मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)

पुष्कर ·

तिनही भाग मस्त झाले आहेत. मुंग्यांना काही फेकून का मारु शकत नाहीत हे कळले पण हत्ती किंवा जिराफ ही काही फेकताना दिसत नाहित. फेकण्याची प्रवॄती फक्त माणूस, गोरीला किंवा इतर माकडांमधे दिसते. असे का? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पुष्कर 28/01/2019 - 10:04
तसं पाहिलं तर हत्ती काही प्रसंगी वस्तू, प्राणी (माणसे देखिल) उचलवून भिरकावून देऊ शकतो याची उदाहरणे आहेत. बाकी वाघ-सिंह, जिराफ वगैरे प्राणी काही फेकताना दिसत नाहीत त्याची काही कारणे खाली डॉ. म्हात्रे यांनी दिलेल्या प्रतिसादात आली आहेत. वाघ-सिंहादि प्राणी वेगाने पळू शकतात. अन्न आणि बचाव यासाठी त्यांची नखे, दात, स्नायूंची ताकद, वेग - हे सर्व उपयोगात येतात. त्यामुळे त्यांना गरज नसल्यामुळे फेकून मारण्यासाठी शारिरिक अवयव तसे विकसित झाले नसावेत. जिराफाचा बचावात्मक पवित्रा काय असतो याचा माझा अभ्यास नाही. आता फेकून मारण्यासाठी शरीररचना कशी हवी ते बघू. फेकून मारताना आपण त्या वस्तूचा वेग शून्यापासून ठराविक वेगापर्यंत वाढवतो. हे त्वरण लावण्यासाठी आपण हाताचा मूमेंट-आर्म सारखा वापर करतो. मूमेंट = फोर्स गुणिले मूमेंट आर्मची लांबी. वस्तू हातातून सुटताना त्यावर जेवढी मूमेंट असेल त्या प्रमाणात तिचा वेग कमी/जास्त असेल. (मूमेंट चं रूपांतर लिनियर मूमेंटम = वस्तुमान गुणिले वेग असं होतं). आता लक्षात येईल की, जेवढी मूमेंट आर्मची लांबी जास्त, तेवढा मूमेंट जास्त आणि तेवढा वेग जास्त. जर हा वेग फारच कमी असेल तर फेकलेली वस्तू सरळ न जाता गुरुत्वाकर्षणाने खालच्या दिशेने लवकर जाईल. आता वाघ - सिंहादि प्राण्यांचे हात-पाय (पायच) किती कमी लांबीचे असतात लक्षात घ्या. जिराफ एका पायाने त्वरण लावेल असा त्याला तो वाकवता येतो का ते पहा. कदाचित तो लाथेने एखादी वस्तू उडवून लावू शकत असला पाहिजे, असा माझा अंदाज आहे, त्या अर्थाने ते फेकणे झाले (अर्थात आपल्या 'वस्तू धरून' फेकण्याची तुलना याच्याशी होऊ शकत नाही). माणूस आणि माकडांचे हात त्यांच्या एकूण उंचीच्या तुलनेने साधारण १/३, म्हणजे बरेच लांब असतात. अवांतरः आता या वर्णनावरून हात कोपर्‍यात वाकलेला ठेऊन बॉलिंग करणे आणि सरळ हात खांद्यातून गोल फिरवून ओव्हर-आर्म बॉलिंग करणे यात दुसरी पद्धत का जास्त वेगकारक आहे हे लक्षात येईल.

In reply to by पुष्कर

पुष्कर 28/01/2019 - 10:06
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हत्ती देखिल वस्तू भिरकावताना सोंडेने, म्हणजे त्याच्या सगळ्यात लांब मूमेंट आर्मने भिरकावतो. पायाने नाही.

सुंदर लेखमाला. भौतिक-जीव-शास्त्रातील काही तत्वे सोप्या शब्दांत सांगण्याची हातोटी तुमच्याकडे आहे. मुंग्या किंवा आणि इतर बरेच प्राणी साखरेचे कण, दगड किंवा इतर कोणतीही गोष्ट फेकून मारत नाहीत. ते करता येण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या भौतीक कारणाबरोबरच इतर दोन क्षमताही आवश्यक आहेत... १. शरीररचना : एखादी वस्तू फेकून मारण्यासाठी ती वस्तू उचलून भिरकावण्यासाठी आवश्यक असणारी शारिरीक क्षमता असणारी शरीररचना (मुख्यतः अवयवांची रचना व स्नायूंची ताकद). ही क्षमता नसल्यामुळेच वाघ-सिंह कितीही ताकदवान असले तरी दगड उचलून फेकू शकत नाहीत. मात्र, हत्ती सोंडेने एखादी वस्तू उचलून फेकू शकतो. २. बुद्धीचा विकास : एखाद्या वस्तूचा साधन (tool) म्हणून उपयोग करण्याची क्षमता असलेला मेंदू. ही क्षमता मानवात फार विलक्षण प्रमाणात विकसित झाली आहे; इतकी की केवळ निसर्गात उपलब्ध असलेली (दगड, झाडांच्या फांद्या, इ) साधनेच नव्हे तर तो नैसर्गिक व अनैसर्गिक वस्तू वापरून स्वतः बनवलेली बनवलेली साधनेही उपयोगात आणतो. इतर काही प्राण्यांतही नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या वस्तूंना साधनांच्या स्वरूपात वापरण्याची क्षमता मूलभूत/छोट्या प्रमाणात दिसते. थोडक्यात, वरील सर्व तीन गोष्टींबद्दलची क्षमता ज्या प्राण्यांत जितकी विकसित झालेली आहे, तेच प्राणीच तितक्या प्रमाणात वस्तू फेकू शकतात / फेकून मारू शकतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुष्कर 28/01/2019 - 10:08
अतिशय समर्पक उत्तर आणि प्रतिसाद! तुम्ही लिहिलिल्या मुद्दा १ मधली शरीररचना म्हणजे नक्की काय आणि तिचा फेकणे या कृतीवर कसा फरक पडतो, हे मी आता वरच्या प्रतिसादात सविस्तर करून लिहिले आहे. तुमचा आणि माझा हे दोन्ही प्रतिसाद एकमेकांस पूरक व्हावेत.

अर्धवटराव 28/01/2019 - 08:46
मुंग्या आपल्या शारीरीक वजनाच्या कित्येकपट जास्त वजन वाहुन नेऊ शकतात. त्यामुळे प्रॉब्लेम शक्तीचा नसुन, वर म्हात्रेसाहेब म्हणतात तसं, फेकुन मारायला आवश्यक शरीररचनेचा आहे असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

पुष्कर 28/01/2019 - 10:19
दोन्ही प्रश्न शक्तीचेच आहेत. फक्त या शक्तिची रूपे वेगवेगळी आहेत. भार वाहून नेताना तेवढी स्थितिज ऊर्जा लागते. मुंगीच्या शरीरावर दबावात्मक भार (कॉम्प्रेसिव फोर्स) येतो. तो सहन करायची ताकद ही वेगळी आहे. फेकून मारताना गतिज ऊर्जा द्यावी लागते, ती ताकद वेगळी आहे. आपण देखिल ज्या वस्तू फेकतो, त्याचं वजन आपल्या वजनाच्या तुलनेत काहीच नाही, पण आपण खूप जास्त जड वस्तू उचलून धरू शकतो. आता आपल्या दृष्टिने हलकी वस्तू हवेच्या दृष्टिने जड आहे, त्यामुळे फरक पडत नाही, पण मुंगी जर तिच्यापेक्षा हलकी वस्तू फेकू लागली तर हवेपेक्षा हलकी असून तिला हवेचा अवरोध देखिल फेकण्यापासून रोखेल - हे आणखी एक कारण झाले.

कंजूस 28/01/2019 - 10:00
शस्त्र किंवा साधन वापरणारे प्राणी फारच कमी आहेत. ते फेकून मारणारे कमीच. एक पक्षी लिंबाएवढा दगड चोचीने उचलून आकाशाकडे तोंड करून खाली अंड्यावर ( दुसऱ्या पक्षाच्या)जोरात आदळून फोडतो. त्याची मान तशी भरकन वळते.

In reply to by कंजूस

पुष्कर 28/01/2019 - 10:11
हे इंटरेस्टिंग आहे! ह्यात तो पक्षी आडव्या दिशेने काही फेकत नसून गुरुत्वाकर्षणाने मिळणार्‍या नैसर्गिक त्वरणाचा उपयोग उभ्या (खालच्या) दिशेने सोडायच्या शस्त्रासाठी करतो आहे. (म्हणजे हा 'थ्रो' नसून 'ड्रॉप' आहे). तो हे कसे शिकला असेल हे बघणे रोचक असावे.

In reply to by पुष्कर

पुष्कर 28/01/2019 - 10:22
तुमचं बरोबर आहे. तो मान जर भर्र्कन वळवत असेल, तर तो मानेचा मूमेंट आर्म सारखा वापर करतो. म्हणजे तो स्वतः देखिल काही प्रमाणात त्वरण लावतो. जोडीला गुरुत्वाची मदत होते. मला हे उदाहरण फारच आवडलं आहे. लगेच माहिती शोधतो.

In reply to by कंजूस

पुष्कर 29/01/2019 - 11:32
आत्ता थोडी माहिती वाचली. काही पक्षी, विशेषतः ऑस्ट्रेलियातले, उपकरणे/साधने वापरत असल्याचे आढळून आले आहे. चिझोम नावाच्या संशोधकाचा १९५४ सालचा आइबीस मधला लेख वाचनीय असावा. मला फक्त पहिले पानच मिळाले. पूर्ण लेख मिळाल्यास पाहतो. 'ब्लॅक ब्रेस्टेड बझर्ड' आणि 'इजिप्शियन वल्चर' हे पक्षी इमू किंवा इतर पक्ष्यांची अंडी दगड/खडा फेकून तोडण्यात वाकबगार असल्याचे आढळून येते असे अनेकांचे निरिक्षण आहे.

अनिंद्य 29/01/2019 - 11:18
तुमची विषय सोप्पा करून सांगायची हातोटी विलक्षण आहे. प्रणाम गुरुदेव _/\_ प्रतिसादांतूनही विचारांना चालना मिळते आहे, ही मालिका उत्तम होणार !

कंजूस 29/01/2019 - 12:38
न्यूजनेशन चानेलवर रोज दोनदा ( ११:३०; १६:३०) 'परिंदे' कार्यक्रम अर्धा तास असतो त्यामध्ये असतात मजेदार विडिओ. युट्युबवर असतं तर लिंक दिली असती.

पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग २/३ (आकारमानाने पडणारे फरक)

पुष्कर ·

दुसरा भागही आवडला. शाळेत गणिताचे शिक्षक कधी शास्त्रा बद्दल बोलले नाहीत ना शास्त्राचे शिक्षक शास्त्र सोडून दुसर्‍या कोणत्या विषया बद्दल. पण इथे भुमिती, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सांगड घातलेली पाहुन एकदम अरे?? असे झाले. खरं तर असाही विचार करता येतो अशी जाणिव (मला तरी) या आधि फारशी तिव्रतेने झाली नव्हती. शाळेतले शिक्षण शाळेतच राहिले आणि कॉलेज मधले कॉलेजातच. पैजारबुवा,

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)

पुष्कर ·

In reply to by आनन्दा

पुष्कर 16/01/2019 - 11:25
अश्या आशयाची नाही, तर अगदी एक्झॅक्टली हीच मालिका मी इतरत्र प्रकाशित केली आहे मागच्या महिन्यात. माझ्या नावाखेरीज जर कुठे आढळली तर मात्र नक्की कळवा.

