नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया.
सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे.
१) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल.
२) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे. यावर क्लिक केल्यावर त्या त्या साहित्य प्रकारातील लेख आपल्याला दिसतील. ह्या लेखांची मांडणी थोडी बदललेली आहे. जून्या टेबल पध्दतीप्रमाणे न मांडता थोडा परिचय यावा असा विचार करून नवी मांडणी आहे.
३) नवे लेखन - पुर्वी प्रमाणे चर्चेत असलेले सर्व प्रकारचे लेखन एकाजागेवर येथे असेल. यापुर्वी मिपाचे पहिले पान जसे होते तसा टेबल येथे आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही चर्चा लेख किंवा अन्य साहित्य चुकवणार नाहीच.
४) मिपा विशेषांक - आता पर्यंत मिपाने सादर केलेले सर्व विशेषांक / लेखमाला या जागी एकत्रीत केलेल्या असतील. आज हा मेन्यु उपलब्ध नाही. लवकरच हा मेन्यु सक्रिय करतो.
५) घोषणा - मिपा व्यवस्थापनाबाबत काही अधिकृत घोषणा असतील तर त्या येथून केल्या जातील.
६) मदत पान - नवीन सदस्यांना मिपावर वावरताना काही अडचण आल्यास येथे मदत मिळेल.
या नंतर पहिलं पान सुरू होतं. - पहिल्या पानावर मिपाचा दिनविशेष अथवा अन्य फलक असेल.
त्या खाली शिफारस नावाचा टेबल असेल. या शिफारसमध्ये मिपावर उत्तम लेखन लोकांसमोर मांडून त्या लेख/कविता/चर्चा आदींची शिफारस केली जाईल.
या टेबल खाली जे चौकोण आहेत त्यामध्ये त्या त्या साहित्य प्रकारात नवीन प्रकाशित झालेले लेखन असेल. यामध्ये केवळ नवीन प्रकाशन एवढाच निकष आहे.
या बॉक्स मध्ये एक सुविचार असेल. हा सुविचार बदलता असेल. तुम्ही येथे जोडण्यासाठी सुविचार पाठवू शकता.
त्या खाली मिपाचे फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि युट्युब चॅनलचा दूवा दिला आहे.
सर्वात खाली काळ्या रंगाच्या पट्टीवर काही नियमीत ब्लॉक आहेत जे आधीही होतेच. आता रंगसंगती बदलली आहे एवढंच.
याशिवाय मिपाच्या मांडणीत काही महत्वाचे बदल करतोय ते पुढील प्रमाणे...
आता नवीन साहित्य बनवण्यासाठी तुम्हाला पुर्वीप्रमाणे दिलेल्या बॉक्स मधून लेखन विषय किंवा प्रकार निवडण्याची गरज नाही तर लेखाच्या शीर्षकाखाली दिलेल्या बॉक्समध्ये सरळ तुम्ही तसा प्रकार किंवा कॅटेगरी लिहून जोडू शकता. यात फायदा हा आहे की तुम्ही करताय त्या लेखनाच्या अनुरूप टॅग तुम्ही लेखाला जोडू शकाल. ही सुविधा ऑटोकम्प्लीट पध्दतीमधील आहे. म्हणजे जर तुम्ही इतिहास हा टॅग जोडू पाहत असाल आणि तो आधीच जोडलेला असेल तर तुम्ही केवळ 'इति' एवढं लिहून वाट पाहिलीत की आधी जोडलेला इतिहास नावाचा टॅग तेथे दिसेल तो तुम्ही सिलेक्ट करावा. शक्यतो एकाचा नावाचे अनेक टॅक लिहिण्याच्या पध्दतीप्रमाणे वेगळे करू नये. आधी जोडलेला टॅग असेल तर तोच निवडावा. ( काही साहित्यप्रकारात हा बदल अद्याप नाही. एक दोन दिवसांत येईल.)
प्रतिक्रिया आणि लेखामध्ये लेखकाचा फोटो दिसण्याची सोय आता देण्यात आली आहे. याचा वापर सर्वांनी करावा. आपला फोटो जोडण्यासाठी उजव्या समासाता आपल्या सदस्यंनावावार टिचकी मारून आलेल्या पानावर संपादन मध्ये जाऊन खाली आपले चित्र चढवण्याची सोय दिलेली आहे. काही अडचण आल्यास येथे प्रतिक्रिया देऊन विचारू शकता.
