सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
29 Dec 2016 - 8:53 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

प्रस्तावना:

'आज नवीन टीचर आली माझ्या वर्गावर' - माझ्या सातवीत शिकणाऱ्या कन्येने शाळेतून घरी आल्या आल्या उत्साहाने सांगितले. 'पण ती खडूस असावी, तिने आम्हाला जरा कॉम्प्लिकेटेड असाईनमेन्ट (काय ते मराठी!) दिले आहे - भारत आणि शेजारी देश ह्या विषयावर आम्हा मुलांना ग्रुप असाईनमेन्ट म्हणून एका प्रेझेंटेशन तयार करायचे आहे (का ते म !) - सो लेटअस डिसकस धिस व्हेन वी हॅव डिनर ..........

आणि मग संध्याकाळी घरात एका गमतीदार चर्चेची सुरवात झाली. तिला काही माहिती सांगण्याआधी मीच तिला काही प्रश्न विचारले. त्यातून कळलेल्या काही गोष्टी:

तिला भारताच्या भौगोलिक सीमा बऱ्यापैकी व्यवस्थित माहित होत्या, सीमेलगतच्या शेजारी देशांची नावे ठाऊक होती. अपवाद म्यांमार (बर्मा) चा.

पाकिस्तान आणि चीन दोन्ही शेजारी देशांशी भारताचे युद्ध झालेले आहे हे माहित होते, बांगलादेशची निर्मिती अश्याच एका युद्धातून झाली हे माहित होते, पण भूतान आणि नेपाळ ह्या देशांची फक्त नावेच माहित होती.

श्रीलंका ही भारताशेजारी असलेली 'आयलंड कंट्री' आहे हे तिला माहित होते पण भारत-लंका ह्यांची भौगोलिक सीमा (physical border) आहे हे तिला मंजूर नव्हते, पाण्यात असलेल्या देशाची जमिनीवर 'बाउंडरी' कशी असेल असा तिचा प्रश्न होता. श्रीलंकेच्या कोलंबो विमानतळावर आपण अति-तिखट ‘मसाला थोसे' (डोसा) खाल्ला होता हे तिला मात्र पक्के आठवत होते. श्रीलंकन एअरवेजच्या हवाई सुंदऱ्या वेगळ्याच स्टाईलने साडी नेसतात आणि म्हणून त्या खूप सुंदर दिसतात असे सर्टिफिकेट तिने दिले (आणि मी अर्थातच त्याला अनुमोदन दिले.)

म्यांमार (बर्मा) हा शेजारी देश आहे आणि भारत-म्यांमार ह्यांची जवळपास 1600 किमि सीमा आहे हे तिला अजिबात मंजूर नव्हते. पण आम्ही एका मेजवानीत खाल्लेले बर्मीज मोहिंगा हे मात्र तिच्या दृष्टीने 'बर्मा हा छानच देश असावा' असे सर्टिफिकेट देण्यासाठी पुरेसे कारण होते.

अफगाणिस्तान हा भारताचा नसून पाकिस्तानचा शेजारी देश आहे, पण तो जवळच असावा आणि त्याला भारताचा शेजारी देश म्हणता येईल असे तिचे मत पडले. म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान ह्यांच्यात भौगोलिक सीमा (physical border) होती / आहे हे तिला मंजूर नव्हते. (डुरॅन्ड लाईन म्हणून ओळखली जाणारी ही सीमारेषा आताच्या POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीरच्या प्रदेशातून जाते आणि हा प्रदेश भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून, म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीच्या पूर्वीपासून 'विवादास्पद मालकी' असलेला प्रदेश आहे. पण डुरॅन्ड लाईन ला आंतराष्ट्रीय सीमा म्हणून आजही मान्यता आहे आणि भारताने ह्या विवादास्पद भागावरचा हक्क काही सोडून दिलेला नाही.)

मालदीव हा देश मात्र माहित होता, कदाचित गेल्याच वर्षी तिथली सहा दिवसांची भरगच्च सहल झाली असल्यामुळे. ‘कॅन वी गो देअर अगेन टू फीड दोज लव्हली किड शार्क्स?’ माझ्या खिश्यावर प्रचंड मोठा ताण आणू शकणारा प्रश्न आला. पण मग कस्टर्ड संपवता संपवता 'I certify that Maldives is the most beautiful country I have seen' असे सर्टिफिकेट तिने (पुन्हा एकदा) न मागता देऊन टाकले आणि मी धोका टळल्याची नोंद घेतली.

