विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही.
(ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.)
पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला. अशाच प्रश्नाची चर्चा कुराणच्या बाबतीत ईस्लामीक ईतिहासात दिसते.
कुराण किंवा ईश्वरादेश अनादी सनातन आहेत म्हटले काय किंवा एकेश्वर निर्मीत काय फरक पडतो ? शेवटी जे आहे तेच कुराण वापरायचे आहेत तर ? पण हा विषय ईस्लामच्या ईतिहासात नवव्या शतकात ईतपत ऐरणीवर आला की ज्यांचे मत कुराण किंवा ईश्वरादेश अनादी सनातन आहेत असे होते त्यांची मिनहा (इन्व्किझीशन) म्हणजे धर्मन्यायिक चौकशी करुन तुरुंगवास दिले गेले.
कुणि कुणाला आणि काय शिक्षा केली ? ईस्वीसन ८२७ मध्ये तत्कालीन (अबासीद) खलिफा -धार्मीक राजप्रमुख- याने 'कुराण ईश्वर निर्मीत आहे' हे तत्व स्विकारुन हे तत्व न मानणार्यांना शिक्षा केल्या. दुसर्या गटाचे (आणि आजही सुन्नी तत्वज्ञानाच्या बहुतेक प्रमुख विचारधारा) मत कुराणमधील ईश्वरादेश सनातन म्हणजे इश्वर आहे तेव्हा पासूनचे अनादी सनातन आहेत. आपल्याकडे हिंदूधर्मिय परंपरावादी आपल्या धर्म परंपरांना सनातन -अनादी म्हणतात तसेच काहीसे. हिंदू धर्मीय परंपरागत धर्माला सनातन म्हणताना अलिखीत परंपरां रुढींचा ही सनातनतेत समावेश होत असावा (चुभूदेघे) . ईस्लामच्या बाबतीत या गटाचे मत कुराण ईश्वरादेश अनादी असल्याचे आहे/ होते. अनादी आहे म्हणण्याचा एक मह्त्वाचा फायदा / उद्देश्य / निहीत-अर्थ कोणतीही परंपरा/ संकेत/ नियम चालत आला आहे तसाच पुढेही चालवावा. नियमांमध्ये अंतर्गत अथवा बाह्य इनकंसिस्टंसी आल्या तर दुर्लक्षीत करता येतात. राजसत्ता न चालवणार्यांना परंपरावाद रेटल्याने बिघडत नाही त्यांचे हित्संबंध शाबुत रहाणार असतात. इनकंसिस्टंसीजना राजसत्तेस तोंड द्यावे लागते तेव्हा नियमात बदल करण्याची व्यावहारीक गरज निर्माण होते. अनादी-सनातनवादी सहज बदल करु देत नाहीत. तत्कालीन खलिफासमोर परंपरावाद्यांना निरस्तकरण्यासाठी कुराण ईश्वर निर्मित आहे की अनादी हा वाद सहज साहाय्यभूत होऊन आला. कुराण ईश्वर निर्मीत आहे म्हटले कि तयार होण्याची वेळ असली पाहीजे आणि कुराण त्या वेळेसाठी योवेळेसाठी, नंतरच्या वेळेसाठी रि इंटरप्रीट करता येईल हे खलिफाला हवे होते आणि परंपरावाद्यांना नको होते. केवळ ईशवरच अनादी असू शकते ईतर काहीच नाही जे लोक कुराण ईश्वरासोबतचे अनादी आहे म्हणतात ते ईश्वराचा शब्द ईश्वरास स्पर्धात्मक ठरवून ईश्वरी शक्ती एका पेक्षा अधिक असल्याचे भासवून , ईश्वर एकच असल्याचा कुराणचा नियम मोडतात असा सिद्धांत मांडून परंपरावाद्यांना खलिफाने आत केले. अर्थात काळाच्या ओघात परंपरावाद्याम्चे प्राबल्य पुन्हा वाढले आणि कुराण अनादी नाही म्हणणार्यांना त्यांनी मोडीत काढले. आणि शरीयामध्ये बदल करता येत नसल्याचे लावून धरले.
