मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणेरी टोला..दगड्फेक..माझा अनुभव्..

दीपकशेठ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुणे म्हट्ले कि पुणेरी टोला आलाच.. असाच एक कालचा अनूभव... मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो.. तो शिम्पी म्हनला कि उद्या येउन घेउन जा.. यावर मी त्या शिम्पी ला विचारले "काहो उद्या दुकान चालू आहे का?? रविवार आहे ना म्हनून.." तर तो म्हणतो "का रे बाळा उद्या काय दगड्फेक आहे का? दगड्फेक असेल तर मग बन्द राहाणार दुकान.. कस आहे ना.. दगड्फेक असली ना तर्र मला ही जाव लागत दगड्फेक करायाला.. काय ना आमच्यात ना स्पर्धा लागते.. कोण काय फोड्णार.. डोक्, डोळा.. म्हणून जर दगड्फेक नसेल ना तर चालू आहे दूकान.." आस्सा ह्या पुणेरी टोला मी अनुभवलेला...

वाचने 3412 वाचनखूण प्रतिक्रिया 17

नरेशकुमार 23/02/2011 - 10:36
ऑई ग! दगड्फेकीचि स्पर्धा, आता तुमच्या सदर्‍याला गुंड्या लाउन झाल्या नसतील तर परत इथंच येक पोस्ट मारा. सदर्‍याला गुंड्या कुठुन लावुन घेउ ते. एक शंका, सदर्‍याला नवीन गुंड्या का बरे लावायच्या, जुन्या तुटल्या होत्या का ?

विजुभाऊ 23/02/2011 - 10:44
अर्रे वा चान चान. पुण्यातले शिंपी आता जोडधंदे करतात म्हणायचे. एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता?

In reply to by विजुभाऊ

शिल्पा ब 23/02/2011 - 10:49
एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता? अहो शेठ आहे ते शेवटी!!! काय समजलात !! बाकी एखादा चांगला इमित्र असता तर त्याने चांगल्या शिंप्याचा पत्ता दिला असता असे राहुन राहुन वाटते...

In reply to by शिल्पा ब

टारझन 23/02/2011 - 10:52
त्या इमित्राने खास दुबै ला जाऊन तासभर चर्चा करुन मग पत्ता बित्ता दिला असता असं न राहुन वाटले :) हो क्की नै शिल्पे ? :) - दुबै फो

स्पंदना 23/02/2011 - 10:47
ती एक म्हण आहे ना...*** ** भिंतीला तुमड्या लावे, त्या चाली वर *** ** दगडफेक स्पर्धा लावी.

टारझन 23/02/2011 - 10:50
हा हा हा ... बिना दगडाचा डॉला सुजीवला की त्यानी तुमचा :) असाच एक दगड विजुभाऊंना द्यायचा आहे .. बड्डे गिफ्त :) खि खि खि :) - पुणेरी खडक

योगी९०० 23/02/2011 - 10:55
मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो. मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले..

In reply to by टारझन

llपुण्याचे पेशवेll 23/02/2011 - 13:16
सांभाळून रे टार्‍या. कर्वेपुतळा ब्रॉन्झचा आहे. त्यांच्या हातातली काठी डोक्यावर पडली तर स्त्रीमुक्ती आठवेल. ;)

विजुभाऊ 23/02/2011 - 11:08
मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले.. मला एक शंका होती की जर गणपतीला थन्डीत स्वेटर घालत असतील तर कर्वेंच्या पुतळ्याला स्वेटर का घालत नाहीत. उत्तर आपोआप मिळाले . कर्वेंच्या पुतळ्यात कोटाचा अम्तर्भाव असतोच. असो.

नाना बेरके 23/02/2011 - 13:26
अत्र्यांच्या पुण्यात असा किस्सा गेल्या एक लाख वर्षात झाला नसेल. पुण्याचे लोक फार भारी बुवा.

रमताराम 23/02/2011 - 14:03
पावतीपुस्तकात बर्‍याच पावत्या आहेत अजून, फाडा न् काय.