, आसाम गणपरीषद, झामुमो, लोजप इ. मित्रपक्ष सोडून गेल्याने रालोआला मोठा फटका बसला होता.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 05/11/2014 - 12:42
अजून १ उदाहरण हरयानाची मे १९९६ मध्ये विधानसभा निवडणुक झाली होती. त्यात भाजपने बन्सीलालच्या हरयाना विकास पक्षाबरोबर युती करून निवडणुक लढविली होती. बन्सीलालच्या पक्षाला ३२ व भाजपला ८ जागा मिळून सरकार बनले होते. चौतालाचा पक्ष बहुमताच्या जवळ असूनसुद्धा सरकार बनविता आले नव्हते. साडेतीन वर्षानंतर १९९९ च्या शेवटी भाजपने बन्सीलालचा पाठिंबा काढून घेऊन चौतालाला पाठिंबा दिला व चौताला मुख्यमंत्री बनला. ६ महिन्यांनी मे २००० मध्ये (विधानसभा मुदत संपण्याच्या १ वर्ष आधी) राजीनामा देऊन लगेच मुदतपूर्व विधानसभा निवडणुक झाली. त्यात चौतालाच्या पक्षाला ४७ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले होते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 05/11/2014 - 13:57
हो बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे १९९६ मध्ये भाजपला हरियाणात ११ जागा मिळाल्या होत्या.नक्की आकडा बघायला हवा. वेळेपूर्वी विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेण्याच्या उदाहरणांमध्ये आणखी काही उदाहरणांचा समावेश करता येईल. १. आंध्र प्रदेशात १९८३ मध्ये निवडणुका होऊन तेलुगु देसमचे एन.टी.रामाराव मुख्यमंत्री झाले.१९८४ मध्ये इंदिरा गांधींनी राज्यपाल रामलाल यांना हाताशी धरून एन.टी.रामारावांचे सरकार खाली खेचले आणि हनुमंत राव यांना औटघटकेचे मुख्यमंत्रीपद दिले.त्यानंतर रामाराव आपल्याला पाठिंबा देत असलेल्या आमदारांना घेऊन थेट राष्ट्रपती भवनात जाऊन थडकले.त्यानंतर रामारावांना परत मुख्यमंत्रीपद देण्यावाचून रामलाल-इंदिरा गांधी यांच्यापुढे पर्याय राहिला नाही.हा उद्योग काँग्रेस पक्षाने केला त्यामुळे १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाच्या इतर भागात राजीव गांधींसाठीची जबरदस्त सहानुभूतीची लाट होती तरीही आंध्र प्रदेशात मात्र काँग्रेसचा चांगलाच पराभव झाला.त्याच्यावर कॅश-इन करण्यासाठी रामारावांनी विधानसभा बरखास्त करून घेतली आणि १९८५ मध्ये परत निवडणुका घेतल्या. त्यात परत एकदा रामाराव निवडून आले. या विधानसभेचा कार्यकाल मार्च-एप्रिल १९९० मध्ये संपणार होता.तरीही रामारावांनी नोव्हेंबर १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्य विधानसभेच्याही निवडणुका घेतल्या. त्यात त्यांचा पराभव झाला. २. आंध्र प्रदेशप्रमाणे कर्नाटकातही १९८३ मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले. डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये सहानुभूती लाटेत काँग्रेसने राज्यातील २८ पैकी २७ जागा जिंकल्या.तरीही हेगडेंनी विधानसभा बरखास्त करून मार्च १९८५ मध्ये ते परत एकदा (आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांबरोबरच) विधानसभा निवडणुकांना सामोरे गेले. त्यावेळी मात्र त्यांचा विजय झाला. ३. ऑक्टोबर १९९९ मध्ये आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या आणि एन.चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री झाले. मधल्या काळात राज्यातील वातावरण त्यांच्याविरोधात जायला लागले. २००३ मध्ये वाय.एस.राजशेखर रेड्डींनी सरकारविरोधात पदयात्रा काढली आणि या पदयात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला.पुढे नोव्हेंबर २००३ मध्ये चंद्रबाबूंवर नक्षलवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने नायडू त्यातून बचावले. पण या हल्ल्यातून आपल्याला सहानुभूती मिळेल असे त्यांना कदाचित वाटले आणि त्यांनी राज्य विधानसभा वेळेपूर्वीच बरखास्त केली. राज्यात निवडणुका मे २००४ मध्ये होणार होत्या.त्याचवेळी देशातही लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर वाजपेयींच्या लोकप्रियतेचाही फायदा होईल असे नायडूंना वाटले. भाजप सरकारने वेळेपूर्वी निवडणुका घ्यायचा जो आत्मघातकी निर्णय घेतला त्याला नायडूंचा आग्रह हे पण एक कारण होते असे अडवाणींच्या आत्मचरित्रात म्हटले आहे. अर्थातच लोकांची सहानुभूती नायडूंना मिळाली नाही आणि तेलुगु देसमचा जोरदार पराभव झाला. ४. ऑक्टोबर १९९९ मध्ये कर्नाटकात एस.एम.कृष्णा मुख्यमंत्री झाले.विधानसभेचा कार्यकाल ऑक्टोबर २००४ पर्यंत होता.तरीही त्यांनी १३ वी लोकसभा बरखास्त होताच राज्य विधानसभा वेळेपूर्वी बरखास्त केली. राज्यात एप्रिल-मे २००४ च्या लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात कृष्णांच्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. ५. डिसेंबर १९९३ मध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे वीरभद्र सिंग मुख्यमंत्री झाले.त्या विधानसभेचा कार्यकाल डिसेंबर १९९८ पर्यंत होता. डिसेंबर १९९७ मध्ये ११ वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी राज्य विधानसभाही बरखास्त केली. राज्यात निवडणुका फेब्रुवारी १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबरच झाल्या. त्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात जवळपास टाय झाला होता.अपक्ष आणि सुखराम यांच्या पाठिंब्यावर भाजपचे प्रेमकुमार धुमल मुख्यमंत्री झाले. राज्यातील ४ मतदारसंघांमधील मतदान बर्फ पडल्यामुळे फेब्रुवारी मध्ये न होता मे १९९८ मध्ये झाले. या चारही मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि धुमल यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहता आले. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता. ६. मार्च १९८५ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या.नंतर काँग्रेसचे नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री झाले. विधानसभेची मुदत मार्च १९९० पर्यंत होती.तरीही त्यांनी विधानसभा वेळेआधी बरखास्त केली. नोव्हेंबर १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्य विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. आणखी उदाहरणे आठवली तर देतोच. पण यातून एक गोष्ट दिसते की वेळेआधी निवडणुका हा एक जुगार असतो. कधी तो यशस्वी होतो तर कधी फसतो.

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे 04/11/2014 - 21:12
अरे?? बेधडक काहीही विधानं करायची आणि चूक दाखवून दिली की अस्सं म्हणायच??
पडलो तरी नाक वर
तुमच्याच बाबतीत खरं दिसतय हे.

श्रीगुरुजी 20/10/2014 - 14:51
उत्तम विश्लेषण! रा़ज ठाकर्‍यांचे टायमिंग नेहमीच चुकते. २००५ साली नारायण राण्यांनी पक्ष सोडल्यावर बाळासाहेबांना धक्का बसला होता. अगदी त्याच वेळी रा़ज ठाकर्‍यांनी शिवसेना सोडून बाळासाहेबांची आधीची जखम सुकण्याच्या आतच नवीन घाव घातला. त्यामुळे सामान्य सैनिक अत्यंत संतप्त झाला होता. २००५ ऐवजी २-३ वर्षे वाट पाहून २००८ किंवा २००९ मध्ये राज ठाकर्‍यांनी मनसे काढला असता तर जास्त फायदा झाला असता. ब्ल्यू प्रिंट सुद्धा अगदी चुकीच्या वेळी आली व त्यामुळे माध्यमांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. निवडणुकीच्या आधी पुरेसा वेळ देऊन ब्ल्यू प्रिंट आणली असती व त्यावर माध्यमातून चर्चा घडवून आणली असती तर काही तरी फरक पडला असता. दुसरं म्हणजे राज ठाकर्‍यांनी गमावलेली विश्वासार्हता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तेलकट वडे व सूप हा विषय आणून त्यांनी घरगुती विषय चव्हाट्यावर आणले. मागच्याच महिन्यात अतुल भातखळकरांनी मनसेकडे तिकीट मागितले असे विनाकारण जाहीररित्या सांगून भातखळकरांसारख्या बिनमहत्त्वाच्या प्रवक्त्याला अडचणीत आणून राज ठाकर्‍यांनी काय मिळविले? नंतर काही दिवसांपूर्वी २५ सप्टेंबरला भाजपने युती तोडल्यावर आपल्यात व उद्धवमध्ये काय संभाषण झाले ते जाहीर करून राज ठाकर्‍यांनी आपली विश्वासार्हता अजून धुळीला मिळविली. एकंदरीत राज ठाकरे हे विश्वासार्ह नाहीत अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे.

मोहन 20/10/2014 - 14:56
MIM बद्द्ल पण आपले विश्लेषण वाचायला आवडेल. माझ्या मते भविष्यात धूर्त मोदी मुस्लीम बहुल मतदार संघ reorganise ( मराठी ?) त्यांना शह देतील. MIM चा चंचूप्रवेश ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नक्कीच नाही

क्लिंटन ह्यांचा लेख असल्याने चांगला झाला आहे असे उगाच काहीतरी लिहिणार नाही, मात्र सेना व भाजपच्या दोन्ही पक्षातील आयाराम उमदेवार किती होते व त्यातील विजयी किती झाले ह्यांचा विदा उपलब्ध नाही आहे तो द्यावा , चलाख प्रसारमाध्यमे जाणून बुजून फक्त भाजपातील आयाराम उमेदवार व त्यातील किती विजयी झाले ह्यावर चर्चाविचारण करत आहेत व सेनेच्या बाबतीत मिठाची गुळणी धरून आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

क्लिंटन 21/10/2014 - 17:43
चलाख प्रसारमाध्यमे जाणून बुजून फक्त भाजपातील आयाराम उमेदवार व त्यातील किती विजयी झाले ह्यावर चर्चाविचारण करत आहेत व सेनेच्या बाबतीत मिठाची गुळणी धरून आहेत.
भाजपमध्ये इतर पक्षांमधून आलेल्यांना तिकिटे देणे हे प्रकार पूर्वीही झाले होते. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी केशुभाई पटेलांविरूध्द बंड पुकारले.त्यामागचे एक कारण होते की भाजपचे १२१ पैकी किमान ४५ आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि १९९० पासून भाजपचे तारू जसे वर जाऊ लागले तसा त्यांनी भाजपप्रवेश केला. (नंतरच्या काळात स्वतः वाघेलाच काँग्रेसवासी झाले ती गोष्ट वेगळी) पण यावेळी अगदी निवडणुकांच्या तोंडावरच इतक्या घाऊक प्रमाणावर पक्षांतरे झाली म्हणून या गोष्टीची चर्चा जास्त होत असावी.

In reply to by क्लिंटन

सौंदाळा 22/10/2014 - 08:57
भाजपप्रवेश आणि काँग्रेसवासी
वाचुन फिस्सकन हसायला आले. गृहप्रवेश आणि स्वर्गवासी एकत्र आल्यासारखे वाटले ;)

सुधीर 20/10/2014 - 16:38
विश्लेषण आवडलं. अवांतरः प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात येत आहे ही गोष्ट तशी चांगली आहे. पण काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाचे दुबळे होणे, आणि तोडीचा दुसरा विरोधी पक्ष नसणे ही गोष्ट लोकशाहीसाठी कितपत चांगली?

