Skip to main content

विनोद

दर्दी

लेखक यकु यांनी सोमवार, 31/01/2011 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल तेवढी किंवा जास्तीत जास्त बिदागी तो देत असे. पण तरीही संगीतकार यायला तयार नव्हता. वाजेद अली त्याच्याकडे आल्यावर संगीतकार म्हणाला, "मी येईन जरूर, पण तुम्ही माझी एक अट पूर्ण करायला हवी.

शाळेतले झुरळ

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश; सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश. बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर; घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर. झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका; तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका. सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग; शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
काव्यरस

ढेकणांचा अड्डा

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस

डासाचे गाणे

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
काव्यरस

लेखनसीमा

लेखक निशदे यांनी गुरुवार, 20/01/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ? " दिसामाजी काहीतरी.....

इनोद (अर्थातच पी जे, चोरलेले इ. इ.)

लेखक चिगो यांनी गुरुवार, 20/01/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच पाचकळपणा... ______________________ एक बाई दुसर्‍या बाईला विचारले प.बा.:तु हा गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? दु.बा: चुलत भावाने आणला.. -------------------------------- गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल? दुकानदारः ७ रुपये.. गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या... ------------------------------- जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी..

इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 19/01/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते! या नगराच्या बाहेरच्या वनात प.पू. तानियामावशी एक गुरुकुल चालवत असत. गुरुकुल शंभर-सव्वशे वर्षांपूर्वी स्थापले गेले होते व ते प.पू. तानियामावशींच्या आधी त्यांचे दिवंगत पति व त्या आधी त्यांच्या सासूबाई तसेच आजे-सासरे व त्याही आधी त्यांचे वडील चालवत असत. मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्‍या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.

रजनीकांत

लेखक महेश काळे यांनी बुधवार, 19/01/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
१. संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल. २. एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. ३. अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’ ४. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल? ५. रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला. ६. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं..
काव्यरस

आभास हा.....

लेखक रेवती यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना! बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्‍या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही.

नाकाची उचकी

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/01/2011 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
आई आज काय आहे ते सांग तरी, कोणासाठी बनवली ही बासुंदी पुरी? तुझे प्रश्न ऐकून, मी त्रासलेय पुरी बाहेर जाउन खेळ, बसू नकोस घरी आणतील का मोठे, खाउ छान छान? का सांगतील खोटे, बंद होते दुकान! परवा पाहुण्यांनी उचलून घेतले थेट गाल पिळून हा्ती दिले छोटे चॉकलेट अवलक्षणी कार्टा लाज माझी काढतो नसते प्रश्न विचारून भंडावून सोडतो आजच्या काकांचे नाक जरा वाकडे सारे सोडून कार्टे हसेल बघून तिकडे आज गप्प बस, पचकू नको, नको तिथे नाकाविषयी बोलू नको काही उलटेतिलथे काकांना बघता आईलाच आले टेन्शन मनात करी वाकड्या नाकाचे निरीक्षण नाक जणू एकीकडे चिमट्याने खेचले की ठोशाच्या धपाट्याने ठसकन ठेचले!