नवीन रचना नवीन मांडणी अद्याप पुर्ण झालेली नाही. याला थोडा वेळ लागेल. जस जसे नवीन काही जोडले जाईल त्याची घोषणा येथेच केली जाईल.
प्रतिक्रिया
1 Jan 2017 - 2:29 pm | संदीप डांगे
गुड गोईन्ग!
1 Jan 2017 - 2:48 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत भारी ! नवी रचना आवडली. धन्यवाद !
अक्षराचा फाँट पूर्वीचा ठेवला तर वाचन सौख्य वाढेल.
1 Jan 2017 - 4:28 pm | सोत्रि
font बद्दल सहमती !!
नवीन थीम एकदम झक्कास आहे. :)
- (मिपाकर) सोकाजी
1 Jan 2017 - 2:54 pm | पुणेकर भामटा
शुभेच्छा!
1 Jan 2017 - 3:08 pm | कैवल्यसिंह
थिम यकदम हटके ऐहे पन... सर्च इंजिन (शोधा) पर्याय नाही दिसला मला कुठेच.. जुने/नविन लेखन, प्रतिक्रीया, मजकुर तसेच सदस्यांना शोधन्याचा पर्याय पाहिजे..
बाकी थिम एकदम झक्कास आहे....
1 Jan 2017 - 3:51 pm | आशु जोग
प्रत्येकाचा फोटो असा काही मजकूर येतो तो यावा का
आणि
स्वगृहवर सर्व धागे क्रमाने यावेत. ज्याला लेटेस्ट कमेंट ते वरती असावे.
दुसरी सोय जो धागा ज्या क्रमाने पोस्ट झाला त्या क्रमाने
1 Jan 2017 - 4:53 pm | नंदन
थीममधले बहुसंख्य बदल आवडले, इतरांचाही सराव होईल यथावकाश.
काही प्रश्न-कम-सुचवण्या:
१. वाचनखुणांची लिंक उजवीकडच्या मेन्यूत देता येईल का?
२. मुख्य पानांवरचे सुविचार 'हे.ला.'वून टाकणारे आहेत ;). ते गाळून, ती रिअल इस्टेट एखाद्या अन्य कारणासाठी (आगामी उपक्रमांची माहिती/मिपा यूट्यूब चॅनेलचा एम्बेडेड प्रिव्ह्यू/मिपाकरांनी टिपलेलं एखादं छायाचित्र इ.) वापरता येईल का?
1 Jan 2017 - 5:13 pm | सुधीर
रुपडं छान आहे. लूक अँड फिल आवडला.
1 Jan 2017 - 6:07 pm | तुषार काळभोर
आधी नवे लेखन च्या उजवीकडील टॅबमध्ये स्वतःचे लेखन (लेख+प्रतिसाद)दिसत असे, ते परत आले तर स्वतःचा सहभाग ट्रॅक करणे सोपे होईल.
1 Jan 2017 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला जुनं काही सोडायचं म्हटलं की जीवावर येतं. गेली दहा वर्ष जे सोसलं सॉरी ज्याची उत्तम सवय झाली त्याला नवीन बदल जड जाणार, पण काळाबरोबर चाललंच पाहिजे म्हणून नव्या बदलांचं स्वागत करतो. आणि सर्व मिपा तंत्रज्ञ आणि मालकांना शुभेच्छा देतो.
आता वरची पट्टी यात आपला मिपाचा पूर्वीचा रंग भरता आला तर भरावा. कारण वरची पट्टी जवळ जवळ अनेक ब्लॉग लेखकांची असते, दैनिकांची असते, सारांश एक कॉमन रंग आहे, तो बदलता आला तर बदलावा. बाकी, सवडीने सांगतोच.
नवीन वर्षाच्या सर्व मिपाकर मित्रांना भरभरुन शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
1 Jan 2017 - 8:28 pm | संग्राम
नवीन look छान आहे
कृपया मुख्य पानावरती तंत्रजगत, कलादालन, क्रिडाजगत, राजकारण या कॅटॅगरीज मध्ये ordering चेक करा
पेजीनेशन 1,2,3.... Next , last असे लेखानंतर देता आले तर plz द्या मोबाईल वर लेख वाचणं सोपं होईल.