लेखनशैली खूप आवडली. पुढील भागांच्या आणि आणखी विविध लेखमालांच्या प्रतीक्षेत.

In reply to by तुषार काळभोर

पुष्कर 16/01/2019 - 11:26
अनेक आभार! एका आठवड्याच्या अंतराने पुढचे भाग टाकत जाईन.

पुष्कर 16/01/2019 - 11:33
उगा काहितरीच, सचिन काळे, बबन ताम्बे, अर्धवटराव, तुम्हा सर्वांचेही आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. पुढचे भाग लवकरच टाकेन, काळजी नसावी :)

पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणे, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणे, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणे आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणे - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ?

आबा ·

बाप्पू 10/01/2019 - 20:54
होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ? माझे उत्तर - 101% फसवेगिरी कारण - याची करणे आपण आपल्या लेखात स्पष्ट केली आहेतच. कोणत्याही वैज्ञानिक तत्वावर होमिओपॅथी खरी उतरत नाही. काही रुग्ण बरे होतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या plecibo effect मुळे. आणि त्याचे क्रेडिट होमीओपॅथ घेऊन आपले दुकान चालवत राहतात. माझ्या माहितीप्रमाणे होमिओपॅथी बद्दल एक ओपन चॅलेंज पण आहे (बहुधा होमिओपॅथी तील औषधातून "औषधं " नावाचा प्रकार शोधून काढण्याचे ) पण आज तागायत ते कोणी घेऊन पूर्ण नाही केलेलं. बऱ्याच देशात यावर बंदी आहे मग भारतात यावर बंदी का नाही? मेडिकल कोलेजेस काढून विद्यार्थ्यांना डॉक्टर ची डिग्री विकण्याचे दुकान चालवण्यासाठी. अश्या दुकानात ते लोक गिर्हाईक बनतात ज्याची शास्त्रीय पद्धतीने डॉक्टरकी करण्याची लायकी नसते. (सरळ सांगायचे तर ज्यांना डॉक्टर बनायचे आहे पण त्या लायकीचे मार्क नाहीत अशी मुले मुली )

टर्मीनेटर 10/01/2019 - 21:49
माझा होमिओपॅथीशी संबंध "म्हैशींना चालते का हो तुमची होमिओपदी?" या पु.लं.च्या वाक्यापुरताच .... बाकी ह्या थोतांडावर माझा तरी विश्वास नाही. वरील बाप्पू ह्यांच्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझ्या मामेभावाचा वर्गमित्र (कॉमर्स शाखेचा) काही काळानंतर दवाखाना उघडून बसलेला ह्याची देही ह्याची डोळा बघितला आहे.

बाप्पू 11/01/2019 - 00:15
महाराष्ट्रात तर बऱ्याच आमदारांनी मिळून होमिओपॅथी डॉक्टरांना; ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना देता येतील असा कायदा नुकताच विधिमंडळात संमत केला आहे ! यामागे या होमिओपॅथीच्या धंदेवाईकांनी विकत घेतलेल्या राजकारण्यांचा स्वार्थ उघड असला, तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांना आता नुसत्या पाण्याऐवजी किमान खरे औषध तरी मिळू शकेल.
ही समाधानाची बाब नसून, हा सगळ्यात भयंकर प्रकार आहे. हे म्हणजे सायकल पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला विमान दुरुस्त करण्याची परवानगी दिल्यासारखे आहे. कित्येक उदाहरणे आहेत ज्यामध्ये रुग्ण दगावला गेला आहे किंवा आजार पहिल्या स्टेज पासून अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहचला आहे. याचे कारण - रुग्ण शेवटपर्यंत मी बरा होईल या आशेने साबुदाण्याच्या गोळ्या खात बसला आहे किंवा चुकीची आधुनिक औषधे आणि उपचार घेत आहे. कुत्र्यांच्या छत्र्याप्रमाणे गल्लोगल्ली उघडलेली ही दुकाने बंद करून रुग्णांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवला पाहिजे.

वीणा३ 11/01/2019 - 02:47
माझी मैत्रीण BHMS डॉक्टर आहे. तिची बहुतेक mbbs सारखी ४ वर्षाची डिग्री आहे. तिच्या (आणि अजून १-२ जणांकडून ) कडून ऐकलं आहे कि सर्जरी (अगदी छोटे टाके घालणं पण ) सोडून बाकीचा अभ्यासक्रम mbbs सारखाच आहे. थेअरी सगळी mbbs सारखी पण प्रॅक्टिकल नाही. तिला आधी इंजेकशन द्यायची परवानगी नव्हती. काहीतरी छोटा कोर्स केल्यावर ती मिळाली. नंतर ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला कसलातरी असिस्टंट चा जॉब करत होती. अर्थात माझी माहिती -जवळपास १०-१४ वर्षापुर्वीची आहे. पण हो BHMS न करता सुद्धा बरेच लोक होपीओपॅथी डॉक्टर होतात, कसे देव जाणे.

कंजूस 11/01/2019 - 05:11
प्रथम एक सांगावेसे वाटते की ही एक शैक्षणिक चर्चा आहे. रुग्णाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास "माझं दु:ख डॅाक्टरला सांगितलं, त्याने एक औषध दिलं आणि साताठ दिवसांत फारसा त्रास आणि खर्च न येता मी बरा झालो." एवढंच अपेक्शित असतं. काही दुखण्यांबाबत ते खरं आहे हे म्हणूनच होमिओपथी टिकून आहे. डॅाक्टरचं महत्त्व आणि काम म्हणजे रोगनिदान करणे. हे शिक्शण मिळण्यासाठी त्यास चारपाच वर्षं शरीरशास्त्र शिकावं लागतं. तोच डेथ सर्टिफिकेट देऊ शकतो. निदानानंतर उपल्ब्ध औषधांतून निवडून योग्य प्रमाणात ते देणं. मग होमिओपथीला मान्यता मिळण्याला विरोध का असावा? एखाद्याच्या औषधाने बरे होत नसल्यास ते उपचार सोडून देण्याचं स्वातंत्र्य रुग्णांना आहेच. काही वेळा पोटेन्सीची औषधे न देता हो० डॅा० ते मदर टिंक्चरही वापरतातच.

चित्रगुप्त 11/01/2019 - 12:04
हल्लीच्या डॉक्टरी -'अ‍ॅलोपॅथी' क्षेत्रातील धंदेवाईक लुटारू टोळ्यांच्या दुष्टचक्रात जन्मभर अडकण्याच्या भितीपायी लोक होमियोपाथी सारख्या निरुपद्रवी/अल्पकालीन उपचारांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याखेरीज अ‍ॅलोपॅथीचा इलाज अयशस्वी ठरल्यानंतर होमियोपाथीच्या इलाजाने बरे झालेले अनेक लोक आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे.

आजकाल पो बी.जे.पी. अ‍ॅन्टी बी.जे.पी./प्रो दिक्षीत अँटी दिक्षीत वगैरे बुद्धीभ्रम सगळ्या सोशल मिडीयावर चालत असल्याने लेखातील मते खरी आहेत की खोटी या वादात न पडता मला जे दिसले ते सांगतो. वर चित्रगुप्त साहेबांनी म्हटल्याप्रमाणे खर्चिक आणि धंदेवाईक अ‍ॅलोपथीवाल्यांचा अनुभव घेउन झाल्यावर मी ही काही वेळा होमिओपथीकडे वळलो आहे आणि माझा अनुभव (आणि मला मिळलेले डॉक्टर) फार चांगला आहे. बालदमा किंवा जुनाट दमा, कोरडा खोकला किंवा कसल्यातरी अ‍ॅलर्जी , अनियमित पाळी ,पांढरे कोड अशा बाबतीत रुग्णांना योग्य गुण आलेला बघितला आहे आणि उपचाराचा खर्च कमी आहे. पण शेवटी शहाण्या माणसाने कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी शक्यतो चढु नये (म्हणजे तशी वेळ येउ देउ नये) अशा मताचा मी आहे.

जालिम लोशन 11/01/2019 - 13:41
हा प्रश्न फक्त होमिओपॅथिशी निगडीत नसुन सव्र पॅथीशी निगडित आहे. Lancet मधिल भारतिय डाॅक्टरांशी संबधीत report वाचला कि लक्षात येइल. ह्याला मालप्रॅक्टीस असे म्हणतात.

पद्मावति 11/01/2019 - 14:18
मी मात्र होमिओपॅथी उपचारांचा जो अनुभव घेतला आहे तो उत्तम आहे. लहान मुलांचे छोटे मोठे आजार तसेच ऍलर्जी वगैरे गोष्टींसाठी मला तरी होमिओपॅथी आवडते.

बाप्पू 11/01/2019 - 14:45
या विषयाची ek बाजू मी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितलीच आहे. पण दुसरी बाजू देखील आहे जी इथे बरेच लोक सांगताहेत. कित्येक रुग्ण ऍलोपॅथी आयुर्वेदिक आणि इतर उपचार करून शेवटी होमिओपॅथी कडे वळले आणि बरे देखील झाले. हे प्रमाण फार थोडे आहे पण निश्चित च असे का होते यावर सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. माझ्या मते प्लॅसिबो इफेक्ट आणि पथ्य पाणी हेच कारण असावे. काही रुग्ण बरे झाले म्हणून होमीओपॅथी चांगली आणि खरी असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. शास्त्रीय कसोट्यांवर या गोष्टी सिद्ध व्हायला हव्यात. माझ्या एक नातेवाईकांना माणकेदुखी मुळे उठता येणे शक्य होत नव्हते. सारखे झोपून राहिल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. त्यांचे वय 85 च्या आसपास असल्यामुळे ऑपेरेशन करणे शक्य नव्हते. घरच्यांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. पण होमीओ पॅथी ची औषधे सुरु केल्यावर त्या पुढे 1.5 वर्षे जगल्या आणि थोडी फार चालणे फिरणे देखील शक्य झाले. पण हा अनुभव म्हणजे होमीओ पॅथी च्या सत्यतेचा पुरावा होऊ शकत नाही. म्हणूनच - जेव्हा इतर उपचार पद्धती हार मानतात तेव्हा आणि फक्त तेव्हाच होमिओपॅथी चा विचार करावा. किंवा इतर औषधोपचार चालू असताना आणखी एक सपोर्ट म्हणून होमिओपॅथी चा विचार करावा.

माझ्या नाकाचा वारंवार घोळणा फुटायचा. अनेक अ‍ॅलोपदी डॉक्टर झाल्या नंतर होमिओपदीस शरण गेलो. २०० पानी वही भरुन जाईल इतकी माझी चिकित्सा केली गेली. जवळ जवळ ६ महिने साबुदाण्याच्या गोळ्या खाल्या. पण त्या नंतर गेली २० वर्षे हा त्रास कधीही झाला नाही. हानेमनने ही समजूत कोणताही वैज्ञानिक पद्धती न वापरता स्वत:च्या लहानश्या अनुभवावरून ठरवली होती, आणि त्यानंतरही आजतोपावेतो कोणालाही ही समजूत वैज्ञानिक साच्यात बसेल अशा पद्धतीने सिद्ध करता आलेली नाही. मात्र बऱ्याच लोकांचा याला प्रचंड पाठींबा आहे असे आम्हाला दिसून आले आहे. काट्याने काटा निघतो किंवा विषच विषाला बरे करते असा सरळधोपट तर्क हे लोक मांडतात. हा न्याय जर सगळ्या बाबतीत सत्य आहे असे मानायचे असेल तर मग विष प्यायलेल्या व्यक्तिला अजून विष पाजून बरे करता यायला हवे! विज्ञान अशा विचित्र कल्पनांवर चालत नाही. अधुनिक विज्ञानवादी हा दावा सरसकट करतात. विषेशतः होमिओपदी किंवा आयुर्वेदाच्या उपचारांवर टीका करताना वरील दावा केला जातो. पण अधुनिक विज्ञानाला अजुनही बर्‍याच गोष्टींची उत्तरे देता आलेली नाहीत. त्या मुळे विज्ञानाच्या कसोटी तरी कितपत व्यवहार्य आहेत हे कसे तपासायचे? प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर उतरवुन दाखवा असे म्हणणे म्हणजे माशाला झाडावर चढायला सांगण्यासारखे आहे. ज्याला होमिओपदी पटत नसेल त्याने ती नये वापरु, पण म्हणुन त्यावर सरसकट बंदी आणावी हे काही पटत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माझ्या मित्राच्या मुलीच्या (वय ६) अंगभर पुरळ उठायचे आणि मग ती रक्त येईपर्यंत अंग खाजवत रहायची. इतके की शेवटी तिच्या हातांना चिंधि / फडके गुंडाळुन ठेवावे लागायचे. अनेक अलोपदी डॉक्टर झाले ४० ते ५० हजार रुपयांच्या टेस्ट झाल्या, अनेक मलमे झाली त्यातली काहीतर १००० रुपयांच्या पुढे होती. सहा महिन्यात एकूण खर्च दोन लाखांच्या पुढे गेला असेल. पण काही फरक पडत नव्हता. उलट बिचारीचे दुखणे वाढतच होते. खाजेनी ती रात्रभर रडायची. त्यामुळे मित्राचे कुटूंब पण त्यामूळे सैरभैर झाले होते. एक दिवस त्यांना कुठून तरी एक वैद्यबुवा भेटले त्यांनी मुली कडे फक्त पाहिले (हात सुध्दा लावला नाही) आणि म्हणाले की तिच्या खाण्यातले गोडेतेल आणि तुरडाळ बंद करुन पहा. इतके उपाय झाले होते तर हा पण करु असे म्हणुन मित्राने तेल बदलले व डाळ माळ्यावर टाकून दिली. दुसर्‍या दिवसा पासूनच फरक दिसायला लागला आणि आठवड्याभरात लेकरु पूर्ण बरे झाले. खाज बंद झालीच आणि महिन्याभरात त्वच्या पूर्वी सारखी निर्मळ झाली. वैद्यबुवांनी हे सगळे फक्त एक कप चहाच्या बदल्यात केले. हा पण प्लासीबो इफेक्टच आहे का या वर जाणकारांनी प्रकाश टाकावा. (जगातली सर्व अक्कल केवळ इंग्रजांकडे आणि आमचे पूर्वज मात्र निव्वळ गाढव असे अजिबात मानत नसलेला) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वैद्य आयुर्वेदिक असतील असे गृहीत धरतो. हेतूंवर, निदान पद्धतींवर अत्यंत खोलवर आणि ओरिजिनल विचार चरकादी लोकांनी केलेला आहे. उच्चकोटींची वैचारिक क्षमता आणि अनुभव, निरीक्षणं यातून हे घडलं आहे. हे करताना साकल्याने विचार कसा करावा हे अभ्यासण्यासाठी मुद्दाम चरक वगैरे वाचावेत. शास्त्र (थिअरी चा प्रतिशब्द म्हणून) म्हणून आयुर्वेद संपूर्ण आहे. आणि अश्या प्रकारच्या केसेस आधुनिक वैद्यकातल्या वैद्यांना सोडवायला जमत नाही हे मी नक्कीच सांगू शकतो(रोगनिदानातले साकल्य हा भाग ह्या अभ्यासक्रमात कसा शिकवतात ते माहीत नाही)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हा तर खूप अलीकडचा शब्द झाला. मानसभावाचा आयुर्वेदाने विस्तृत विचार केलेला आहे. गरज असेल तेव्हा प्लासीबोचीही सोय करून ठेवली आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विजुभाऊ 14/01/2019 - 12:12
प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर उतरवुन दाखवा असे म्हणणे म्हणजे माशाला झाडावर चढायला सांगण्यासारखे आहे.
प्रत्येक गोष्टींचे मापक / मोजपट्ट्या वेगवेगळ्या असतात. अंतर किलोग्रॅम्मधे कसे मोजता येईल. तसेच होमीऑपाथी मुळे जी मनोचिक्त्सिका केली जाते ती कशी मोजायची. मी होमीऑपाथी चा समर्थक नाहिय्ये. पण कुतुहलापोटी एक पुस्तक वाचत असता त्यात कालीमूर या क्षार चिकीत्सेत रोगाची लक्षणे " स्वप्नात मांजरे दिसतात" अशी दिलेली होती. ही लक्षणे हा आजार कसा असू शकतो हे ठरवण्या साठी हल्ली तरी एकोणतेच मोजमाप दिसत येत नाही. स्टेटेस्टिकस कितपत खरे मानायचे हे ही वादग्रस्त आहे

चित्रगुप्त 11/01/2019 - 15:27
शास्त्रीय कसोट्यांवर या गोष्टी सिद्ध व्हायला हव्यात.
... हे सिद्ध होणे नेमके कुणाला आणि कश्यासाठी हवे आहे ? व्याधि झेलणाराला येनकेनप्रकारे बरे व्हायचे असते, मग ते शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झाले असो वा नसो. आणि शास्त्रीय कसोट्यांची प्रमाणिता कशी ठरवायची ? अमूक एका कंपूने ठरवलेले निकष सर्वांनी का मानायचे ?
जेव्हा इतर उपचार पद्धती हार मानतात तेव्हा आणि फक्त तेव्हाच होमिओपॅथी चा विचार करावा.
हार मानण्यापूर्वी होणारा अमाप खर्च, मनस्ताप, दगदग, कुटुंबियांना होणारा त्रास, औषधांमुळे होणारे दुष्परिणाम, काही समस्यांच्या बाबतीत महागडी औषधे जन्मभर बोकांडी बसणे, हे सर्व कशासाठी करायचे ? ज्यांना होमियापाथी - वा अन्य उपचार्पद्धती - समाधानकारक वाटत असेल, त्यांनी हे सर्व का म्हणून करायचे ? आम्हा उभयतांना एकदमच काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया झाला होता. त्यावेळी इकडे तशी साथ आलेली होती. ज्या ज्या लोकांनी अ‍ॅलोपाथी औषधे घेतली, त्या सर्वांना अजून गुडघेदुखी वगैरे त्रास होत आहे. आम्ही सुरुवातीचे फक्त दोन दिवस होमियो औषधे घेतली. तापाची मुदत संपल्यावर आम्ही अगदी लवकर खडखडीत बरे झालो.

चौकटराजा 11/01/2019 - 15:52
माझ्या पत्नीचे हिमोग्लोबिन ५ होते. ऍलोपॅथिक उपचार १ वर्ष घेतले काही फरक पडला नाही. काही शरीरांच्या बाबतीत असे होऊ शकते असे आधुनिक वैद्यकच सांगते . कारण नैसर्गिक दोष वयपरत्वे असा येऊ शकतो की लोहाला शरीरात स्वीकारण्याची एकाद्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे होमिओ पथिक उपचार चालू केले . पत्नीच्या भावजयीला देखील हिमकोग्लोबीं बाबतीत होमिओपॅथीने उत्तम अनुभव आल्याने मी मनाविरुद्ध का होईना तयार झालो. पहिल्याच दिवशी वैद्याने जणू पैजेवर साम्गितले की गूण येणारच .तीन महिने झाले . महिन्यास २००० चे औषध लागते . ३ महिन्यानंतर हिमोग्लोबिन ७.१ आहे . तीन महिन्यात वाढच दिसली आहे पण फार धीमी . माझया सारखा अति चिकित्सक हाही कोड्यात पडला आहे . अर्थात समजा त्याने १० पर्यंत हिमो वाढवून दिले व औषधा बंद करताच ते पुन्हा ५ आले तर प्लॅसिबोच असे मी म्हणेन .

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 11/01/2019 - 18:45
@चौरा: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी चुकंदर (लाल बीटरूट) पालक आणि शेपू यांचे ज्यूस किंवा स्मूदी नित्य प्यायल्याने हिमोग्लोबिन ११ पर्यंत वाढल्याचे अगदी माझ्या घरातलेच उदाहरण आहे. अवश्य करून बघा. याशिवाय लिंबू, अक्रोड, मोड आणलेली कडधान्ये, केळी, डाळिंब, खजूर, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, कलिंगड वगैरेंबद्दल खालील लेखात वाचा: https://www.ndtv.com/food/9-foods-that-can-help-increase-haemoglobin-1828770

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 12/01/2019 - 05:14
आहारात लोह देणारे सर्व घेऊनं पाहिले .हा बी १२ कमतरतेचा भाग आहे व शाकाहारी माणूस बी १२ च्या बाबतीत दुर्दैवी असतो.

असा विषय आलाय (किंवा मी वाचलाय म्हणा). माझा काही सोपे प्रश्न . १. अलोपाथी सोडून अन्य काही मार्गाने रुग्ण बरा होतो हे अलोपाठी वाल्यांना मान्य आहे का ? २. शेकडो हजारो लोकांना गेली कित्येक वर्षे आणि आजही वेगवेगळ्या उपचार पद्धतीनी चांगला गुण येतोय. हि पद्धती जर अलोपाठी नसेल तर तो प्लासिबो इफेक्ट आहे असे पट्कन का ठरवले जाते ३. कोणत्याही प्रचलित गोष्टीनमध्ये काही गृहीतके, श्रद्धा, समज, प्रत्यक्ष प्रमाण, नियम, अपवाद, सिद्धांत, विचारसरणी आदी गोष्टींचा समावेश असतो आणि त्याची एक चौकट असते. तथापि चौकटी बाहेर जेजे आहे तेते अस्तित्वातच नाही किंवा ते खोटे आहे हा हट्ट बालिश आहे. ४. ५+४ = ९ आणि ६+३ = ९ हे दोन्हीही शक्य आहे ह्यातील ९ उत्तर येण्याचे एकच समीकरण खरे असे म्हणून चालणार नाही ५. शास्त्रीय शास्त्रीय शास्त्रीय कसोट्या म्हणजे नेमके काय ? जे पुन्हा पुन्हा सिद्ध करता येते फक्त तेच शास्त्रीय? ज्या गोष्टींची कारण मीमांसा देता येते फक्त तेच शास्त्रीय? एखाद्या विशिष्ट घटना क्रमाला नाकारणे हे शास्त्रीय का त्यातील कार्यकारण भाव शोधणे हे शास्त्रीय ? ६. पुस्तकात छापून आलेले खरे का प्रत्यक्ष प्रमाण हे खरे ? सध्या एवढेच पुरे

In reply to by अत्रन्गि पाउस

जालिम लोशन 11/01/2019 - 20:06
1) allopathy वाल्यांना हे मान्य आहे. 2)असे पटकन ठरवले जात नाही. वेगवेगळ्या loby त्यासाठी काम करत असतात. हा सगळा धंद्यासाठीचा प्रयत्यन असतो. 3) बरेचसे आजार हे Allopathyच्पा scope पलीकडे असतात. त्यात मानसिक आजार. वेदना. अर्धशिशी वगैरे आजार येतात. 4) Hollistic ऊपचार बरेचदा चांगले result देतात.