In reply to by सुधीर

चौकटराजा 20/10/2014 - 17:51
यात काँगेस ची जी अवस्था झाली आहे त्याबाद्द्ल मला ही फार खंत वाटते. कॉग्रेस आता सुधारणेपलीकडे गेलेली संघटना वाटतेय. एखादा जोतिरादित्य सिंधीया सोडला तर मला तरी कोणी व्हिजन वाला दिसत नाही. गरीबाना सक्षम बनविण्यापेक्षा त्याना सतत पॅकेजेस देत रहाणे हे घातक आहे. अशी संस्कृति त्यानी सोडली पाहिजे. कामे करा .पैसे मिळवा कर्जमाफी मिळणार नाही. असे गरीबाना देखील बजावून सांगितले पाहिजे. त्याना भरपूर काम मिळवून देणे व योग्य मेहनताना देणे हाच यावरचा उपाय आहे.

In reply to by चौकटराजा

+१ एका मुद्यावर मात्र भाजपा अपयशीच राहील तो म्हणजे महागाईचा. या वरच्या एका प्रतिसादात तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याचा उपाय तुम्हीच तुमच्या या प्रतिसादात खालीलप्रमाणे लिहीला आहे. गरीबाना सक्षम बनविण्यापेक्षा त्याना सतत पॅकेजेस देत रहाणे हे घातक आहे. अशी संस्कृति त्यानी सोडली पाहिजे. कामे करा .पैसे मिळवा कर्जमाफी मिळणार नाही. असे गरीबाना देखील बजावून सांगितले पाहिजे. त्याना भरपूर काम मिळवून देणे व योग्य मेहनताना देणे हाच यावरचा उपाय आहे. मला वाटते सद्याचे सरकार हेच तत्व बोलत आहे... आणि त्याच दिशेने कृती चालू राहिली तर ३ ते ५ वर्षांत लक्षणिय फरक पडेल. पॅकेजेस (स्पष्ट मराठीत "भीक") देणे हे जनतेला कायमचे गरीब आणि स्वतःचे मिंधे ठेवण्याचे उत्तम साधन म्हणून भारतात आणि जगभर खूप काळ वापरले गेले आहे... वापरले जात आहे. "फुकटेगिरीला चालना देणे किंवा बळजबरीचा हस्तक्षेप करून किमती खाली ठेवण्याने" गरिबी कमी होत नाही तर "खुल्या किमती व जनतेच्या अर्थार्जनशक्तीची वाढ" करण्याने होते... शिवाय हे करताना जनता सक्षम होऊन देशाचा खरा विकास होतो, ते वेगळेच.

सुहास.. 20/10/2014 - 18:04
ह्या निवडणुकीत 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन' (AIMIM / MIM / मिम) ह्या हैद्राबादस्थित ओवैसी बंधूंच्या पक्षाचा महाराष्ट्रात उदय झाला. त्याने दोन जागा जिंकल्या. मुंबई (भायखळा) आणि औरंगाबाद (मध्य). औरंगाबादमध्ये 'मिम'ने एक जागा जिंकली आणि एका जागेवर जोरदार लढत दिली, पण अखेरच्या काही फेऱ्यांत मागे पडल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानलं. जी जागा जिंकली तिथे भाजप व शिवसेनेचे दोन तगडे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या दोघांनाही प्रत्येकी चाळीस हजाराच्या आसपास मतं पडली आणि 'मिम'च्या उमेदवाराने साठ हजार मतं मिळवून जागा जिंकली. लोक बोंबा मारत आहेत की आपसांतल्या मतभेदांमुळे नुकसान झालं वगैरे. कदाचित युती असती, तर मतांची विभागणी न होता एकाच उमेदवाराला ऐंशी हजार मिळाली असती आणि जागा 'मिम'ला मिळाली नसती. पण त्याही परिस्थितीत तो उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असता आणि त्याला मिळालेली साठ हजारी मतसंख्या दुर्लक्ष करण्याजोगी नसतीच. 'मिम'सारख्या पक्षाला अश्या प्रकारे एकगठ्ठा मतदान का झालं असावं ? आणि तेही दोन जागांवर ? ह्याला युतीचं विभाजन जबाबदार नाही. युतीच्या विभाजनामुळे एक जागा हातची गेली असेल, पण ही मतं कुणाच्या खिश्यातली गेली, हे समजुन घ्यायला हवं. १. 'मिम'ला मतदान करणं, ह्याला केवळ 'बदल' म्हणून पाहू नये. हा पराकोटीचा असंतोष आहे, जो अगदी रास्त आहे. असंतोष जेव्हा असह्य होतो, तेव्हा असं अकल्पित घडत असतं. वर्षानुवर्षं, निवडणुकांमागून निवडणुका, समाजाच्या एका मोठ्या घटकाचा तथाकथित सेक्युलरांकडून फक्त वापर करून घेतला गेला आहे. मतांच्या राजकारणासाठी त्यांना ताबडवलं आहे. त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक व धार्मिक उत्कर्षासाठी कुठलेही ठोस, मोठे पाउल इथे तरी उचलले गेले असल्याचं दिसून येत नाही. आश्वासनांची खैरात केली जाते आणि प्रत्यक्षात फक्त तोंडाला पानं पुसली जातात. २. दुसरीकडे 'मिम'ला खतपाणी देऊन वाढवायलाही कोण जबाबदार आहे, हेसुद्धा डोळसपणे पाहिल्यास सहज लक्षात येईल. ह्याच पक्षासोबत हातमिळवणी करून आंध्रात सत्तास्थापना कुणी केली होती ? डे इन डे आउट, तो ओवैसी तिखटजाळ बकवास करत असताना त्यावर कुठलाही निर्बंध सत्ताधाऱ्यांनी घातला गेला नव्हता. ३. मराठवाडा पूर्वी हैद्राबाद संस्थानातच होता. निजामाकडेच होता. इकडच्या लोकांवर हैद्राबादचा खूप पगडा आहे. तिथली संस्कृती, भाषा इथे जशीच्या तशी दिसून येते. निजामाचा आणि मराठवाड्याचा विषय निघालाच आहे तर एक उदाहरण सांगतो. निजामाने त्याच्या काळात मराठवाड्यात जितके कि.मी. रेल्वेमार्ग बांधले, त्याच्या एक चतुर्थांशसुद्धा निजामाची राजवट संपल्यापासून मराठवाड्याला मिळालेले नाहीत; असं मला नुकतंच समजलं. ह्या तीन मुद्द्यांवर विचार केल्यास ह्या बंडाकडे झुकणाऱ्या बदलाची साधारण कारणमीमांसा करता येईल. पुढील येणारा काळ, ह्याहीपेक्षा अकल्पित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेही नमूद करून ठेवतो. आता हे वाचल्यावर काही सेक्युलर मंडळी चवताळतील. माझ्यावर कुठल्या तरी भक्तीचं, रंगाचं एक लेबल लावतील आणि वचावचा बोलतील. माझ्या अक्कलेचा उद्धार वगैरेही होईल. मी खूप मोठा तज्ञ वगैरे नाही आणि ह्या क्षेत्रात तर नाहीच नाही, पण जे उघड्या डोळ्यांना स्पष्ट दिसलं आणि खुल्या कानांनी थेट ऐकलं, तेच बिनधास्त बोटांनी इथे टंकलं. पटलं तर घ्या, नाही तर असो ! रणजित पराडकर !! ही लिव्ह़ज देअर https://www.facebook.com/ranjeet.paradkar?fref=nf ( अर्थात आमचे ही " हायलाईटस " येतच आहेत ...

