मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही आवाज.. हरवलेले....

विक्रान्त कुलकर्णी ·
लेखनविषय:
वैज्ञानिक संकल्पनेनुसार आवाज म्हणजे कंपनलहरी असतात व आपल्या कर्णपटलावर आदळल्यावर मेंदू त्याचा अर्थ लावतो व आपल्याला नादाचा बोध होतो. मात्र काही आवाज हे आपल्या मन:पटलावर नाद म्हणून टेपरेकॉर्डरच्या टेप सारखे कायमचे कोरलेले असतात, जे आपण केव्हाही रीवैंड करून ऐकू शकतो. त्यालाच आपण आठवणी म्हणतो. अशाच कांही हरवलेल्या आवाजाच्या आठवणी. माझे लहानपण मुंबईतील विक्रोळी या कामगार बहुल उपनगरात गेले. दिवसाच्या ठराविक वेळी ठराविक येणारे आवाज ऐकतच आमचा दिवस उजाडत असे व संपत असे. ते आवाज व ती ठरलेली वेळ इतकी मनात पक्की बसली आहे कि आजही तसा एकादा आवाज ऐकला कि बरोब्बर ती वेळ डोळ्यासमोर उभी राहते.

दिवाळीचे फटाके !

मनो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(वाघाच्या गुहेतला एक सीन) धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?" थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून" धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … " थोरले राजे: "काय म्हणालास?" धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?" थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार" धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?" थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.

स्ट्रेट फ़्रॉम द हार्ट !

गुल-फिशानी ·
कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे.

काजू अ‍ॅपल मिठाई

सानिकास्वप्निल ·
. साहित्यः १ वाटी काजू पावडर १/२ वाटी साखर १/४ वाटी पाणी सजावटीसाठी लवंगा खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे) . पाकृ: नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा ए

आली दिवाळी

धर्मराजमुटके ·
मिपावरील समस्त मित्रांनो, महाराष्ट्राचे नवे सरकार दिवाळीआधी बनेल असे वाटत नाहीये. राजकारणापासून थोडा वेळ काढा. आता दिपावली आली आहे. तेव्हा खालील विषयांवर काथ्या कुटावा ही नम्र विनंती. फटाकेबाज विषयांची यादी खालीलप्रमाणे. आपणही या यादीत भर टाकू शकता. १. प्रदुषणमुक्त दिवाळी - दिवाळीचे फटाके कसे प्रदुषण करतात, त्यामुळे पर्यावरणाचे कसे नुकसान होते, माणसांना कशा कशा प्रकारे ईजा होतात याचे दाखले द्यावे. २. त्यातून जमल्यास शिवकाशी किंवा तत्सम ठिकाणी बालकामगारांचे कशा प्रकारे शोषण होते यावर प्रकाश टाकावा. ३. जमल्यास भर दिवाळीत संस्कृतीच्या नावे शिमगा करावा. ४.

तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?

योगी९०० ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय? हाच प्रश्न मला एकदा एका मॉलमध्ये कोणीतरी विचारला होता. अर्थात लगेच होकार दिला नाही. विचार करून सांगतो असे सांगितले. साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. त्याचे असे झाले, एका घराजवळच्या मॉलमध्ये आमचे नेहमी जाणे व्ह्यायचे. बाहेर वेगवेगळ्या वस्तूंचे प्रमोशन चालायचे. त्यातल्या त्यात क्रेडीट कार्ड, क्लब हॉलिडेस यांनी तर फारच छळले होते. एकदा विकांताला सहकुटूंब तेथे हिंडत असताना अशीच एक गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची) आमच्या जवळ आली. उगाचच माझ्या मुलांचे कौतूक केले आणि मला म्हणाली.

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

जीएस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत.

Europe- heritage

चौकटराजा ·
 photo headingmipa_zps1db417a3.jpg प्रास्तविक- युरोपात गेल्या दोनेक हजार वर्षात निर्माण केल्या गेलेल्या व विशेष म्हणजे जतन केलेल्या वा पुनर्निर्माण केलेल्या चर्चेस, विलाज, क्यासल्स, शॅटो, फोरेट्रेस ई संख्या अमाप आहे. तेथील कोणताच देश असा नाही की तेथे ऐतिहासिक व कलात्मक मूल्य नसलेले काही आहे. या लेखात सर्वच देशातील वास्तुकलेचा आढावा घेणे शक्य नव्हते.

शब्दांशी दोस्ती

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
शब्दांनीच जर मैत्री करायची तर शब्दाना कशाला प्रौढ करायचे कशाला द्यायची त्यांच्या हातात पंतोजीची छडी नि उगाच आजोबाची काठी एवढ्या जुन्या पिंपळ वृक्षाला फुटतेच ना नव्याने पालवी केशरी छटा असलेल्या कोवळ्या पानांनी वृक्ष जातोचना सळसळून पोपट करतातच न मुक्काम भर रात्री त्यांच्या फांदीची उशी करून झाडांना कशी स्वप्ने पडतात उद्याची मग कशी दिसते त्यांच्या अंगावर नव्याने फुलून गेलेली कोवळी पालवी नव्याने दिसतेचना आभाळ नव्याने जमतातच ना ढग तोच पाउस प्रत्येकवेळी नव्याने बरसून जातो मातीचा तोच गंध नव्याने जाणवून जातो पहाटचा सूर्य नव्यानेच सापडून जातो मैत्रीत आपले शब्दही सतत असावेत

उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात : भाग १

सुधांशुनूलकर ·
|| श्री गुरवे नम: || डिस्क्लेमर : या भटकंती वृत्तान्तामध्ये खादाडीचे फोटो / वर्णन नाही. त्यामुळे काही मिपाकर हा धागा **वर मारतील, याची पूर्ण कल्पना आहे. मात्र त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्याच, तरीही त्यांचं (प्रतिक्रियांचं) स्वागतच असेल (त्यांची प्रतिक्रिया **वर मारली जाणार नाही).

भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली

पाऊस... उन्हाळ्याच्या दाहक उष्म्याने चराचर तगमगत असताना थंडगार शिडकाव्याने प्रत्येक जीव शांत करणारा ऋतू. पाऊस पडला की सगळ्या सृष्टीचा नूरच बदलून जातो.