Skip to main content

विज्ञान

द सेकंड स्पार्क - भाग १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 12/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.

डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.

द होल ट्रूथ!

लेखक भागो यांनी बुधवार, 21/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही. “चल, काहीतरी पिऊया.” “नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.” “मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.” दिवस मावळतीला आला होता. आता सुटका नव्हती. पक्या जे काय बोलेल ते ऐकायचे. “पक्या, राजकारण सोडून दुसरं काही बोलणार असशील तर येतो.” “माहिती आहे.” अखेर पक्या मला हॉटेलात घेऊन गेलाच.

चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान

लेखक मार्गी यांनी शनिवार, 03/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार ✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी ✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल ✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील ✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची‌ संधी ✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात.

थोडी गंमत.

लेखक भागो यांनी रविवार, 07/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखा पाहू. खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा तुम्हाला ओळखता येत आहे का. १.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो. २.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू. ३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू हळू वाढतेे (इतरांच्या तुलनेत) . तसेच पहिल्या मजल्यावरची सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल. ४.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन(२) जागतिक हरितक्रांती आणि बोरलॉग

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 23/11/2023 या दिवशी प्रकाशित केले.
एम.एस.स्वामिनाथन भारतात परत आल्यावर भारताने स्वातंत्र्याचे अर्धे दशक पूर्ण केले होते.पंतप्रधान नेहरू यांनी कृषीक्षेत्रातील सर्व वैज्ञानिकांच्या भेटीनन्तर “everything can wait but not Agriculture” मंत्र देऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपोषी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.ब्रिटीश काळापासून सक्तीच्या कापूस ,नीळ यांची लागवड ,हवामान बदल इत्यादी गोष्टींमुळे भारत अजूनही दुष्काळाचा सामना करत होता.त्यामुळे अन्न धान्य आयात करावे लागे.भारताला “जहाजाच्या अन्नावर जगणारा देश –Ship to Mouth”, “Bowl Begging” असे म्हटले जात असे.

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 13/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन (१)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 30/09/2023 या दिवशी प्रकाशित केले.
A भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि जगाला 'झिरो हंगर' या परिस्थितीत आणणारे डॉ.