मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरागस बालक व्हा

विश्वजीत दीपक गुडधे ·
निरागस बालक व्हा.....निराशेला पळवा मानवी भावना म्हटले की त्यामध्ये आनंद, राग, लोभ, मत्सर, द्वेष, भीती, निराशा या मनोवस्थांचा अंतर्भाव होतो. भावना म्हणजे मनाची निर्मिती. आपल्या परिसरात घडणार्‍या घटनांवर आपलं मन कसं प्रतिसाद देतंयावर ही भावना अवलंबून असते. खरं म्हणजे मनाला कोणत्याच सीमा मान्य नसतात. कधी मन उनाडपाखराप्रमाणे सैरावैरा उडत राहतं, कधी गटांगळ्या खातं, कधी अश्रूंच्या आड लपतं तर कधी क्षणार्धात दूरवर जाऊन येतं. अशीच एक मनोवस्था म्हणजे निराशा. निराशा येणे ही एक नैसर्गिक बाब आहे. दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेला खरी उतरत नाही.

आयुर्हित 23/10/2014 - 00:29
सतत नवे मार्ग, संधी शोधत राहाव्या. कितीही बिकट परिस्थिती असली तरी आशा जिवंत ठेवावी. ही उमेदच आपल्याला वाट दाखविते आणि पूर्णत्वास नेते. वाह व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख! निरागस बालकाचे उदाहरणही आवडले.

वेल्लाभट 31/10/2014 - 15:14
छान लेख. आणखी एक महत्वाचं. सकारात्मकता स्वतःत शोधा, 'सेल्फ हेल्प' पुस्तकांपासून दूर रहा.

पणती

क्रान्ति ·
एक चिमुरडी पणती दिसली रस्त्यावर पणत्या विकणारी पाटी-पुस्तक-शाळेवाचुन व्यवहारी गणिते शिकणारी नऊ-दहा वर्षांची इवली चंद्रकोरशी नाजुक, सुंदर चतुर, कुशल संभाषण हसरे व्यवहाराला परखड, कणखर 'ताई, काकू घ्या ना पणत्या हलक्या, सुंदर, सुबक, टिकाऊ शोभिवंत रांगोळीसाठी दीपमाळ ही नवीन देऊ? या पानांच्या आणि फुलांच्या शंख-शिंपल्यांच्या, मोरांच्या सोनेरी, रंगीत मण्यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या खासच निवडुन देते सगळ्या भाव नका पण पाडू खाली आम्हां गरिबांच्या कष्टाचा तुमच्यावाचुन कुठला वाली? मोल असे माती-पाण्याचे कलाकुसर अन् कौशल्याचे स्नेह-वात घालाल तुम्ही तर जीवन होइल साफल्याचे' बोलुन गोष्ट

स्पंदना 27/10/2014 - 06:23
पोर डोळ्यासमोर उभी राह्यली ना ताय!! नऊ-दहा वर्षांची इवली चंद्रकोरशी नाजुक, सुंदर चतुर, कुशल संभाषण हसरे व्यवहाराला परखड, कणखर मान गये!!

चौथा कोनाडा 01/11/2014 - 13:32
सहज, सुंदर अन लयदार कविता ! खरंच, साध्या साध्या गोष्टीतून कवि/कवयत्रीला किती संवेदना जाणवतात नै ? (नाहीतर, आमी आपले घेतल्या पणत्या की दिवाळीचा फराळ हादडायला मोकळे ) पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन् मनात दीपावली उजळली धन्य माउली आणि पिता ते ज्यांनी पणती अशी घडवली! शेवटचे कडवे तर खासच !

