"ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टाकावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची, प्रेमात पडण्याची क्षमता, असणं त्या क्षमतेला काय म्हणावं.?"
सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहीणी.प्रत्येकाची वागण्याची तर्हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली. आपल्या संसारात ती सुखी होती.उषा तशी दिसायला चांगली.बॉलीवूडमधे नाचाच्या कोरसमधे मिळणार्या कामात समाधान रहायची.