चर्चेतून माझ्या पुन्हा एकदा लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आज शाळा कॉलेजेस मध्ये शिकणाऱ्या मुलांना अमेरिकेची तर अगदी इत्यंभूत माहिती असते. म्हणजे अमेरिकन स्टार्स, पर्यटनस्थळे, तेथे घडणाऱ्या घटना, खाद्यसंस्कृती वगैरे, अगदी नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका ह्याबद्दल माहिती असते. (अर्थात अमेरिका ही महाशक्ती आहे आणि तिचे आपल्याकडे पूर्वापार आकर्षण आहे आणि असणारच हेही खरे) तसेच यूरोपच्या देशांबद्दल, अगदी ब्राझील, चीन, जापान सकट बहुतांशी देशांबद्दल थोडीफार माहिती असली तरी भारताच्या सख्ख्या शेजारी देशांबद्दल फारशी माहिती असेलच असे नाही.

जी गोष्ट लहानांची तीच थोरांची. आपल्यापैकी कितीजण शेजारी राष्ट्राबद्दल 'अपडेटेड' असतो? एका सामान्य भारतीयाला अमेरिका, युरोप, चीन, जापान बद्दल थोडीफार तरी माहिती असते, पण आपल्या शेजारी असलेल्या ह्या देशांबद्दल त्रोटक सुध्दा माहिती नसते. थोडाफार अपवाद पाकिस्तानचा. पाकिस्तानबद्दल आपल्याला जी काही माहिती असते ती सर्व बहुदा आतंकवादी घटना, घुसखोरी, सीमेवरचा गोळीबार, पुन्हा पुन्हा निर्माण होणारी युद्धसदृश्य परिस्थिती, सरकारी पातळीवर होणाऱ्या चर्चा अश्याच प्रकारची असते. नेपाळ, भूतान, बांगलादेश तर कुठेच नसतात. अगदी 2008 पासून मला जेव्हा कामानिमित्त मालदीवला जावे लागायचे तेव्हा माझ्या मुंबईसारख्या महानगरात राहाण्याऱ्या बहुतेक मित्रांना तो आपला शेजारी देश आहे याची कल्पना सुद्धा नसायची. लाहोरला भेट द्यायची ठरवले असता पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्यामुळे माझी होणारी चिडचिड त्यांना समजून यायची नाही. नेपाळमध्ये काही पाहण्यासारखे असेल हे कमीच लोकांना पटायचे. आता चित्र थोडे बदललेले आहे. नेपाळ, श्रीलंका, भूतान हे देश भारतीय पर्यटकांच्या नकाशावर हळूहळू दिसू लागले आहेत, थोडीफार व्यापारिक, सांस्कृतिक घेवाण देवाण सुरु आहे, पण अजूनही 'शेजारी' देशाच्या मानाने आपले आर्थिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे 'पीपल टू पीपल' संबंध पुरेसे घनिष्ठ नाहीत असेच दिसते.

बांगलादेश म्हणजे घुसखोर, भूतान म्हणजे आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थान असलेला देश, नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र, पाकिस्तान तर बोलून चालून आतंकवादी देश, श्रीलंका म्हटले की रावण आणि प्रभाकरन, अफगाणिस्तान म्हणजे तालिबान आणि त्या बामियान बुद्धमूर्तींची विटंबना असेच काही ठराविक ठोकताळे आपल्या मनात असतात. ते दूर होतील अश्या काही बातम्याही आपल्यापर्यंत पोचत नाहीत. टीव्ही, वर्तमानपत्रे वगैरे आपल्या संपर्क माध्यमातून आपल्या शेजारी राष्ट्रांबद्दल फारशी माहिती, कार्यक्रम, बातम्या नसतात. त्यामुळे ह्या देशांशी आपले संबंध जरी शतकानुशतके चालत आलेले असले तरी वरवरचे भासतात.

मला माझ्या कामानिमित्ताने, उपजत कुतूहल आणि हौसेमुळे, मित्र आणि परिवारजनांच्या भेटीगाठींच्या निमित्ताने, त्या त्या देशातील मित्र, सामान्य लोक, कवी, लेखक आणि राजदूत इत्यादी मान्यवरांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून, वाचन, पर्यटन आणि अश्याच अन्य कारणामुळे आपल्या ह्या शेजारी देशांबद्दल थोडेफार अनुभवता आले. आज कन्येला माहिती देताना 'तू नीट लिहून का काढत नाहीस?' असे सुचवण्यात आले आणि म्हणून ही तोंडओळख आपल्या शेजारी देशांची.

ह्या विषयावर लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिण्याचा उत्साह किती टिकेल याची खात्री नसल्यामुळे हे लेखन सध्या सार्क देशांपुरतेच. चीन आणि म्यांमार (बर्मा) दोन्ही शेजारी देशांवर लिहिणे एक मोठे काम होऊ शकेल, त्यामुळे ते जमल्यास थोडे नंतर. तसेच संदर्भांची यादी बनवणे एक किचकट काम आहे पण ते करावे लागेल खरे, माझे थोडे लिहून झाले की करीन.

पहिला देश - नेपाळ
नेपाळबद्दल विशेष ममत्व असण्याचे कारण म्हणजे अगदी लहान असताना आयुष्यातला पहिला 'विदेश'प्रवास आणि पहिलाच विमानप्रवास घडला तो काठमांडूला जाण्यासाठीचा. दोनही गोष्टींचे प्रचंड अप्रूप होते तेंव्हा. म्हणून 'random selection' करायचेच तर नेपाळचा क्रमांक पहिला.

थोडे अवांतर:

8 डिसेम्बर 1985 ला ढाका येथे स्थापन झाली SAARC सार्क ही संघटना. बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सात संस्थापक देश असलेल्या ह्या 'साऊथ एशिअन अससोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन' मध्ये त्यावेळी अफगाणिस्तान हा देश नव्हता, तो नंतर सामील करण्यात आला. सार्क ह्या संकल्पनेचे श्रेय भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचे. सार्क आणि पुढे 1 नोव्हेंबर 1993 ला जन्माला आलेली युरोपियन यूनियन ह्या सारख्याच संकल्पना आहेत - प्रादेशिक सहकार्य आणि त्यातून सर्व सदस्य देशांचा विकास. युरोपचे एकीकरण घडून आता परत त्याच्या विसर्जनाचे / विघटनाचे बिगुल वाजू लागलेत तरी सार्क अजून आहे तिथेच आहे. भारत आणि त्याचे सख्खे शेजारी देश मिळून एक शक्तिमान प्रादेशिक महासंघ निमार्ण करण्याचे सार्क संस्थापकांचे स्वप्न आजून फारसे पुढे गेले नाही हे खरे आहे.

saarc-country-map

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

लेखहे ठिकाण

प्रतिक्रिया

गुड. वाचत आहे! पुभाप्र.

यशोधरा's picture

29 Dec 2016 - 9:02 pm | यशोधरा

प्रस्तावना वाचली. आता देशलेखमालिका येऊ देत.

प्रस्तावना वाचली . चीन ला गेलोय २ वेळा तेव्हा ती मत पुढील लेखात मांडली कि सांगतो .
१)नेपाळ - लहान असताना पहिल्यांदा गेलो १९९९ असावं विदेशी पर्यटक आणि कॅसिनो यामुळे हिंदू राष्ट्र असूनही तिथे भारतीयांचा आदर नव्हता . परत नंतर २ वेळा जाणं झालं विदेशी मित्रांसोबत त्यावेळचा अनुभव अजून वेगळा . फुटकळ गोरी लोक पहिली कि आदर दाखवणारी लोक भारतीयांबद्दल अगदी वेगळे वागत होते मागे . आपण मदत करूनही आज पण त्या देशाने साथ नीट दिली नाही
२) भूतान - २०११ माझ्या कंपनीचा प्रोजेक्ट चालू होता . ह्यांना भारत पण नको आणि बाहेरचे पण . आपली संस्कृती बेस्ट ह्या विचारात असतात पण देश शांत आहे . ब्रॉड माईंडेड आहे फक्त सिक्कीम पश्चिम बंगाल पासिंग च्या गाड्या आल्या कि थोडे वैतागतात . पण फिरण्यासारखा देश .इतक्या छोट्या देशात ड्रिंक्स असो वा स्वतंत्र मुलींचा राहणं वागणं हे भारतापेक्षाही चांगलं आहे .किंबहुना वैयक्तिक विचार स्वतंत्र .
३) मालदीव -फिरण्यासाठी उत्तम अर्थव्यवस्था धोक्यात . बरेच मुस्लिम असूनही देश प्रगत आहे . कित्येक टन साखर पुरवली होती आता काही वर्षांपूर्वी एका रात्रीत ह्या देशाला तरी जिविके एअरपोर्ट ला शब्द फिरवला आणि खूप अश्या गोष्टी
लिहितो मग पण सार्क देश म्हणजे आता ओढूनताणून झालेलं प्रकरण आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

ब्रॉड माईंडेड आहे फक्त सिक्कीम पश्चिम बंगाल पासिंग च्या गाड्या आल्या कि थोडे वैतागतात . पण फिरण्यासारखा देश .इतक्या छोट्या देशात ड्रिंक्स असो वा स्वतंत्र मुलींचा राहणं वागणं हे भारतापेक्षाही चांगलं आहे .किंबहुना वैयक्तिक विचार स्वतंत्र .