माझ्या पुष्पसख्या

नूतन ·
(प्रसिद्ध बंगाली लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांचे ’अरण्यक’ हे (मूळ बंगाली भाषेतील ) पुस्तक वाचनात आले.य़ा पुस्तकात कथानकाच्या अनुषंगाने, भागलपूर,बिहार येथील मोहनपूरा रिझर्व्ह फौरेस्ट मधील वनश्रीचे नितांतसुंदर वर्णन केले आहे. ते वाचून मला माझ्या शाळकरी वयातील झाडाझुडपांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.) हा साधारण १९६७-६८ च्या दशकाचा काळ. सुशिक्षित मध्यम वर्ग वाडे किंवा चाळीत बिऱ्हाड करुन रहायचा हा काळ. तर आम्हीही अशाच एक चाळीत रहात होतो. म्हणायला जरी ती चाळ असली तरी ते एक टुमदार, कौलारू एकमजली घरच होतं.

सविता००१ 09/11/2014 - 15:24
एक सुरेख, सुगंधित लेख वाचायला मिळाला. अगदी लहानपणात फेरफटका मारून आले. पै ताई सारखंच म्हणते - नेहमी लिहीत जा तुम्ही!

सखी 18/11/2014 - 02:11
वरील सर्वांशी सहमत. सध्या इंदिरा संतांचे मृदगंध वाचतेय, त्यावर एका जेष्ठ परीचितांची प्रतिक्रिया होती की हे सहज, सोपे लिहलेलं ललित असलं तरी असं लिहणं सोप नाही, तुमचा लेख वाचुन मलाही तसेच वाटले, अजुन वाचायला नक्कीच आवडेल.

नूतन 21/11/2014 - 19:46
मा़झ्या पहिल्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनापसून आभार. पुढे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन

कणकीचे लाडू

श्रीरंग_जोशी ·
नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! यंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.

आमच्याकडे कणकेचा शिरा (सा़जूक तुप आणि दुध घालून) केला जातो. अतिशय चविष्ट लागतो. हे कणकेचे (कणकीचे नाही हं!) लाडू पहिल्यांदाच पाहिले. एक वेगळाच प्रकार आहे. करून पाहिले पाहिजेत. बेसनाच्या लाडूंसारखे दिसत आहेत पण कणीक, साजूक तुप आणि पिठीसाखर हे मिश्रण चांगलेच लागते.

प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार. पाकृ लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. छायाचित्रणासाठी मिपाकर जुइ यांचे आभार. दोन वर्षांपूर्वी पाकृ टाकण्यासाठी एकट्यानेच लाडू करता करता फोटो काढले होते. तेव्हा फोटो काढण्याच्या नादात कणीक करपून तांबडी झाली होती. यावेळी पूर्ण लक्ष लाडू बनवण्याकडेच होते. 'कणकेचे' हे देखील बरोबर असले तरी जाणूनच 'कणकीचे' असे लिहिले. माझ्या गावाकडच्या बोलीभाषेचा प्रभाव. कणकीचे असे ऐकताना जो गोडवा मला जाणवतो तो कणकेचे असे ऐकताना जाणवत नाही. जरा रुक्षपणा जाणवतो. इतरांच्या बाबतीत हेच पूर्णपणे उलट असू शकते हे मान्य आहेच.

सखी 23/10/2014 - 22:31
फोटो आणि सादरीकरण दोन्ही छान. मी यात अख्खे बदाम घालण्याऐवजी बदाम+काजु पावडर, वेलदोडा, आणि साखरेऐवजी गुळ घालते (ब-याचदा तुप कढवल्यावर उरलेल्या बेरीचं काय करायचा हा प्रश्न असायचा तेव्हा या लाडवात बेरीपण मिसळुन जायची). तुमच्या पद्धतीनेपण करुन पाहीन येत्या हिवाळ्यात.

संवाद एका नटासोबतचा - मंदार पुरंदरे

पैसा ·
(श्री मंदार पुरंदरे सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री पुरंदरे यांना धन्यवाद!) ***************** मूळ पोलिश कविता : Rozmowa z Aktorem ( रोझमोवा झ आक्तोरेम ) मूळ पोलिश कवि: Ildefons Gałczyński ( इल्देफोंस गौचीनस्की ) संवाद : एका नटासोबतचा ! नुकताच तो इथून गेला , … अजूनही या खोलीत त्याचा वावर जाणवतो आहे त्याची अर्धी सिगारेट मंद धूर सोडते आहे.

एस 22/10/2014 - 17:48
आणि अस्तित्वात आहेत फक्त : प्रेक्षक आणि नट
खरोखरच अशी एखादी भूमिका एखाद्या नटाला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली जाणे हे त्या भूमिकेचे भाग्य म्हणावे की त्या नटाचे? अनुवाद छान जमलाय, पोहोचलाय याची तूर्तास फक्त पोच.

पैसा 24/10/2014 - 11:33
अतिशय प्रभावी जमलेला अनुवाद! अनुवाद वाटत नाही इतका छान जमलाय! लेखकाचे शब्द आणि कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा नटच ती कथा जगतो, आणि लेखक नंतर बाजूलाच रहातो, उरतो तो नट आणि प्रेक्षक यातला संवद! कल्पना खूपच आवडली.

इनिगोय 04/11/2014 - 11:07
अनुवादित मुक्तक उत्तम जमलं आहे. हे वाचून काशीनाथ घाणेकर ह्या मनस्वी ताकदवान नटाची आठवण झाली. स्वतःचं अस्तित्त्व आणि भूमिकेचं त्यावरचं रंगलेपन यातली अत्यंत सूक्ष्म रेखा हा माणूस फार प्रभावीपणे सांभाळत असे. हे मुक्तक म्हणजे थेट त्यांचंच मनोगत वाटलं.

संवादिका : रोड टू विन (जिंकण्यासाठी कायपण...)

प्रास ·
---------------------------------------- "बर्गोमी, काय करायचं बोल! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?" "ए माल्डिनी, काय बोलतोयस? कसला धंदा? आणि हे फॅमिली, फॅमिली काय प्रकार आहे?" "अरे दोनादोनी, सांग रे याला! लक्ष्य कधी नव्हे ते येवढं जवळ दिसतंय आणि हा मात्र.... ए, घुसळ रे याला, तू चेंडू घुसळतोस तसं." "बर्गोमी, सध्या माल्डिनी पुझो वाचतोय रे..." "हो का रे, मग काय आता पाब्लो माल्डिनीच्या ऐवजी डॉन कॉर्लिओनी म्हणायचं का तुला?" "अरे नाय रे! मी पुढच्या मॅचबद्दल विचारतोय. काय करायचंय?" "असं आहे बघ, उद्या मैदानावर जायचं.

एस 22/10/2014 - 17:55
आधी नुसताच चाळला होता, आता वाचून सगळे संदर्भ लक्षात आले आणि फुटलो! क्या लिवताय तुम! लय भारी प्रासराव! लेख जरा अनुक्रमणिकेच्या तळाला असल्याने फारसे प्रतिसाद अजून कुणी दिले नाहीयेत. तरी हरकत नाही. पुन्हा अनेकवेळा वाचणार आहे. मस्त! भन्नाट.
"दबंग आणि सिंघमसुद्धा मारियो पुझोने लिहिलेले का रे, दोनादोनी?
हे तर जबरदस्तच! :-D

स्वप्नज 23/10/2014 - 20:09
वाचायला सुरुवात केली, पण कंटाळवाणे वाटले. पुढे वाचणार नव्हतो,पण प्रतिसाद वाचल्यावर जाणवले की लेखन वाचनीय असावे. म्हणून पुर्ण वाचला आणि ह.ह.पु.वा.... खरंच अप्रतिम लेखन. ( स्वॅप्स भाऊ आणि पैसाताईंचे आभार)

In reply to by स्वप्नज

पैसा 25/10/2014 - 09:14
"यशस्वी खेळाडू कसे व्हावे" मालिकेतला लेख वाटला काय तुम्हाला? बाकी या कथेला प्रासभाऊंच्या स्वानुभवाचा आधार आहे का काय अशी शंका एकदा मनात डोकावून गेली! :D

