मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 1:03 pm

.

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

वावरआरोग्यप्रकटनआरोग्य

Naate

Savnil's picture
Savnil in जे न देखे रवी...
2 Jan 2017 - 11:30 am

लहरिच आणि किनाऱ्याच
नात जगावेगळ असत
जवळ असले तरीही
मिलन नाशिबि नसत

लहरिवर लहर सतत
त्याला असते भेदत
तरीही प्रेम करतो किनारा
बिन प्रश्न विचारत

किनाऱ्याच्या नशिबी फ़क्त
वाळूच लेण असत
लहरिला वेध मात्र
त्याला स्वतःत सामावून घेण असत

आलिंगन देऊन लहरिला
परत फिरायच असत
दुःख विरहाच मात्र
किनाऱ्यान सोसायच असत

जेव्हाहि जातो किनारयाजवळ
तेव्हा हेच विचारावस वाटत
प्रेम म्हणजे हे असत
तर आम्हा माणसात अस का नसत ????

प्रेमकाव्य

पन्नास पावसाळ्या नंतरचा जमाखर्च

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 11:17 am

आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही. आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव एक survey फॉर्म घेऊन समोर येतात.

मांडणीलेख

वडील

वृंदा१'s picture
वृंदा१ in जे न देखे रवी...
1 Jan 2017 - 9:28 pm

मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार
घडवणारा कधीच दिसत नाही
पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची
काळसुद्धा कधी पुसत नाही

कविता माझीकविता

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

आशुतोष-म्हैसेकर's picture
आशुतोष-म्हैसेकर in तंत्रजगत
1 Jan 2017 - 9:09 pm

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे. त्यात आता एका नवीन नावाची भर पडली आहे, ते नाव म्हणजे रॅन्समवेअर.

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी-एक होते हिंदू राष्ट्र - भारत आणि'सख्खा' शेजारी नेपाळ-१

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
1 Jan 2017 - 2:44 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

हे ठिकाणलेख

मिपाच्या नव्या थीमची ओळख

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
1 Jan 2017 - 2:15 pm

नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया.

सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

१) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल.

मांडणीवावरप्रकटनविचार

काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही भाग २

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in राजकारण
1 Jan 2017 - 7:50 am

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १४ )

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 Jan 2017 - 7:32 am

त्या चक्रीवादळाच्या आठवणी

ते पावसाळ्याचे दिवस होते.कोकणातला पाऊस म्हणजे त्याबद्दल न विचारलेलं बरं.एकदा कोसळायला लागला मग एक दोन दिवसात उतार यायचं नाव नाही.ह्यावेळीही असंच झालं.त्यात चक्री वादळाचा संभव आहे असा हवामान खात्याने अंदाज दिला होता.काळ्या कुट्ट ढगानी आकाश पूर्णपणे झाकलं गेलं होतं.दुपारी बारा वाजता रात्रीचे बारा वाजले की काय असं भासत होतं.पाऊस धरून होत्ता पण कोसळत नव्हता.म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता तसं अगदी शब्दश: वाटत होतं.

कथालेख