सिक्कीम वेगळा देश नाही, ते भारताचे एक राज्य आहे.

वरुण मोहिते's picture

29 Dec 2016 - 10:12 pm | वरुण मोहिते

सिक्कीम आणि पश्चिम बंगाल च्या गाड्या पहिल्या कि वैतागतात बोलो . आपलं इंडियन पासिंग . कारण दोन्ही राज्यातले रस्ते भूतान ला जातात . बाकी सिक्कीम,पश्चिम बंगाल ह्या बद्दल एक धागा काढू कालीपोंग चीझ, गंगटोक , भर टाकेन मी .

अनिंद्य's picture

31 Dec 2016 - 12:19 pm | अनिंद्य

@ वरून मोहिते

- नेपाळबद्दल तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत, पण हे अगदी पूर्ण आशियात घडते. म्हणजे विदेशी पाहुण्यांना, त्यातून गोऱ्या पाहुण्यांना, सगळीकडे, अगदी भारतातही स्पेशल वागणूक मिळते हे आपण बघतोच. मला स्वतःला माझ्या गोऱ्या पाहुण्यांसोबत जेवायला गेले असतांना हा फरक भारतातही सगळीकडे जाणवतो. :-)

- भूतानची बाहेरच्या जगाशी ओळखच अगदी अलीकडे झालेली आहे. हा देश अजूनही बराचसा स्वतःच्या कोशातच आहे, त्यामुळे बाहेरच्या प्रगत जगाला सामोरे जाताना स्वतःच्या संस्कृतीला आणि वेगळेपणाला जपण्याचा नागरिकांचा प्रयत्न ठळक आहे.

- भारतीय पर्यटकांना वैतागणे हे दुर्दैवाने आता अनेक देशात दिसून येत आहे पण त्याची कारणे वेगळी आहेत.

- मालदीवबद्दल पुढे लिहीनच, पण एक छोटी दुरुस्ती - ह्या देशात 'बरेच' मुस्लिम नसून तो ९९.४ % मुस्लिम नागरिक असलेला देश आहे. तुम्ही म्हणताय तसे नाजूक अर्थव्यवस्था आणि राजकिय अस्थैर्य ह्या नितांतसुंदर देशाच्या दुखऱ्या बाजू आहेतच.

विस्तृत प्रतिक्रिया दिलीत, आभार.

अनिंद्य's picture

5 Jan 2017 - 9:59 am | अनिंद्य

@ सिक्किम

- नेपाळच्या इतिहासाबद्दल बोलत-लिहीत असतांना भारत, तिबेट, भूतान, चीन आणि महत्वाचे म्हणजे सिक्कीमचा वेगळा उल्लेख अगदी येतोच. आंतराष्ट्रीय संबंधातील तज्ञ, रणनीतीज्ञ आणि आशियातील युद्धशास्त्राचे अभ्यासक सिक्कीमला 'इंडियाज चिकन नेक' म्हणतात त्याला काही विशेष कारणे आहेत.

२०१७ च्या जानेवारीत अप्रसिद्ध असलेले 'इंडियाज चिकन नेक' जुलैमध्ये एवढे प्रसिद्धी पावेल असे वाटले नव्हते. सध्या चीन-भारत ताणाताणीत हा भाग चर्चेचा विषय झाला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! सुरुवातीची झलक पाहता, मालिका रोचक होईल याची खात्री पटत आहे.

श्रीलंका सोडून इतर देश पाहिले नसल्याने मालिकेबद्दल खूप कुतुहल आहे. पुभाप्र.

अनिंद्य's picture

31 Dec 2016 - 1:01 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

तुमच्या प्रवासवर्णनांचे अनेक अभ्यासपूर्ण आणि आखीव-रेखीव लेख मी मिसळपाववर वाचले आहेत, काही वाचत आहे. तुमच्या सौंदर्यदृष्टीचा मी चाहता आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2016 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पिलीयन रायडर's picture

30 Dec 2016 - 3:02 am | पिलीयन रायडर

कल्पना आवडली! पण लवकर लिहा हा धमकी वजा आग्रह!