In reply to by पैसा

एस 25/10/2014 - 09:55
तुम्ही या पैतैंकडे लक्ष देऊ नका. काल्पनिक कथांनाही सत्यात काहीतरी आधार शोधायची त्यांची जुनीच खोड आहे! :-D लईच शंकेखोर हैती त्या. ;-)

आतिवास 30/10/2014 - 16:01
आधी थोडा कंटाळा आला होता. पण तरीही नेटाने लेख वाचला - आणि सार्थक झालं. मस्त जमलाय लेख!

“काल-प्रवास” (टाईम ट्रॅवल)

आतिवास ·
प्रास्ताविक: “कालकूपि” (टाईम मशीन) मधून प्रवास करणं; भूत अथवा भविष्यकाळात जाता येणं ही काही तज्ज्ञांच्या मते निव्वळ कविकल्पना आहे. त्यांच्या मते प्रत्यक्षात असं काही घडल्याचा पुरावा नाही; आणि असं काही घडण्याची शक्यताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही. पण एक तर आपल्याला भूतकाळाचं परिपूर्ण ज्ञान आहे असं समजण्यात आपण चूक करत आहोत. कुणाला माहिती कशाच्या पायावर आपली आजची इमारत उभी आहे ते! ज्ञाताहून अज्ञात अधिक आहे. शिवाय कोणे एके काळी अशक्य वाटणा-या कल्पना आज आल्या आहेत ना अस्तित्वात? मानवी मनाची ताकद तर्काच्या ब-याच पल्याड असते. म्हणून “टाईम मशीन” आज ना उद्या अस्तिवात येईल असं मला वाटतं.

सस्नेह 22/10/2014 - 22:04
अतितरल कल्पनाविलास. काल ही चौथी मिती मानली तर नचिकेताचा त्याहीपुढच्या एखाद्या मितीत प्रवेश झाला असण्याचीही शक्यता आहे. लेख त्याच्या वेगळेपणामुळे विशेष उठावदार झाला आहे.

१५०-२०० वर्षांपुर्वी विमानं, पाणबुड्या, रॉकेट्स आणि रोबोट्स हे सगळं अशक्यप्राय वाटतं होतं. कोणाला माहीत उद्या काल प्रवासही शक्य होईल. टेलिपोर्टेशनला काही अंशी यश मिळालेलं आहेचं. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आतिवास 05/11/2014 - 12:36
शक्यतेच्या शक्यता फार मोठ्या आहेत आणि आज कदाचित आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही.

Pradip kale 03/11/2014 - 19:24
Nachiketacha pravas ha "kal-pravas" asala tarihi to kahi anshi "parlok pravas" mhanaje dusarya vishwatil pravas vatato. mi ji yapurvi nachiketachi katha "nachiket aakhyan" ya granthat vachali tyavarun ase vatate .

पैसा 10/11/2014 - 22:36
जबरदस्त कल्पनाविलास आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्या कथेला घेतलेला नचिकेताच्या कथेचा आधार! खूपच छान! ज्ञानलालसा असलेला छोटा नचिकेत आणि इहलोकीच्या धनाचा तसंच परलोकीच्या सुखाचा लोभी त्याचा पिता, ज्ञानदान करणारा साक्षात मृत्युदाता यम! सगळंच विलक्षण आहे, आणि त्याला सजवलेला कालप्रवासाचा साज या सगळ्याला अधिकच विलक्षण बनवतो आहे! मस्त!

In reply to by विअर्ड विक्स

आतिवास 19/12/2014 - 14:37
कॉपी राईट जप या कथेचे… थोडा ट्विस्ट सोडला, आणि अर्थ काहीसा वेगळा लावला आहे हे सोडलं; तर कथा फार जुनी आहे!

माझा कॅनव्हास.. अर्थात जोहॅनसची गोष्ट.

इनिगोय ·
२०१२ सालचा जुलै महिना. ऑस्ट्रियामधल्या प्योर्टशाख इथे जगभरातले कलाकार जमले होते. तिथे उभारलेल्या मोठ्या मंचावर आमच्या सर्वांच्या कलाकृती सादर करून झाल्या होत्या. निकालाची वेळ जवळ येत होती. तिसर्‍या आणि दुसर्‍या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आणि विजेतेपदासाठीची घोषणा करण्यात येऊ लागली.. "आणि यंदाचा आपला विश्वविजेता ठरला आहे... जोहॅनस स्टॉयटर!!" JS1 सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली..

एस 21/10/2014 - 20:43
लेख आवडला! काय अफाट कला आहे! बॉडीपेंटिंगमध्ये कलाकाराचा आणि त्याच्या 'कॅनव्हास'चाही पेशन्स पणाला लागतो. त्यात जे रंगवतोय ते रंगवताना कॅनव्हास वेगळ्या स्थितीत असतो. नंतर त्याची स्थिती बदलते. त्यामुळे हा बदल लक्षात ठेऊनच चित्र रंगवावे लागते. यात कल्पनाशक्तीची कसोटी लागते! जोहॅनस स्टॉयटरची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार!

खूप छान ओळख करुन दिलीस. एरवी हे असे अनेक चित्र नुसते इमेल्समधुन फिरतात पण त्यामागची मेहनत, ती करणारे चेहरे इत्यादी गोष्टी अनभिज्ञ असतात. एका वेगळ्या कलेविषयी आणि कलाकारावरील लेखासाठी धन्यवाद.

In reply to by मधुरा देशपांडे

+१ तो पोपटाचा फोटो पाहिला होता.. पण त्यामागे इतकी मेहनत असेल असा विचार कधीही आला नाही... लेख उत्तम जमला आहे!

पैसा 22/10/2014 - 21:11
नवीनच प्रकारच्या कलेची ओळख करून दिलीस, तीही आत्मवृत्त प्रकारात! जबरदस्त! प्रचंड मेहनत घेऊन लिहिलेला लेख आहे हे पदोपदी जाणवतं आहे! सलाम!

प्रास 24/10/2014 - 18:36
मनोगताच्या माध्यमातून माहितीपूर्ण लेखनाचा प्रयत्न आवडला.

सुहास झेले 26/10/2014 - 17:54
मागे एकदा फेसबुकवर फोटो पहिले होते ह्यातालेच.. पण त्यात कलाकाराचे नाव दिले नव्हते. आज त्या कलाकाराची ओळख झाली... मनापासून धन्यवाद :)

सविता००१ 26/10/2014 - 18:02
एका वेगळ्या कलेची, कलाकाराची अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ओळ्ख करून दिल्याबद्दल.

मित्रहो 26/10/2014 - 18:27
चित्रे बघितली होती पण कलाकाराचे नांव माहीती नव्हते सविस्तर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!!

स्पंदना 27/10/2014 - 08:58
धन्य त्या माणसाची!! अग तो पेब्बल्सचा फोटो तर अजिबातच जाणवत नाही. वृक्ष सुद्धा.... काय कला आहे!! अन इने तुझी सांगायची स्टायल सुद्धा अशीच मिसळुन गेली आहे हो, जणु अनुवादच!

बोका-ए-आझम 31/10/2014 - 01:25
क्या बात है! अप्रतिम कलाकृतींची आणि कलंदर कलाकाराची ओळख करुन देणारा तितकाच अप्रतिम लेख! कलाकाराचं व्यक्तिमत्त्व लेखात बरोबर पकडले आहे आणि प्रथमपुरूषी निवेदनामुळे त्याला वेगळीच उंची मिळालेली आहे. फोटोही लाजवाब!

