संस्कृत भाषा

महेश काळे's picture
महेश काळे in काथ्याकूट
11 Feb 2011 - 11:50 am
गाभा: 

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे
भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक
पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील
तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला
म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र
आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात
संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.
उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही
राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली
की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली
ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज
आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली
नाही
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

11 Feb 2011 - 11:56 am | स्पंदना

जरुर!!
खरच आपण रोजच म्हणतो ही स्तोत्रे, अन ऋचा. अ‍ॅकचुअली भारत सरकारन ही देववाणी जमेल तेव्हढी प्रसारीत केली पाहिजे. मी होते तोवर आकाशवाणीवर संस्कृत मध्ये बातम्या असायच्या. आता या एफ एम च्या गदारोळात काय माहिती नाही.
तुमच हे आवाहन मी माझ्या नातेवाईकांना कोपी पेस्ट करुन पाठवु का?

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 12:06 pm | llपुण्याचे पेशवेll

संस्कृत बातम्या अजूनही लागतात. ७ ला ५ कमी असताना. :)
त्यातले निवेदक परमानंद झा: , बलदेवानंद सागरः वगैरेंची आनऊन्समेन्ट अजूनही आठवते. सध्या परमानंद झा असतात बहुतेक वेळेला.

टारझन's picture

11 Feb 2011 - 2:23 pm | टारझन

रट्टा मारलेले स्तोत्र आले म्हणजे संस्कृत भाषा आली काय ? स्वतःची अशी दोन वाक्य बोलायला सांगा बरं संस्कृतात ... शेवटी कुठे विसर्ग लावला म्हणजे संस्कृत होत नाही :)
तेंव्हा मला संस्कृत येत नाही , सबब मी खोटी माहिती भरणार नाही ... संस्कृत मेली तरी बाहत्तर त्र्याहत्तर .. पण मी माझ्या तत्वांशी फार प्रामाणिक आहे म्हंटलं :)

- ( मराठी, हिंदी,इंग्रजी) तारझन

प्रमोद्_पुणे's picture

11 Feb 2011 - 4:02 pm | प्रमोद्_पुणे

सध्या झा असतात बहुदा.. इयं आकाशवाणी संप्रतीवार्ता: श्रुयंताम...भाषा खरेच देवभाषा आहे.नैव क्लिष्टा न च कठिना..

पन याकरनाच लय भ्या वाटतय... संस्कृत संभाषण वर्ग घेणे जरूरी आहे. जे बहुदा पुण्यात होत असतात. छोटी छोटी वाक्ये बोलायला सुरुवात केली की भीती चेपेल. सरकारने सुद्धा संभाषण वर्ग व तत्सम उपक्रमांना आर्थिक मदत द्यायल हवी आणि आपण त्याचा लाभ घ्यायला हवा.

गोगोल's picture

12 Feb 2011 - 12:27 am | गोगोल

संप्रती वार्ता श्रुयंताम

चु भु द्या घ्या.

चिंतामणी's picture

13 Feb 2011 - 12:30 am | चिंतामणी

एकवचनी पाहीजे. द्वि वचनी नको.

संप्रती वार्ता श्रुयंताम

संप्रती वार्ता: श्रुयंताम

प्रवाचकः बलदेवानंद सागरः

चिंतामणी's picture

13 Feb 2011 - 12:25 am | चिंतामणी

मी माझ्या नातेवाईकांना कोपी पेस्ट करुन पाठवु का?

प्रश्ण का पडला???

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 11:58 am | नगरीनिरंजन

उत्तम कल्पना आणि ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार. सगळ्यां मित्र-नातेवाईकांना नक्की सांगणार.

यशोधरा's picture

11 Feb 2011 - 12:02 pm | यशोधरा

चांगला विचार आहे. जरुर असे करेन.

प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु किंचित असहमती.

कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.

ही अशी घोषणा करणारे टिक्कोजीराव कोण? असो. एक जण जरी ती भाषा स्वगत रुपाने बोलत असेल तरिही ती भाषा जिवंत असे माझे मत आहे,

राहता राहिली कमी लोक बोलतात तर ही परिस्थिती गेल्या हजारो वर्षांपासून आहे. संस्कृत कधीही त्या अर्थाने जिवंत नव्हती की जी आता मृत घोषित केली जाईल.

परिस्थिती बदलत आहे. उत्तरांचल सरकारने द्वितीय भाषा म्हणुन संस्कृतला मान्यता दिली आहे. मध्यतरी बंगुळूरु येथे झालेल्या संस्कृत पुस्तक प्रदर्शनात शेकडो (धार्मिक संदर्भ नसलेली) पुस्तके वेगवेगळ्या विषयांवरची विकली गेली तसेच संस्कृतमधे लेखन असलेल्या अनेक नव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. अगदीच अनास्था आहे असे नाही. ज्याला अभ्यास करायचा अहे ते करतात त्यासाठी सरकारी मदतीची पण वाट पहात नाहीत.

असो. तरीही भावनांशी सहमती आहे त्यामुळे वाद नसावा.

राहता राहिली कमी लोक बोलतात तर ही परिस्थिती गेल्या हजारो वर्षांपासून आहे. संस्कृत कधीही त्या अर्थाने जिवंत नव्हती की जी आता मृत घोषित केली जाईल.

+१

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 2:50 pm | मुलूखावेगळी

माझा संस्क्रुत हा विषय ८ वी पासुन . (त्यामुळे आमच्या तुकड्या विभागल्या गेल्या :( ).
बी.एस्सी. २न्ड पर्यन्त चा स्कोरीन्ग विषय . तेव्हा मला नेहमीच रटृटा मारुन ९० च्या मार्क्स १दा तर ९९ ( ह्या १ च विषयात) पडायचे.
बाकि मी टिळक विद्यापीठाच्या परीक्षा पण दिलेल्या . वर्गात मला सगळयाच सुभाषिततांचे अर्थ , प्रश्नांची उत्तरे यायची.
पण मला फक्त २ वाक्येच बोलता येतात.
मम नाम
नमो नमः
माझ्या सारखे बरेच लोक असतात मार्क्स साठी हा विषय घेनारे
तेव्हा मी मला येते असे म्हनु कसे शकते. आता तुम्हीच सांगा धागाकर्ते

युयुत्सु's picture

11 Feb 2011 - 12:11 pm | युयुत्सु

+१

अमोल केळकर's picture

11 Feb 2011 - 12:22 pm | अमोल केळकर

सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिताहृद्या रमणीया ।
अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, नच कठीना ! नैव क्लिष्टा, नच कठीना !!

अमोल केळकर

महेश काळे's picture

11 Feb 2011 - 12:37 pm | महेश काळे

फारच छान..
धन्यवाद

कच्ची कैरी's picture

11 Feb 2011 - 1:57 pm | कच्ची कैरी

ही माझी आवडती कविता आहे ,आमच्या संस्कृतच्या टीचर नेहमी मलाच म्हणायला सांगायच्या .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2011 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>अवगत असलेल्या भाषा मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा

मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही.

>>>>संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे
आम्ही दिवेलागणीला कोणतीही स्तोत्रे म्हणत नाही.

>>>>लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
आमच्याकडे लग्नात कोणतेही संस्कृत श्लोक नसतात.
आम्ही अग्नीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतांना शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने
शंकराला जी वचनं दिली होती ती वचनं शुद्ध मराठीत देतो घेतो.

असो, बाकी जनगणनेत ही ’अवांतर’ माहिती भरणा-यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

महेश काळे's picture

11 Feb 2011 - 12:30 pm | महेश काळे

:D :D :D :D

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार

मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही.

म्हणुन तर देवभाषा म्हणतात तीला प्रा.डॉ. ;)

चिंतामणी's picture

13 Feb 2011 - 12:33 am | चिंतामणी

परा, लै भारी.

=))

अवलिया's picture

11 Feb 2011 - 1:33 pm | अवलिया

>>>मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही.
>>>आम्ही दिवेलागणीला कोणतीही स्तोत्रे म्हणत नाही.

अरेच्या हा प्राध्यापकांचा विनय म्हणावा की नम्रता ? असा प्रश्न पडला आहे.

