बोर्डरूम ड्रामा...
त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली. राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.
- राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे.... सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.
- त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
- राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.
- १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
- इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.
- आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
- ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.
- ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
- राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही.मोठी चुक. जो व्यक्ती इतर मोठे प्लेअर्स मैदानात असताना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन फंडींग मिळवतो आणी यशस्वी पदार्पण करतो तो इतकी अविवेकी चाल कशी काय निवडु शकतो ? स्पर्धात्मक जग म्हणजे काय एखादे अप्रसीध्द इंग्रजी भाषीक संस्थळ न्हवे जिथे सगळे झेक-जर्म-आयरीश-नायजेरीअन महामुर्ख *पादक नेमलेले असावेत अन सामान्यांच्या हाती काही पर्यायच ठेवलेले असु नयेत ?
In reply to मला एक समजलं नाहीये. हाउसिंग by आदूबाळ
In reply to मला एक समजलं नाहीये. हाउसिंग by आदूबाळ
In reply to बहुतांश पैसा हा अ by भाऊंचे भाऊ
In reply to पूरक कंपन्या विकत घ्यायचं एक by आदूबाळ
पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का?चैन जोपर्यंत ऑफीस गॅरेजमधे आहे तोपर्यंतच झेपत नाही. एकदा फंडीग मिळाले की... फक्त स्पर्धेत टीकणे हेच ध्येय उरते.
जाहिरातीला एवढा खर्च ?होय. जाहीरात म्हणजे ब्रोशर छापणे, फ्लेक्स उभारणे न्हवे तर टॉपचे लोकं साइन करुन त्या अॅड आइअपीएलच्या प्रत्येक ओवरनंतर प्रसारीत करणे. संस्थळ वापर चालु असताना विवीध बॅनरच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समोर येणे वगैरे वगैरे खर्चीक प्रकरण आहे. तरीही रक्कम बरीच वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे रुपयाचे डॉलरमधील उपलब्ध्द होणारे मुल्य. हे झाले एका देशाचे अर्थकारण. अर्थात तुम्हाला फक्त भारत न्हवे तर सोबत आख्खा एशीया ताब्यात घ्यायचा आहे, तिथे ऑफीस टाकावेच लागेल (कायदेशीर बाब म्हणून) तर हो ७०० कोटीचे फंडींग १० वर्षांसाठी हवेच जर गुंतवणुकदाराला कंपनीत अपेक्षीत हिस्सा हवा असेल तर ही रक्क अतिशय योग्य आहे.
In reply to पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार by भाऊंचे भाऊ
In reply to बरेचदा अनेकांचा स्टार्टप by भाऊंचे भाऊ
In reply to प्रतिसाद आवडला.. एक विस्तृत by संदीप डांगे
In reply to मला एक समजलं नाहीये. हाउसिंग by आदूबाळ
In reply to "जुनून"नावाच्या हिंदी मालिकेत by कंजूस
In reply to जुनूनपेक्षा स्वाभिमान by श्रीरंग_जोशी
In reply to जुनूनपेक्षा स्वाभिमान by श्रीरंग_जोशी
In reply to त्याच्या आधी आलेल्या by बोका-ए-आझम
In reply to जुनूनपेक्षा स्वाभिमान by श्रीरंग_जोशी
In reply to विषय अतिशय नाविन्यपूर्ण व by संदीप डांगे
विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला.सहमत. संदीपरावाचे लक्ष पोर्टलवर होते. तिथली झ्गमग पाह्यलीय त्यांनी. मी हाउसिंगचे प्रिंट कॅम्पेनिंग पाहूनच चाट पडलो होतो. एकाच वेळी सगळ्या लीडिंग पेपरला फुल्ल फ्रंट पेज. ती पण अगदी कुतूहल वाढवणारी. जबर एन्ट्री होती ती. त्याच वेळी होर्डिंग्ज, डीस्प्लेज अन बॅनर्स पण अशाच राक्षसी आकारात अन संख्येने झळकत होते. सगळीकडे तो अप्वर्ड अॅरो पाहून अन हॅशटॅग पाहून पहिल्यांदा बर्याच जणांना कळले नाही. पाण ह्या कॅम्पेनवर केलेला खर्च अफाट अचाट होता हे नक्की.
In reply to विषय अतिशय नाविन्यपूर्ण व by अभ्या..
In reply to विषय अतिशय नाविन्यपूर्ण व by अभ्या..
In reply to हाउसिंगचं 'कॅम्पेन डिझाईन' by संदीप डांगे
जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होतीदॅट्स ईट. अवांतर माझे १०बाय १०: होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.
In reply to जाहिरातींवर इतका खर्च by अभ्या..
होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.मग वाट काय बघताय राव... होऊ दे खर्च. तसेही भारतीय जाहिरातजगताबद्दल फार मौल्यवान पुस्तके नाहीत. जी आहेत ती आर्मचेअर अॅक्टीविस्टसची आहेत. तुझ्यासारख्या ग्राउंडचा अनुभव असणारं कुणीच नाही. इंग्रजी-मराठी दोन्ही छापू, हाय काय नाय काय.
In reply to होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० by संदीप डांगे
In reply to पीयूष पांडेंचं आलंय आता. by बोका-ए-आझम
In reply to बघूया... पियुष पांडेचं by संदीप डांगे
In reply to बापरे! by पैसा
छान लेख.