"आज म्हणलं माती व्हावं"
कुंभाराच्या पोटासाठी
त्याला एक मडकं द्यावं
कधीतरी कोणासाठी
मातीच एक घरट द्याव
........आज म्हणलं माती व्हावं
भिंतीला त्या पुसायाला
पोते-याच फडकं व्हाव
चूल बनून तापलेल्या
तव्याच ते बुडक घ्यावं
........आज म्हणलं माती व्हावं
कोंब कोंब शरीरावर
पिकांची मी माय व्हाव
मूळ घट्ट पकडुनी
पोटात त्याचं पाय घ्याव
........आज म्हणलं माती व्हावं
कुणब्याच्या सुखासाठी
अंगावरी शाण घ्याव
नांगरुनी शरीराला
स्वताच ते प्राण द्याव
........आज म्हणलं माती व्हावं
आकारुनी कुणी मला
देवाचं ते नाव द्यावं
बसुनीया देवळात
मानसाचा खेळ पहाव
.........आज म्हणलं माती व्हावं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2186
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात!
धन्यवाद सर
In reply to क्या बात! by वेल्लाभट
वा वा वा.....
येकच नंबर!
कविता आवडली. शेवटचं कडवं तर
धन्यवाद सर
In reply to कविता आवडली. शेवटचं कडवं तर by एस
अप्रतीम !!
धन्यवाद
In reply to अप्रतीम !! by माहितगार
वा वा
धन्यवाद सर
In reply to वा वा by प्रमोद देर्देकर