In reply to by अत्रन्गि पाउस

सुबोध खरे 12/01/2019 - 13:01
१. अलोपाथी सोडून अन्य काही मार्गाने रुग्ण बरा होतो हे अलोपाठी वाल्यांना मान्य आहे का ? कोणतीही उपचार पद्धती परिपूर्ण नाही. आणि माणूस नैसर्गिक प्रतिकार शक्ती आणि स्वतः बरा होण्याच्या शक्तीमुळे बरा होतच असतो. कोणतीही उपचार पद्धती हि या नैसर्गिक शक्ती पेक्षा जलद काम करत असेल किंवा जेंव्हा नैसर्गिक प्रतिकार शक्ती काम करत नसेल अशा वेळेस उपयुक्त ठरते आहे असे सिद्ध झाले पाहिजे. असे सिद्ध करण्यात एखादी उपचार पद्धती जेंव्हा सातत्याने अयशस्वी होते तेंव्हा ती उपयुक्त आहे असे कसे म्हणावे. २. शेकडो हजारो लोकांना गेली कित्येक वर्षे आणि आजही वेगवेगळ्या उपचार पद्धतीनी चांगला गुण येतोय. हि पद्धती जर अलोपाठी नसेल तर तो प्लासिबो इफेक्ट आहे असे पट्कन का ठरवले जाते. कोणत्या रोगाला होमियोपॅथीने हटकून गुण येतोच असे सिद्ध झाले आहे? आधुनिक उपचार पद्धतीत असे शास्त्रीय ( जीवशास्त्रीय नाही तर भौतिक आणि रसायन शास्त्रीय आणि संख्या शास्त्रीय) कसोट्यांवर सिद्ध करता येते. ३. कोणत्याही प्रचलित गोष्टीनमध्ये काही गृहीतके, श्रद्धा, समज, प्रत्यक्ष प्रमाण, नियम, अपवाद, सिद्धांत, विचारसरणी आदी गोष्टींचा समावेश असतो आणि त्याची एक चौकट असते. तथापि चौकटी बाहेर जेजे आहे तेते अस्तित्वातच नाही किंवा ते खोटे आहे हा हट्ट बालिश आहे. ते अस्तित्वात नाही असे म्हणणे नाहीच पण जो माणूस ते अस्तित्वात आहे अस दावा करतो त्याने तो दावा सत्य आहे हे सिद्ध करायला नको का? संजय गांधी उद्यानात जिराफ आहे असे सांगणार्याने एक तरी जिराफ दाखवायला हवा कि नको? कारण जिराफ नाहीच हे सिद्ध करणे जास्त कठीण आहे ४. ५+४ = ९ आणि ६+३ = ९ हे दोन्हीही शक्य आहे ह्यातील ९ उत्तर येण्याचे एकच समीकरण खरे असे म्हणून चालणार नाही मान्य पण म्हणून ५ पेरू + ४ बटाटे हे ९ पेरू किंवा ९ बटाटे असे कसे म्हणता येईल? ५. शास्त्रीय शास्त्रीय शास्त्रीय कसोट्या म्हणजे नेमके काय ? जे पुन्हा पुन्हा सिद्ध करता येते फक्त तेच शास्त्रीय? ज्या गोष्टींची कारण मीमांसा देता येते फक्त तेच शास्त्रीय? एखाद्या विशिष्ट घटना क्रमाला नाकारणे हे शास्त्रीय का त्यातील कार्यकारण भाव शोधणे हे शास्त्रीय ? एखाद्या गोष्टीची( येथे औषधाच्या परिणामकारकतेची) मीमांसा देता येत नसेल पण ते औषध सलग हजारो रुग्णात गुणकारी ठरते आहे असे शास्त्रीय आणि सांख्यिक कसोटीवर सिद्ध करता येत असेल तर आधुनिक वैद्यकशास्त्र ते गुणकारी आहे हे मान्य करते. अशी स्थिती आजतरी होमियोपॅथी ची नाही. ६. पुस्तकात छापून आलेले खरे का प्रत्यक्ष प्रमाण हे खरे ? आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पुस्तकात छापून आलेले हे १०० % खरे सिद्ध होणार नाही कदाचित, पण सध्या उपलब्ध असणाऱ्या पुराव्यानुसार ते खरे मानता येईल इतका पुरावा उपलब्ध असतो. प्रत्यक्ष प्रमाण एका रुग्णाला आले म्हणजे ते सर्वाना येईल असे नाही मग एखादया कर्करोगाच्या/ किंवा तत्सम दुर्धर रोगाच्या रुग्णाला सिद्ध न करता येणाऱ्या खोट्या दाव्या मुळे उपचारास अक्षम्य विलंब झाला तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? (असे असंख्य रुग्ण मी पाहत आलो आहे.)

कंजूस 11/01/2019 - 17:21
सध्या रुग्णांनाही आणि सोयऱ्यांनाही "मला कसा मोठ्ठा रोग झाला,कशा महागड्या चाचण्या केल्या,अन कशी महागडी ट्रिटमेंट घेतली" हे सांगायची हौस आहेच. तर चालू दे ना. आपण आपलं बघायचं,पुज्य मोजायची नाहीत.

विकास... 11/01/2019 - 18:46
अत्यंत आभारी आहे या विषयावर लेख काढल्याबद्दल !! बरेच दिवस होमियोपॅथी वर लेख शोधात होतो. मिपा वर जाणकार लोकांनी होमियोपॅथी आणि खालील विषय याबद्दल अधिक माहिती द्यावी. Fungal Infection (ओला/कोरडा नायटा) असे समजते कि ७०% लोकांना हा त्रास आहे. Psoriasis (?) Immune Power/System (प्रतिकारशक्ती / रोगप्रतिकारशक्ती)

In reply to by विकास...

जालिम लोशन 11/01/2019 - 23:16
वाढवण्यासाठी : धुतपापेश्वरचा च्पवनप्राश सेवन करणे. बाबा रामदेव नको चिंचोक्यापासुन बनवतात. कमी करण्यासाठी : ऐरंड तेल सोसेल इतके रोज पोटात जावु देणे. संधिवातासारख्या विकारात हे ऊपयोगी आहे.

आनन्दा 11/01/2019 - 19:10
हा थोडासा देव आहे की नाही, श्रद्धा अंधश्रद्धा सारखा काठावर असलेला विषय आहे.. देव आहे की नाही हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करणे शक्य नसले तरी ज्यांना देव किंवा तत्सम अतींद्रिय अनुभव येतात ते असले शास्त्र फाट्यावर मारतात. तसेच काहीसे होमिओपॅथी चे पण आहे. माझ्या आजी आजोबांचा जुनाट दमा या प्लासीबो गोळ्यांनी बरा झालाय, आणि ते पण त्यांना आपण औषध खातोय हे माहीत नसताना माझा मलेरिया तिसऱ्या पाळीला ताप येता येता निदान करून औषध दिले, तिथेच ताप थांबला, 1 तासात पूर्ण बरा झालो.. असेलही प्लासीबो, but I dont care आता, काही गोष्टी कोणत्याच शास्त्राने दुसऱ्या शास्त्राला कमी लेखू नये.. या तीनही पॅथीचे डॉ हे सर्रास करताना दिसतात. ज्यामुळे गैरसमज अधिक वाढत जातात. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यावर तुम्ही गोळ्या खात बसाल की ऍडमिट व्हाल? या आपल्या मर्यादा ज्याला कळतात तो डॉक

In reply to by आनन्दा

खिलजि 02/02/2019 - 20:28
+१ नंबर बोललात आनंदा साहेब .. पटलंय आणि स्वतः अनुभवलंय पण .. ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोघांनाही मी मानतो किंबहुना जवळून अनुभवलंय म्हणून तर आईच्या आजारपणाच्या वेळी मी वरळीहून अंबरनाथला जायचो होमिओपॅथीची औषधे आणायला .. अनुभवही छान आले .. मला वाटत . आपण समोरच्या डॉक्टरला निदान सांगून तरी बघावे कि बाबा रे मी हे पण चालू ठेवले आहे जर त्याला काही आक्षेप असेल तर दुसरा सोयीस्कर मार्ग शोधावा ..

एकंदरीत निष्कर्ष म्हणजे आधुनिक पद्धतीने सिद्ध होउ न शकलेली , काहींना उपाय झालेली काहींना उपाय न झालेली ही उपचारपद्धती आहे. आधुनिक वैद्यकीय शास्ताप्रमाणे याचे साईड इफेक्ट आहेत का ? रच्याकने वजन कमी करायला होमीओप्याथी आहे का ? (गाजराची पुंगी ;-) )

In reply to by उगा काहितरीच

कंजूस 03/02/2019 - 09:02
पुढे काय होणार, अन्न मिळणार का नाही या विवंचनेतून काहींचे शरीर अन्न चरबीरूपात साठवत असेल तर रोग म्हणता येणार नाही. मग त्यावर औषधही कसे असेल?

In reply to by कंजूस

गवि 03/02/2019 - 09:14
"चरबी वाढणे" हे लक्षण शरीरात तीव्रतेने निर्माण करु शकणाऱ्या द्रव्याचे (उदा:श्रीखंड, गुलाबजाम अशा अन्नाचे) अंश घेऊन ते १०० x १०० x १००.... अशा पटीत नाहीसे होइपर्यंत विरळ केल्यास "चरबी कमी करणे" यासाठीचे औषध बनावे. ;-)

