आमचा एक मित्र. घराणं पूर्वापार काँग्रेसी. घराच्या भिंतीवर नेहरु, इंदिरा गांधी याच्या तसबिरी. घरातल्या मोठ्या माणसांची नावे संजय राजीव अशी तर मुलांची नावे राहुल प्रियांका अशी.
मी एवढ्यात या मित्राला फोन केला. त्याचे घराणे पिढ्यानपिढ्या काँग्रेसनिष्ठ. आजोबा सरपंच. याचे वडिल काँग्रेसकडून आमदार. बंधू काँग्रेसकडून आमदार. पुढे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकता येत नाही असं ध्यानात आल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण मोदीलाटेत वाहून गेले. आता याने आपल्या पत्नीला भाजपाकडून उभे केले. ती आमदार बनली.
आता हे लोक आम्हाला जम्मू-काश्मीर, कलम ३७०, अखंड हिंदूस्थान याबद्दल सांगणार का ? दिनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मोठेपण यांच्या तोंडून आम्हाला ऐकावे लागणार का... असा प्रश्न पडू लागलाय.
मित्रांनो ज्या लोकांनी संघाच्या स्थापनेपासून हिंदूत्त्वाला साथ दिली. आणिबाणीच्या मुस्कटदाबीला ज्यांनी कडाडून विरोध केला. तुरुंगवासही भोगला. प्रसंगी सांप्रदायिक, गांधीजींचे मारेकरी असे आरोप झेलले. त्या लोकांनी एवढे कष्ट घेऊनही कधी सत्तेची हाव धरली नाही. बहुधा हीच चूक झाली. हिंदूत्त्वाच्या वारुळावर आज भलते सलते नागोबा येऊन डुलायला लागलेत. आमच्याच घरात आम्ही पाहुणे झालो आहोत. उद्या काय होणार हा मोठा प्रश्न आहे...
(यातली उदाहरणे, नावे काल्पनिक असली तरी वस्तुस्थितीचा अंदाज यावा यासाठी दिली आहेत)
वाचने
4458
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटोफ्रेममेकरकडे कधी गेलात
फोटो प्रेम आणि नावे यांना
In reply to फोटोफ्रेममेकरकडे कधी गेलात by कंजूस
निवडणूक बंदी
सहमत.
In reply to निवडणूक बंदी by संग्राम
पक्षाचा बालमृत्यू
In reply to निवडणूक बंदी by संग्राम
NGOs कशा पोसल्या जातात तसाच
In reply to पक्षाचा बालमृत्यू by सुनील
5 वर्षाची सक्ती असायला हवी
In reply to NGOs कशा पोसल्या जातात तसाच by प्रभाकर पेठकर
आशु
आपल्याला काय फरक पडतो?
कालातीत सत्य !!!
In reply to आपल्याला काय फरक पडतो? by मुक्त विहारि
फरक पडतो ना