Skip to main content

विनोद

विनोद — मराठी विनोदी लेखन, किस्से आणि हास्यकथांचा संग्रह. हसवणारे मराठी विनोद व गमती येथे वाचा.

ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 19/12/2010 07:08 या दिवशी प्रकाशित केले.

नगरीनिरंजन यांनी मुखपुस्तकातल्या उरोजकर्क स्थितीसंदेशांवर एक खुमासदार लेख लिहिला होता. वरवर पहाता हा लेख हलकाफुलका, वात्रट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटलं. म्हणून एक स्वतंत्र लेखच लिहायचं आम्ही ठरवलं.

स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 18/12/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.

"स्नेहाच्या ठिकाणीच कामसंबंध येणार, बाळीशा." काड्यापेटीतली काडी तंदूरी चिकन चघळावं तशी चघळत हणम्या म्हणाला. "ही पुनरावृत्ती आहे. टॉटॉलॉजी. स्नेह नसेल तर कामसंबंध कसे येणार? आणि आले तरी त्रास नाही का होणार?"
"हणम्या, काही भलतंसलतं वाचू नकोस. तुला 'काम' या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, हा लेका तुझा दोष आहे. काम म्हणजे कर्म. मराठीत सांगायचं तर वर्क. इथं अर्थ हा असा आहे."

तो......

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 18/12/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.

रात्रभर इकडुन तिकडे तळमळणे चालु होते त्याचे.रात्रभर झोप लागली नाही. सामान्य माणसासारखे आपण जमिनीवरच झोपतो, जुनाच ब्लॅक अँड व्हाईट T.V. वापरतो, अजुन पण तोच जुना Motorola च मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!

या पोराला काय करावे ?

लेखक शरद यांनी मंगळवार, 14/12/2010 07:04 या दिवशी प्रकाशित केले.

शिक्षा ठोका
सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले
" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
गुरुजींनी काय शिक्षा केली ते सोडा. तुम्ही काय शिक्षा ठोकणार ते सांगा. प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली हे गुरूजींना आवडले नाही हे कळते. पण आपण पोराच्या उत्तराचा नीट अर्थ लावून मगच शिक्षा करा.
[सगळ्यांना विचार करावयास वेळ मिळावा म्हणून वाक्याचा अर्थ दोन दिवसांनी सांगावा ही नम्र विनंती.]
[शाळकरू] शरद

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.

पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे.

______

काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे.

१ विनोद

लेखक अश्फाक यांनी शुक्रवार, 10/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.

राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ?

पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे .

पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे .

पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते

"सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"

कोकनातलो जोक ..... ;)

लेखक पियुशा यांनी सोमवार, 06/12/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.

कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापा पासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.

आरती सप्रेम..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 02/12/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.

"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."

अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या सोसायटीत हे असले एकेक नग आहेत.

(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 30/11/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल.

तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही
हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही

तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई
पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही

चाटून ही ताटाला - आले न पोटी काही
भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही

सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे
आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई

उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही
पाच भाकर्‍या अन - वडे पाच खाई

काव्यरस

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 30/11/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.

वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे.