मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) जॉर्डन

डॉ सुहास म्हात्रे ·
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

एस 21/10/2014 - 20:09
पेत्रा येणार, येणार असे म्हणता म्हणता दिवाळी अंकात उगवले शेवटी! वा, क्या बात है! प्रवासवर्णन आणि छायाचित्रे छानच, पण तेथील भौगोलिक व ऐतिहासिक ओळख जास्त आवडली. अनेकाभार!

चौकटराजा 22/10/2014 - 18:46
पेट्रा ते पेट्रा हे खरेच आहे. पण इथे गेल्याचा काहीसे समाधान , अजंता, कार्ला, आता इथे दर्शविल्या प्रमाणे सांदण दरी तसेच बदामी येथेही मिळेल . आपल्या लेख म्हणजे पेट्रातील कलाकारीचा (मानवी व नैसर्गिक) उत्सवच आहे ! बाकी उंटावर च्या सवारी वर हातात चाबुक व डोक्यावर हॅट का नाही ?

इस्पिकच्या एक्क्याचे आम्ही 'पंखे' आहोत ते केवळ त्यांची भटकंतीची 'खाज' आणि पर्यटनस्थळाचा सखोल अभ्यास करून स्वच्छ आणि सोप्या शब्दात मांडणी करण्याच्या कलागुणांमुळे. निवृत्तीवयाच्या जसजसे जवळ पोहोचतो आहे तसतसे भटकंतीला सुरुवात केली आहेच. इस्पिकचा एक्का ह्यांची ही प्रवास आणि स्थलकाल वर्णने सर्वांसाठीच मोठी मार्गदर्शक ठरत आहेत. नशिब त्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाही (बाकी, सशुल्क माहितीही उपकारकच ठरावी अशी आहे) हे आमचे भाग्य. अल्फ शुक्रन. पेठकरांच्या पर्यटन यादीत 'पेत्रा' आलेले आहे.

स्पा, जेपी, स्वॅप्स, मधुरा देशपांडे, मोदक, चौकटराजा, इशा१२३, स्नेहांकिता, प्रभाकर पेठकर, खटपट्या, वल्ली, कुसुमावती, सानिकास्वप्निल आणि जुइ : सर्वांसाठी अनेकानेक धन्यवाद !

एक नाते - अनोखे

वैशाली हसमनीस ·
एक नाते — अनोखे

     माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात.

परत नाही भेटायला मिळणार तिला ह्याची प्रचंड खंत आहे मनात... आयुष्य किती कठोर आहे.... भेटणार्‍या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकात मी माझे आजी आजोबा बघतो....

पैसा 22/10/2014 - 14:16
आजी नातवंडांना बिघडवते असं वाटतं खरं, पण त्या भूमिकेत शिरल्यावर कळेल नेमकं काय होतं ते! ज्यांना ज्यांना आजी मैत्रीण म्हणून मिळाली ते खरेच नशीबवान!

सर्वात आधी 'आजी' पदाला पोहोचल्याबद्दल अभिनंदन. लेख जरा एकांगी झाल्यासारखा वाटला. ह्या नात्याचे वर्णन आजोबा ह्या सदरात बसणाऱ्या समस्त पुरूष वर्गालाही तंतोतंत लागू पडते. ह्या एका वाक्यात बिच्चार्‍या आजोबा वर्गाला गुंढाळून टाकल्यासारखे वाटले. मुळात स्त्री म्हणजे 'कोमल भावनांचे प्रतिक' आणि पुरुष म्हणजे 'कठोरतेचे पुतळे' ह्या चुकीच्या गृहीतकावर वरील कांही निरिक्षणे बेतलेली आहेत त्यामुळे लेखाचा समतोल (जरा) ढळलेला आहे. ह्या सर्व नात्यांहून एक आगळेवेगळे, बोनस म्हणून पदरात पडलेले, तरीही अत्यंत गहिरे आणि हृद्य, तरीही थोडेसे उपेक्षित राहिलेले नाते म्हणजे आजी आणि नातवंडाचे नाते. आजी नातवंडांइतकेच आजोबा-नातवंडं हे नातंही तितकच अनोखं असतं. आजोबांना बिलगणारी नातवंडंही तेवढीच दृष्टीस पडतात. आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीत पुरुषी दरारा थोडा जास्तच असल्यामुळे काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास नातवंड आजोबांपेक्षा आजीलाच जास्त बिलगते हे खरे. त्या पुरूषी दरार्‍यावर असलेला घरच्या स्त्रीचा दरारा चिमुकल्यांच्या नजरेतूनही सुटत नाही. वडिलांच्या भूमिकेतून आजोबांच्या भूमिकेत शिरल्याबरोबर पुरुषाच्या वागण्यात फरक पडतो. तो हळूवार होतो. म्हातारपणी (दोघांनाही) 'दूधापेक्षा साय जास्त महत्त्वाची आणि आवडीची वाटत असते.' स्वतःच्या मुलांना शिस्त लावायची असते पण मुलाच्या मुलांवर 'नुसते प्रेम उधळायचे असते' अशा विचारांप्रती दोघेही आलेले असतात. मुलांना शिस्त लावण्याच्या (आपलं प्रेम बाजूला ठेवून) कंटाळवाण्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यावर उर्वरीत आयुष्यात त्यांना ही 'साय', हाच आयुष्यातला 'स्नेह', स्वतःची शारीरिक दु:ख आणि आयुष्याच्या अटळ शेवटाकडे होणारी वाटचाल सुसह्य करण्यासाठी मानसिक बळ आणि समाधान देत असतो. दोघांनाही त्याची अतीव गरज असते त्यामुळे त्यांच्याकडून ही प्रेमाची उधळण आणि नातवंडांमधील मनाची गुंतणूक वाढत जाते. एखाद्या दु:खद घटनेत, आपले आई-बाबा आजी आजोबांना कांही अप्रिय बोलले तर आजी लगेच डोळ्यांना पदर लावते. आजोबा तो आघात सोसून खंबीर राहण्याची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे आजीला नातवंडांची सहानुभूती लगेच मिळते पण आजोबांचे (अश्रू लपविलेले) दु:ख समजून घेण्यासाठी त्यांना बालपणातून बाहेर पडेपर्यंत वाट पाहावी लागते. असो. विषय अत्यंत खोल आणि महासागरासारखा विस्तृत आहे. दोन-चार वाक्यात कवेत॑ येणारा नाही. जाहिरातींमधूनही आजोबा आणि नातवंडांच नातं ह्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. हे मला वाटतं 'आजोबा-नातवंडं' हे नातंही 'आजी-नातवंडांइतकच' प्रभावी असतं हे वास्तव अधोरेखित करतं. लेखातील आजी-नातवंड ह्या नात्याचे गहिरे रंग चांगल्याप्रकारे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल नक्कीच अभिनंदन.

सखी 05/11/2014 - 23:13
आजी जिव्हाळ्याचा विषय खरचं मला तरी हे नाते उपेक्षित वाटले नाही उलट आजी-आजोबा पाहीजेतच असचं वाटतं. पण तरीही तुमच्या भावना पोचल्या, लेख आवडला.

psajid 07/11/2014 - 12:34
परत नाही भेटायला मिळणार तिला ह्याची प्रचंड खंत आहे मनात... आयुष्य किती कठोर आहे.... भेटणार्‍या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकात मी माझे आजी आजोबा बघतो....इति : - माम्लेदारचा पन्खा अगदी याच भावना आहेत माझ्यासुद्धा !

सविता००१ 09/11/2014 - 15:59
अतिशय छान आजी-आजोबा मिळालेल्या भाग्यवंतांमध्ये मी नक्की आहे म्हणून हा लेख आणखी आवडला. शा़ळेतून घरी आल्यावर आजोबांबरोबर सागरगोटे, पत्ते खेळणे, त्यांच्या मित्रमंडळींमध्ये जाउन सगळ्याच आजोबांकडून हक्काने लाड करून घेणे हा एक आवडीचा छंद होता माझा. आजोबांबरोबर मंडईत जाणे म्हणजे तर भारी प्रकार होता. ते इतकी सुरेख भाजी आणायचे आणि आल्यावर आजी-आईला फ्रिजमधल्या जुन्या भाज्या बाहेर काढून, नवीन निवडून आत कशी ठेवायची म्हणजे चांगल्या रहातील हे सांगायचे की आजही फ्रिज मध्ये हे सगळं ठेवताना नकळत ते आठवतातच. आजी तर काय- आवडीचीच असते. एकूणच मस्तच असतात आजी आजोबा.

नरकचतुर्दशी

मृत्युन्जय ·
दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्‍या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा.

सौंदाळा 22/10/2014 - 10:00
लेख आवडला. दिवाळी साजरी करण्यामागे काही कारण, कथा आहे का असे मला एका किरीस्तांव मित्राने विचारले होते तेव्हा मला काही ठोस सांगता आले नव्हते. आंघोळीचे वर्णन मस्तच. लहानपणी अंगाला तेल, उटणे लावायाला ज्याम वैताग यायचा राव. नरकचतुर्दशीची अजुन एक खासीयत म्हणजे सकाळी ४/४.३० ला अभ्यंगस्नान, ६ ला फराळ वगैरे झाल्यामुळे ११/११.३० लाच प्रचंड झोप यायची. आज पण येईल ;). पाउण्-एक तास झोपुन उठलो की फ्रेश वाटायचे.

लेख आवडला. फटाके, किल्ल्याचे उल्लेख वाचताना नॉस्टॅल्जिक करुन गेले. स्वाती

अनुप ढेरे 23/10/2014 - 17:17
कृष्णाने हे ही दाखवून दिले की समाजाने स्वतःच्या आचरणावर स्वतःच काही मर्यादा घालून घेतल्या आहेत आणि त्यातील काही काळाच्या प्रवाही वाटचालीत निरुपयोगी, निरुद्देश किंवा अन्य्याय्य ठरत जातात. माणसाने या मर्यादांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे खूप गरजेचे आहे. कृष्णाने ते करण्याचे धैर्य दाखवले. अश्या कृतींमधुनच समाज शिकत जातो, घडत जातो, बदलत जातो.
ही वाक्य आवडली. पूर्ण सहमत. आपली गृहितकं सारखी तपासून पाहून त्यातली कालबाह्य टाकून देणं आपल्या हिताचं असतं.

पाटिशप्ता

दिपक.कुवेत ·
पाटिशप्ता बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच. पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली. घ्या तर मग... दिवाळीला घरच्यांना हा वेगळ्या चवीचा पदार्थ खायला घालून आनंद द्विगुणित करा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:03
फ्रिजमधे टिकतो हा पण खातेवेळि मावे मधे हलके गरम खात जा. फ्रिज मधे पॅन केक कडक होतात म्हणून. म्हणून करतानाच थोडे कर म्हणजे ताजे ताजे संपतील. सुख्या नारळ्याच्या किसात सुद्धा बाकि जीन्नस घातल्याने एक ठरावीक काळाने नारळास वास येतो.

पहिल्या दोन ओळींमधून मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून बाहेर पडल्यावर पाककृती वाचली. गोडाची असल्याकारणाने 'छान आहे' एव्हढंच म्हणतो. पाटीशप्ता ह्या शब्दाची फोड, व्यत्पत्ती काय आहे? म्हणजे एव्हढ्या साध्या आणि गोड (दिपकच्या भाषेत बंगाली मुलींप्रमाणे) पदार्थाला हे असे उच्चारायला, लक्षात ठेवायला कठिण नांव का ठेवले असावे??

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:06
मलाहि माहित नाहि. खरं तर हा पदार्थ बघीतल्यावर ईतकी भुरळ पडली कि ति कधी एकदा करुन खातोय असं झालेलं.

सेरेपी 23/10/2014 - 03:00
माझा आवडता पदार्थ आहे. कधी बनवला नाही पण. आंबा घालायची आयडिया आवडली. फोटो छान आलेत.

आजही माझ्याचपासुन दूर मीही

स्नेहदर्शन ·
आजही माझ्याचपासून दूर मीही तू जशी आहे तसा मजबूर मीही भेटण्या जितकी मला उत्सुक असते ये, व्यथे ये, तेवढा आतुर मीही जेवढे जातो जवळ, ती लांब जाते वाटते आता राहावे दूर मीही लागला होता तिला माझा लळा पण, प्रेमही केले तसे भरपूर मीही एवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे, जाहलो बघ खेळताना क्रूर मीही सांगणारे सांगता लाखो कहाण्या नीट आता वाचतो मजकूर मीही ----स्नेहदर्शन​

भाषेची विभक्ति

वेल्लाभट ·
खरं तर, मराठी, तिची अस्मिता, अभिमान वगैरे यांचा विचार तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी करणं, म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. तो करण्याची जबाबदारी ठराविक लोकांकडे सोपवलेली आहे. ते लोक वेळ बघून, सोयीस्करपणे तो करतही असतात. पण क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतोच आपण. असाच मीही घालवत होतो. पेपर वाचत होतो. एक बातमी अगदी ठळक छापलेली दिसली. श्रीनगरच्या पुरात इतके इतके मराठी लोक अडकले. बातमी वाचून राग आला. राग याचा की श्रीनगरचा पूर हे राष्ट्रीय संकट आहे. असं असताना त्यात इतके मराठी अडकले, इतके बंगाली अडकले, इतके तामिळ अडकले...

पैसा 22/10/2014 - 22:12
अस्मिता कुठे असावी याचं तारतम्य आपल्याकडे एकूण कमीच प्रमाणात दिसतं हे खरं आहे!

कविता कशी उपभोगावी

शरद ·
कै. इन्दिरा संतांनी म्हटले आहे " कूकर लावून शिटी होईपर्यंत कथा वाचून होते. जेवण झाल्यावर लोळत लोळत कादंबरी वाचून बाजूला करता येते पण कवितेचे वाचन असे करता येत नाही. कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते " कवयित्री म्हणून त्यांनी काव्याला झुकते माप दिले आहे कां ? मी कविता करत नाही तरीही मला तरी तसे वाटत नाही.. शालेय कविता ( त्यातल्या आजही बर्‍याच पाठ आहेत) सुरेख होत्या पण त्या भावकविता नव्हेत.

अजया 22/10/2014 - 13:34
अतिशय आवडला लेख.
कवीच्या मनात काय होते ते तुम्हाला कळले पाहिजेच असे अजिबात नाही. कवीची कविता तो लिहतो तेव्हा त्याची; ती तुमच्या हातात पडते तेव्हा ती तुमची होते. तुमचा अर्थ तुमच्या पुरता खरा. दुसर्‍याला दुसरा अर्थ लागला तर तो त्याच्या पुरता खरा. बरोबर कोण ? दोघेही. आणि आज तुम्हाला जे वाटले ते उद्या वाटलेच पाहिजे असेही नाही. श्रेष्ठ साहित्याचे लक्षण हे की ते तुम्हाला विचार करावयास लावते
नक्कीच!

पैसा 22/10/2014 - 22:07
केवळ सुंदर! साठ वर्षेतरी भावकविता वाचताय! आणखी काही आम्ही बोलण्यासारखं आहे का? एक अखखं आयुष्य कवितेचा अभ्यास करता आहात! फक्त मनापासून नमस्कार करते!

इनिगोय 23/10/2014 - 07:06
रंगत चाललेल्या कार्यक्रमात दूरदर्शनची 'व्यत्यय'ची पाटी यावी तसं वाटलं. लेख पूर्ण करा ही आग्रहाची विनंती. कवीने वापरलेला एखादा शब्द बदलून पाहायचा, आणि त्याच भावाच्या जवळपास जाणारी कविता आठवून पाहायची हे दोन्ही फार रोचक वाटलं. या त-हेने कविता वाचून पाहिन यापुढे. कवीला अभिप्रेत असलेला अर्थ आणि आपल्याला जाणवणारा अर्थ हे भिन्न असू शकतात हे अनेकदा अनुभवलं आहे. पण एकाच कवितेने पूर्णतः परस्परविरोधी अर्थ दाखवावेत हा अनुभव 'केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली' या कवितेने दिला आहे..! तो अनुभव अजूनही नेमक्या शब्दात मांडणं जमलेलं नाही. दोन्हीही अर्थ दरवेळी तितक्याच ताकदीने खेचून नेतात. लेख आणि कविता या दोन्हीतला फरक सांगायचा तर लेख म्हणजे इस्त्री करून नीट घडी केलेला कपडा. तर कविता म्हणजे सळसळणारा रेशमी स्कार्फ.. हाती लागणारं टोक दरवेळी नवं अन् चटकन निसटेलसं..

In reply to by इनिगोय

कवितानागेश 27/10/2014 - 21:41
अतिशय सुंदर लेख आणि छान प्रतिसाद. इनि, तुझी उपमा अशी लिहिता येइल ना, तलम रेशमी शब्द, सळसळले, -लकाकून निसटले.

सुहास झेले 23/10/2014 - 07:39
खरे सांगायचे तर कविता ह्या प्रकाराला मी फार बिचकून असतो... ;-) वाटायचे काही कळलेच नाही आपल्याला किंवा आपल्या आकलनशक्तीच्या बाहेरचा प्रकार असावा... पण हा लेख वाचून एका वेगळ्या दृष्टीकोनातून कविता वाचण्याचा नक्की प्रयत्न करणार. ह्यावर अजून लेख येऊ द्यात :)

प्रास 24/10/2014 - 18:39
कविता हा साहित्यप्रकार कशाप्रकारे आस्वादित करावा हा अनेक वर्षांपासून पडलेला प्रश्न, तुमच्या या लिखाणामुळे, काही प्रमाणात तरी नक्की सुटला आहे, असं नम्रपणे नमूद करू इच्छितो. या पुढे, कृतीची जोड लागेल, बघू कसं जमतंय ते.... सुंदर लेखन. धन्यवाद!

बेसनलाडू 26/10/2014 - 15:51
लेख आवडला. कवितेशी समरस होणे, एखाद्या शब्दयोजनेविषयी अधिक विचार करणे, कवीच्या मनात काय चालले असेल, याविषयी अंदाज बांधणेयाहे मुद्दे विशेष पटले. (मुद्देसूद्)बेसनलाडू

>>>> कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते. इंदिरा संत ह्यांच्या सारख्या मोठ्ठ्या कवियित्रीने म्हंटले असल्यामुळे त्यावर मी कांही भाष्य करावं एव्हढी माझी योग्यता आणि त्यांच्या इतका साहित्याचा सर्वांगिण अभ्यास माझा नाही. माझ्या अनुभवाच्या शिदोरीच्या भरवशावर चटकन एव्हढंच लक्षात आलं की चिवि जोशी, पुलं देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, नासी फडके, नास इनामदार, वपु, आचार्य अत्रे, लक्ष्मण माने, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिरासदार, शंकर पाटील ह्यांच्या, मी माझ्या शाळकरी जिवनात वाचलेल्या कथाही आज तागायत माझ्या मनात ताज्या आहेत. त्या कथांमधील पात्रे, संवाद आजही मला पाठ आहेत. आजही मला ती पात्रं, संवाद रिझवतात. त्यांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. एक प्रेरणा दिली, संघर्षासाठी मानसिक बळ दिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कांही अमुल्य संस्कार माझ्यावर केले आहेत. कवितांचे महत्त्व आहेच, त्यातील तरलता, भावभावनांशी मांडलेले सप्तरंगी खेळ, कवीचं व्यक्त होणं आणि रसिक वाचकांची त्या भावनांशी नाळ जुळणं अत्यंत स्वाभाविक आणि अतूट वाटतं पण कवितेचे मोठेपण अधोरेखित करण्यासाठी कथाकादंबरी प्रकाराला न्यूनतेचा दर्जा देणं हे कवियित्रीच्या कोमल आणि तरल भावनांच्या विपरीत आहे. असो. प्रत्येकाचे विचार, एखाद्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मी माझा दृष्टीकोन मांडला आहे.