ईस्लाम बाहेरच्यांना त्यांचा हा तात्विक विवाद त्यांनी पडद्याच्या मागे सरकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे फारसा माहित नसला तरी लॉजीकली अजूनही प्रॉब्लेमॅटीक असलेला प्रश्न आहे. कारण आजच्या काळात कुणालाही विचारले तर कुराण मधील काही आदेश सरळ सरळ प्रेषित कालीन आहेत त्यांना अनादी कसे म्हणता येईल आणि म्हटले तरी एकेश्वराच्या स्वतःच्या अनादीत्वासोबतचे कसे म्हणता येईल ? असो. ह्या वादाची ओळख मुख्य चर्चा विषयाचा अंदाजा येण्यास साहाय्य व्हावे म्हणून. सोबतच पुस्तकपुजेच्या एका अंधश्रद्धेच्या जोपासनेचा अंदाज आला असेल. या धागा लेखात मला या वादाचे सर्व पैलू कव्हर करता आलेले नाहीत, जिज्ञासूंनी गूगलल्यास अधिक माहिती Is Quran created or uncreated ? असा गूगल सर्च देऊन मिळावी. ईंग्रजी विकिपीडिया लेखातून या वादाच्या सर्व बाजू येत नसल्यातरी अंशीक ओळख होऊ शकते.
तर, या धागा लेख चर्चेचा विषय आहे, विज्ञान (विज्ञान तत्वे) सनातन-अनादी आहेत कि एकेश्वर निर्मीत ? अनादी आहेत असा अर्थ केला तर एकेश्वराला , विज्ञान (विज्ञान तत्वे) स्पर्धा करत को-एक्झीस्ट करते म्हणजे एकेश्वरवादाला अप्रत्येक्ष छेद जातो. किंवा दुसर्या बाजूस विज्ञान तत्वे एकेश्वर निर्मीत आहेत आणि ईश्वर विज्ञानतत्वे बदलू शकतो याचे समर्थन करावे लागते.
या वादात कदाचित अनेकेश्वरवाद्यांना अधिक फ्लेक्झीबीलीटी मिळते. विज्ञानतत्वे एकेश्वराला स्पर्धाकरत कोएक्झीस्ट करतात म्हटले तरी त्यांच्या खिशातले काही जात नाही ते पत्येक विज्ञानतत्वाला ईश्वरी दर्जा देऊ शकतात.
विज्ञान वादी नास्तिक त्यांना विज्ञानतत्वे अनादी असतात हि भूमिका कदाचित लावून धरावी लागेल का ?
तुम्ही कोणत्या पक्षात आहात ? तुम्हाला काय वाटते ?
* मी या लेखात वापरलेल्या ईंग्रजी शब्दांना मराठी शब्द सुचवण्यास हरकत नाही (ह्या लेखा पुरतेच, अन्यथा सहसा माझी हरकत असते हे वे सा न ल.)
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी चर्चा सहभागासाठी आभार.
वाचने
11634
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सनातन = अनादि ?
In reply to सनातन = अनादि ? by गामा पैलवान
.....प्रत्यक्षात सनातन म्हणजे
In reply to .....प्रत्यक्षात सनातन म्हणजे by माहितगार
पुस्तकी अर्थ व व्यावहारिक अर्थ
In reply to सनातन = अनादि ? by गामा पैलवान
प्रत्यक्षात सनातन म्हणजे
In reply to प्रत्यक्षात सनातन म्हणजे by प्रकाश घाटपांडे
नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ?
In reply to नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ? by माहितगार
काका कालेलकरांचा संदर्भ
किति जिलब्या टाकाल ओ
In reply to किति जिलब्या टाकाल ओ by कपिलमुनी
....
In reply to किति जिलब्या टाकाल ओ by कपिलमुनी
ओशो म्हणतो ते किती बरोबर आहे
अपौरुषेय
हो.
In reply to हो. by गामा पैलवान
...हिंदू धर्माची चिकित्सा
In reply to ...हिंदू धर्माची चिकित्सा by माहितगार
गंमत सांगतो ....
In reply to गंमत सांगतो .... by गामा पैलवान
आपले नेमके ऊत्तर काय आहे:?
In reply to आपले नेमके ऊत्तर काय आहे:? by माहितगार
विज्ञान स्वयंभू आहे
डॉ. संजय उपाध्ये
In reply to डॉ. संजय उपाध्ये by चौथा कोनाडा
गल्ली चुकली:? कि भात शिजला