पुणे म्हट्ले कि पुणेरी टोला आलाच..
असाच एक कालचा अनूभव...
मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो..
तो शिम्पी म्हनला कि उद्या येउन घेउन जा.. यावर मी त्या शिम्पी ला विचारले "काहो उद्या दुकान चालू आहे का?? रविवार आहे ना म्हनून.."
तर तो म्हणतो "का रे बाळा उद्या काय दगड्फेक आहे का? दगड्फेक असेल तर मग बन्द राहाणार दुकान..
कस आहे ना.. दगड्फेक असली ना तर्र मला ही जाव लागत दगड्फेक करायाला.. काय ना आमच्यात ना स्पर्धा लागते.. कोण काय फोड्णार.. डोक्, डोळा.. म्हणून जर दगड्फेक नसेल ना तर चालू आहे दूकान.."
आस्सा ह्या पुणेरी टोला मी अनुभवलेला...