Skip to main content

विनोद

"माझी व्यथा"

लेखक वपाडाव यांनी मंगळवार, 15/02/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला... आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे.. त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!! टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या.

काही मस्ट वॉच सीन्स...

लेखक अंतु बर्वा यांनी मंगळवार, 15/02/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स आज चेपु वर आपल्या सनी पाजींचा जीत चित्रपटातला डान्स कुणीतरी अपलोड केला आणी ते पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं. आणी आत्तापर्यंत पाहीलेले सर्व विडियोज आठवले... तर मंडळी, ही घ्या लिस्ट ऑफ मस्ट वॉच सीन्स ऑन तुनळी... १. पहिला क्रमांक पटकावलेला आहे या पठ्ठ्याने. मोस्ट ऑफ दी मिपाकर्स नी या डान्सबद्दल मिपावर आधी चर्चा केलेली आहेच.

विनोद.............

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/02/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक मारवाडी माणूस आय. सी. यु .मध्ये शेवटचा श्वास घेत होता श्वास घेताना त्याने बायकोला विचारलं तू माझ्याजवळ आहे का ? ती म्हणाली ;- "होय स्वामी " नंतर त्याने आपल्या भावाला आवाज दिला "सोन्या तू माझ्याजवळ आहे का? तो म्हणाल हो दादा मी तुझ्याजवळच आहे नंतर त्याने आपल्या मुलाला आवाज दिला बिट्टू .........

सशांचे वर्ष

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 05/02/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या महिन्याच्या तीन तारखेपासून चिनी नववर्ष सुरू झाले. हे वर्ष सशाचे आहे. ससा भित्रा असतो, सावध असतो. त्यामुळे इतर बलवान जनावरांप्रमाणे तो मार्गक्रमणा करीत नाही. थोडे पुढे जाणे, मागे वळून पहाणे, असे त्याचे चालते. ह्याचा हवाला देऊन चिनी भविष्यवेत्ते म्हणतात की ह्या वर्षी जगातील स्टॉक मार्केट्स, प्रॉपर्टी मार्केट्स इ. 'रोलर-कोस्टर' वर राहतील. हे असे होईल किंवा नाही, हे पुढे दिसेलच. मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी.

उशीर झाला?? ... Dont Worry

लेखक आपला आभि यांनी शनिवार, 05/02/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गप्पा आणि गोष्टी हलो हलो .. हा अरे आलोच किती वेळ १५ मिनिटात येतो म्हणाला होतास... अरे हो तेव्हाच निघालो होतो पण ट्राफिक मध्ये अडकलोय .. कधी निघालास ? अरे अर्धा तास झाला निघून.... पण काय करणार ट्राफिक किती आहे... आताही सिग्नलला थांबलो आहे .. चल सिग्नल सुटेल .. ठेवतो.. शांतपणे हा मोबाईल खिशात ठेऊन चहाचा शेवटचा घोट संपवतो आणि दुचाकीकडे चालू लागतो... दुचाकीला किक मारून हा निघतो.. उशीर करण्याची अनेक कारण आहेत ..इथे तर लिस्ट च देता येईल ... हो आलोच जवळच आहे... अरे ट्राफिक मध्ये अडकलोय... घरून फोन आला म्हणून उशीर झाला.. पेट्रोल संपल.. त्यामुळे वेळ लागला... लाईट गेली होती..

वेज हाक्का नूडल्स

लेखक स्वैर परी यांनी शुक्रवार, 04/02/2011 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सकाळचा नाश्ता करायला न मिळाल्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. अशातच तुम्हाला गुप्त खबर मिळते कि तुमच्या हापिसातल्या खानावळवाल्याने (खानावळ हा योग्य शब्द आहे, कँटीन म्हणाव अस थोर पक्षी:चविष्ट काम काही त्या कँटीन वाल्याने केलेले नाहीये ) काही नवीन (?) पदार्थ विकायला सुरुवात केलेली आहे. हर्षाची लहर मनात उठून तुम्ही थेट त्या कँटीनच्या दिशेने चालायला सुरुवात करता. पोटातले कावळे ४ मिनिटांच अंतर १ मिनिटात पार करायला उद्युक्त करतात.

गोष्ट माझ्या भावाची

लेखक कच्ची कैरी यांनी बुधवार, 02/02/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा यांनी लिहायला प्रोत्साहन दिल्यामुळे ह्या सदरात लेख लिहिण्याचा श्रीगणेशा करीत आहे माझा पहिलाच लेख असल्याने काही चुकल-माकलं तर आपल म्हणून तुम्ही समजून घ्यालच (अपवाद-टारझण ) याची खात्री वाटते . तर खालील कथा ही माझ्या लहान भावाची आमच्या लहान पणीची असून ती रंगविण्यासाठी अजिबात माल-मसाला वापरला नाहीये जसे आठवले तसेच्या तासे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . माझा भाऊ पप्पू माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान ,एकुलता एक असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका,(आईचा नाही ) म्हणून त्याला जराही खरचटले तर सगळ्या घरालाच ताप यायचा आणि त्यामुळेच मी आणि माझा लहान मामा (नानामामा) नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत

भावड्या उत्तरं लिहितो

लेखक भीडस्त यांनी मंगळवार, 01/02/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/16226 - भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील भावड्याने अशी धमाल सुरुवातीलाच उडवल्यानंतर आमच्या त्याच्याकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या. आणि भाउमहाराजांनीही पुरेपुर अपेक्षापूर्तीचं दान आमच्या पदरात भरभरून टाकलं. एकदा हिंदी गृहपाठासाठी निबंध लिहायचा होता. भावड्याने आयत्या वेळी कुणाचातरी निबंध उतरून काढला. सरांकडे तो निबंध तपासण्यासाठी गेला. सरांनी निबंध तपासला.