Skip to main content

श्वासगंध

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 20/10/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास गंध तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ||१|| सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ||२|| चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ||३|| कधी नीज लागली, न कळे मुळी मला सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ||४|| जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ||५|| -सार्थबोध
दिवाळी अंक वर्ष

वाचने 1893
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया