Skip to main content

कुंदन मोर

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 20/10/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
कुंदन मोर r नमस्कार मंडळी! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची खरेदी केली असेलच. कपडे खरेदी , भेटवस्तू याबरोबरच महत्त्वाची खरेदी असते ती गृहसजावटीच्या वस्तूंची. मोठ्या वस्तूंपासून ते छान छान पणत्या, दिवे, तोरण, लाइटच्या माळा इ. एक ना दोन वस्तू खरेदी केल्या जातात. त्यातच रांगोळीच्या विविध रंगाची खरेदी येते. रांगोळी येत असो वा नसो चार रेघा काढून रंग भरावेसे वाटतातच. आजकाल तयार छापही मिळतात तेही आणले जातात. या रांगोळीतच थोडी विविधता आणण्यासाठी आता बाजारात सुबक लाकडी साचे विविध आकाराचे मिळू लागलेत. त्यावर रंगीबेरंगी कुंदन चिकटवून रांगोळ्या तयार करता येतात. http://www.misalpav.com/node/26882 चाळणीने रांगोळीचे रंग पसरून वा विविधरंगी फुलांच्या पाकळ्या पसरून या कुंदनच्या रांगोळ्या मांडता येतात. कधी हेच साचे ताटाभोवती महिरप म्हणून मांडता येतात तर कधी देवापुढे मांडता येतात. साच्यांचे वेगवेगळे प्रकार आकर्षक दिसतात. या वेळेस दिवाळीसाठी मी आणले मोराचे साचे. आणि त्यावर चिकटवायला विविध कुंदन. मोरासाठी वापरलेले साहित्य:
  • मोराचे लाकडी साचे
  • सोनेरी आणि जांभळ्या रंगाची मण्यांची चेन
  • रंग (जांभळा आणि सोनेरी)
  • आवडीप्रमाणे विविध आकाराचे आणि रंगाचे कुंदन (डिझाइनवर अवलंबून)
  • चिकटवायला ग्लु
r1 प्रथम साच्याला हवा तो आकर्षक रंग देऊन घ्यावा. मोर असल्याने मी जांभळा रंग वरच्या भागाला आणि पिसार्‍यासाठी सोनेरी रंग दिला. रंग साधारण दोन वेळा द्यावा लागतो तरच तो नीट बसतो. r2 रंग वाळल्यावर त्यावर कडेने सोनेरी रंगाची बारीक मण्यांची चेन चिकटवून घेतली. पिसारा कुंदनने पूर्ण भरून घ्यायचा होता म्हणून मोराच्या वरच्या भागात कमी कुंदन वापरले. मोराचा पोटाचा भाग उठावदार होण्यासाठी वेगळा आखून घेतला. तो चेन आणि कुंदन लावून पूर्ण केला. r3 त्यानंतर मोराच्या पिसार्‍याला दुहेरी सोनेरी आणि मधे जांभळी चेन लावली. (चेन चिकटवताना आकारानुसार कापून घ्यावी.) मग मधल्या पिसार्‍यावर कुंदनने डिझाईन बनवले. r4 असे दोन मोर तयार केले. दोन्ही मोरांमधे वेगळ्या आकाराची कुंदन रांगोळी ठेवून फुले आणि पणत्यांनी एक मोठी रांगोळी सजवली. r5
दिवाळी अंक वर्ष

वाचने 7838
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अप्रतिम!! मी कोयर्‍या आणलेत लाकडाच्या. आता हे पाहून, नक्की कस बनवायचं ते समजल. धन्यवाद.