दाते प्रसाद's picture

30 Dec 2016 - 10:46 am | दाते प्रसाद

सुंदर सुरुवात , दक्षिण आशियाई देशामधून( बांगलादेश , श्रीलंका , म्यानमार ) कामानिमित्त फिरत असल्याने , ह्या देशाचा, तिथे राहण्याचा , सामान्य लोकांशी इंटरॅक्शनचा अनुभव आहे ( पाकिस्तानसोडून). पाकिस्तानात तिथल्या लोकांशीं फोनवरून इंटरॅक्शन आहे.
तुमचे पुढचे लेख वाचायची उत्सुकता आहे . लवकर येऊ द्यात.

पैसा's picture

30 Dec 2016 - 10:54 am | पैसा

अगदी मनोरंजक! लिहायचा उत्साह टिकवून ठेवा.

अनिंद्य's picture

30 Dec 2016 - 9:43 pm | अनिंद्य

एस, यशोधरा, वरुन मोहिते, डॉ. सुहास म्हात्रे, पिलीयन रायडर, दाते प्रसाद, पैसा
- उत्साहवर्धनासाठी आभार.

मनिमौ's picture

31 Dec 2016 - 3:54 pm | मनिमौ

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत

पुढचे सगळे भाग इथेच एकाखाली एक असे दिसतील अशी रचना करायची आहे. काय करावे लागेल ?

प्लीज हेल्प!

सुखीमाणूस's picture

9 Jan 2017 - 11:23 pm | सुखीमाणूस

पहिला भाग वाचुन पुढचे भाग वाचायची उत्सुकता वाढली.

आणि मी अर्थातच त्याला अनुमोदन दिल

- हे छान केले

अनिंद्य's picture

16 Jan 2017 - 5:41 pm | अनिंद्य

@ सुखीमाणूस - आभार !

@ दीपक११७७ - :-)

साहित्य संपादक / संपादक मंडळी,

संदर्भांच्या सोयीसाठी सार्क देशांचा नकाशा असलेली ही लिंक वरील लेखात योग्य जागी टाकण्यासाठी मदत हवी आहे:-

http://www.mapsofindia.com/maps-of-asia/saarc-country-map.html

नकाशा जालावरून साभार.

हेल्प प्लीज !

अनिंद्य's picture

28 Apr 2017 - 3:58 pm | अनिंद्य

आभारी आहे,
हे तंत्र लवकर शिकून घ्यायला पाहिजे.

मस्त आणि रोचक सुरुवात.

का कुणास ठाऊक, शीर्षकावरुन इतके दिवस मी या लेखमालेतले धागे काथ्याकूट प्रकारातले असे समजून उघडलेच नव्हते! आता वाचेन एकेक करुन सगळे.

अनिंद्य's picture

25 May 2017 - 11:15 am | अनिंद्य

@ रुपी,

आभार!

हा माझा पहिलाच लेखन-प्रयत्न असल्यामुळे मलाही आधी हे लेखन कुठल्या विभागात टाकू असा प्रश्न पडला होता. :-)

पुंबा's picture

22 Dec 2017 - 12:23 pm | पुंबा

वन्टास!!!
हे आधी वाचले नव्हते.. मस्त!!

अनिंद्य's picture

24 Dec 2017 - 6:04 pm | अनिंद्य

वन्टास ?

अनिंद्य's picture

28 Dec 2017 - 5:00 pm | अनिंद्य

@ पुंबा,

वन्टास म्हणजे काय हो ? काहीतरी गमतीशीर अर्थ असावा असे वाटते आहे.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 12:47 pm | पगला गजोधर

"वन्टास" म्हणजे "रापचिक" बहुतेक...
चू भू द्या घ्या

अनिंद्य's picture

11 Apr 2018 - 3:55 pm | अनिंद्य

वन्टास, रापचिक :-))
शब्दसंग्रहात भर पडली माझ्या.

कुमार१'s picture

8 Apr 2018 - 12:31 pm | कुमार१

आज 'मिपा-पुस्तकं' मध्ये जाऊन इथे आलो. उजळणी मस्त वाटतेय.

अनिंद्य's picture

11 Apr 2018 - 3:58 pm | अनिंद्य

थँक यू !
हे लिहिले तेंव्हा फोटो आणि नकाशे डकवण्याचे तंत्र काही केल्या जमले नव्हते.