स्पंदना 27/10/2014 - 08:31
लिहीणारा लिहुन जातो अन त्या शब्दांत वाचणारा अडकुन रहातो. आता हे लिहीणं जरा सव्विस्तर, मोकळ ढाकळ, उलगडुन दाखवणारं असेल तर त्याला ललित म्हणता येइल, अन नेमका घाव घालणार्‍या शब्दात उतरलं, तर कविता म्हणता येइल. शरद सर कवितेशी तुमच नातं अधिकच उलगडलं या लेखात.

कथा

अनाहिता ·
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. यशोधरा यांची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ****************** भिवाण्णा पार सटपटून गेला होता.... गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता!

एस 21/10/2014 - 20:03
आपल्या आयुष्याची कथा असंच कोणीतरी लिहीत असेल अन आपल्यालाही आपल्या दु:खांचा उतारा आता मिळेल असा विचार करतच तिने कागद परत नीट जुळवून एका बाजूला ठेवले. त्यावर पेपरवेट ठेवला आणि निर्मितीच्या कळा देऊन लाभलेल्या नव्या शांततेने आणि उत्साहाने सळसळलेली ती आयुष्याला पुन्हा नव्याने सामोरी जायला सज्ज झाली.
शेवटचा परिच्छेद छान झालाय. कथेचा फॉरमॅट (साचा) आवडला.

अमित खोजे 21/10/2014 - 21:34
कथा वाचताना सुरुवातीला वाटले कि आता परत एखादी गरिबांवर होणार्या अत्याचाराची कहाणी वाचायला मिळणार का! कोणतीही अशी कथा वाचायला घेतली कि ९९.९९% कथांचा शेवट दुःखदच झालेला मी वाचला आहे. पण जेव्हा डॉक्टरांनी आनाशेचं बोट बरं केलं तेव्हा जरा कथा पुढे वाचायचा उत्साह आला. सुखद शेवट असलेली माझ्या वाचनातील पहिली ग्रामीण कथा लिहिल्या बद्दल तुमचे शतशः आभार. मनाला उभारी येते अशाने.

सौंदाळा 22/10/2014 - 09:29
कथेचा फॉरमॅट (साचा) आवडला
+१ तळमळीने लिहिणारे, भावनावश होणारे लेखक जेव्हा एखादी कथा लिहित असतील तेव्हा त्यांच्या मनावर, आयुष्यावर कसे पडसाद उमटत असतील याची झलक दिसली. लिखते रहो.. जागते रहो च्या चालीवर जोरात वाचा आणि खरच लिहित्या रहा ही विनंती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पैसा 22/10/2014 - 10:53
अनाहिता असा आयडी नसल्यामुळे हा लेख माझ्या आयडीने प्रसिद्ध करावा लागला, त्याबद्दल संपादकीयामधे लिहिले आहेच. अंक प्रसिद्ध करण्याच्या गडबडीत त्या त्या कथेवर श्रेय उल्लेख करायचा राहून गेला होता, त्याबद्दल मी दिलगीर आहे. ती दुरुस्ती आता केली आहे. या कथेचे सर्व श्रेय यशोधरा आणि इतर अनाहितांचे आहे, त्यांच्यातर्फे तुम्हाला धन्यवाद!

