शुभ्र मोगर्याची कळी
शुभ्र मोगर्याची कळी
शुभ्र मोगर्याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही कधी?
---
पहाटेच्या दवात भिजलेली
आता उमलावं की नको
या विवंचनेत गुंतलेली
शुभ्र मोगर्याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
पाहता पाहता पहाटेची सकाळ झाल्यावर
हलकेच डोळे मिचमिचे करुन
हिरवे हिरवे जग बघून
शुभ्र मोगर्याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
सकाळ कलंडतांना आळसाने
भरलेले डोळे चोळत
त्या एका वेड्याची वाट पाहणारी
शुभ्र मोगर्याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो आल्यावर पटकन
त्याच्यासमोर उडी घेणारी
लाजरी बुजरी
शुभ्र मोगर्याची कळी
पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना
गोळा करुन
एका सुंदरश्या गजर्यात माळून
जेव्हा तिला देतो
तेव्हा
त्याच्या समोरची
शुभ्र मोगर्याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
---
सांगाना
पाहिलीये का हो?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
दिवाळी अंक वर्ष
वाचने
5293
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
कळी अजून उमलायची आहे!
भन्नाटच , ज्याम आवडली
मिका-कविता
तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना गोळा करुन एका सुंदरश्या गजर्यात माळून जेव्हा तिला देतो तेव्हा त्याच्या समोरची शुभ्र मोगर्याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?पाहिलीय, पाहिलीय, ओंजळीतल्या कळ्या फिक्या पडतील इतकी लाजली होती :-) कंबख्त, तुमने भी क्या याद दिलाया?मोगरा ?
In reply to मोगरा ? by सस्नेह
असेच म्हणते. छान..
आवडली.
पेश्शल
क्या बात है
प्रचंड गुरफटून गेलो... उलगडता
मिका मिका मिका
छान आहे कळी!! आवडली...
मिका रॉक्स पैजारबुवा,