सुबोध खरे 12/01/2019 - 10:15
कोणत्याही पॅथीवर (उपचारपद्धती) टीका न करता काही वस्तुस्थिती १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा आपली आयुर्मर्यादा ३२ वर्षे होती आणि आता २०१८ मध्ये ती ७१ झाली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र सोडले तर इतर उपचारपद्धतीमध्ये गेल्या ७१ वर्षात फारसा बदल झालेला नाही म्हणजेच आपली आयुर्मर्यादा दुपटीपेक्षा जास्त झाली आहे याचे कारण इतर कोणतीही उपचारपद्धती नसून आधुनिक वैद्यकशास्त्र आहे हे स्पष्टच आहे. आपल्या हातापायाला जखम झाली तर कोणताही उपचार न करता ती बरी होते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि नैसर्गिकरित्या रोग बरा होण्याची क्षमता प्रत्येक प्राणीमात्रात असतेच. याच कारणासाठी कोणत्याही उपचारपद्धतीने रोग हा नैसर्गिकरित्या रोग बरा होण्याची क्षमतेपेक्षा लवकर बरा झाला तरच ती उपचार पद्धती उपयुक्त आहे असे म्हणता येईल. असा तुलनात्मक अभ्यास करून कोणत्याही उपचारपद्धतीने रोग लवकर बरा झाला हे स्पष्टपणे सिद्ध करणे आवश्यक असते. जगभरात केलेल्या अशा असंख्य अभ्यासात होमियोपॅथी सपशेल नापास झालेली आहे. उदाहरण म्हणून देतो-- काविळ हा रोग जर विषाणूमुळे झाला असेल तर ९९ % रुग्णांमध्ये तो नैसर्गिक रित्या बरा होतोच. कोणात थोडा अगोदर कोणात थोडा नंतर. जर १००० रुग्ण घेतले आणि वय, उंची, वजन, लिंग आणि प्रांत यात साम्य असणारे दोन गट केले आणि त्यापैकी ५०० जणांना औषध दिले आणि ५०० जणांना त्याच रंगाच्या औषध नसलेल्या गोळ्या दिल्या. आणि जर औषध दिलेल्या लोकांची कावीळ ५ दिवसात बरी झाली आणि न दिलेल्या रुग्णांची कावीळ १० दिवसांनी बरी झाली तर ते औषध नक्कीच गुणकारी आहे असे दाखवता येईल. (STATISTICALLY SIGNIFICANT). उगाच एका गटाची ५ दिवसात आणि दुसऱ्या गटाची सव्वापाच दिवसात बरी झाली तर तो केवळ दैवयोग आहे (STATISTICALLY IN SIGNIFICANT) होमियोपॅथी मध्ये आम्ही प्रतिकार शक्ती वाढवतो असा दावा करतात. पण प्रतिकारशक्ती वाढवतो म्हणजे नक्की काय? याचे ठोस उत्तर त्यांच्याकडे नाही. पांढऱ्या पेशी वाढतात का? नाही. त्या पेशींची मारक क्षमता वाढते का? नाही. रोग होण्याचे प्रमाण कमी होते का? तसे सांगता येत नाही. मग बाबा किंवा महाराजांच्या अंगाऱ्याने स्वामींची उदी लावली आणि ताप उतरला सांगणारे किती तरी लोक असतात. मग त्यांच्यात आणि या उपचार पद्धतीत फरक काय? बाबा गुरमीत राम रहीम सिंह यांनी पण अनेक रुग्ण बरे केले आहेत ( असा त्यांच्या भक्तांचा दावा आहे) कदाचित श्रद्धेचा फरक आहे. एखाद्या माणसाला एखाद्या औषधाचा गुण येतो म्हणून तो दुसऱ्याला येईलच असे नाही हे स्पष्ट आहे. क्रोसीन देऊन बहुसंख्य लोकांचा ताप अर्ध्या तासात उतरतो. पण काही लोकांचा उतरत नाही. याचे कारण त्या माणसाचे ताप निर्माण करणाऱ्या क्रियेचे विकर (एंझाइम)(COX -३) वेगळ्या रचनेचे असतात. अशा माणसाला ब्रुफेन/ डायक्लोफेनॅक दिले कि लगेच ताप उतरतो. पण हे सिद्ध करून दाखवता येते. असे कोणतेही सैद्धांतिक अधिष्ठान होमियोपॅथीला नाही. केवळ मला अनुभव आला हे मला भूत दिसले या तर्हेचे विधान आहे. कारण तो अनुभव माझ्या दृष्टीने "खराच" असतो. मूळ मुद्दा असा आहे कि सरकार जर उपचारपध्द्ती साठी पैसे खर्च करणार असेल तर त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसले पाहिजेत. उगाच एखादा हा धंदा उत्तम आहे म्हणतो म्हणून तुम्ही कोणत्याही धंद्यात पैसे टाकणार का? त्यातून मिळणार नफा कसा आणि कधी मिळेल याच काहीतरी हिशेब असले पाहिजेत. असे सगळेच्या सगळे हिशेब होमियोपॅथीबद्दल जगभर चुकलेले आहेत. यास्तव जगभरात आरोग्य विमा कंपन्यांनी किंवा सरकारानी या उपचार पद्धतीला पैशाचा परतावा देणे थांबवले आहे. बहुसंख्य लोकांचे अनुभव या कहाण्या असतात. त्या दुसऱ्या रुग्णाला बहुतांश लागू पडतच नाहीत. इतर कोणतीही उपचारपद्धतीचे असंख्य रुग्ण मी पाहत आलो आहे. जे रोग स्वतःहून बरे होणार आहेत त्याबद्दल इतर कोणतीही उपचारपद्धती घेतल्यानेच ते बरे झाले आहेत असा छातीठोक दावा करणारे इतर उपचारपद्धतीचे व्यावसायिक जेंव्हा स्वतःवर पाळी येते तेंव्हा आधुनिक वैद्यकशास्त्राचीच कास धरताना आढळतात. बाकी मुतखडा, पित्ताशयातील खडा, कर्करोगसारखे स्पष्टपणे दिसणारे रोग बरे होताना माझ्या २७ वर्षाच्या अनुभवात दिसलेले नाही. मी व्यवसाय सुरु केला तेंव्हा पासून गेल्या १० वर्षात माझ्या कडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येक चाचणीच्या प्रतिमा आणि अहवाल(IMAGES AND REPORTS) माझ्या संगणकावर आहेच तेंव्हा त्यांचे अगोदरचे अहवाल आणि आत्ताचे ताडून पाहिले असताना मला एकही रुग्णात याचा परिणाम दिसून आलेला नाही. शिवाय वैद्यकीय नीतितत्त्व( ETHICS) प्रमाणे मी कोणत्याही डॉक्टरचे पैसे घेत नाही त्यामुळे माझ्या पंचक्रोषीतील अनेक डॉक्टर माझ्याकडे परत परत येतात तेंव्हा त्यांच्या स्वतःच्या अहवालात काहीही फरक जाणवत नाही हे पाहून ते माझ्याशी याबद्दल वाद घालू शकत नाहीत. बाकी ते व्यवसाय करत आहेत तेंव्हा आमची उपचार पद्धती निकामी आहे हे ते कधीही कोणत्याही रुग्णाला सांगणार नाहीतच. सर्वात वाईट स्थिती आहे ती होमीयोपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयांची. होमियोपॅथी मध्ये तिसऱ्या वर्षात अभ्यासक्रमात २५ गुण आधुनिक उपचार पद्धतीच्या साईड इफेक्टस साठी राखून ठेवले आहेत. यामुळे तेथून बाहेर पडणारे विद्यार्थी एक पूर्वग्रह घेऊनच बाहेर पडतात. पण बाहेर पडल्यावर आपण जे साडे चार वर्षे शिकलो आहोत त्याचा व्यवहारात उपयोग फार थोडा होतो आहे हे पाहून ते अत्यंत निराशाजनक स्थिती मध्ये दिसतात. त्यातून खेड्यामध्ये लोकांना ताबडतोब गुण हवा असतो आणि शहरात व्यवसाय करायचा तर येणार भांडवली खर्च आणि त्यातून मिळणार परतावा (होमियोपॅथी ने आपली औषधे आणि सल्ला स्वस्त असतात हा केलेला प्रचार आता त्यांच्याच अंगाशी येतो आहे) याच व्यस्त प्रमाण पाहुन हेच फळ काय मम् तपाला हि स्थिती येते. अशी अनेक मुले बी एच एम एस पदवी घेऊन दुसरेच पदव्युत्तर अभ्यासक्रम करताना किंवा विपणन(मार्केटिंग), मेडिकल ट्रान्सक्रिप्शन इ व्यवसायात जाताना आढळतात आणि बऱ्याच मुली लग्न करून घरीच बसलेल्या दिसतात. ज्याची श्रद्धा आहे त्याने हि उपचार पद्धती जरूर करावी परंतु ती शास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही हि वस्तुस्थिती. जाता जाता -- विषय फार गहन आणि गंभीर आहे. आणि याला उपाय फार मूलगामी आहेत पण त्याची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता तो सुटण्याची शक्यता आपल्या आयुष्यभरात आहे असे वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/01/2019 - 11:35
डॉक्टर साहेब, कळकळ पोचतेय, पण दुर्दैवाने ती व्यर्थ जाणार आहे. मुळात बहुसंख्य लोकांना तपशिलात जायलाच नको असतं. आणि डेव्हिल इज ऑलवेज इन डीटेल्स. त्यामुळे एकूण काहीही फरक पडण्याची शक्यता नगण्य आहे. फक्त याच बाबतीत नव्हे, सर्वच बाबतीत. धागाकर्त्याने तपशीलवार आणि सोपी करुन सांगितलेली माहिती (खरोखर पूर्णपणे) वाचूनही त्याउपर कोणाला होमिओपॅथीत काहीतरी उपयुक्त असणारच असं वाटत असेल तर त्यांनी ती वापरणंच योग्य ठरेल. कारण तर्कांच्या पातळीवर न शिरता थेट निव्वळ श्रद्धा ठेवत असल्यास, आणि आलेल्या चांगल्या अनुभवांचं श्रेय त्या श्रद्धेला पूर्ण मिळत गेल्यास (आणि वाईट अनुभवांचं अपश्रेय मात्र इतर कुठेतरी जात असल्यास) त्या श्रद्धा बळकट होत जातात. तशा त्या होत गेल्या असल्यास त्यात बदल करणं जगात कोणालाही शक्य नाही. तसाही होमिओपॅथी गोळ्या खाण्यात अपाय नाही. गोड असतात आणि निव्वळ साखर असते. इमर्जन्सी आली की सगळे आधुनिक वैद्यकीय इस्पितळात इमर्जन्सी विभागातच जातात, होमिओपॅथी क्लिनिकमध्ये नाही. मॉडर्न मेडिसिन अतिप्रामाणिकपणा या दोषापायी जेव्हा पेशंटला म्हणतं की यावर आता फारसा उपयोगी उपाय शिल्लक किंवा उपलब्ध नाही, तेव्हा निराशेच्या गर्तेत कोसळण्यापेक्षा होमिओपॅथीची आशा काय वाईट? खूप चिकित्सा होते. आपली नीट माहिती घेतली जाते. निराश पेशंटला खूप बरं वाटतं. (जी डिटेल्ड हिस्टरी , चौकशी दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनमधले बहुसंख्य डॉक्टर घेणं टाळतात आणि पाच मिनिटांत कटवतात, कटू पण सत्य..) ब्लडप्रेशर, ल्युपस, नायटा, लठ्ठपणा, न्यूरोपथी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, कॅन्सर .. काहीही नाव घ्या, उपाय नाही असं तिथे काही नसतंच. अर्थात त्यात अत्यावश्यक असा आशेचा किरण मिळतो. मनाला उभारी येते. तसाही इतर उपाय दिसत नसतो. तेव्हा दिल के खुश रखनेके लिये ए गालिब...ये गोली अच्छी है..!!

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 12/01/2019 - 14:02
उत्तम प्रतिसाद. १३-१४ वर्षांपूर्वी होमियोपॅथीक डॉक्टरांसाठी एक सॉफ्टवेअर बाजारात आले होते. कंपनीचे नाव नक्की आठवत नाही पण बहुतेक माइंड टेक्नोलॉजी होते. माझा एक मित्र कर्जत ते ठाणे आणि नवी मुंबई ह्या परिसरात त्या सॉफ्टवेअरचे मार्केटिंग करायचा. १०,००० रुपये किमतीचे हे सॉफ्टवेअर त्या परिसरातील जवळपास सर्व होमियोपॅथीक डॉक्टरांनी घेतले होते. पेशंटची सर्व माहिती फीड केली कि स्क्रीनवर ५-७ औषधांची नावे दिसत असत (ज्यात १-२ नावे प्रत्येक रिझल्ट मध्ये कॉमन असायची), मग त्यांना अजून फिल्टर केल्यावर जी २-३ औषधे शिल्लक राहत ती सर्व किंवा त्यातली एक दोन औषधे ते डॉक्टर रुग्णाला देत असत. अशा पद्धतीने दिली जाणारी औषधे घेऊन किती जणांना गुण यायचा ते देव जाणे पण तुमच्या प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे "ज्याची श्रद्धा आहे त्याने हि उपचार पद्धती जरूर करावी परंतु ती शास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही हि वस्तुस्थिती." हे नक्की!

In reply to by सुबोध खरे

बाप्पू 12/01/2019 - 14:09
डॉक्टर खरे सर. एकदम माझ्या मनातलं बोललात. मला देखील हेच मुद्दे मांडायचे होते पण शब्दांमध्ये बसवता येत नव्हते. पण आपण अगदी योग्य रीतीने समजावून सांगितलेत.