काही नाही गेल्या काही महिन्यात ही खरड वाचण्यात आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शनी, 06/11/2010 - 10:19

आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. सकाळीच उठण्यापासून [उटणे वगैरेसहीत]
ते लक्ष्मीपूजनापर्यंत. फक्त सायंकाळी लक्ष्मीपूजनाला गुरुजी नसतात. आम्हीच श्री सुक्तमचे वाचन करतो. नंतर कुटूंबासह फॆन्सी फटाके उडवतो.

आता पारंपारिक पद्धतीने श्रीसुक्तम संध्याकाळी मराठीत म्हटले असेल काय असा प्रश्न पडला :)

>>>शुद्ध मराठीत देतो घेतो.

शुद्ध मराठी म्हणजे कोणती भाषा नक्की?

आपलाच नाना
(हाणतंय आता विद्यावाचस्पती मला ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2011 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>काही नाही गेल्या काही महिन्यात ही खरड वाचण्यात आली.

सर्वप्रथम खासगी खरड संबंधितांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी त्या खरडींचा वापर करण्याच्या कृतीबद्दल सन्माननीय सदस्य श्री अवलिया यांचा निषेध व्यक्त करतो.

’संस्कृत लेखन वाचणे म्हणजे काही संस्कृत भाषा अवगत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. संस्कृत भाषेतील शब्दांचा अर्थ ही कळला पाहिजे. मला संस्कृत वाचता येते पण त्याचा अर्थ कळत नाही. त्या अर्थी मी संस्कृत मला ’अवगत नाही’ असे म्हणतो.

>>>शुद्ध मराठी म्हणजे कोणती भाषा नक्की?
शुद्ध भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास शुद्ध भाषा असे म्हणावे. - प्रा.डॉ. ;)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

11 Feb 2011 - 2:01 pm | अवलिया

तुमच्या निषेधाला केराची टोपली दाखवतो.

शुद्ध भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास शुद्ध भाषा असे म्हणावे. - प्रा.डॉ.

हे भाषेबद्दल झाले. त्याला शुद्ध असे विशेषण न लावताही व्याख्या होते.

भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास भाषा असे म्हणावे

ही खरी व्याख्या. उगाच शुद्ध शब्दाच्या कुबड्या का? आणखी तुम्ही शुद्ध मराठी भाषा असे विधान केले. म्हणजे परत त्यातही घोळच नाही का?

आपलाच नाना

गवि's picture

11 Feb 2011 - 1:00 pm | गवि

ती भाषा का नष्ट होत आहे याचा पूर्वग्रह न ठेवता विचार केला पाहिजे.

लवचिक नाही ते टिकत नाही. लवचिक फॉर्ममधे संस्कृत ऑलरेडी इतर भारतीय भाषांच्या रुपात अवतरून जिवंत आहेच आणि चांगली ठणठणीत आहे. पण मूळ रुपात... नाही. हे अ‍ॅक्सेप्ट करण्याचाच प्रश्न आहे फक्त.

आपण रोज त्या भाषेत बोललो (असतो) तरच ती जिवंत राहील (राहिली असती). पण त्यातल्या अत्यंत कठीण कडक नियमांमुळे ते शक्य झालं नसावं. माझ्यासहित (दहावी संस्कृत ९६%) जे कोणी अद्याप संस्कृत शिकतात ते केवळ स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून. संस्कृतमधे संपूर्ण निबंध लिहा. दहा ओळीत संस्कृतमधे उत्तरे लिहा असे प्रश्न पेपरात यायला लागले तर शिकायलाच काय, शिकवायला सुद्धा तेवढ्या संख्येने संस्कृत येणारे लोक सापडणार नाहीत.

स्तोत्रे वगैरे कधीतरी म्हणणे म्हणजे संस्कृत येणे नव्हे. प्रामाणिकपणे मनाशी विचारुन सांगावे की किती श्लोकांचा / स्तोत्रांचा अर्थ समजून आपण म्हणतो ? (नुसते कशाविषयी आहे ते माहीत असणे वेगळे..)

जे टिकत नाही ते न टिकण्यामागे कारणेही असतात. फॉर्मॅलिन घालून म्युझियममधे टिकवलेले नमुने आणि जंगलात वावरणारे प्राणी यात खूप फरक आहे.

बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे पोपटाने पंख पसरले आहेत, जमिनीवर निपचित पडला आहे, चोच वासली गेली आहे, पाय वर केले आहेत.. पण मेला मात्र नाही..तशी अवस्था.

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 1:21 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

बिरुटेसरांशीही सहमत

धनंजय's picture

11 Feb 2011 - 9:28 pm | धनंजय

मत जवळपास असेच.

ज्यांची प्राथमिक भाषा मराठी असेल (म्हणजे प्रवाही संस्कृतापैकी "मराठी" हा प्रवाह असेल), त्यांनी प्राथमिक भाषेच्या रकान्यात "मराठी" लिहावे.

मी_ओंकार's picture

11 Feb 2011 - 12:50 pm | मी_ओंकार

मिपावर संस्कृत.. हम्म त्या लावण्यादेवी कुठे आहेत?
ढकलपत्रातून ही माहिती मिळाली होती. बघू.
बाकी हिंदी गाण्यांमध्ये हल्ली बरेच पंजाबी आणि उर्दू शब्द असतात. आणि ही गाणी आम्ही कधीही म्हणतो. मग या पण भाषा म्हणून लिहाव्यात का?

तसेच
उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही
राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत.

याबद्दल आणखी माहिती मिळू शकेल का?

- ओंकार.

वेताळ's picture

11 Feb 2011 - 12:50 pm | वेताळ

मदत करणारी पुस्तके सांगा. मला संस्कृत शिकायचे आहे. सुरुवात कशी करावी त्याबद्दल जाणकारानी मार्गदर्शन करावे.

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 2:01 pm | नितिन थत्ते

दुसर्‍या संकेतस्थळावरील नानांची मालिका वाचावी.

अवलिया's picture

11 Feb 2011 - 4:03 pm | अवलिया

http://sanskrit.nic.in/dis.htm

किंवा जवळपास संस्कृतभारतीचे केंद्र शोधा, त्यांच्या तर्फे अधुन मधुन संस्कृत संभाषण वर्ग असतात.

चिरोटा's picture

11 Feb 2011 - 12:53 pm | चिरोटा

कारण मागील सर्वेक्षणात
संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.

ती मृत भाषा आहेच. लॅटिनही मृत भाषा आहे.पण अशा जुन्या भाषांचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत जगभरात.येथे हल्लीच भरलेल्या संस्कृत मेळाव्यात अनेक संस्कृत पुस्तके खपली.काही वक्ते(एस्. पी. बालसुब्रमण्यम) तर संस्कृतमध्येच बोलले.

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 1:45 pm | नगरीनिरंजन

प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार व्यावहारिकदृष्ट्या बरोबर असतीलही पण एक रोजच्या वापरातील भाषा म्हणून नाही तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून तरी ती भारतातच जतन व्हावी असे मात्र वाटते.
बाकी अभ्यास करणारे करतातच आणि त्यात परदेशी लोकही असतातच. फक्त भविष्यात पैशाअभावी असा अभ्यास करणार्‍या भारतीयांची संख्या शून्यावर येऊ नये एवढ्याचसाठी जे करता येईल ते केले पाहिजे. बाकी, या दोघांनी मांडलेली मते अजून एखाद्या शतकात मराठीबद्दल बोलली गेली नाहीत म्हणजे मिळवली.
आजकाल आधुनिकता म्हणजे आपलं सगळं टाकून देणे आणि प्रत्येक गोष्टीचा उपयुक्ततेच्या दृष्टीने विचार करणे असे असल्याने यात आश्चर्य ते काही नाही.
सुदैवाने अजूनही संस्कृत बोलणारे अनेक लोक आहेत आणि मोठ्या शहरांत इंग्रजाळलेलं वातावरण असलं तरी छोट्या शहरांमध्ये लोक अजूनही संस्कृत शिकतात. नगरसारख्या ठिकाणीसुद्धा संस्कृतमध्ये मासिक निघते हे भूषणास्पद आहे.