जुइ 02/11/2014 - 05:50
ही छायाचित्रे अनेकदा ढकलपत्रांमधे पाहिली आहेत मात्र त्यामागे ईतकी मेहनत आहे हे माहित नव्हते. कालाकाराची आणि त्याच्या कलेची माहिती अनोख्याप्रकारे करुन दिल्याबद्ल धन्यवाद!

इनिगोय 03/11/2014 - 11:46
सगळ्या प्रतिसादकांचे मनापासून आभार. इथे जोहॅनसचे काही व्हिडिओज पाहता येतील. जोहॅनस काम करताना लहान मुलांना घेऊन केलेली एक अप्रतिम जाहिरात अगदी अलीकडे केलेलं एक प्रोजेक्ट - यातलं त्याचं काम म्हणजे स्वतंत्र परफॉर्मन्सच वाटतो...

आरसा

सर्वसाक्षी ·
अभिजित कुलकर्णी. वय ३४-३५. शिक्षण बी ई (सिव्हिल), एम बी ए (मार्केटिंग). मूळचा सोलापूरचा. नोबल केमिकल्स मध्ये अवघ्या पाच वर्षात बऱ्यापैकी जम बसवलेला, धडाडीचा, आक्रमक आणि घेतली गोष्ट पूर्णत्वाला न्यायचा स्वभाव. सदा हसतमुख. स्टाफशी सलगीने वागणारा पण गरज पडेल तेव्हा डोक्यावर बसून काम करून घेणारा. स्वभाव त्याच्या नाकासारखा सरळ. आतलं बाहेरचं न ठेवणारा. सेल्स मध्ये मल्लू राज्य असताना सुद्धा आपली छाप उमटवणारा अभिजित, प्रस्थापित धेंडांच्या नजरेत सलत असला तरी आपले स्थान बळकट करत होता.

समीरसूर 21/10/2014 - 15:04
जबरदस्त कुतुहल जागवणारी कथा! मस्त जमली आहे. वाचतांना मजा आली. :-) 'कॉर्पोरेट'मधला संदीप मेहता आठवला; बिपाशासोबत दारू पिऊन तर्र होणारा. 'त्रिशुल'मधला युनुस परवेझ पण असाच संजीव कुमारचे टेंडरचे आकडे अमिताभला पुरवणारा.

अमित खोजे 22/10/2014 - 01:05
पकडून ठेवणारी कथा! मस्त सजवलित. फक्त एकाच जाणवले. जीतला या सगळ्याचा गौप्यस्फोट योगायोगाने झाला. म्हणजे संधी अन्याच्या रूपाने चालून आली. पुढचे काम त्याने हुशारीने केलेच म्हणा. मला वाटले होते कि या षड्यंत्रामागील सूत्रधार तो स्वतः स्वतःच्या बुद्धीने शोधून काढेल. पण तरीही, खिळवून ठेवले कथेने. मस्तच.

भाते 28/10/2014 - 19:55
काल रात्री दिड वाजता हा लेख (एका दमात) वाचुन झाला. लेख वाचल्यावर, त्यावेळी प्रतिक्रिया द्यायचे सुध्दा त्राण उरले नव्हते. मस्तच! यावर एखादा चित्रपट नक्कीच येऊ शकेल! शेवटी, हे सगळे अनुभवाचे बोल!

सुंदर रहस्यकथा. कॉर्पोरेट जगतातील अनैतिक राजकारणं, आर्थिक गणितं आणि सरकारी टेंडर्स मिळवायच्या कॢप्त्या ह्या सर्वच गोष्टी सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडच्या आणि अत्यंत विस्मयकारक असतात. त्या सर्व यतार्थपणे कथेत उतरविण्याचे लेखकाचे कसब वाखाणण्यासारखे आहे. कथा आवडली.

सविता००१ 09/11/2014 - 15:41
कंपनी चं नाव वगळलं तर हाच नायर आमच्या हपिसात आहे की काय अस वाटतंय. सगळे गुणावगुण सेम. आणि नाव तर तेच. नायर :(