सुबोध खरे 12/01/2019 - 12:05
गवि साहेब आशेचा किरण हा तर एक फार मोठा उपाय आहे. बहुतेक वेळेस रुग्णाला काहीच उपचार नाही (विशेषतः कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला) हे फार क्लेशदायक असतं. अशा वेळेस आधार देणारं कोणीही असला तरी चालतं. मग ते स्वामी बाबा असोत किंवा साबुदाण्याच्या गोळ्या. वरील प्रतिसाद आणि आताच्या प्रतिसादाच्या "मधल्या काळात" माझ्याकडे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या बाई आल्या होत्या दोन वर्षांपूर्वी मीच निदान केलं होतं आणि शल्यक्रिया झाली होती. दुर्दैवाने कर्करोग सर्वत्र पसरला आहे. डॉ हेरूर( कर्करोग तज्ञ) यांनी काही उपचार नाहीत असे सांगितले आहे. आता ते निसर्गोपचार करत आहेत. पण ४ महिन्यात रोग अजूनच पसरला आहे. रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी काही उपाय चालू आहेत, काही वेळेस स्थिती अशी असते कि रुग्णाला काहीच उपचारांची गरज नसते अशा वेळेस पण हे "इतर" उपाय फारच छान लागू पडतात. एक उदाहरण देतो आहे. माझ्या कडे एक कच्छी काका आले होते वय वर्षे ८० राहणार मुंद्रा गावी. मुलाकडे मुंबईत लघवीच्या त्रासासाठी (प्रोस्टेट आहे म्हणून). सोनोग्राफी करताना त्यांना पित्ताशयात खडे आढळले. काकांना पोटाचा काहीही त्रास नाही. पण त्यांच्या मुलाने त्यांची शल्यक्रिया करायची म्हणून आग्रह धरला होता.मी त्या मुलाला सांगायचा प्रयत्न केला कि इतकी वर्षे त्यांना काही त्रास नाही तर उगाच शल्यक्रिया कशासाठी करता? पण मुलाला त्यांच्या फॅमिली डॉक्टरने (इतर पॅथीचा आहे) शल्यक्रिया आवश्यक आहे असे "पटवले"( आर्थिक कारणासाठी). त्यांच्या एका भावाने सांगितले कि आपण त्यांना होमियोपॅथीचे औषध देऊ. काका दोन वर्षे होमियोपॅथी चे औषध घेत आहेत. खडे जसेच्या तसे आहेत पण होमियोपॅथीच्या हळू हळू काम करण्याच्या पध्द्ती वरील विश्वास मुळे काकांची शल्यक्रिया टाळली गेली आहे. आहे कि नाही होमियोपॅथी परिणामकारक.

कंजूस 12/01/2019 - 12:38
ओवर द काउंटर मिळणारी होमिओपथिक औषध स्वस्त आणि मस्त असतात. चारपाच दिवस घेऊन बघायला काय जातं? चाळीसपन्नास रुपयांत काम होतं. दुकानदारास अनुभव असतोच की कोणतं लागू पडतं. ---------------- रुग्णाने उगाच खोलात शिरू नये ,आपला रोग बरा होतोय ना एवढंच पाहात राहावं. ----------- आयुर्वेदात तर रानटी भरमसाठ उगवणाऱ्या वनस्पतीच अधिक गुणकारी असतात.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 12/01/2019 - 13:05
रानटी भरमसाठ उगवणाऱ्या वनस्पतीच अधिक गुणकारी असतात. हे सरसकटी करण आहे आणि धोकादायकही आहे. उत्तराखंडात चरस हि वनस्पती अनेक ठिकाणी उगवलेली दिसते( असे माझी वर्गमैत्रिण सांगते-ती ह्रिषीकेषच्या AIIMS ची अधिष्ठाती DEAN आहे). बाकी धोत्रा, रुई, अफू, कोकेन, कुचला(यात स्ट्रिकनीन असते) या पण रानटी वनस्पतीच आहेत.

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 12/01/2019 - 13:39
एक छोटीशी दुरुस्ती... चरस हि वनस्पती नसून गांज्याच्या झाडांपासून मिळणारे एक बाय-प्रोडक्ट आहे, गांज्याच्या शेतातून तो पदार्थ मिळवण्याची पद्धत फार किळसणी आहे. त्याचे सेवन करणाऱ्यास जर ती आधी समजली तर तो त्यापासून चार हात लांब राहण्याची शक्यता जास्ती आहे :)

In reply to by टर्मीनेटर

नक्की काय किळसवाणी म्हणजे ?
गांज्याच्या शेतातून तो पदार्थ मिळवण्याची पद्धत फार किळसणी आहे. त्याचे सेवन करणाऱ्यास जर ती आधी समजली तर तो त्यापासून चार हात लांब राहण्याची शक्यता जास्ती आहे :)
असे असेल तर कळू देत ना मिपावर. (व्यनि केला तरी चालेल. )

In reply to by टर्मीनेटर

सुबोध खरे 12/01/2019 - 18:08
चरस हे मादक पदार्थाचे नाव असून ते कोणत्या झाडापासून मिळते त्याचे मराठी नाव माहिती नाही. पण कॅनाबिस इंडिका आणि कॅनाबिस सटायव्हा हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. कदाचित भांग असावे (भांगेत तुळस नावाचा वाक्प्रचार प्रचलित आहे)

कंजूस 12/01/2019 - 18:27
बरीच औषधे विषापासूनच तयार होतात. वनसपतींत निरनिराळी विषे असतात. ते लागू होण्यासाठी काही प्रमाण असते. अत्यल्प प्रमाणात ते मात्र उत्तम औषध असते. धोत्रा अफुवगैरे ही पुर्वी दम्यासाठी वापरत आताही त्यातले उपयोगी घटक( सिन्थेटिक ) वापरतात. तयार होमिओपथी औषधं तावून सुलाखूनच बनवलेली असतात. कोणत्या सॅाफ्टवेरची गरज नाही. दुकानात ती लगेच उपलब्ध असतात. लेखाचा विषय हा रुग्णाच्या तसेच शिकलेल्या डॅाक्टरांकडून वेगळा पाहिला जाऊ शकतो. जेव्हा नारु'वर इकडे योग्य औषध माहीत नव्हते तेव्हा काहीजण त्यासाठी एक विडा खायला लावत. त्या विड्यात काय आहे हे सांगितले तर कुणी खाणार नाही. ( ढेकणांचा विडा) ( यावरुनच 'औषधालाही ढेकुण नसणे ही म्हण पडली.)

सुबोध खरे 12/01/2019 - 18:54
ढेकणांचा विडा खाल्ल्याने नारूचा जंत शरीराच्या बाहेर जातो याला कोणताही शास्त्राधार नाही. पूर्वी नारूचा जंत काडीला गुंडाळून ठेवत असत आणि हळूहळू ओढून बाहेर काढत असत. २००० साली भारत देश नारुमुक्त झाला याचे कारण त्या जंताचे शास्त्रीय सृष्ट्या संशोधन होऊन जंताची अंडी कशी पोटात जातात हे शोधून काढून साधा सोपा उपाय म्हणजे पाणी गाळून प्या हा केल्यामुळे झाला. हजारो वर्षे आपल्याकडे असलेल्या "जुन्या" उपचार पद्धतींमुळे नाही

वन 12/01/2019 - 20:31
आस्तिक/नास्तिक, आधुनिक वैद्यक/इतर पद्धती, मराठी माध्यमात शिक्षण/इंग्रजीत, भारतात वास्तव्य/प्रगत देशात, विभक्त/अविभक्त कुटुंब…… या सगळ्या विषयांवर कितीही काथ्याकूट केला तरी विरोधी गटाचे मतपरिवर्तन होत नाही. असो

सुबोध खरे 12/01/2019 - 20:39
बहुसंख्य लोक आपले विचार बदलत नाहीत हि वस्तुस्थिती परंतु आता पर्यंत १७७७ लोकांनी हा लेख वाचला आहे. विचार मंथन चालू आहेच. पण जर लोकांना एक गोष्ट लक्षात आली कि आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्या आजारांना ठोस उपाय आहेत उदा. क्षयरोग अशा वेळेस होमियोपॅथी कडे जाऊ नये हे एका माणसाला जरी कळले आणि त्याने योग्य उपचार करून घेतले तरी या लेखाचा काही तरी उपयोग झाला असे म्हणता येईल. माझ्या कडे एक रुग्ण आला होता त्याला एका होमियोपॅथ ने आपल्यावर करणी केली म्हणून आपले व्यायामाचे शरीर वाळत चालले असे वाटत होते.त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांना क्षयरोग झाला आहे असे निदान केले त्यानंतर त्यांचे उपचार योग्य तर्हेने झाले आणि आता ते रोगमुक्त होऊन त्यांचे वजन सुद्धा वाढून पूर्ववत झाले आहे. मिपा वाचण्याचा कधी तरी काही चांगला परिणाम होतो हे सांगण्यासाठी हा प्रपंच. जगात कोणतीही वस्तू पूर्णपणे निरुपयोगी असत नाही.

बाप्पू 12/01/2019 - 21:42
धाग्यावर 50 प्रतिसाद झाल्याबद्दल होमिओपॅथी च्या समर्थकांना एक एक बाटली साबुदाण्याच्या गोळ्या देऊन सत्कार करण्यात यावा अशी विनंती मी मिपा संपादकांना करून मी या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.. !!!

In reply to by कंजूस

विकास... 13/01/2019 - 14:30
होमीओपॅथी १५००/- प्रथम तपासणी आणि ३००/- दर आठवडा (१२००/- प्रति महिना) जरा महाग वाटतेय हो, स्वस्त असेल कुठे तर व्यनि करा

विकास... 13/01/2019 - 14:24
१५००/- प्रथम तपासणी आणि ३००/- दर आठवडा (१२००/- प्रति महिना) जरा महाग वाटतेय, स्वस्त कुठं असेल तर व्यनि करा (सर्व आकडे रुपये मध्ये)

युयुत्सु 13/01/2019 - 14:58
सर्वात गमतीचा भाग असा की होमिओपथीची पाठ्यपुस्तके हस्तमैथुनाच्या निंदेने भरलेली आहेत. मी एकदा एका होमिओपाथला याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांची भंबेरी उडाली होती.

कंजूस 13/01/2019 - 20:56
महाग ? ओवर द काउंटर तयार फार्मुलेशन्स मिळतात॥ पाचसहा कंपन्यांची त्यांची रोग, नंबर अशी साठ सत्तर औषधे असतात. त्यात आपल्यासाठीचे बघून घ्यायचे. अथवा दुकानदारही देतो. ३० ते २०० रु॥ बहुतेक पंधरा दिवसांत गुण येतो. पुन्हा कन्सल्टिंग नको काही नको. ( तीन दिवसांत काहीच सुधारणा नसेल तर प्रयोग करत बसू नये एवढे तारतम्य बाळगावे, रोग बरा झाला की औषध घेत राहू नये. )

In reply to by कंजूस

गवि 14/01/2019 - 10:12
तुम्ही वरील अनेक प्रतिसादांमध्ये जे उल्लेख केले आहेत त्यावरुन"रोगनिदान" आणि "औषधोपचार" या बाबतीत तुम्ही बिस्किटे, टूथपेस्ट यांप्रमाणे विचार करता आहात असं वाटतं. स्वस्त आणि मस्त, रानटी जास्त गुणकारी, ढेकणाचा विडा, दुकानदारालाच विचारणे.. रोग, आरोग्य ही अशी खेळण्याची वस्तू मानू नये असं मत आहे. औषधं म्हणजे ट्राय करुन बघण्याच्या FMCG वस्तू नव्हेत.