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/10/2014 - 18:42
एक शंका: मीम चे बिगरमुसलमान मतदार किती? ते % फार नसेल तर मराठवाड्याच्या अन्यायाचा इथे संबंध नसावासे वाटते. बाकी सहमत.

सुहास.. 20/10/2014 - 18:55
मीम चे बिगरमुसलमान मतदार किती? ते % फार नसेल तर मराठवाड्याच्या अन्यायाचा इथे संबंध नसावासे वाटते. >>. पाँईट नोटेड !! दलीत ही मते देतात तिथे ...भाजपाच्या विरोधात ...मग ते समोर कोणी ही असो ..( स्वःता भाजपा चा उमेदवार असला तरी ...अर्थात टक्केवारी नाही माझ्याकडे ..पण देतो ) पण एखादा मुसलमान मराठवाड्याच्या विकासाशी संबधित नसावा का ? केवळ इतर पक्षाच्या मुस्लीम उमेदवारांनी ठेका घेतलाय ! अब्दुल सत्तार कॉग्रेसच्या तिकीटावर आलाय की निवडुन !! याच काम आहे सिल्लोड मध्ये , सिल्लोडच्या बॉर्डर पासुन ते अजिंठ्याचा रस्ता अतिशय नॉन क्वालीटी होता आधी , आता ते वल्ली वगैरै जावुन आले की .विचार कसा आहे रस्ता !! टोल आहे का ते ही विचारा ( हे प्रत्येक आमदाराला करता येते, करंटे अख्खा रस्ता खातात हा भाग वेगळा )...आता तोच रस्ता चौपदरी होणार आहे , त्यात फक्त मुस्लीम उमेदवार भाजपाच्या विरोधात निवडुन आलाय म्हणुन केंद्र सरकारने काड्या घालु नये , वर्ल्ड बँकेतुन 'हेरिटेज' मधुन मंजुर झालाय तो ..नाहीतर आमच्या गरीबांच्या मराठवाड्यात कशाला होतो रस्त्यासाठी येव्हढा रेव्हेन्यु जनरेट !! :)

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/10/2014 - 19:01
पण एखादा मुसलमान मराठवाड्याच्या विकासाशी संबधित नसावा का ?
अवश्य असावा. मुळात हा प्रश्न येण्याचेच कारण नव्हते. मुळात मीम सारख्या पक्षाला मिळालेले यश हे मराठवाड्याच्या अवस्थेशी संबंधित नसावे असे वाटते इतकेच. अन्यथा मुसलमान काय अन दलित काय. विकास कोणीही करावा.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा 21/10/2014 - 09:47
हो. विकासाचा मुद्दा आणि मीम ला मिळालेली मते यांचा काहीही परस्परसंबंध असेल असे वाटत नाही. आणि विकास कधी होतो, जेव्हा शेवटच्या कडीपर्यंत विकास पोचतो तेव्हा. मुस्लिमसमाजाबद्दल माझे असे पर्सेप्शन आहे की त्यांना मिळालेले सगळे पैसे वेगळ्याच कारणासाठी नेते वापरतात आणि त्यातीलच काही पैशांच्या सहाय्याने सामान्य मुसलमान दारिद्र्यात आणि अज्ञनात कसा राहील याची काळजी घेतात. हे जो कोणी थांबवू शकेल तोच मुसलमानांचा विकास करू शकेल.

सुहास.. 20/10/2014 - 19:05
मीम सारख्या पक्षाला मिळालेले यश हे मराठवाड्याच्या अवस्थेशी संबंधित नसावे असे वाटते इतकेच. >>> तिथे दलीत-मुस्लीम यांची संख्या जास्त आहेत, म्हणुन जाणु बुजुन विकास थांबविला जातो , अशी धारणा/अफवा/विदारक सत्य/ आहे या लोकांची रे !!

बॅटमॅन 20/10/2014 - 19:09
तिथे दलीत-मुस्लीम यांची संख्या जास्त आहेत, म्हणुन जाणु बुजुन विकास थांबविला जातो
रोचक दावा आहे. विदा असल्यास पहायला आवडेल, नपेक्षा पाहू कुठे काही मिळालं तर.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 19:23
अजुनही आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याची भारतीय वृत्ती जात नाही. विदर्भ मागास राहीला का तर म्हणे प.महाराष्ट्राने आमचा विकास थांबवला. मुसलमान मागे राहीला का तर म्हणे हिंदुनी विकास थांबवला. कोण बाहेरचा येउन आडवत नाही तुमची प्रगती, स्वतालाच ती जमत नसते आणि कष्ट करायची तयारी नसते.

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 19:17
ह्या निकालावरुन असे दिसते की मनसे ला २००९ मधे जे यश मिळाले होते ते भाजप आणी शिवसेना युती असल्यामुळेच असावे. जिथे भाजप उमेदवार होता तिथे काही शिवसेनेच्या मतदारांनी मनसेला मतदान केले आणि शिवसेनेचा उमेद्वार होता तिथे काही भाजपच्या मतदारांनी मनसेला मत दिले होते. कोथरुड मधल्या माझ्या अनेक नातेवाईक्/मित्र मैत्रिणींनी २००९ साली शिवसेना नको म्हणुन मनसे ला मत दिले होते.

सुहास.. 20/10/2014 - 19:17
प्लीज !! मी पण बघतो...माझ्या औं.बाद च्या 'सुशिक्षीत' मित्रांकडुन आलय ...त्यातला एक " कोर्टाचा जज्ज हाय !! ( मग आपली मराठवाड्याकडं बी वठ हाय ;) )

श्रीगुरुजी 20/10/2014 - 21:10
नुसत्या मिमला कशाला नावे ठेवायची? मानखुर्द-कुलाब्यातून धर्मांध अबू आझमी दुसर्‍यांदा निवडून आला हे दुर्लक्षिले जातंय. २००४ ला डॉन अरूण गवळीसुद्धा तुरूंगातून निवडून आला होता. असे तुरळक आमदार निवडून आले म्हणून फारसा फरक पडत नाही. यांची संख्या खूप मोठी असेल तरच काळजीचे कारण आहे.

विकास 21/10/2014 - 01:10
लेख आणि विश्लेषण नेहमीप्रमाणे आवडले. :) काही मुद्दे: शिवसेनेची साथ तुटणे हे भाजपसाठी धक्कादायक होते तसेच भाजपची साथ तुटणे हे शिवसेनेसाठीही धक्कादायक होतेच. हे विधान तितकेसे पटले नाही. भाजपाला काडीमोड घेयचाच होता. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून जर निर्विवादपणे लोकांपुढे येयचे असेल तर हळूहळू प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार हे नक्की. त्यात शिवसेनेची कुबडी सगळ्यात भक्कम होती. त्या संदर्भात आत्ता मोजका धोका पत्करणे (calculated risk) शक्य होते. जे त्यांनी केले. त्यामुळे त्यांना काही ते धक्कादायक होते असे वाटत नाही. तसेच शिवसेना आणि त्यातही उद्धव हे देखील हे जाणून नसतील असे वाटत नाही. पण त्यांनी देखील किंचीत आंधळ्या आत्मविश्वासाने तोच धोका पत्करला. गेल्या निवडणुकीत भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या म्हणूनच त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद गेले. यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी बुडणार हे नक्की होते. अशा वेळेस पण जर युती करून शिवसेनेच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या असत्या तर ते शिवसेनेच्या अस्तित्वास अधिक धोकादायक ठरू शकले असते. आता काही झाले तरी, बाळासाहेब नाहीत, मोदी आहेत वगैरे म्हणत आम्ही तरी देखील कसे इतके जिंकलो असे ते म्हणू शकतील. - असे वाटते! अर्थात आत्ताच्या अनुभवातून न शिकता शिवसेनेने तरी देखील टर्रेबाजी सोडली नाही तर मग मात्र नजीकच्या भविष्यात अस्तित्वास कायमस्वरूपी धोका बसू शकतो.
----------
त्या व्यतिरीक्त भाजपामधून निवडून आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेने मधून आयात केलेले किती जिंकले हे देखील बघणे महत्वाचे ठरेल. त्यांनी ते everything is fair ...या तत्वानुसार केलेले असले तरी त्यामुळे काही अंशी अंतर्गत आव्हान नक्कीच तयार होऊ शकेल असे वाटते.
----------
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अर्थात पवारांच्या काँग्रेसचे) पूर्वजन्मातील नाव हे "समाजवादी काँग्रेस" असे होते. त्याला काँग्रेस (स) असे म्हणत. त्यावर विदुषक उपाधी मिळालेले तत्कालीन काँग्रेस नेते बाबासाहेब भोसले म्हणाले होते की काँग्रेस (स) म्हणजे "काँग्रेस संपली"! आज हे दोन्ही काँग्रेसला लागू झाले आहे असे म्हणायची वेळ काँग्रेसजनांनी स्वकर्तुत्वाने आणलेली आहे. त्या काळात निवडणुकीत शरद पवारांचा त्यांच्या जाहीरातींमधे "महाराष्ट्राचा बुलंद आवाज" असा उल्लेख केलेला असायचा. त्यावर देखील "हा कसला महाराष्ट्राचा बुलंद आवाज? ही तर बारामतीची पिपाणी" असे म्हणले गेले होते. आज राजकारण काही असुंदेत पण ज्या पध्दतीने राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिला आहे त्यावरून ही पिपाणीच आहे असे खेदाने म्हणायची वेळ आली आहे. कधी काळी पवार हे सर्वपक्षांमधे आणि महाराष्ट्रातील सर्वप्रकारच्या जनतेमधे (भले सगळे पटले नाही तरी) बर्‍यापैकी मानले गेलेले नेतॄत्व होते. दुर्दैवाने म्हणता येणार नाही पण "स्वकर्तुत्वाने" आज सगळेच बदलले आहे. पवारांपेक्षा कमी पॉप्युलॅरीटी असली तरी एकेकाळी मराठी तरूणांमधे प्रिय ठरू लागलेले राज ठाकरे त्याच लाईनमधे उभे आहेत आणि उद्धवपण बदलले नाहीत तर फार लांब नाहीत. आज भाजप या "पंक्तीत" नसावा असे वाटत असले तरी यासर्वावरून भाजपाच्या नेत्यांनी देखील शिकणे हे जनतेपेक्षा देखील त्यांच्या स्वतःसाठी महत्वाचे आहे असे वाटते. असो.
----------
ओवेसीच्या मिमचे दोन आमदार आलेत हे आवडण्यासारखे नाही. तरी देखील कदाचीत "अदृश्य आशिर्वाद" (blessing in disguise") ठरू शकणारी घटना आहे असा आशावाद एकीकडे वाटत आहे.
----------
कॉंग्रेसबद्दल काय म्हणावे? जो पर्यंत काँग्रेसजन हे काही काम करत नाहीत आणि गांधी घराण्याच्या एक खांबी तंबुतून बाहेर पडत नाहीत तो पर्यंत घसरगुंडीच आहे.
----------
अजून एक गोष्ट या महाराष्ट्रातील निवडणुकीत झाली आहे... कम्युनिस्ट आणि समाजवादी यांचा किमानपक्षी आत्ता तरी लय झालेला दिसत आहे. आता उरलो (जालावरील) लेखनापुरता अशी या विचारवंतांची अवस्था झालेली आहे. त्या विचारातील राजकारण्यांना तर मराठी जनतेने पार हद्दपारच केले आहे. जे काँग्रेसच्या लयापेक्षाही अधिक उत्तम आहे असे वाटते... पण असे होण्याची कारणे काय असावीत?

In reply to by विकास

क्लिंटन 21/10/2014 - 18:16
हे विधान तितकेसे पटले नाही. भाजपाला काडीमोड घेयचाच होता. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून जर निर्विवादपणे लोकांपुढे येयचे असेल तर हळूहळू प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार हे नक्की. त्यात शिवसेनेची कुबडी सगळ्यात भक्कम होती. त्या संदर्भात आत्ता मोजका धोका पत्करणे (calculated risk) शक्य होते. जे त्यांनी केले. त्यामुळे त्यांना काही ते धक्कादायक होते असे वाटत नाही.
कदाचित धक्कादायक हा शब्द चुकला. भाजपने गेल्या २५ वर्षात एकदाही निवडणुक लढवली नाही अशा जागांची संख्या १५० होती. इतक्या वर्षात या मतदारसंघांमध्ये पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे योग्य तो उमेदवार देतानाही पक्षाची दमछाकच झाली अशा प्रकारच्या बातम्या आहेत/होत्या. भाजपचे हाडाचे, तळमळीचे कार्यकर्ते सगळीकडे सापडतील.पण सगळे हाडाचे कार्यकर्ते हे योग्य उमेदवार होऊ शकतीलच असे नाही.त्यामुळे नक्की उमेदवार म्हणून कोणाला उभे करा हा प्रश्न भाजपपुढे होता.पूर्वी युती असताना ही डोकेदुखी नव्हती. निवडणुकीच्या ऐन तोंडावरच हे नवे आव्हान पक्षापुढे उभे राहिले हा एक धक्का होता. त्या अर्थाने धक्कादायक हा शब्द वापरला.

+१. तरीही सत्तेचे लोणी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे आव्हान आयात केलेल्यांपासून उभे राहणार नाही.पण अन्यत्र एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी केशुभाई पटेलांविरूध्द बंड केले त्याचे एक कारण होते की पक्षाच्या १२१ आमदारांपैकी किमान ४५ आमदार मुळात काँग्रेसमधून आलेले होते (ही बातमी मी त्यावेळी वाचली होती. आता या क्षणी याचा आंतरजालीय दुवा माझ्याकडे नाही). अशाप्रकारे आयात केलेल्यांना जास्त महत्व मिळू लागले आणि खरोखरच्या भाजपवाल्यांना डावलले जाऊ लागले तर त्याचीही प्रतिक्रिया उमटू शकेल.

@मित्रहो प्रसार माध्यमांनी भाजप बद्दल माहिती आधीच दिली आहे मी येथे सेनेबद्दल विचारणा केली आहे , आणि इतर पक्षांच्या आयाराम गयाराम लोकांचा जया पराजयाच्या एखादा तक्ता मिळाला लय भारी काम होईल , ह्या निवडणुकीच्या निमित्ताने छोटा कोण व मोठा कोण हे कोण चुकले.

ऋषिकेश 21/10/2014 - 13:06
छान विश्लेषण या निवडणूकीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे NOTA या पर्यायाची उपलब्धता. काही ठिकाणी त्याचा वापर अतिशय सढळ आहेच. पण NOTA पेक्षा मत न दिलेले बरे म्हणणार्‍यांना NOTA काय करू शकतो याची चुणूक "पिंपरी" मतदारसंघाने दिली आहे पिंपरीमध्ये विजयी उमेदवाराचे "मार्जिन" अर्थात फरकाचा आकडा NOTA ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. तेथील विजयी उमेदवाराला 51096 मते मिळाली तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला 48761. अर्थात मार्जिन २३३५ मतांची झाली, मात्र NOTA या पर्यायाला ४४३५ मते आहेत. कन्नड मतदार संघातही मार्जिन १५६१ची तर नोटाला २०९४ मते आहेत. तीच गत गंगाखेडची मार्जिन 2289 तर नोटाला मते 2024 (गडचिरोलीमध्ये 17510 मतांसह नोटा तिसर्‍या स्थानावर आहे - दुसर्‍या स्थानावरील उमेदवाराला 18280!) इतरही अनेक मतदारसंघात नोटाने निकाल बदलण्याची शक्यता निर्माण केली आहे. हा पर्याय नसताना या लोकांनी उपलब्ध पर्यायांमध्येच मतदान करावे लागले असते किंवा मग त्यांनी मतदानच केले नसते. दोन्ही गोष्टीं होण्यापेक्षा सद्य रचना अधिक चांगली आहे. तेव्हा नोटा हा फस्ट पास्ट द पोस्ट या प्रकारात "पोस्ट" चे स्थान हलवण्याचे महत्त्वाचे कार्य करतो हे मी मागे म्हटले होते त्याला हा विदा पुष्टीच देतो आहे.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 21/10/2014 - 13:10
नोटा पर्याय कैक लोकांनी अवलंबला म्हणून निकाल बदलला हे कसे काय? ते स्पष्ट होत नाहीये. उमेदवार अ जिंकला असता, पण नोटा मुळे उमेदवार ब जिंकेल असं थोडीच होतंय?

