मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

ढकलपत्रे....

अरुण मनोहर ·
लेखनप्रकार
ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल. स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका. मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा ! ------------------ कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार? ------------ आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर--> ..................................... काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे. त्यामुळे आता देखील, 'Window' म्हणजे स्क्रीन वरील एक 'खिडकी' च आहे.

देव म्हणावे कोणाला ?

मयुरMK ·
लेखनविषय:
पट्वुनी सांगा आम्हाला देव आम्ही म्हणावे कुणाला ? या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला भेटला कधी आहे का तो तुम्हाला....? देव दगडात असे की मुर्तीत वसे आहे का माहित, रूप तयाचे कसे ? उगीच का मग सजविता देव्हार्याला ? देव म्हणजे आहेत कुणी ते ? स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला .... असेल जर तो या जगती यावे तयाने या नजरेपुढती साद असे ही आमची त्या दैवाला असता मनी खरी भक्तिभावना करावी माणूसकीची आराधना जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद ·
काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

लालवानी... विजय लालवानी

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लालवानी... विजय लालवानी माझा बॉस होता, मी एवरेस्ट ब्रँड सोल्युशन्स मध्ये जेव्हा रुजू झालो, काही महिन्यांतच विजयच्या ग्रुप मध्ये शिफ्ट झालो. एक नम्बर बोलबच्चन! रेतीला ही सोन्याच्या भावात विकण्या इतपत तगडा आत्मविश्वास... आणि त्यात कमालीचा खडूस! माझी पहिली वाहिली नोकरी, २००५ची वेळ... एवरेस्ट ब्रँड सोल्युशन प्रा.लि. मुंबई. तिथे रुजू झाल्या नंतर ६महिन्यांनी प्रभादेवीच्या कार्यालयातून जेव्हा आम्ही नवीन सांताक्रूझच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत झालो तेव्हा त्याला बंद खोली असलेली स्वतंत्र खोली मिळाली आणि त्याला आमच्या दंग्यापासून सुटका मिळाली!

बोर्डरूम ड्रामा...

सुहास झेले ·
लेखनप्रकार
हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात.

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे... कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो, जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०...

स्पर्श.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.” आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत. आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं. लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्‍या वार्‍याच्या झुळकीबरोबर,देठापासून तु

२२-११-२०१५.....नुलकरां बरोबर ओरिगामी कट्टा...पुणे...

मुक्त विहारि ·
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे. वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५. काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही. प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

हुश्शार छोकरी

शिव कन्या ·
हुश्शार छोकरी [म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.] आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’ राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले, ‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’ ‘होय, महाराज! आहेच ती!’ राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने.