Skip to main content

विज्ञान

आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 05/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story! भारतातील पहिली माध्यमिक शाळा स्तरावरील अंतराळ तंत्रज्ञान एकेडमी सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी कल्पना चावला स्पेस एकेडमी, एडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा येथे एका कार्यशाळेमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. तिथला अभ्यासक्रम आखण्यामध्येही सहभाग घेता आला. विज्ञान, शिक्षण, संशोधन अशा क्षेत्रातील दिग्गजांना ऐकण्याचा व त्यांच्यासोबत संवाद करण्याचा अनुभव मिळाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कल्पना चावलाबद्दल फार माहित नसलेल्या अनेक विशेष गोष्टी कळाल्या.

कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१

लेखक भागो यांनी शुक्रवार, 07/04/2023 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१ ccccccccccccccccccccccccccccccccccccccc ‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल. ““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते. शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

लेखक Bhakti यांनी बुधवार, 22/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 31/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन ✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद ✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton ✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था ✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी ✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश ✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट! ✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन ✪ व

जन्मजात दुखणे येता (३) : ओठ व टाळू

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 28/12/2022 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे गर्भावस्थेच्या चौथ्या ते सातव्या आठवड्यादरम्यान ओठ तयार होतात. किंबहुना या काळातच खऱ्या अर्थाने चेहरा तयार होत असतो. ही प्रक्रिया होत असताना जर संबंधित पेशीसंयोगात काही बिघाड झाले तर बाळाचा वरचा ओठ दुभंगलेला राहतो. ओठाला पडलेली फट काही वेळेस छोटी असते तर अन्य काही वेळेस ती मोठी होऊन थेट नाकात घुसलेली असते. ह्या प्रकारचे दुभंगणे शरीराच्या एका किंवा दोन्ही बाजूंनाही असू शकते.

प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्ण भारतात दिसू शकेल नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी बुधवार, 28/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

भगवद्गीता शांकरभाष्य नमन आणि प्रस्तावना - मराठी भाषांतर

लेखक अभिजीत यांनी रविवार, 08/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.

आद्य शंकराचार्य जयंती - वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (मे ६, २०२२) आद्य शंकराचार्य वेदोक्त अशा अद्वैत मताचे पुरस्कर्ते होत. केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयी (भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे) वर भाष्ये लिहिली, तत्कालीन भारत देशात चार वेळा भ्रमण करून प्रस्थपित असलेली अवैदीक मते खोडून काढली व वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली. वेदकाळापासून सुरू असलेली आचार्य परंपरा, आद्य शंकराचार्यांनी पुढे सुरू ठेवली.

उष्णकटिबंधीय वसंत

लेखक माहितगार यांनी सोमवार, 25/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?