Skip to main content

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 20/10/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे. [[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ? यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे. भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल. "भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे. *अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील

वाचने 37289
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by hitesh

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही. अर्थातच... पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे. अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे. अहो इमाम मुसलमानांचे आहेत म्हणुनच इस्लामी राष्ट्रांचे उदाहरण देउनच प्रश्न विचारला आहे. हिंदूंची सहिष्णुता म्हणजे माज करण्याची मुक्त मुभा नव्हे. बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो. हॅहॅहॅ... ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ? हा प्रश्न नीट वाचला नाही का ? मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ? अरे व्वा... याच मुस्लीम समुदायाने आझाद मौदानात कायद्याच्या चौकटीत बसुन काय बांग दिली होती का ? स्त्री पोलिस अधिकार्‍यांवर हात टाकणारे कुठल्या चौकटीत बसुन हे अघोरी कॄत्य करत होते ? तेव्हा तुमची वाचा बसली होती का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

पुन्हा विनंती.. आझाद मैदानातील "दैदिप्यमान" पराक्रमावर मिपावर कुठेही एकोळी धागा/चर्चा माझ्या पाहण्यात तरी नाही.त्यानुसार सोईस्कर्/बोट्चेपी धोरण कुरवाळणी असल्यावर अशा अदखलपात्र घटनेचा बागुलबुवा करू नका बरे!! "ओवेसींचे" फुत्कार आणि एमायएम प्रवेश ही त्याचीच वि़खारी फळे आहेत. स्वघोशीत वकिलांचे/हितचिंतकांचे स्वागत आहे.

In reply to by नाखु

ह्म्म... त्या दिवशी हिंदूस्थानातील सहिष्णू मुस्लिम समुदायाने केलेला पराक्रम :- हे सगळ कायद्याच्या चौकटीत बसुन ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

एक सांगायचे राहिलेच की, इथे शाही इमामांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलवणे केले आहे तर आझाद मौदानातील दंगलीत सहिष्णू मुस्लिम लोक पाकिस्तानचे ध्वज मिरवत फिरत होते. म्हणजे यांनी रहावयाचे इथे खावयाचे इथे, मात्र प्रेम पाकिस्तानाशी ठेवायचे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता. आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु.

In reply to by hitesh

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे. आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता. नक्की ना ? मग जरा सांगा ना, की त्यांची सहिष्णूता तेव्हा कुठे पेंड खायला गेली होती ? आणि त्यावर तुमचे मौलिक विचार देखील आम्हाला कळु दे. आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु. मी काय म्हणतो... सही करण्या पेक्षा तुम्हीच पत्र पाठवुन का पाहत नाहीत ? म्हणजे आम्हाला देखील तुम्ही सेक्युलर असल्याची खात्री पटेल. कसे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ... ..... आँ ! हे राष्ट्र हिंदुराष्ट्र !साआसाडेतीनशे वर्षे मोघल साडेतीनशे वर्षेक्ख्रिश्चन इंग्रज आणि नंतर साठ वर्षे काँग्रेस ! देशाचा विकास याच काळात झाला ना ? अआणि हे राष्ट्र म्हणे हिंदुराष्ट्र ! गंमतच की !!

In reply to by मदनबाण

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते. कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे.
@बाणराव, प्रार्थनेच्या पद्धतीचे स्वातंत्र्य हे खरेतर हिंदुसंस्कृतीचे खरेच मोठेपण आहे. एखादी व्यक्ती नमाज किंवा चर्ची किंवा अजून इतरही पद्धतीने प्रार्थना करूनही हिंदु असू शकते. हि सहिष्णूतेच्याही वरची पायरी आहे ह्याचा हिंदूनाही विसर पडतो कधी कधी. धन्यवाद

In reply to by hitesh

आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे.
आत्ता कश्शी खरी वळख दावली !! म्हणजे फक्त हे सरकार आमचे आणि आधीची सरकारे (बहुवचन काय रे बॅटोबा)तुमची काय ??? आम्ही सगळीच सरकारे आमची समजत होतो, म्हणून काम न केल्याबद्दल वेळोवेळी टिका करीत होतो. चुकलेच आमचे! स्वारी बरं का? जाता जाता: गुन्हेगाराना शासन करावे हे कुठल्याही मु.म.आणि पं.प्र. ला सांगावे लागत नाही.

In reply to by नाखु

आझाद मैदानच कशाला , कधी हिंदुत्व , कधी मराठीत्व असे मुद्दे घेऊनही तोडफोड झालेली आहेच.. त्याच्याबद्दलदेखील कुणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. मुद्दे वेगळे. पण तोडमोड आमच्याच मालमत्तेची झाली.

In reply to by मदनबाण

पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे
ही शक्यताच नाही. मोदी/भाजप सोडुन दुसरे कोणी असते तर निमंत्रण नक्कीच गेलेच असते. आणी निमंत्रण गेले नसते तरी ते पंतप्रधान न बोलवता गेले असते.

In reply to by प्रसाद१९७१

आणि काँग्रेसचे पंतप्रधान इम्मामाना भेटले असते तर मिपावरचे हेच लोक, ' काँग्रेसवाले बघा कसे लांगुलचालन करतात ' म्हणुन रडले असते.