महेश काळे's picture

11 Feb 2011 - 1:52 pm | महेश काळे

सहमत आहे

गवि's picture

11 Feb 2011 - 2:06 pm | गवि

लवचिकता नाही ठेवली तर टिकत नाही. हो. हे मराठी किंवा कोणत्याही इतर भाषेबाबतीत घडू शकतं.

मराठीही चारशे वर्षांपूर्वीची पहा, बखरींमधली पहा आणि आजची पहा. ती एकच भाषा आहे किंवा कसे? हा संशोधनाचा विषय ठरेल.

भाषा मरत नाही. ती रूप बदलते.

डायनॉसोर जातात, मगरी राहतात,

डायनॉसॉरच्या आठवणी जतन कराव्यात हे योग्यच.. पण तो तस्साच्या तस्सा जिताजागता शिल्लक राहिला पाहिजे असं कसं म्हणता येईल.

(डायनॉसोर हे फक्त उदाहरण आहे. संस्कृत भाषेला डायनॉसॉर म्हणतो असे समजू नये ही विनंती.. :) )

अभ्यासविषय म्हणून एखादी भाषा शिल्लक राहणे / ठेवणे / ठेवण्याची गरज पडणे म्हणजेच फॉर्मॅलिनमधे जतन. जिवंत गोष्टींना याची गरज नसते.

हेच एवढेच म्हणत होतो.

शरभ's picture

11 Feb 2011 - 1:58 pm | शरभ

+१
Agree with Mahesh.
भले भाषा वापरत नसलो तरि पणनोन्द तर झालिच पाहिजे.....
बाहेरच्या देशात(Especially European countries) ह्याला फार महत्व आहे... त्याना त्यान्च्या भाषेचा आभिमान असतो...

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 2:02 pm | नितिन थत्ते

>>बाहेरच्या देशात(Especially European countries) ह्याला फार महत्व आहे... त्याना त्यान्च्या भाषेचा आभिमान असतो...

कळले नाही.

युरोपियन देश किंवा इतरत्र ते ती भाषा प्रत्यक्ष बोलत असतात. अशी माझी समजूत आहे.

बोलता येत नसलेल्या / समजत नसलेल्या मूळ लॅटिन किंवा अन्य भाषेची "आपल्याला अवगत भाषा" म्हणून कुणी नोंद करत असतील असे वाटत नाही. तरीही करत असले तर कल्याण असो.

नोंद तर आहेच संस्कृत भाषेची. जुन्या ग्रंथातले ज्ञान मिळवणे, संशोधन यासाठी लागेल तेवढी नक्कीच जतन होईल.

रमताराम's picture

11 Feb 2011 - 2:35 pm | रमताराम

संस्कृत भाषा मृत म्हणून घोषित होणे हे चांगले की वाईट? कदाचित मृत म्हणून घोषित झाली तर तिच्या संवर्धनासाठी पुरातत्वसंशोधनाच्या धर्तीवर अधिक ठोस उपाय, अनुदान इ. खास उपाययोजनांसाठी ती पात्र होईल. जर जिवंत आहे असे ठरले तर कदाचित चार भाषांप्रमाणेच एक भाषा या न्यायाने अधिक दुर्लक्ष होऊ शकेल. आणि मुळात ती भाषा समजत नसेल तर निव्वळ पोपटपंची केल्याने अवगत असलेले चार श्लोक म्हटल्याने 'अवगत' असे लिहिणे ही शुद्ध फसवणूक नव्हे काय?

इन्द्र्राज पवार's picture

11 Feb 2011 - 2:37 pm | इन्द्र्राज पवार

"....डायनॉसॉरच्या आठवणी जतन कराव्यात हे योग्यच.. पण तो तस्साच्या तस्सा जिताजागता शिल्लक राहिला पाहिजे असं कसं म्हणता येईल...."

श्री.गगनविहारी यांचे या संदर्भातील दोन्ही विचार मननीय आहेत...व्यावहारिकदृष्ट्या तर जास्तच आहेत. संस्कृतचा विषय 'स्कोरिंग' ला चांगला म्हणून घेणार्‍यांची मानसिकवृत्ती पाहिली तर निखळ दिसून येते की त्याना 'संस्कृत' भाषा मरायला टेकली आहे की पुढील सप्तसहस्त्र वर्षे ती जिवंत राहून प्राचीन परंपरेचा सार्थ साक्षीदार म्हणून काम करणार आहे, याच्याशी किंचितही सोयरसुतक नसते. तसे असते तर पुढे कला शाखेला (शास्त्र शाखेचे नावच नको) कितीजण यातील 'संस्कृत' वैकल्पिक विषय घेत असतील? इथे युक्तीवाद असा केला जातो की, 'आमच्या कॉलेजमध्ये संस्कृत विषय' शिकविला जात नाही. पण विद्येची [इथे त्या भाषेची....] ओढ, अभिमान, आवड असेल तर हाच विषय बाहेरच्या शिकवणीनेही शिकता येतोच. मुंबई, पुणे, शिवाजी या तिन्ही विद्यापीठानी 'दुसरी भाषा जर त्या त्या महाविद्यालयात शिकविण्याची सोय नसेल, तर विद्यार्थ्याने स्वतःच्या जबाबदारीवर त्या भाषेचा विकल्प अर्जात भरावा'. कोल्हापुरातील कित्येक मुलेमुली माहीत आहेत की त्यानी 'स्वत:च्या' जबाबदारीवर सेकंड लॅन्ग्वेज म्हणून "जर्मन"..."फ्रेन्च"..."रशियन" घेतली आहे.....'संस्कृत' घेणारा एकही...अगदी एकही नाही. [हा विदा विद्यापीठात मिळू शकतो...किंवा विद्यापीठाच्याच 'वार्षिक अंकात' प्रसिद्ध होत असतो.]

सोलापूरच्या काही महाविद्यालात (संगमेश्वर आणि दयानंद महाविद्यालयात) 'उर्दु' या भाषेची सोय आहे, पण जिथे नसेल तिथले विद्यार्थी या दोन महाविद्यालयातील 'उर्दु' साठी संबंधित शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात....आजही तिथे Optional Urdu घेणारे विद्यार्थी आहेत. तिच गोष्ट 'अर्धमागधी' ची. हा विषय तर मेलेलाच आहे. पण एकेकाळी कोल्हापुरात या भाषेलाही विद्यार्थी होते. 'पाली' आणि 'लॅटीन' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमातून कित्येक विद्यापीठानी 'चॉसर' हा लेखक आणि त्याचे साहित्य काढून टाकले आहे...का? तर त्याची भाषा शिकविणार्‍या शिक्षकांची पिढीच संपली आहे. चॉसरच्या 'कॅन्टरबरी टेल्स' मधील केवळ 'Wepyng and waylyng, care and oother sorwe,I knowe ynogh, on even and a-morwe,' ही एकच वेळ पुष्कळ आहे समजण्यास की त्याच्या भाषेपासून 'मॉडर्न इंग्लिश' का दूर गेली !

"संस्कृत" बद्दलही तीच रड आहे. ती शिकविणारे जे काही शिक्षक आहेत ते फक्त प्राथमिक पातळीवर (चू.भू.दे.घे.). माझ्या माहितीप्रमाणे महाविद्यालयीन पातळीवरच 'स्पेशलायझेशन' ला हा विषय उपलब्ध नसेल तर (काही सन्माननीय अपवाद असतीलही...पण माझ्याजवळ त्या कॉलेजीसचा विदा नाही) संस्कृत निव्वळ खानेसुमारीच्या रकान्यात टिकमार्क करून टिकेल या भ्रमात न राहिलेले बरे.

श्री.गवि नी 'बिरबल' कथेतील दिलेले पोपटाचे उदाहरण चपखल आहे. त्याच चालीत श्री.महेश काळे यांची या विषयीतील आपुलकी विचारात घेऊनही असे म्हणत आहे की, या दशकातील येऊ घातलेली ही खानेसुमारी संपल्यानंतर निव्वळ फॉर्मवर भरली आहे म्हणून जर 'संस्कृत' जिवंत राहिली अशी समजूत करून घेतली तर ती एकप्रकारे फसगत होईल.

"वाडा चिरेबंदी..." होता एकेकाळी पण आता त्याला 'उद्ध्वस्त धर्मशाळे'चे रूप आले आहे.

इन्द्रा

महेश काळे's picture

11 Feb 2011 - 2:43 pm | महेश काळे

भग्न शीवालय.. ही उपमा जास्त योग्य वटते..

नाही का??

सहज's picture

11 Feb 2011 - 2:42 pm | सहज

मुळ धाग्यात संस्कृतमधले पत्र आले असते तर अजुन आवडले असते. पत्रलेखकाला बहुदा त्याच्या प्रकल्पासाठी आर्थीक सहाय्य बंद होण्याची भिती असु शकते असे एका वाक्यावरुन वाटत आहे. असो. तसे नसेलही.

माझ्या मोडक्या तोडक्या संस्कृतमधील भावना समजुन घ्या. ही विनंती.

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे
एक अतिमहत्वस्य गोष्ट्यार्थं तव लक्षवेधस्य अस्ये

भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक
पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील

भारतदेशस्य जनगणना कार्य अंतीम अवस्था अभ्यु अन अस्य पक्षे स्वयंसेवकाणान पुनरागमस्य तव द्वारे.

तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

तव अन तव कुटूंबस्य माहीती: पत्रे पुनर्भरीतस्य नोदवंस्य अस्तु.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा

माहीती संकल्पेन, तव मातृभाषा जे अस्य ते तस्य लिखस्व परंतु 'अवगत भाषा नामस्य' विषये लिखीत्वांनाम संस्कृत न विसरस्य.

आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो.
यदा अपूर्णस्य नोहे तदानाम अजहू अवश्य तव भाषा वापरानाम

संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र
आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

सांय दिपस्यकाले वदतु स्तोत्रं अथवा गणपतये कालस्य सहस्त्र आवर्तने च देवपुजेस्य अथवा विवाहकाले मंगलश्लोकाम सर्व सर्वजनांम मुखोद्गत अस्तु.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे.

अस्य भाषा जीवीत ठेवस्य तव हस्तात अस्तु

कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.

गत सर्वेक्षणानाम संस्कृत जानापी जनसंख्या केवलम सहस्त्राय अस्तु तच कारणे इदं भाषा मृतघोषितम जाहीर कर्तूम.

उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत.

विपरीतपक्षे अरबी , फारसी जानस्य जनसंख्या विपूलास्ती. अस्य प्रमुख कारण, काही भारतराज्यम ठरवूरम भाषापत्रक भरवती.

मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही.

योयदी भाषा मृतघोषितम अस्तु तदानाम शून्य निधे उपलब्धम करवन्ति जानामहे

आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

अस्यकारणे तदनंतरम अपुलस्य पुरातनच पवित्रच भाषा कायमस्वरुपे कालपडदस्य मागेजयतम

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो.

तव जाणीवपूर्वकम प्रयत्नच इती भाषेम जिवीत रख्यास्तु.

आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा

अज आपुलस्य भाषा अश्य घट-घटीका कारण तव, अव, सव कारणीभूतस्य अस्तु. परंतु घटीका पूर्णस्वरुपम जायंतम नस्तु.
यदी तव इती विचार पटस्य अस्तु तदानाम तव मित्रगणंस्य कर्णपटलद्वये अवश्य वदामी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2011 - 2:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवभाषेचे आणि तुमचे सख्य आहे हे कधी बोलला नाहीत.
आपल्याला नमस्कार करतो. कृपया, मला तुमचा शिष्य करुन घ्या....!

-दिलीप बिरुटे
[सहजसरांचा संस्कृतचा विद्यार्थी]

महेश काळे's picture

11 Feb 2011 - 2:45 pm | महेश काळे

फारच छान.. खुपच आवडले..

सहज's picture

11 Feb 2011 - 2:49 pm | सहज

धन्यवाद. आपणही माझ्या संस्कृत भाषांतरात सुधारणा करुन हे पत्र आपल्या मित्रांना पुढे पाढवू शकता. तेवढेच संस्कृत भाषेची माझ्याकडून काही सेवा घडली तर स्वताला भाग्यवान समजेन.

बिरुटे सर, महेशजी तुमच्या सारख्यांच्या प्रोत्साहनाने संस्कृतचे क्लासेस काढायचा मोह होतो आहे.

सहज's picture

11 Feb 2011 - 2:50 pm | सहज

पुनरुक्ती कारणेन प्रकाटकायच |

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll

साधु: सहजराव साधु: |

प्रचेतस's picture

11 Feb 2011 - 3:16 pm | प्रचेतस

एकदम झकास लेखन. आवडेश.

धनंजय's picture

11 Feb 2011 - 9:31 pm | धनंजय

लय भारी! असेच म्हणतो.

निशाणा भेदलाय!

संस्कृतच्या या पार्श्वहत्येनंतर१ संस्कृत ही आता अधिकृतरीत्या 'मृत' म्हणून घोषित करायला हरकत नसावी. मृत्यूच्या दाखल्यात 'मृत्यूचे कारण' या रकान्याखाली 'अतिरक्तस्राव'२ अशी नोंद करता यावी.

(१, २ 'संस्कृतची लाल होईस्तोवर मारणे' म्हणजे नेमके काय, याची प्रचीती या प्रतिसादातून आली.)

(वैद्यकीय शास्त्राच्या आणि कायद्याच्या क्षेत्रांत मृत्यूचा 'ब्रेन डेथ' नावाचा एक प्रकार मानला जातो, असे ऐकलेले आहे. यात, मला जितपत समजले, त्याप्रमाणे मेंदूचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि ते परत सुरू करता येण्याची सुतराम् शक्यता नसते, मात्र इतर इंद्रिये, जसे हृदय वगैरे, कार्यरत असणे शक्य असते. अशा रीतीने मृत घोषित केलेली व्यक्ती ही 'ब्रेन डेड' आहे, असे म्हटले जाते. असो, ही अवांतर माहिती झाली. तर सांगण्याचा उद्देश, 'ब्रेन डेड'च्या धर्तीवर संस्कृतला 'गुदामृत'३ म्हणून घोषित करावे काय?)

(३ हा समास सोडवताना त्यातील पदांची फोड 'गुदा' आणि 'मृत' अशी करावी; कृपया 'गुदा' आणि 'अमृत' अशी करू नये, ही कळकळीची विनंती.४)

(४ या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फोडींमुळे होणारे भिन्न समास हे समासांचे नेमके कोणते प्रकार आहेत, हे संस्कृत व्याकरण शाळेतच विसरून आल्यामुळे सांगू शकत नाही, तरी क्षमस्व. आपल्या वस्तू शाळेत विसरून येण्याची आमची खोड सनातन आहे. तरी तज्ज्ञांनी जमले तर खुलासा करावाच.)

शरदिनी's picture

11 Feb 2011 - 3:29 pm | शरदिनी

आज इतके तरूण संस्कृत लेखन करण्यात मग्न आहेत हे पाहून गहिवरले...
छान रे सहज...
तू संस्कृत मध्ये निबन्ध छान लिहिशील...

तुझी शंकरशेठ शिष्यवृत्ती कितीने हुकली तेही लिही...

मेघ मल्हार ह्रुदय स्थित .. धडाम धुडुम

ह. घ्या. :)

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2011 - 4:33 pm | पिलीयन रायडर

संस्कृत ही एक अत्यंत कमी लोकांकडून वापरली जाणारी भाषा आहे हे मान्य. ती थोड्या फार प्रमाणात समजत असली तरी बोलता येत नाही. पण वाचता येते. त्यामुळे ती अवगत आहे कि नाही हे ठरवणं अवघड आहे. पण अनेक लोक ह्यावर काम करत आहे. (भाषातज्ञ ). जर आपण ही भाषा आपणास येते अशी नोंद केली नाही तर तिला अनुदान मिळणार नाही हा मुद्दा आहे.
थोडी तत्व बाजूला ठेवून "आपली " भाषा म्हणून आपण अशी नोंद करू शकत नाही का? आपली अशासाठी कारण स्कॉरिंग म्हणून ही भाषा मदतीला येते... तुम्ही देव मानत असाल नसाल पण ह्या भाषेतील स्तोत्रे तुमच्या कानावर परदेशी असताना पडली तर आपलीशी, ओळखीची वाटत नाहीत का?
मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत हवी पण आज नोंद करायची वेळ आली तर कारण पुढ करायची ...
संस्कृत मरतेय हे खर असला तरी तिला वाचवण्याचे प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि अनेक लोक असे प्रयत्न करत आहेतच.. किमान त्यांना मदत तरी करू शकतो आपण..

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 5:20 pm | नितिन थत्ते

>>संस्कृत मरतेय हे खर असला तरी तिला वाचवण्याचे प्रयत्न करायला काय हरकत आहे

संस्कृत मरतेय हे विधान धाडसाचे आहे. वापरात असलेली भाषा मरत असेल तर दु:ख करणे योग्य आहे. जी वापरात नाही ती भाषा मरत आहे म्हणजे काय हे समजले नाही. कर्नाटकातल्या कुठल्यातरी गावात लोक संस्कृत बोलतात ते लोक लिहितीलच की भाषा अवगत आहे असे.

आपल्याला अवगत नसेल तरी ती मरू नये म्हणून अवगत आहे असे लिहायचे?
(सोनिया गांधी रोमन लिपीत लिहिलेली हिंदी भाषणे - अर्थ न समजता- वाचतात असे म्हटले जाते. आपण श्लोक म्हणतो तसेच हे आहे. त्यांनी हिंदीभाषा अवगत आहे असे लिहायचे का?)

पाली आणि अर्धमागधी या भाषा अवगत आहेत असे किती लोक म्हणतील किंवा आजवर म्हणत असतील? तरी त्या भाषांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठे विभाग उघडून असतातच आणि संशोधनही होतच असते.

तेव्हा सदर ढकलपत्रातली भीती अनाठायी आहे असे वाटते.

अमोल केळकर's picture

11 Feb 2011 - 5:36 pm | अमोल केळकर

मनाला पटेल असा प्रतिसाद. दिलेली उदाहरणे ही आवडली

अमोल केळकर

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2011 - 6:55 pm | पिलीयन रायडर

ठीक आहे. हे मान्य की भाषा मारतेय ही भीती बाळगणे अनाठायी...
पण कित्येक शाळांमधली मुले ३-५ वर्ष संस्कृत भाषा घेतात. त्यावेळी ती त्या भाषेत छोटे निबंध सुद्धा लिहितात. पुढे जाऊन भाषेशी संपर्क न राहिल्याने आपल्याला ती बोलता येत नाही. (पण लिहिता वाचता येते! , आणि थोड्या प्रमाणात समजते सुद्धा...)
म्हणजे कागदोपत्री नगण्य लोक भाषा बोलतात ही नोंद होईल. आणि इथे मात्र मुले शिकातेत भाषा... न जाणो उद्या संस्कृत असणारच नाही पर्याय म्हणून..

गवि's picture

11 Feb 2011 - 7:06 pm | गवि

ती त्या भाषेत छोटे निबंध सुद्धा लिहितात.

-१

पंगा's picture

12 Feb 2011 - 11:03 am | पंगा

संस्कृत मरतेय हे विधान धाडसाचे आहे. वापरात असलेली भाषा मरत असेल तर दु:ख करणे योग्य आहे. जी वापरात नाही ती भाषा मरत आहे म्हणजे काय हे समजले नाही.

काही तुरळक (आणि बहुधा बहुतांशी जाणूनबुजून घडवून आणलेले) अपवाद वगळता संस्कृत ही कोणाचीही मातृभाषा नाही आणि व्यवहारभाषा किंवा रोजवापरातली भाषाही नाही, कधी वापरली गेली तरी तिच्यात आता कालानुरूप नैसर्गिक बदल होत जात नाहीत म्हणजेच ती प्रवाही नाही किंवा अश्मीभूत आहे (असे वाटते; चूभूद्याघ्या.), कोठल्यातरी काळात ठरवून दिल्या गेलेल्या (कदाचित तत्कालीन चालू पण आता पुरातन झालेल्या) 'फॉर्म'ला अनुसरून ती आज (वापरली गेलीच तर) वापरली जाते, अशा काही निकषांच्या आधारावर ती मृत भाषा आहे असा दावा असल्यास त्यात निदान मला तरी फारसे काही वावगे दिसत नाही. ('मृत' याचा अर्थ 'नामशेष' असा होत नसावा असे वाटते.)

अर्थात याचा अर्थ तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होऊ नयेत, किंवा कोणी ती शिकू नये, किंवा तीत संभाषणकौशल्य अवगत करण्याचा प्रयत्न करू नये असा मुळीच होऊ नये. राष्ट्राच्या सर्वच वारशांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे इष्ट आहे, आणि (स्वतःची मातृभाषा नसलेल्या कोणत्याही भाषेप्रमाणे) हौशीने कोणी संस्कृत शिकल्यास आणि विशेषतः तीत संभाषण करता येण्याइतकी प्रगती केल्यास ते स्तुत्यच आहे. आणि त्यातूनही पुढे जर अशा संस्कृतात संभाषणप्रभुत्व असलेल्या हौशी मंडळींची वीण वाढत गेली, तर संस्कृत पुन्हा प्रवाही बनणेही अगदीच अशक्य नाही. (हिब्रू या मृतभाषेचे इस्राएलमध्ये अशाच प्रकारे प्रयत्नपूर्वक आणि यशस्वी पुनरुज्जीवन होऊन ती आता केवळ राष्ट्रभाषाच नव्हे, तर पुढील पिढीतील बहुतांची मातृभाषाही झाली आहे, आणि व्यवहारभाषा तर आहेच आहे, असे ऐकलेले आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नसावे. अर्थात इस्राएलने केले म्हणून हे संस्कृताच्या बाबतीच घडलेच पाहिजे किंवा घडवून आणलेच पाहिजे असे म्हणण्याचा कोणताही उद्देश नाही; केवळ ही अशक्यकोटीतली गोष्ट नाही एवढेच म्हणायचे आहे. अर्थात हिब्रूचे पुनरुज्जीवन म्हणजे यिडिशसारख्या युरोपीय ज्यूंच्या पारंपरिक, जिवंत आणि समृद्ध भाषेचे मरण ठरले या तोट्याकडेही त्याचबरोबर दुर्लक्ष करून चालणार नाही.)

हे सर्व जर स्वेच्छेने घडू शकले, तर त्यात काही गैर नाही. (तेवढे संवर्धन सोडून. राष्ट्रीय पातळीवर ते होणे गरजेचे आहेच. जनांमधील प्रसार हाच भाग काय तो स्वेच्छेचा भाग आहे.) आणि लोकांच्या हौशीतून या भाषेचा प्रसार होऊन पुन्हा तिच्यात प्रवाहित्व येऊ शकले, तर ते स्तुत्यच ठरेल. पण हे सर्व होण्यासाठी आपण नेमके काय, कशाकरिता आणि कसे करीत आहोत याचे प्रत्येक संबंधिताने भान ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा संस्कृतचे तथाकथित प्रचारकच जनतेतील संस्कृतविषयी अनास्थेला (आणि कधीकधी उघड द्वेषालाही) कारणीभूत ठरतात असे दिसून येते. संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रचारकांची नव्हे तर चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे असे वाटते. संस्कृत शिकणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य मुळीच नाही, आणि संस्कृतचा प्रचार करणे हे तर नाहीच नाही. दिसतील त्या दहा जणांना पकडून कंटाळा येईस्तोवर 'संस्कृत का शिकली पाहिजे' हे (काहीबाही कारणांसहित) ऐकवून 'संस्कृतचे महत्त्व पटवून देणे' (थोडक्यातः पकवणे) याइतके मूर्खपणाचे दुसरे काही नसावे. हे तर लोकांवर संस्कृत लादणे झाले. ते उपयोगाचेही नाही आणि योग्य तर नाहीच नाही. मात्र ज्याला कोणाला संस्कृत शिकण्याची मनापासून इच्छा असेल, त्याला ती शिकण्याची सुविधा आणि ती उत्तम प्रकारे आणि जीव लावून शिकवू शकणाराच नव्हे, तर तिच्याबद्दल गोडीही निर्माण करू शकणारा शिक्षक उपलब्ध होऊ शकल्यास ते लाखमोलाचे ठरेल. येथे आयडियॉलॉजी नाही तर भाषेविषयी तळमळ कामाची आहे.