सुबोध खरे 14/01/2019 - 10:03
तीन दिवसांत काहीच सुधारणा नसेल प्रत्यक्ष होमियोपॅथी चा पण दावा नसतो कि त्यांचा थोडासा तरी गुण ३ दिवसात येईल. त्यांची रोग, नंबर अशी साठ सत्तर औषधे असतात. रोग तर अक्षरशः हजारो असतात. त्याचे निदान आपणच करायचे? त्यावर हीच ६०-७० औषधे घ्यायची? म्हणजे तोंड येणे आणि मूळव्याधीला एकच औषध लागू पडते असे होईल का हि शंका वाटते.

कंजूस 14/01/2019 - 11:22
६०-७० औषधे वेगवेगळ्या सामान्य रोगांवर. एकावरच नाही. ---- आपणच जेव्हा आपल्यासाठी उपचार करतो तेव्हा " ठवले्ल्या औषधाचा गुण ३ दिवसात आला नाही" तेव्हा आपले उपद्व्याप गुंडाळायचे. परंतू दहापैकी नऊवेळा गुण येतोच. गुगलून उगाचच वाचन करायचे नाही. शिवाय त्या दुकानदाराचा अनुभव असतोच. तोही उपयोगी पडतो. होमिओपथी पुस्तके वाचून प्रयोग करू नयेत.

सुबोध खरे 14/01/2019 - 11:32
औषधाचा गुण ३ दिवसात दहापैकी नऊवेळा गुण येतोच. यालाच प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. कारण तीन दिवसात होमियोपॅथीच्या तत्वज्ञाना( organon & philosophy) प्रमाणे औषध तीन दिवसात disease process take over करणारच नाही. मग ते बरोबर होणे तर लांबच. शिवाय त्या दुकानदाराचा अनुभव असतोच. हे म्हणजे वर्तमानपत्रात राशी भविष्य पाहून लढाईला जायचं कि नाही ठरवण्यासारखं आहे. ))=((

कंजूस 14/01/2019 - 11:38
>>रोग, आरोग्य ही अशी खेळण्याची वस्तू मानू नये असं मत आहे. ~~>> नाहीच परंतू आताचे रुग्ण डॅाक्टरांवर केस ठोकू लागल्यापासून ते फारच सावध झालेत. त्यांच्या अनुभवांनी ते सोप्या तपासणींत आणि दोनचार दिवसांच्या साध्या औषधाोपचारांत निदान करू शकतात. पण अधिकाधिक पथॅालजी तपासण्या करण्याची परिस्थिती भाग पाडत आहे. पण असे करा नका, तुम्हीच करा असा सर्वसाधारण सर्वांनाच सल्ला देण्याचा हेतू नाही. हे करण्यासाठी होमिओपथी आणि आयुर्वेदिक काढे उत्तम उपाय आहेत. ( एकावेळी एकच औषध फक्त. दोनचार वेगवेगळी औषधं एकाचवेळी कधी घेऊ नयेत. ) रुग्ण स्वत:च जबाबदारी घेऊन पाचसात दिवस सोपी औषधं घेऊ शकतो. सर्वांनाच

युयुत्सु 14/01/2019 - 12:00
What I find most compelling is that this is a book borne out of the professional experience of the author (Harris himself being an orthopedic surgeon) and reflects on the author’s own discovery of the evidence, or lack of thereof, behind his training and expertise. This makes the book a manifesto for science in medicine, in general, and for the use of the scientific method in surgery, in particular.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5981174/

कंजूस 14/01/2019 - 13:16
>>>राशी भविष्य पाहून लढाईला जायचं कि नाही ठरवण्यासारखं आहे.>>> हाहाहा. पण प्रत्यक्ष इतिहासात राजे लोक ज्योतिषींचा सल्ला घेत होतेच. त्यांना स्पेशल ज्योतिषी परवडत असे. आम्हाला नाही परवडत म्हणून कुणा शेजाऱ्याकडून आणलेल्या पेप्रातले राशी भविष्य पाहून ~~~~.

नेत्रेश 14/01/2019 - 13:47
कुठल्या रोगावर होमिओपॅथीची कोणती औषधे घ्यायची हे या वेबसाईटवरुन सहज समजते. LINK डिस्केमर - मी काही होमिओपॅथी चा समर्थक नाही, व कधीही होमिओपॅथीची कोणतीही औषधे घेतली नाहीत.

आपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती आहे. इ.स. १७९६ साली सॅम्युअल हानेमन (Samuel Hahnemann) या जर्मन व्यक्तीने होमिओपॅथीची सुरुवात केली. एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट घटक (उदा. एखादे रसायन) व्याधी तयार करत असेल तर तोच घटक ती व्याधी झालेल्या व्यक्तिला निरोगी बनवू शकते अशी (अजब!) होमिओपॅथीची पहिली समजूत आहे.

आकाशातील भुते

हेमंत ववले ·
भुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही.

पाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला !

डॉ सुहास म्हात्रे ·

mayu4u 30/07/2018 - 14:08
या पाच जणांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे पण! एक्का काका, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) आहे ते. कृपया सम्पादित करा ही न वि.

गामा पैलवान 31/07/2018 - 02:48
डॉक्टर सुहास म्हात्रे, बातमीबद्दल आभार. पाचही सुवर्णपदकधारकांचं अभिनंदन. निकाल इथे आहेत : http://ipho2018.pt/content/exams आ.न., -गा.पै.

गवि 01/08/2018 - 08:41
अभिनंदन. कौतुकास्पद. पुढे कितीजण इथे राहतील माहीत नाही. पण मूळचे भारतीय म्हणून अभिमान राहतोच भारतीयांना.

लिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे !  चमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

माहितगार ·

गामा पैलवान 02/07/2018 - 01:54
माहितगार, या लेखात तुम्ही सनातन म्हणजे अनादि असा काहीसा अर्थ घेतल्याचं जाणवतंय. प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. म्हणून हिंदू धर्माचं अधिकृत नाव सनातन धर्म आहे. आपला देहसुद्धा दर क्षणाक्षणाला नूतनीकृत होत असतो. त्यामुळे देहदेखील सनातनच आहे. जेव्हा तो सनातन रहात नाही तेव्हा त्याला प्रेत म्हणतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 02/07/2018 - 08:14
.....प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. ....
व्यकीशः परंपरवादी असूनही सनातन शब्दास ....प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. .... असा कालसुसंगत नित्यनूतन अर्थ देण्यासाठी आपले मनःपुर्वक आभार :) आता पुस्तक डॉट ऑर्गवरील अद्याप नूतनीकरण होण्याच्या बाकी व्याख्या बघू या
शब्द का अर्थ सनातन : वि० [सं०] [भाव० सनातनता] १. जो आदि अथवा बहुत प्राचीन काल से बराबर चला आ रहा हो। जिसके आदि का समय ज्ञात न हो। जो परंपरानुसार आचार-विचार आदि पर निष्ठा रखता हो। परंपरानिष्ट (आर्थोडाक्स) २. सदा बना रहनेवाला। नित्य। शाश्वत। ३. निश्चल। स्थिर। ४. अनादि और अनंत। पुं० [वि० सनातनी] १. अत्यन्त प्राचीन काल। २. बहुत दिनों से चला आया हुआ व्यवहार क्रम या परम्परा। (विशेषतः धार्मिक आचार, विश्वास आदि के संबंध में) ३. वह जिसे श्राद्ध आदि में भोजन कराना आवश्यक हो। ४. ब्रह्मा। ५. विष्णु। ६. शिव। समानार्थी शब्द- उपलब्ध नहीं सनातन-धर्म : पुं० [सं० मध्यम० स० कर्म० स० वा] १. ऐसा धर्म जो अनादि अथवा बहुत प्राचीन काल से चला आ रहा हो। २. वर्तमान हिंदू धर्म जिसके संबंध में उसके अनुयायियों का विश्वास है कि यह अनादि काल से चला आ रहा है। इसके मुख्य अंग है-बहुत से देवी-देवताओं की उपासना, मूर्ति-पूजा, तीर्थ-यात्रा, श्राद्ध, तर्पण आदि।

In reply to by माहितगार

गामा पैलवान 02/07/2018 - 12:42
माहितगार, शब्दकोशीय व्याख्येने पुरेसं आकलन होत नाही. इथला दुसरा परिच्छेद अधिक प्रकाश पाडते : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8 त्यानुसार सनातन धर्मात सर्व उपास्य देवता समान व एकमेकांच्या भक्त मानल्या आहेत. सांप्रदायिक वैर नाहीसे व्हावे म्हणून काही विद्वानांनी विशेष प्रयत्न केले. याचं फलित म्हणून आज दिसतो तो सर्वसमावेशक सनातन धर्म उत्पन्न झाला. जससा काळ बदलेल त्याप्रमाणे एकेक उपास्य देवतेस महत्त्व येत जाईल. मात्र तरीही सर्व देवता आंतरिक दृष्ट्या समान असल्याने वैदिक एकसत्यवचन सुद्धा अबाधित राहील. अशी ती योजना आहे. म्हणूनंच सनातन म्हणजे काळानुसार बदलणारा धर्म ( = नित्यनूतन ) होय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. म्हणून हिंदू धर्माचं अधिकृत नाव सनातन धर्म आहे.
सनातन याचा हा अर्थ आहे कि अन्वयार्थ? अपौरुषेय अपरिवर्तनीय असे काहीसे तो धर्माचा सनातन अर्थ आपण व्यवहारात वापरतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 02/07/2018 - 12:48
बहुधा अन्वयार्थ , खालील वाक्य बघा
'नित्य नूतन इति सनातन' अर्थात् जो प्राचीनतम होकर भी प्रति क्षण नया है, वही सनातन है संदर्भ
वाक्यातली गुगली लक्षात आली का ? अशी गोष्ट जीला आम्ही काळामुळे जुनी होते असे मानत नाही, म्हणून नित्यासाठी म्हणजे नेहमीसाठी नूतनच आहे. आता नूतनच आहे तर अजून काही नवीन परीवर्तन मागण्याचे कारण आणि संधी रहात नाही. म्हणजे नित्य परिवर्तन होणारे या अर्थाची जागा प्रत्यक्षात परिवर्तनाची गरज नसलेल्या अर्थाने भरली की झाले हि परंपरावादी छद्म युक्ती आहे जी परिवर्तनास नाकारु इच्छिते, विद्येची जागा अविद्येने विज्ञानाची जागा अविज्ञानाने घेण्याची याच्यापेक्षा चांगली क्लृप्ती असू शकत नाही. म्हणूनच ईश्वर निर्मित किंवा पौरुषेय पैकी एक स्विकारण्यापेक्षा अनादी किंवा नेहमी नवेच रहातेवर खपवले की झाले. मानवी बुद्धीतून काय काय भन्नाट कल्पना निघतात, कमाल वाटते एकेकदा. तळटीप : काका कालेलकरांनी सनातन शब्दाची पुरोगामी मांडणी पण केलेली दिसते. 'गती, प्रगती, परिवर्तन, अनुभव , सुधार, प्रयोग, संस्करण ये सब सनातन धर्म के मूल तत्व है . ईस लिए सनातन धर्म नित्य नूतन रहता है. आता काका कालेलकरांच्या अशी व्याख्या करणार्‍या पुस्तकाचेच नाव 'युगानुकूल हिंदू जीवनदृष्टी' असे आहे. काका कालेलकरांप्रमाणे युगानूकुल परिवर्तन मान्य असलेले नित्य नूतन , आदरणीय गा.पै जींना मान्य असल्याचे त्यांनी सुस्पष्ट केले तर काही वाद नाही . आम्ही अशा परिवर्तनाचे अभिनंदन करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. गा.पै. आणि हिंदू परंपरावादी नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ? हा महत्वाचा प्रश्न आहे.