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 21/10/2014 - 13:16
जर नोटा पर्याय नसता तर त्याला मत दिलेल्यांनी एका पक्षाल मत देण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर अशी लोक विनिंग मार्जिनपेक्षा अधिक आहेत. तेव्हा अ ऐवजी ब जिंकू शकला असता उदा. वर पिंपरी विधानसभाक्षेत्रात ४०००+ लोकांनी नोटा निवडलाय, त्यापैकी अर्ध्यांनी जरी क्र. दोनच्या उमेदवाराला मत दिले असते तर तो जिंकला असता.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 21/10/2014 - 13:22
अच्छा, आले लक्षात. पण नोटा नसता तर नोटावाल्यांची मते कशी विभागली गेली असती हे सांगायचा काही मार्ग थोडीच उपलब्ध आहे? आणि, तुमचे म्हणणे मान्य करूनही, जे कोणी उपलब्ध उमेदवार (गणंग & ऑल) आहेत त्यांपैकीच एक (गणंग अगेन) निवडून येणार...मग नोटाने काय मोठा तीर मारला? लोकांच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत ही निव्वळ.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 21/10/2014 - 14:02
अच्छा, आले लक्षात. पण नोटा नसता तर नोटावाल्यांची मते कशी विभागली गेली असती हे सांगायचा काही मार्ग थोडीच उपलब्ध आहे?
मान्य. तो मार्ग उपलब्ध नाहीच, शिवाय त्या सार्‍यांनी नोटा नसताना मतदान केलेच असते का याचीही खात्री नाही. पण ते केले आहे आणि त्याने एक "शक्यता" निर्माण झाली आहे.
आणि, तुमचे म्हणणे मान्य करूनही....मग नोटाने काय मोठा तीर मारला? लोकांच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत ही निव्वळ.
ओके. मताचा आदर आहे. माझ्यासाठी नवा पर्याय मिळणे तसा पर्याय नसण्यापेक्षा किंवा दुष्कर असण्यापेक्षा अधिक स्वागतार्ह आहे. आणि आता त्या पर्यायाची उपलब्धता आणि त्यामुळे निकालांवर फरक पडण्याची शक्यता निर्माण होणे तर अधिकच महत्त्वाचे आहे.

In reply to by ऋषिकेश

प्रचेतस 21/10/2014 - 14:55
ऋच्या मताशी सहमत. पिंपरी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटाचा नक्कीच फायदा झालेला आहे. कमळ चिन्ह नसल्याने नोटाला मत देऊन आलेले दोन सदस्य आमच्या घरातच आहेत (मी सोडून).

In reply to by प्रसाद१९७१

ऋषिकेश 21/10/2014 - 14:44
निव्वळ एक कर्तव्य म्हणून (किमान मी तरी मतदानाच कर्तव्य भारतात असताना बजावायचे टाळत नाही. माझ्यासारखे बरेच असतात)

In reply to by विजुभाऊ

सुधीर 21/10/2014 - 18:17
तृटी तर आहेतच आणि कालानुरुप त्यात बदल घडवून आणता येतीलच. पण जसजशी या पर्यायाची आणि स्वछ चारित्र्य असणार्‍या उमेदवाराच्या मागणीसाठीची जागरुकता वाढत जाईल तस तशी अगदी पक्षनिष्ठ मतदार सुद्धा आपापल्या राजकिय पक्षांना आपल्या विभागासाठी चांगला उमेदवार देणे भाग पाडतील अशी आशा वाटते.

पैसा 22/10/2014 - 20:54
खास वाट बघावी असा लेख आणि त्यावर उत्तम चर्चा! मस्त!

आदिजोशी 05/11/2014 - 14:56
निवडणूकीनंतर निकालाचे पोस्टमॉर्टेम करून स्वतःच्या मेंदूचा भुगा करून घेण्यापेक्षा क्लिंटनच्या लेखाची वाट बघायचा जो निर्णय घेतला होता तो फळला. क्लिंटनचा लेख येईल अशी आशा नव्हे खात्रीच होती. आमच्याकडून एक मिसळ लागू :)

In reply to by आदिजोशी

कलंत्री 08/11/2014 - 12:35
या वेळची निवडणूक कोणतीही विचारधारा नसलेली, सभ्यता आणि सुसंस्कृतता, पक्षातून सत्तेकडे जाण्याचा प्रचलित मार्ग नसलेली असा प्रघात ठरणारी होती. त्याही पलीकडे आजही सर्वच पक्षांचे चित्र धुसर असेच आहे. काही विजयाचा उन्माद असणारे, काही पराभव न पचवु शकणारे तर काही पक्ष पराभूत मानसिकतेच अजूनही अडूकन पडलेले असे विचित्र असे चित्र आहे. डोक्याचा भूगा बहुधा सदैव चालू राहिल अशी भिती वाटते.

नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ५ - आयगर नॉर्डवांड आणि परिसर

मधुरा देशपांडे ·

एस 20/10/2014 - 20:29
हा फोटो खूपच छान आला आहे. सुरेख प्रवासवर्णन!

सखी 20/10/2014 - 21:27
छान वर्णन, टुमदार घरं आणि गावं, फोटोही देखणे. ते लाकडी पाण्याचे साठे कोणासाठी? गायीसाठी असा अंदाज आहे पण या भागात गायी दिसल्या नाहीत.

चौकटराजा 22/10/2014 - 17:32
आताच मुरेन गावात थोडा भटकलो. मग एकदम बिर्ग च्या फलाटावर. तिथूनही " ते" त्रिकूट दिसते. मग येकदम शिल्टहोर्न वर उडी. अंग आश्शी इथून ब्रह्मा विष्णू महेश चांगले दिसतायत ! बाकी आजूबाजूला बरीच " शिंगं " उगवलेली आहेत म्हणा! आपली सफर मस्त चाललीय माझी (?) सुद्धा !

पैसा 13/11/2014 - 23:12
अप्रेअतिम आहे सगळं! ठिकाणं, लिखाण आणि फोटो!!

आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ हवामानाचे अंदाज बघत दुसऱ्या दिवशी कुठे जावे यावर विचार सुरु होता. डोक्यात होते युंगफ्राउ (Jungfrau) या शिखरावर जायचे. इथवर जाण्यासाठी डोंगरातून रेल्वे मार्ग तयार केलेला आहे जो आयगर (Eiger), म्योंश (Moensch) अशा शिखरांखालुन युंगफ्राउ पर्यंत जातो.

ऐलमा पैलमा

अनाहिता ·
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. मधुरा देशपांडे हिची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ऐलमा पैलमा लेखिका: अनाहिता __________________________ थोड्याच वेळात आपण मुंबईच्या छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू अशी वैमानिकाने सूचना केली. पहाटेची वेळ होती. अजून सूर्योदय व्हायचा होता. दिव्यांनी मुंबई लखलखत होती. माईआजी मायदेशी उतरण्यास आतुर झाली होती. अनेक आठवणी दाटून आल्या होत्या.