दुसरे म्हणजे, 'संस्कृत शिकणे' किंवा 'संस्कृत अवगत असणे' म्हणजे काय, हेही ती शिकण्यास उत्सुक असणारास स्पष्ट असणे गरजेचे आहे. चारदोन संस्कृत सुभाषिते (अगदी अर्थासहसुद्धा!) मुखोद्गत असणे आणि ती पंक्तीत म्हणून दाखवता येणे म्हणजे संस्कृत अवगत असणे नव्हे. किंवा संस्कृत व्याकरणाचे नियम, धातूंचे गण आणि धातुरुपावली, विभक्तिप्रत्यय ('राम', 'देव', 'वन' किंवा 'माला' - 'खानेवाली या पहननेवाली' हा मुद्दा येथे गौण आहे - चालवता येणे वगैरे) हे पाठ असणे म्हणजेही संस्कृत अवगत असणे नव्हे. व्याकरण हे भाषा कशी आहे याचा अभ्यास करण्याकरिता ('भाषेचे वर्णन करण्याकरिता') उत्तम साधन असले, तरी व्याकरण म्हणजे भाषा नव्हे. 'भाषा अवगत आहे' हे अगदी प्राथमिक पातळीवरसुद्धा म्हणता यायला त्या भाषेतला अगदी सोपा का होईना, पण असाच एखादा उतारा कानावर पडल्यास त्याचा अर्थ विशेष प्रयत्नांशिवाय समजणे आणि प्रसंगी अगदी जुजबी का होईना, पण वेळ निभावण्याइतकी चारदोन वाक्ये अंतःस्फूर्तीने बोलता येणे एवढे तरी किमान आवश्यक आहे, असे निदान मला तरी वाटते. ती चारदोन वाक्ये शक्य तितकी अचूकपणे म्हणता येण्यासाठी नवशिक्यास अर्थातच व्याकरणाची मदत होऊ शकते, पण ते व्याकरणाचे नियम न आठवतासुद्धा अंतःस्फूर्तीने आणि आत्मविश्वासाने आतून येणारे शब्द हे आपोआप त्या नियमांच्या लायनीस लागणे, हे खरे भाषा येणे! या निकषाने मला नाही वाटत आपल्यापैकी खूप जणांना संस्कृत येत असेल म्हणून. अगदी तीन वर्षे शाळेत शिकलो असलो तरीही. निदान मला तरी नाही येत.

अशा परिस्थितीत, संस्कृत येत नसताना 'संस्कृत येते' असे म्हणण्यात काहीच हशील नाही. एक तर ती स्वतःचीच फसवणूक आहे, आणि त्यातून संस्कृत 'वाचणे' (हे जे काही असेल ते) हेही शक्य नाही. असे करण्याला 'निव्वळ एक मूर्ख गिमिकबाजी' यापलीकडे काहीही अर्थ नाही.

सहजराव तुमच्या पत्रात थोडी सुधारणा करावी अशी इच्छा आहे. ही आवृत्ती बिनचूक असेल असे नाही पण तुम्ही केलेल्या मनःपूर्वक प्रयत्नाला अधिक सुंदर करावेसे वाटले म्हणूनः

>>एक अतिमहत्वस्य गोष्ट्यार्थं तव लक्षवेधस्य अस्ये.
भारतदेशस्य जनगणना कार्य अंतीम अवस्था अभ्यु अन अस्य पक्षे स्वयंसेवकाणान पुनरागमस्य तव द्वारे.
तव अन तव कुटूंबस्य माहीती: पत्रे पुनर्भरीतस्य नोदवंस्य अस्तु.
तव अन तव कुटूंबस्य माहीती: पत्रे पुनर्भरीतस्य नोदवंस्य अस्तु.
माहीती संकल्पेन, तव मातृभाषा जे अस्य ते तस्य लिखस्व परंतु 'अवगत भाषा नामस्य' विषये लिखीत्वांनाम संस्कृत न विसरस्य.
यदा अपूर्णस्य नोहे तदानाम अजहू अवश्य तव भाषा वापरानामसांय दिपस्यकाले वदतु स्तोत्रं अथवा गणपतये कालस्य सहस्त्र आवर्तने च देवपुजेस्य अथवा विवाहकाले मंगलश्लोकाम सर्व सर्वजनांम मुखोद्गत अस्तु.अस्य भाषा जीवीत ठेवस्य तव हस्तात अस्तुगत सर्वेक्षणानाम संस्कृत जानापी जनसंख्या केवलम सहस्त्राय अस्तु तच कारणे इदं भाषा मृतघोषितम जाहीर कर्तूम.विपरीतपक्षे अरबी , फारसी जानस्य जनसंख्या विपूलास्ती. अस्य प्रमुख कारण, काही भारतराज्यम ठरवूरम भाषापत्रक भरवती.योयदी भाषा मृतघोषितम अस्तु तदानाम शून्य निधे उपलब्धम करवन्ति जानामहे अस्यकारणे तदनंतरम अपुलस्य पुरातनच पवित्रच भाषा कायमस्वरुपे कालपडदस्य मागेजयतम तव जाणीवपूर्वकम प्रयत्नच इती भाषेम जिवीत रख्यास्तु.

थोडी सुधारणा:

एके अतीव महत्वपूर्णविषये युवानां लक्षवेधं कर्तुं इच्छामि।
भारतस्य जनगणनाकार्यस्य अंतिमचरणं एते मासे अस्ति।
तथा स्वयंसेवका: पुनः तव द्वारं आगमिष्यन्ति।
युवानां एवं युवानां परिवारजनानां विज्ञप्ति पुनश्च एकवारं याचितव्या न्यसितव्या च।
तदा यूयं विज्ञप्तिदानसमये युवानां मातृभाषा लिखध्वं किन्तु "अवगत भाषा" स्थाने संस्कृत भाषा अवश्य लिखध्वं।
वयं अद्य अपि तां भाषां प्रयोज्यामः न पूर्णरूपमपि तु।
सायंकाले पठितानि स्तोत्राणि वा गणेशोत्सवे वर्तितानि सहस्रावर्तनानि तथा विवाहेषु उक्तानि मंगलश्लोकानि वयं जानामः क्वचित कण्ठस्थानि अपि सन्ति।

अस्या: भाषाया: अवस्थानं अस्माकं हस्ते एव अस्ति।
गत सर्वेक्षणे संस्कृतज्ञानां संख्या केवलं क्वचित्सहस्रा अस्ति स्म। अतः एता भाषा मृता इति घोषितव्या।
विपरिते, अरबी, फारसी ज्ञातानां सन्ख्या विपुलास्ति। अस्य कारणं इति अस्ति भारतदेशे केषु राज्येषु निर्णयपूर्वकं ता: भाषा: न्यसिता:।

यदि एका भाषा मृता इति घोषिता तर्हि तस्या: उत्कर्षार्थं क्वापि निधी न देयं। तदा अस्माकं एता पुराभाषा कालपटले लुप्ता भविष्यति।

युवानां निर्णयपूर्वकानि प्रयत्नानि एतां भाषां जीवयितुं शक्नुवन्ति।

--------------------------------------------------------------------------
मी संस्कृत भाषेची नोंद नक्की करणार!

सहज's picture

11 Feb 2011 - 6:34 pm | सहज

धन्यवाद

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 6:45 pm | मुलूखावेगळी

संस्क्रुत मधे अरे वाअ !!!
हे छान :०

मी ऋचा's picture

11 Feb 2011 - 10:41 pm | मी ऋचा

धन्यवादः।

गोगोल's picture

12 Feb 2011 - 12:43 am | गोगोल

संस्कृतला पार स्क्रु केलेत की :P

गोगोल's picture

12 Feb 2011 - 12:42 am | गोगोल

ही खरी संस्कृत .. क्या बात है

चिंतामणी's picture

13 Feb 2011 - 12:42 am | चिंतामणी

____/\____

धन्यवाद चिंतामणी आणि गोगोल!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2011 - 10:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गगनविहारीचे प्रतिसाद आवडले.

-दिलीप बिरुटे

कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातलं मत्तूर हे सुमारे २००० लोकवस्तीचं गाव आहे. या गावात लहान थोर सगळेजण बोलीभाषा म्हणून संस्कृत वापरतात, त्यात कोणत्याही जातीचा अपवाद नाही. विशेष म्हणजे या लहानशा गावातून सुमारे १५० सॉफ्टवेअर इंजिनिअर्स तयार झालेत. मला आश्चर्य वाटतं कोणालाच बजाज डिस्कव्हरच्या या गावाबद्दलच्या जाहिरातीची आठवण झाली नाही!

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 11:47 pm | नितिन थत्ते

>>मला आश्चर्य वाटतं कोणालाच बजाज डिस्कव्हरच्या या गावाबद्दलच्या जाहिरातीची आठवण झाली नाही!

मला झाली आठवण. :)

चिंतामणी's picture

13 Feb 2011 - 12:44 am | चिंतामणी

मग लिहीले का नाही????

(कुठले मांजर आडवे गेले?????)

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 11:58 pm | आजानुकर्ण

संस्कृत भाषा हा आपला पुरातन ठेवा आहे तो नष्ट होऊ नये असे मनापासून वाटते. मात्र अवगत नसूनही अवगत असल्याचे लिहिल्यास भाषा संवर्धनासाठी सरकारकडून कदाचित पुरेसे प्रयत्न होणार नाहीत असेही वाटते.

पंगा's picture

12 Feb 2011 - 9:07 am | पंगा

सहमत.

आपल्या सर्वच अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे एक इष्ट ध्येय आहे याबद्दल वाद नाही. मात्र त्यासाठी असली गिमिक्स वापरली जाऊ नयेत - ते योग्यही नाही, इष्टही नाही आणि त्याचा फायदाही नाही - असे मनापासून वाटते.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2011 - 9:07 pm | पिलीयन रायडर

"ह्या प्रश्नाखाली दोन पेक्षा जास्त भाषा नोंदवू नयेत.त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत. त्या अशा रीतीने नोंदवायच्या आहेत कि सर्वात चांगली बोलता येणारी व समजू शकणारी भाषा तसेच दुसर्याशी चांगल्या प्रकारे बोलता येणारी भाषा नोंदवावी. त्या व्यक्तीला त्या भाषा लिहिता अगर वाचता आल्या पाहिजेत असे नाही. त्या भाषे मध्ये ती समजुतीने आणि सहजतेने संभाषण करू शकला तरी पुरेसे आहे."

हे प्रगाणाकांच्या सूचना पुस्तिकेत लिहिले आहे........

विजुभाऊ's picture

15 Feb 2011 - 11:33 am | विजुभाऊ

त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत.
हा अन्याय आहे.
मला आणि माझ्या लहान मुलाना देखील किमान चार भाषा लिहिता बोलता वाचता येतात. ( मराठी , गुजराथी , इंग्लीश , हिंदी ) उर्दू समजते/बोलता येते.
बांगला , मारवाडी , हरयानवी , पंजाबी , या भाषा बोलता येतात समजतात .
माझ्या पत्नीला कच्छा , सिम्धी भाषा समजतात बोलता येतात.
वरील सर्व भारतीय भाषा आहेत.
भारतात अरबी कुठे बोलली जाते हे कोणी सांगेल का?
अर्धमागधी पाली प्राकृत या भाषा मृत समजल्या गेल्या आहेत.
संस्कृत मॄत घोषीत झाली म्हणून असा किती फरक पडेल?

सुनील's picture

12 Feb 2011 - 10:07 pm | सुनील

भारताच्या घटनेप्रमाणे संस्कृत हीदेखिल एक राष्ट्रभाषा आहे. तेव्हा जर तिचे हे स्थान काढायचे असेल तर, घटनादुरुस्ती करावी लागेल, शिरगणतीच्या निष्कर्षावर हे अवलंबून नाही! तेव्हा शिरगणतीत उगाच कैच्या काहीच सांगायची गरज नाही.

बाकी सहजरावांचे संस्कृत आवडले!

धन्यवाद, महेश-जी!
मला आणि माझ्या वयाच्या अनेक लोकांना शाळेत शिकलेली खूप संस्कृत सुभाषिते आठवतात आणि त्यांचा प्रसंगानुरूप केलेला उपयोग संभाषणात खूप मजा आणतो.
मी सध्या जिथे काम करतो त्या देशाची आणि मलेशियाची भाषा जवळ-जवळ २० टक्के संस्कृत शब्दांनी सजली-नटली आहे. त्यावर मी इथे एक धागाही लिहिला होता. (त्यात भर घालण्यासाठी आणखी आठवलेले शब्दही आहेत, पण स्वसंपादनाची सोय बरखास्त केल्याने ते माझ्याकडे पडून आहेत!)
असो. मला तर या 'गीर्वाणवाणी'चा (देवांच्या भाषेचा) अभिमान आहे आणि मी माझ्या सार्‍या मित्रांना याबद्दल नक्कीच सांगेन.
परदेशस्थ लोकांना ही सोय आहे काय? मी इथल्या दूतावासात विचारून पहातो. आपल्यापैकी कुणाला माहिती असल्यास जरूर द्यावी.
माझे आणखी एक आडनावबंधू (आपण महेश काळे) इथे आले याचा आनंद आहे. सुस्वागतम्.

महेश काळे's picture

14 Feb 2011 - 11:00 am | महेश काळे

धन्यवाद!!

इतर किंवा हिंदी भाषिक मित्र मंडळींना पाठवण्यासाठी हे हिंदी आवाहन वापरा.
त्या खालीच ऋचाने दिलेले संस्कृत आवाहनही चिकटवले आहे.
त्याखाली चुका काढलेले मराठीतले आवाहन आहे.

तुम्हाला माहिती असलेल्या इतर भाषिकांना आपापल्या भाषेत याचे भाषांतर करण्यासाठी उद्युक्त करा!

सर्व भाषेतील आवाहने पाठवू शकता!

-------
एक अत्यधिक महत्त्वपूर्ण बात पर आपका ध्यान लाना चाहता हूं|
भारतकी जनगणना आज महत्त्वपूर्ण अंतिम घड़ी मे आ चूकि है|
कुछ्ही दिनों मे जनगणना स्वयंसेवक आपके पास आकर आपकी और आपके कुटूंब की जानकारी लेने के लिए पधारेंगे|

आपकी मातृभाषा आपको इसमे दर्ज करानी होगी. यह तो आप कराएँगे.
किंतु अवगत भाषाएं इस तालिकामे 'संस्कृत' लिखना न भुलाए|

हम सब यह भाषा किसी न किसी रूप मे उपयोग मे लाते है| सुबह की पूजा हो या संध्याक़ालीन स्तोत्र पाठ. आप संस्कृत भाषा उपयोग करते है| आप किसी व्यक्तिसे मिलने पर जब 'नमस्ते' कहते हो तब आप संस्कृत का उपयोग करते हो|
हर शादी और अन्य सारे पूजा-पाठोंमे इसी से व्यवहार होता है| भारत की सभी भाषाओं मे इसी से शब्द आते है| इन सब मे हम सहयोगी, है इसीलिए हमे संस्कृत अवगत है|

इस भाषा को जीवित रखना अब आपके हातों मे है| पिछली जनगणना मे इसे अवगत रखने वाले सिर्फ चंद लोग ही थे| इसलिए उसे इस जनगणना मे 'मृत भाषा' घोषीत किया जा सकता है|
संस्कृत मृत घोषित होने के बाद इस भाषा के उत्कर्षके लिये किसी सरकारी निधि का उपयोग नही होगा| अगली पीढ़ी के लिए ना ये प्राचीन भाषा होगी ना इसे प्राप्त करने के कोई साधन बचेंगे|

इस पवित्र भाषा की आज की स्थिति हम ही ने बनाई है. आईये हम सब मिलकर इसे सुधारे|
अगर यह आवाहन आपके सही लगता है तो कृपया आपके मित्रोंको भी भेजिए|
---
अगर आप खुद आपके बच्चों को संस्कृत कथा पढ़कर सुनाना चाहते हो, तो यह देखिये
http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/
यहां आपको संस्कृत शब्दकोश सहित संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिलेगी|
पढने लगेंगे तो जान जाओगे आपको संस्कृत अवगत है|