In reply to by कपिलमुनी

माहितगार 02/07/2018 - 13:41
ईतरांनीही लिहावे म्हणजे मेनबोर्डच्या आपोआप खालच्या क्रमांकाला जाते. आपणास ईतर आमच्या नव्या जिलब्यांचा कंटाळा आला असल्यामुळे, आमच्या हम्मामा काव्य संग्रहातून ही जुनी चविष्ठ जिलेबी वाचनार्थ सप्रेम भेट. वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ... * आपल्या मनमोकळ्या प्रतिसादांसाठी अनेक आभार

In reply to by कपिलमुनी

माहितगार 03/07/2018 - 15:07
ओशो म्हणतो ते किती बरोबर आहे . मी तुम्हाला चंद्र दाखवतो आहे तर तुम्ही म्हणताय त्या कडे निर्देश करणारे बोट वाकडे आहे.

Jayant Naik 03/07/2018 - 14:44
या जगात काही अपौरुषेय आहे का ? किवा सारेच अपौरुषेय . जर एखादा ग्रंथ कुणी मनुष्याने लिहिला नाही म्हणून तो अपौरुषेय असे बरेच जण समजतात पण माझ्या मते ते बरोबर नाही . आकाशवाणी झाली किवा परमेश्वराने काही मानवी अवताराला आज्ञा दिल्या त्या कुठल्यातरी शरीराच्या माध्यमातूनच आपल्या पर्यंत पोचतात. असे समजायला हवे कि मनुष्याच्या शरीराचा फक्त मध्यम म्हणून उपयोग करून ज्ञान आपल्या पर्यंत आले त्यात त्या मध्यम म्हणून वापरल्या गेलेल्या शरीराचा काहीच हातभार नसेल तर ते ज्ञान अपौरुषेय . म्हणजे समजणे त्याचे नाही ... त्याला कसे समजले तर परमेश्वराकडून .... मात्र भाषा त्याची कारण त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना समजावे म्हणून. . मेहेर बाबांनी शांततेच्या माध्यमातून ज्ञान संक्रमण करायचा प्रयत्न केला ....काही गुरु शक्ती पात या माध्यमातून ज्ञान संक्रमण करतात . म्हणजे ज्ञान कुठे तरी असतेच ..फक्त त्याचे संक्रमण शरीराच्या माध्यमातून जर होत असेल तर ते ज्ञान अपौरुषेय होय.

गामा पैलवान 03/07/2018 - 17:54
माहितगार,
गा.पै. आणि हिंदू परंपरावादी नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ? हा महत्वाचा प्रश्न आहे.
हो. मी तयार आहे. बाकी, धर्मास नित्यनूतन म्हणवतांना फक्त गुगली शब्दांचे बुडबुडे उडवायचे नसतात. तर त्या नूतनत्वाची नित्याने अनुभूती घ्यायची असते. त्यासाठी साधना असावी/करावी लागते. हिंदू धर्माची चिकित्सा करण्यापूर्वी प्रत्येकाने आपापली साधना तपासून पहावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 03/07/2018 - 21:29
...हिंदू धर्माची चिकित्सा करण्यापूर्वी प्रत्येकाने आपापली साधना तपासून पहावी...
:) जरुर, काका कालेलकर रविम्द्रनाथ टागोर पसायदान विवेकानंद असे मार्गदर्शन असल्यानंतर ते अवघड जाऊ नये .
तर त्या नूतनत्वाची नित्याने अनुभूती घ्यायची असते.
आदर पुर्वक प्रणाम __/\__
...हो. मी तयार आहे.
हिंदूत्वाची ही प्लस बाजू वाटते , तत्तत्वज्ञानाचा आंतर्भूत उदारता सबळ आहे की परंपरावादी अनुयायी सुद्धा परिवर्तनास तयार होतात . आणि इथेच एकेश्वरवाद्यांपासून सकारात्मक फारकत होते. मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार अर्थात धागालेखाचे मुख्य उद्देश्य विज्ञान विषयक प्रश्न विचारला आहे त्या बाबत चर्चा पुढे जावी असे वाटते. ईतर काही धर्मांंच्या ग्रंथपुजेमागील कर्मठतेचे आधार या निमीत्ताने अप्रत्यक्षपणे तपासले जाऊ शकतील अशी आशा आहे.

In reply to by माहितगार

गामा पैलवान 04/07/2018 - 03:01
माहितगार, एक गंमत सांगतो. त्याचं काये की धर्माची चिकित्सा सतत करावी लागतेच. पण त्यात कोणी साधक कमी पडला तरी चालून जातं. कारण की धर्म ही श्रद्धेची बाब आहे. जिकडे चिकित्सा कमी पडते, तिथे श्रद्धेने काम चालवता येतं. शिवाय धर्म ही साधकाची खाजगी बाब असते. खाजगीत थोडं इथेतिथे झालेलं खपून जातं. मात्र विज्ञानात खाजगीपणा शून्य असतो. त्यामुळे विज्ञानवाद्यांची खरी गोची होते. कारण की बऱ्याचशा विज्ञानवाद्यांना विज्ञान कशाशी खातात तेच मुळातून ठाऊक नसतं. असे आकलनशून्य विज्ञानवादी विज्ञानावरच्या विश्वासासाठी इतरांवर अवलंबून असतात. धार्मिक पण साधना नसलेले लोकं जसे श्रद्धेच्या बाबतीत परावलंबी होतात व कुण्यातरी बुवाबापूच्या मागे लागतात. अगदी तस्सेच आकलनशून्य विज्ञानवादी वैज्ञानिक विश्वासांच्या बाबतीत परावलंबी असतात. पण यांना आपल्या विज्ञानवादाची इतकी धुंदी चढलेली असते की यांना आधुनिक विज्ञानातले कूटप्रश्न काय आहेत हेही माहित नसतं. धुंदीचा अंमल इतका जबरदस्त असतो की विज्ञानालाही मर्यादा आहेत याचा विसर पडलेला असतो. वाट चुकलेला सश्रद्ध आणि अज्ञानापायी भरकटलेला विज्ञानवादी दोघेही सारखेच आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by माहितगार

गामा पैलवान 04/07/2018 - 12:20
माहितगार, आत्मन जसा स्वयंभू आहे तसंच ज्ञान स्वयंभू आहे. म्हणून विज्ञानही स्वयंभू आहे. आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 03/07/2018 - 22:39
रिमझिम पाऊस पडे सारखा... या चालीवर. *डॉ. संजय उपाध्ये - : *टिप टिप मेसेज* टिप टिप मेसेज गळे सारखा बोटे फिरती मागे पुढे वेळचवेळ सर्वांकडे गं बाई गेले शहाणे कुणीकडे? सूर्य उगवता पहिला उठतो GM म्हणतो कुणीतरी कुणी पाठवी गुच्छ अचानक हाय हाय करतो कुणीतरी कुणी स्वत:च्या गच्चीमधल्या विविध फुलांचे पाडी सडे वेळचवेळ सर्वांकडे गं बाई गेले शहाणे कुणीकडे? कुणी पाठवी लांबलांब एक लेख कुणाचा? शहाण्याचा ज्ञान स्वत:चे दाखविण्याचा मी छंद ओळखे बहाण्याचा कुणी टोमणे मारून बघतो ग्रुपमधला मग कुणी चिडे वेळचवेळ सर्वांकडे गं बाई गेले शहाणे कुणीकडे? कुणी पाठवी कवितेला नि कुणी धाडतो व्हिडीओला क्लिप पाहता चावट, कोणी मिचकावे काणा डोळा कवी पहिल्याची कविता फिरता कवी दुसरा मग मनी कुढे वेळचवेळ सर्वांकडे गं बाई गेले शहाणे कुणीकडे? इतुके सारे रोज वाचुनी वेड लागते कधी कधी घ्यावे सगळे मोबाइल्स, वाटे फेकून द्यावेत नदी मधी पत्नी म्हणते नको हो तुमचे मग कोण वाचणार काव्य गडे टिप टिप मेसेज गळती सारखे बोटे फिरती मागे पुढे वेळचवेळ सर्वांकडे गं बाई गेले शहाणे कुणीकडे? डॉ . संजय उपाध्ये

हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम

सुधीर कांदळकर ·

एस 14/06/2018 - 20:15
या लेखमालेची उपयुक्तता मोजणे शक्य नाही. अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला. या आणि अशा विषयांवर अजून लिहा. श्रीगणेश लेखमाला ह्याही वर्षी आहेच. तेव्हा त्यासाठीही जरूर लिहा. धन्यवाद.

मंगूजी, डॉक्टर्साहेब आणि एस यांना धन्यवाद. @डॉक्टरसाहेबः नाही. माझ्या व्यवसायात मला जेवढी प्राथमिक माहिती हवी होती तेवढी किंबहुना थोडीशी जास्तच सातोस्कर भांडारकर मध्ये होती. त्यामुळे त्या विषयावरचे दुसरे पुस्तक कधी वाचलेच नाही. इन्डस्ट्रीअल फारमसीचे रेमिन्ग्टन, गुडमन-गिलमन, विश्लेषणाचे गॅरट आणि इतर माहितीसाठी मार्टींडेल आम्हाला जास्त जवळचे होते. लॉरेन्सचा ग्रंथ आकाराने किती मोठा आहे ठाऊक नाही. परंतु आता तुम्ही माझ्या मेंदूत किडा सोडला आहे. मुंबईपुण्याला गेलो की फार मोठे नसेल तर लॉरेन्स नक्की घेऊन येणार आहे. अब चौकात रस्त्यावर मिळेल अशी आशा आहे. नाहीतर मुंबई आहेच. पण किंमतीत न पटल्यास कुठेतरी लायब्ररीमध्ये पाहीन किंवा एखद्या मित्राच्या कंपनीत असले आणि त्यांना नेहमी लागत नसले तर उसने मागून घेईन. असो. अनेक अनेक धन्यवाद.

@ डॉ. कुमार१: नक्कीच डॉक्टरसाहेब. मजा येईल. या विषयाशी माझा संबंध १९९४ साली नोकरी बदलल्यानंतर तुटलाच होता. @ यशोताई धन्यवाद. @ डॉ. सुहास म्हात्रे: धन्यवाद डॉक्टरसाहेब.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ४ दोन मोठे शास्त्रज्ञ पदुआ विद्यापीठाशी निगडित होते. पहिला निकोलाय कोपर्निकस आणि दुसरा गॅलीलीओ.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४

सुधीर कांदळकर ·
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ https://www.misalpav.com/node/42703 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक २ https://www.misalpav.com/node/42705 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ https://www.misalpav.com/node/42744 जसे क्लॉडीअस गॅलेनला टाळता येत नाही तसेच अल राझीला देखील टाळता येत नाही एवढे त्याचे कार्य महान आहे. अल राझी हे एक पर्शियन विचारवंत, गणिती, वैद्य, रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि वैद्यकीय इतिहासातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रात त्याने चिरस्थायी असे विचार देऊन महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.