चौकटराजा 22/10/2014 - 10:55
मी माझ्या मुलीला नेहमी सांगत असतो ." आपल्या भोवती चांगल्या, खुल्या मनांचा राबता ही सर्वात मोठी संपती आहे !" मायामी मधे स्थायिक झालेल्या माझ्या एक सहकारी महिलेने माझ्याशी आपणहून फेसबुक वर मैत्री आरंभली कारण तिला तिथ वाटणारे एकाकीपण ! टीपटाप रस्ता हवा , मॉल हवा पण त्यापेक्षाही यांत्रिकपणाला शरण न गेलेला माणूस फार महत्वाचा ! एरवी खोडकर, मिश्किल असणारीने ही तशी गंभीर कथा लिहलीय ! सुरेख !

In reply to by सस्नेह

सखी 24/10/2014 - 17:59
वेगळ्या वळणाने जाणारी ओढाळ कथा. विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य - हे आणि असेच म्हणते.

अत्यंत समतोल, हृदयस्पर्शी, बरंचसं वास्तव लेखन आणि सूक्ष्म निरिक्षणांनी भरलेली कथा ही कथा न राहता सर्वांचाच कधी न कधी घेतलेला स्वानुभव आहे. त्यामुळे कथेशी मनाने जुळणे नैसर्गिकपणे झाले आहे. मधे मधे जरा पाल्हाळीक आणि भारतातल्या नकारात्मक गोष्टींमध्येच अडकल्यासारखी वाटली पण पुढे पुढे ही भावना विरळ होत गेली आणि सर्वाथाने.....

कथा भावली.

...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा? हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 24/10/2014 - 11:27

खरं आहे. वाचताना पटकन बोचतं, पण नंतर लक्षात आलं की लिहिणारीने ते अमेरिकेत जन्माला आलेल्या अमेरिकन मुलीच्या भूमिकेतून नीट, जाणीवपूर्वक लिहिलं आहे. भले या कथानायिकेचे आईवडील, नातेवाईक भारतीय आहेत पण तिचा देश भारत नाहीये. USA च आहे!

भाते 24/10/2014 - 20:39
किमान १० वेळा कथा/लेखन वाचल्यावर प्रतिक्रिया देत आहे. वाचताना बऱ्याचदा अस्वथ व्हायला झाले. अनाहितांकडुन असे आणि यापेक्षा आणखी सुंदर लेखन वाचायला नक्की आवडेल. अनाहिता संपादक मंडळ, २०१५ चा पहिला 'अनाहिता दिवाळी अंक' समस्त मिपाकरांना वाचण्यास द्यावा हि नम्र विनंती.

वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांचं मनोगत शब्दात बरोबर पकडलं आहे. मात्र हे कमीतकमी दीर्घकथेचे कथाबीज नक्कीच आहे, त्यामुळे एकाच लेखात असलेली ही कथा भराभर पुढे जाते. हा प्रयोग पुढच्या वेळेस जास्त वेळ घेऊन केल्यास नक्कीच एखादी सुंदर लेखमाला तयार होईल. या अनवट प्रकारच्या भविष्यातल्या लेखनाला अनेकानेक शुभेच्छा ! विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य ! +१०००, हे दोनदोनदा सांगितलेले नसते तर विश्वास बसणे कठीण होते !

अजया 25/10/2014 - 17:55
काय मस्त वाटतंय ही कथा इथे वाचायला! ही कथा साहित्य घेण्यापासुन, बांधुन तयार होईपर्यंत आणि अाता ताटात घालुन इथे, सर्वजणींनी मिळुनमिसळुन केलेला प्रयत्न,छान जमुन आलाय. अनाहिता विशेषांक येणारच!!

ऋषिकेश 27/10/2014 - 13:12
कथा लांबली आहे, पण या प्रकाराच्या कथाप्रकारात हे स्वाभाविकही आहे म्हणा! चांगला प्रयत्न. सुचवणी: पुढिल कथा अमेरिकेतील भारतात स्थायिक झालेल्या आज्जीला व तिच्या भारतातच जन्मलेल्या नातीला अमेरिकावारी करवून आणा. (नॉस्टॅल्जिआ, ओढ आदी) भावना सेम फक्त स्थळसापेक्ष निरिक्षणं वेगळी आहेत हे लगेच जाणवेल

कथा वाचून असे वाटलेच नाही की ती (केवळ) एका व्यक्तीने लिहिलेली नाहीये. ऋषिकेश यांच्या सुचवणीस अनुमोदन. बादवे 'ऐलमा पैलमा' या शब्दांबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.

कपिलमुनी 28/10/2014 - 12:39
मस्त वर्णन ! आणि योग्य शेवट ( मेलोड्रॅमिक शेवट न ठेवल्याबद्दल अभिणंदन ) थोडा थोडा स्वदेस आठवला

आम्हा अनाहितांतर्फी सर्वांचे आभार. :) @चौकटराजा काका, ही सगळ्यांनी मिळुन लिहिलेली कथा आहे. त्यामुळे ते सगळ्यांचे श्रेय आहे. @पेठकर काका, "तुमचा भारत" लिहिण्यामागची पार्श्वभुमी पैसाताई म्हणाली तशीच. प्रोत्सहनासाठी धन्यवाद. @बोका-ए-आझम, क्रमश: वाचायला आवडणार असेल तर लिहु की पुढचा भाग. हाकानाका. @ऋषिकेश, तुमच्या सुचवणीबद्दल विचार करु. धन्यवाद. @इए काका, भाते, श्रीरंग जोशी, कपिलमुनी अनेक धन्यवाद. अजुन नक्कीच अशा प्रकारचे लेखन करु. @अजयाताई, स्नेहाताई, सखी, अनन्याताई, तुमचे प्रोत्साहन होतेच नेहमी. आता कथा इथे आल्यावर अजुनच मस्त वाटतंय. :)

In reply to by मधुरा देशपांडे

मधुरा, पटलेलं नसलं तरी स्पष्टीकरणाचा स्विकार केला आहे. दखल घेऊन भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.