In reply to by hitesh

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे..
अजीबात नाहि. तो एका धर्मपीठाधीशाचा प्रश्न आहे. समस्त (वास्तवात समस्त नाहि) समुदायाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. सतत एकमेकांवर बंदुका रोखुन धरणार्‍या आणि एकमेकांप्रति कटुत्व बाळगणार्‍या अत्यंत संवेदनाशील राष्ट्रांचा देखील संदर्भ येऊ शकतो इथे. पेडगावला मुक्काम करायला हरकत नाहि, पण मग मनोरंजनाचं प्रयोजन तरि स्पष्ट करायचं ना.

In reply to by अर्धवटराव

इतकं पोटात दुखतच असेल तर कधीतरी शंकराचार्यांच्या एकसष्टीला तुम्ही पाकिस्तानी शंकराचार्यअंना बोलावून घ्या..

In reply to by अर्धवटराव

इतकं पोटात दुखतच असेल तर कधीतरी शंकराचार्यांच्या एकसष्टीला तुम्ही पाकिस्तानी शंकराचार्यअंना बोलावून घ्या..

भीष्माचार्य किती वर्षाचे होते?>>>>> काय माहित नाय ब्बॉ. लै जुन ते. आश्यातला उदा.देतो. दे दी हमे आझादी,बिना खड़ग बिना ढाल वाला म्हातारा लढताना काय वयाचा होता.

मी पन्नासावा; धागा शतकतर सहज मारेल असे दिसूनही - अवांतरांनी संचित माहितगार !

बुखारी पुराण हे ह्या धाग्याच्या कक्षेत येत नाही. सर्वच धर्मांमध्ये स्वतःची टिमकी वाजवून घेणारे काही असतात. काही लोकांच्या भाग्यात विरोधकांमुळेच प्रसिद्धी लिहिली असते आणि तुम्ही प्रसार माध्यमे असलेल्या राजधानीच्या ठिकाणी असाल तर प्रसिद्धीचा सोस चटकन भागवून घेता येतो. एखाद्या तथाकथीत धार्मीक व्यक्तीची अध्यात्मिक उंची त्याच्यातील सहिष्णूतेने ठरते का असहिष्णुतेने ठरते ? बुखारींचे वर्तन धार्मिक व्यक्तीकडून अभिप्रेत अध्यात्मिक उंचीचे दर्शन देणारे नाहीच. बुखारींच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांमध्येही विरोधाभास असतील नाही असे नाही परंतु एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही. एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन हा तर्कदोष आहे. भारतात धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत व्हावयास हवी हे खरे परंतु चुकीच्या असहिष्णू वर्तनाचे समर्थन अथवा लांगूलचालनाने धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत होण्यास हातभार लागत असावा असेही होत नसावे. राजकीय उद्दीष्टांनी चुकीच्या लांगुलचालनाने भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या परंपरांचे नुकसानच अधिक होत असावे आणि आतातरी हे लांगुलचालनाचे प्रकार थांबवावयास हवेत. आणि सोम्या गोम्यांची अनावश्यक चर्चा करून त्यांना अधिक प्रसिद्धी प्राप्त करून देणे किती श्रेयस्कर हा ही विचार व्हावयास हवा असे वाटते. ह्या धाग्यात कबिरांचे गुणगान जरूर करा. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद देतानाच, बुखारींप्रेमाचा कुणाल बुखार आलाच असेल तर संत कबीरांसोबत बुखारींची उंची एकदा तापासून बुखारी पुराण थांबवून भारतातील खर्‍याखुर्‍या धार्मीक सहिष्णूतेच्या उदाहरणाची दखल घेण्याच्या दिशेने या धाग्याची चर्चा जाईल अशी अपेक्षा करतो.

In reply to by माहितगार

भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच. प्रश्न फक्त एकाच धर्माचा आहे. Odd Man Out अशी परिस्थिती असली की प्रॉब्लेम त्याचाच असतो बाकीच्यांचा नाही.

In reply to by प्रसाद१९७१

भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच. हिंदूस्थानातला मुस्लिम समाज हा पहिल्या पासुन स्वतःला वेगळा ठेवुन आहे,त्यामुळेच ते जिथे राहतात त्यांना मुस्लिम मोहल्ला म्हंटले जाते. मुंब्रा, ठाण्यात राबोडी भाग, कुर्ला, नागपाडा इं. हे इतक्या संख्येने एकत्र राहतात, पण इतर समाजा पासुन अंतर ठेवुनच असतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

आमच्या गल्लीचे नाव ब्राह्मणपुरी आहे. आहे म्हणजे होते. आता नवीन वोटर आयडीवर जैन वस्ती परिसर असा पत्ता आहे.

In reply to by hitesh

किती टक्के मुसलमान ब्रामणांच्या आणि जैनांच्या { वरील दोन्ही तुमच्याच प्रतिसादातुन घेतले आहेत.} वस्तीत / बोळात /गल्लीत राहतात ? तुमच्या राहत्या जागी किती टक्के मुस्ल्मीम कुटुंबीय राहतात ? जाता जाता :- खर्‍या आयडीने लिहणे जमत नाही का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

एवढ्यातच कुठेतरी वाचले, महाराष्ट्रातले एक गाव जिथे एकही मुसलमान नाही पण ताजिया काढून मोहर्रम का काय साजरा करतात म्हणे. बहुतेक महाराष्ट्र टैइम्स वर वाचली.

In reply to by माहितगार

आता नवा धागा काढा.. बुखारीशी रुसला वेडा !