1 Jan 2017 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा
साइन, स्मायली पुन्हा जाग्रुत व्हाव्यात. बाकी नवी रचना आवडलीच आहे. मोबल्यावरून हताऴायला खूप सोपी सुखद आहे.
1 Jan 2017 - 9:49 pm | टवाळ कार्टा
मस्तय नवीन रूप
1 Jan 2017 - 10:31 pm | सही रे सई
व्वा भारीये.. नवीन थीम खूप छान
2 Jan 2017 - 6:31 am | रेवती
मिपातील बदल आवडले. अजून सवयिचे होतायत म्हणून वेगळे वाटतेय तेवढेच!
2 Jan 2017 - 8:13 am | लालगरूड
nice efforts
2 Jan 2017 - 10:48 am | बाळ सप्रे
इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये फार चमत्कारीक वागत आहे मिपाचा नवीन चेहेरा :-(
क्रोम ब्राउजरमध्ये उघडून पाहीपर्यंत नक्की समजत नव्हतं की हे काय चाललय!!
2 Jan 2017 - 10:51 am | थॉर माणूस
सोपी आणि सुटसुटीत... छान जमली आहे. आधीच्या भगव्या रंगाची थोडी कमतरता वाटत आहे पण या रंगसंगतीची देखील होईल सवय हळूहळू. :)
2 Jan 2017 - 10:57 am | नितिन थत्ते
नवी रंगसंगती छान आहे. विशेषतः लाल रंगाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बरे वाटले.
2 Jan 2017 - 11:52 am | माझीही शॅम्पेन
2 Jan 2017 - 11:50 am | माझीही शॅम्पेन
मीपकारांना आणि मालकांना नववर्षयच्या आणि नवीन रूपाच्या शुभेच्छा __/\__
2 Jan 2017 - 12:08 pm | अरिंजय
सवय होईल हळुहळु.
2 Jan 2017 - 12:12 pm | अरिंजय
गुरु-माऊलींचे छायाचित्र शक्य असल्यास वरच्या भागात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
2 Jan 2017 - 1:43 pm | कपिलमुनी
साईट अतिशय भारी झाली आहे . मांडणी आ र्क ष क आहे
यूआय- यूएक्स मधल्या १५+ वाल्या टीममेटला दाखवली . त्यानेही भरभरून कौतुक केला आहे .
मोबाईल , टॅब वर खूप सोपी झाली आहे
2 Jan 2017 - 2:02 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
छान,आता मोबल्याफ्रेंडली साईट आली आहे.पण मागच्या वेळेस सही काढून घेतली तशी फोटो दिसण्याची सुविधा काढू नये.मिपाला व मिपाकरांना नविन वर्षाच्या शुभेच्छा.
2 Jan 2017 - 8:45 pm | पिलीयन रायडर
थीम आवडलीच. नवीन वर्षाचे बॅनरही आवडले. डांगेअण्णांनी भारी काम केले आहे. एकदम "पार्टी!" लुक आहे!
2 Jan 2017 - 10:58 pm | इन्द्र
लेखन तारिख दिसेल तर बरे होइल ..............
3 Jan 2017 - 4:43 pm | पंतश्री
आवागमन हे वरती काळ्या पट्टिवर टाकल्यास अधिक सोपे आणि आकर्शक होइल.
3 Jan 2017 - 7:05 pm | पिलीयन रायडर
सहमत
4 Jan 2017 - 10:26 pm | सॅगी
पण वाचनखुणांची सुविधा परत आल्यास फारच बरे होईल.
5 Jan 2017 - 1:35 am | रुपी
थीम आवडली.. इतकी मेहनत घेतलीत त्यासाठी धन्यवाद! :)
5 Jan 2017 - 11:26 pm | कैवल्यसिंह
लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद, खरडवही, खरडफळा व व्य नि यांवर जी वेळ दाखवतात ती २४ तासांची दाखवतात त्यात बदल करुन ती जर १२ तासाची केली तर बरे हेईल.. म्हनजे वेळेपुढे AM/PM आसले तर जरा बरे होईल...