----
संस्कृत आवाहन

एके अतीव महत्वपूर्णविषये युवानां लक्षवेधं कर्तुं इच्छामि।
भारतस्य जनगणनाकार्यस्य अंतिमचरणं एते मासे अस्ति।
तथा स्वयंसेवका: पुनः तव द्वारं आगमिष्यन्ति।
युवानां एवं युवानां परिवारजनानां विज्ञप्ति पुनश्च एकवारं याचितव्या न्यसितव्या च।
तदा यूयं विज्ञप्तिदानसमये युवानां मातृभाषा लिखध्वं किन्तु "अवगत भाषा" स्थाने संस्कृत भाषा अवश्य लिखध्वं।
वयं अद्य अपि तां भाषां प्रयोज्यामः न पूर्णरूपमपि तु।
सायंकाले पठितानि स्तोत्राणि वा गणेशोत्सवे वर्तितानि सहस्रावर्तनानि तथा विवाहेषु उक्तानि मंगलश्लोकानि वयं जानामः क्वचित कण्ठस्थानि अपि सन्ति।

अस्या: भाषाया: अवस्थानं अस्माकं हस्ते एव अस्ति।
गत सर्वेक्षणे संस्कृतज्ञानां संख्या केवलं क्वचित्सहस्रा अस्ति स्म। अतः एता भाषा मृता इति घोषितव्या।
विपरिते, अरबी, फारसी ज्ञातानां सन्ख्या विपुलास्ति। अस्य कारणं इति अस्ति भारतदेशे केषु राज्येषु निर्णयपूर्वकं ता: भाषा: न्यसिता:।

यदि एका भाषा मृता इति घोषिता तर्हि तस्या: उत्कर्षार्थं क्वापि निधी न देयं। तदा अस्माकं एता पुराभाषा कालपटले लुप्ता भविष्यति।

युवानां निर्णयपूर्वकानि प्रयत्नानि एतां भाषां जीवयितुं शक्नुवन्ति।
- ॠचा

---
मराठी आवाहन
एक महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे
भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक
पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील
तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा.
पूर्ण जरी नाही, तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला
म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र
आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
तुम्ही कुणी भेटल्यावर 'नमस्ते' म्हणता तेव्हा संस्कृत वापरता.

ही भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात
संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.
उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही
राज्यात अगदी ठरवून ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. भाषा मृत घोषित झाली
की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली
ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज
आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली
नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा!
---
जर तुमच्या मुलांच्या कानावर संस्कृत पडावे असे वाटत असेल तर हे पाहा
http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/
येथे संस्कृत शब्दकोशा सहीत संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिळेल.
वाचू लागा, तुमच्या लक्षात येईलच की तुम्हाला संस्कृत येते!
एका दिवशी फक्त एकच गोष्ट.

सहज's picture

15 Feb 2011 - 10:02 am | सहज

नुस्ती ढकलपत्रे पाठवण्यापेक्षा, त्यातील भावनांशी किमान प्रामाणीक राहून मनापासुन प्रयत्न करणे चांगले.

अर्थात जाणकारांकडून ही पत्रे तपासणे महत्चाचे आहे.

तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. तसे असेल तर संस्कृत भाषा संबधी सरकारी विभाग व इतर संस्थांनी याबाबत कायदेशीर प्रक्रिया करावी.

असो हे पत्र, अजुनही टाईमपास ढकलपत्र वाटते आहे. ह्या धाग्यातुन संस्कृत भाषा थोड्या लोकांपर्यत अजुनही आहे, मृत नाही हेही कळले. शालेय शिक्षणामधे संस्कृत विषय बाद अजुन झाल्याचे कळले नाही त्यामुळे आता हा विषय (निदान माझ्यापुरता) पुरे.

मी ऋचा's picture

15 Feb 2011 - 12:19 pm | मी ऋचा

>>अर्थात जाणकारांकडून ही पत्रे तपासणे महत्चाचे आहे.

अगदी सहमत. जास्तीत जास्त बिनचुक आवृत्ती लोकंपर्यन्त पोहचणे आवश्यक आहे.

तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. सहमत आहे. मलाही पटत नाहीये.
तसेच या ढकलपत्रातून फार काही साध्य होईल असेही वाटत नाही. :(

संस्कृत येण्यासाठी -
वाचल्याने येत आहे रे आधी वाचलेची पाहिजे!!
असे वाटते.

धनंजय's picture

15 Feb 2011 - 8:29 pm | धनंजय

संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

सध्या एक-दोन आठवडे घाईत आहे, पुढील उत्तराचे मराठी भाषांतर दिले नाही. येथील कित्येक सदस्यांना संस्कृत भाषा अवगत आहे, त्यांनी मराठीत भाषांतर करून येथेच द्यावे, ही विनंती. म्हणजे येथील थोड्या सदस्यांना अरबी-फारसी वगैरे अवगत असून संस्कृत अवगत नाही, त्यांना मराठीत वाचायला सोयीचे जाईल.

(नाहीतरी यात मराठी शब्दांची भरणा आहे. संस्कृत-स्वभाषकाने लिहिलेली ही वाक्ये नव्हेत, मराठीभाषकाने "सम्प्रतिवार्ता: श्रूयन्ताम्" धर्तीवर लिहिलेले परिच्छेद आहेत. मराठीभाषक नसेल, भारतातल्या दुसर्‍या कुठल्या मातृभाषेचा संस्कृत जाणकार असेल, त्याला समजायला जडच जाईल.)

- - -
न मर्यादितुम् इच्छामि कस्यचिदपि वाक्स्वातंत्र्यम् । तथापि ।

जनगणनाप्रसङ्गे उत्तराणि सत्यानि एव ददातु, तानि रम्याणि भवेयु: न वा
भवेयु: |

अवगच्छामि यावदहं "[प्रथमभाषाभिन्ने] के भाषे अन्यतरे सुतरां ज्ञाते?"
इति पृच्छन्ति । ये के ते भाषे, ते एव लिखितव्ये, इति प्रार्थना मे भवतश्
चरणयो: ।

भारतशासनं करोति जनगणनां, तस्या अभिप्रायः सत्यपरिस्थितिज्ञानम् -
ध्येयानि न । यानि ध्येयानि शिरोधार्याणि, न तु वर्तमानानि, तानि
लिखितव्यानि ध्येयकल्प-आलेखेषु, गन्तव्यमार्गदर्शक-आलेखेषु ।

संस्कृतभाषाया: पठनपाठने भूयेयाताम् इत्येव धारणा मे । तथापि ज्ञातुम्
इच्छामि "_अधुना_ सा भाषा सुतरां कतिपयानि जनानि जानन्ति?" इति ।

यथा : कुटुम्बेषु बालका: सुनियंत्रिता: सुदृढाश् च इति मम दृढा कामना ।
तथापि प्रार्थये - "सर्वम् व्यवस्थितं कुशलं कुटुम्बे" इति न लिखितव्यं
ईप्सिततमम् । लिखितव्यं सत्यं यथा कथं वा भवेद् भवतः कुटुम्बम् _अधुना_ ।

ईमेल-पत्राणि पठामि कानि कानि दिने दिने - तत्र रुदन्ति केऽपि - न
कुर्यात् चेत् तत्र संस्कृतभाषाया: उपसंख्यानम्, "मृता संस्कृतभाषा" इति
घोषणां कुर्येयु: । अस्ति भो: कोऽपि भारतस्य शासने "मृतभाषाघोषणाविभागः"
नामा?

सविनयो,
धनञ्जयः ।
- - -

पंगा's picture

16 Feb 2011 - 11:53 am | पंगा

अतिशय सुरेख, टू-द-पॉइंट आणि साध्यासोप्या, सहज समजण्यासारख्या संस्कृतातील प्रतिसाद. आवडला.

महाशय,

आपले मराठीतले - आपल्या आणि माझ्याही स्वभाषेतले - लेखन बहुतप्रसंगी डोक्यावरून जाते, असा अनुभव आहे.

मात्र यावेळचा आपला संस्कृतातील प्रत्युत्तरवजा प्रतिसाद - मला शालेय संस्कृत विसरून य वर्षे होऊन गेली असूनही - चटकन समजला.

सबब, यापुढे आपण आपले लेखन संस्कृतातच करावे आणि संस्कृतापुरतेच मर्यादित ठेवावे, तसेच मराठीतून लेखन करण्याचे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून आपण काय लिहिता ते समजणे सुकर होईल, अशी आपणांस कळकळीची विनंती.

कृपाभिलाषी,