सस्नेह 24/10/2014 - 15:25
अतिशय संयत अन सहज वळणाने जाणारी ग्रामीण पार्श्वभूमीवरील ओघवती कथा. ग्रामीण वातावरणातील असूनही कुठेच भडकपणा नाही याबद्दल अभिनंदन. भाषेला जरतारी ग्रामीण ढंगाचा साज चढवल्याबद्दल अपर्णाताईचे विशेष आभार !

सखी 24/10/2014 - 19:03
सुरेख कथा, आवडलीच. कामाच्या गडबडीत अनाहितात वाचायला, प्रतिसाद द्यायलाही तेव्हा वेळ झाला नव्हता. कथेचा साचा, ग्रामीण साज, आणि लेखिकाच लिहीत आहे ही भावना - सगळचं उत्तम जमुन आलं आहे.

अनन्न्या 01/11/2014 - 18:20
भिवण्णा, आनशी रखमा सगळेच आपल्या जवळचे वाटतात. सुखद शेवट असला की कथा वाचून बरं वाटतं. सहभागी अनाहितांचे विशेष अभिनंदन!

यशोधरा ताई आणि सर्व अनाहिता ज्यांनी अनाहिताच्या ह्या पहिल्या कथेला एकत्र बांधायचे ठरवले त्यांचे मनापासून आभार. ग्रामीण पार्श्वभूमी, भाषा आणि शेवट सगळेच उत्तम जमले आहे. खूप आवडली :)

ह्या अन त्या कारणाने मागे पडत गेलेली एक सुंदर कथा तशीच वाचल्याशिवाय राहिली असती पण आज नशिबाने आणि वेळेने साथ दिली आणि विस्मयकारी कथाकृतीने मनाची पकड घेतली. उत्सुकतापूर्ण कथानक आणि एक वेगळाच बाज, आवडला. अभिनंदन.

दिवाळीतले जी टीव्ही कार्यक्रम

माम्लेदारचा पन्खा ·
दिवाळीतले "जी" टीव्हीवरचे खास कार्यक्रम ( मिपा मेम्ब्रांसाठी जनहितार्थ प्रसारित ) (सूचना - आपल्या जबाबदारीवर सदर साहित्य वाचावे. उल्लेखित व्यवसायांबद्दल कोणतेही साम्य आढळल्यास योगायोग समजावा....(चला मी सुटलो !!) ) १) "बोम मिनिष्टर"- भावजी रोज संध्याकाळी वेगवेगळ्या वहिनींना भेटायला त्यांच्या घरात जातात ऑफिशियली.....घरातले सगळे घरीच असतात.... शिवाय सगळ्या गावाला बोलावून ठेवलेलं असतं घरी....शूटिंगचा क्यामेरामन रोज एक डिस्प्रिन खातो सगळ्यांची एकमेकांशी असलेली नाती ऐकून. भावजिंशी सगळ्या गावाची ओळख ,नमस्कार, चमत्कार झाल्यावर अर्धा एपिसोड संपतो.

मित्रहो 21/10/2014 - 19:26
सतत चहा कोफी पिणे हा इतर घरच्यांचा प्रमुख उद्योग. मी सिरीयल बघत नाही पण बायको बघत असताना सहज लक्ष गेले तर मला आठवतेय ते चहाच पित असतात. टाटा, लिप्टन वाल्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. जाहीरातीचे ब्रेक घ्यायची गरज नाही.

एस 21/10/2014 - 19:56
हे असं लॉजिक आम्ही कुटुंबाला सांगायला गेलो की एक फणकार्‍याने भरलेला जळजळीत कटाक्ष आमच्या वाट्याला येतो. त्यामुळे हतबल! काय करणार?

