Skip to main content

विज्ञान

||कोहम्|| भाग 4

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 23/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कोहम् भाग 4 जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील.. पण मग अगदी असंच चित्र तुम्हांला लांडग्यांच्या, म्हशींच्या, हत्तीच्या आणि माकडांच्या कळपातही दिसेल.

||कोहम्|| भाग 3

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 19/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Part 1 Part 2 कोहम् भाग 3 मागच्या भागात आपण होमो या मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेतली आणि त्याच बरोबर त्यांची थोडीशी वैशिष्टही समजून घ्यायचा प्रयत्न केला. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती अशी की या प्रजातींना जरी आपण वेगवेगळ्या स्पिसीज म्हणत असलो तरी याचा अर्थ हा नाही की त्या गाढव आणि घोड्यासारख्या, बऱ्याचश्या मिळत्या-जुळत्या दिसणाऱ्या पण जनुकीय दृष्ट्या पूर्ण वेगळ्या प्रजाती होत्या, आणि असाही नाही की त्या कुत्र्याच्या जातींसारखे फक्त दिसायला वेगळे पण सहजप

||कोहम्|| भाग 2

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 18/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
1856 च्या ऑगस्ट महिन्यात, जर्मनीमधल्या निअंडरथल दरीत काही मजूर काम करत होते, एका चुन्याच्या खाणीत त्यांना काही हाडं सापडली. अशी हाडं सापडण्यात फार विशेष काही नव्हतं पण तरी त्यांनी ती एका स्थानिक अभ्यासकाला दिली.

||कोहम्|| भाग 1

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 15/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा.. वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं.. या महास्फोटानंतर साधारण 3 लाख वर्षांनी, पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात अभिसरण सुरु झालं, या दोन घटकांनी एकमेकांना एका आकृतिबंधात बांधलं, ज्याला आपण ऍटम किंवा अणू म्हणतो. या अणूनी स्वतःला पुन्हा काही विशिष्ट प्रकारे रचून घेतलं, ज्याला आपण आज रेणू म्हणतो.

ट्रिंग ट्रिंग !!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी शुक्रवार, 24/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 12/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

वैज्ञानिक दृष्टीकोण

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 07/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

विज्ञानकथा आहेत का कुठे?

लेखक kool.amol यांनी मंगळवार, 01/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?

इनिग्मा

लेखक आबा यांनी सोमवार, 26/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.

श्रद्धावानांच्या तार्कीक उणीवा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 09/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्‍या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्‍याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्‍यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?