सुंदर निरिक्षण आणि शब्दांकन. आमच्या घरी ह्या 'सिरियल किलर्स' बद्दल बोलल्यावर 'शी बाई! मी नाही पाहात ह्या त्या न त्याच सिरियल्स.' असं झुरळ झटकल्यासारखं म्हंटलं जातं. एखादी सिरियल पाहत बसली असताना मी म्हंटलं की, ' बघ! सिरियल्स तर बघतेच, मग नाही कशाला म्हणतेस?' तर 'छे:! एव्हढी एकच बघते कधीतरी. ते पण मुद्दाम नाहीच. सहज टिव्ही लावला आणि चालू असेल तर पाहते जरा.' (हे प्रत्येक सिरियलच्या बाबतीत ऐकलं आहे.) लेकरू आमचं त्याच्या रुम मध्ये यू-ट्यूबवरच्या क्लिप्स आणि टोरँटवरून उतरवलेले इंग्रजी चित्रपट दार आतून बंद करून पाहात असतं. त्याचे इंटरेस्ट बदललेत. मी पाककृत्या पाहात असतो. किंवा डिस्कव्हरी वगैरे. मधे जरा कपिल शोने भूरळ पाडली होती पण आता तेव्हढे आकर्षण राहिले नाही.

खुमासदार लेखन. इतक्या सुंदर आणि करमणुकप्रधान मालिका असल्यामुळे प्रेक्षकांना (सॉरी सॉरी... दर्शकांना) जी टीव्ही लावल्या लावल्या करमणुक कर भरावा लागला पायजेल.

भाते 22/10/2014 - 20:41
तुम्ही या सगळ्या मालिका रोज बघता का? हो असेल तर… तुमच्यापध्दल सहानुभुती :( आणि... तुमच्या जिद्दीला सलाम! :) हापिसातुन घरी आल्यावर ते चेटकिणीच्या आवाजातले बेसूर हसत 'काहिही हं श्री' ऐकलं कि पायातला बुट फेकुन टिव्ही फोडावासा वाटायचा मला! माझ्या नशिबाने ती मालिका घरच्यांनी बघायची थांबवली. :) बाकी, लेख मस्त आहे!

In reply to by भाते

पण माझ्या सक्तमजुरीत ते समाविष्ट आहेच... "काहीही हं श्री" च्या बाबतीत - +१११११११११११११११११११११११११११११ सरकलेली वाटते ही बाई तिच्या चेहर्याचे हावभाव बघून....

In reply to by भाते

जेपी 23/10/2014 - 10:12
हापिसातुन घरी आल्यावर ते चेटकिणीच्या आवाजातले बेसूर हसत 'काहिही हं श्री' ऐकलं कि पायातला बुट फेकुन टिव्ही फोडावासा वाटायचा मला! Laughing Hysterically

स्वप्नज 24/10/2014 - 20:10
'झीट यावी' या च्यानैलचेच वस्त्रहरण केलेत की हो...! बादवे, प्रत्येक सिरीयलमध्ये त्रिशतकी धाग्यांचे पोटेन्शियल आहे.

स्पार्टाकस 01/11/2014 - 11:56
हान् तु च्यायला SSSSSSSSSSSS...!!!! प्रेक्षकाचं (चुकलो चुकलो दर्शकाचं) मानसिक वय आपल्यापेक्षा जास्तं आहे हे या लोकांना का समजत नाही?

तुझाच होऊनी

पद्मश्री चित्रे ·
तृुणात पाहतो तुला, फुलात मी न्याहाळतो तुझाच सूर होउनी, चराचरात गुंजतो तुझ्याच अंतरी तुला नकळता मी राहातो होउनी मी मंद गंध तुला हळु खुणावतो तुझाच अश्रु होऊनी पापणी मी भिजवतो तुझेच मौन होऊनी अधरी मी विसावतो उदास रात्री या तुझ्या बनूनी चंद्र पाहतो अंगणात मीच आणि पारिजात बरसतो श्वास मी भास मी तुझ्या समीप राहतो तुझाच होऊनी तुला तुझ्यातुनी हिरावतो पद्मश्री चित्रे