देव म्हणावे कोणाला ?
लेखनविषय:
पट्वुनी सांगा आम्हाला
देव आम्ही म्हणावे कुणाला ?
या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला
नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला
भेटला कधी आहे का तो तुम्हाला....?
देव दगडात असे की मुर्तीत वसे
आहे का माहित, रूप तयाचे कसे ?
उगीच का मग सजविता देव्हार्याला ?
देव म्हणजे आहेत कुणी ते ?
स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे
प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला ....
असेल जर तो या जगती
यावे तयाने या नजरेपुढती
साद असे ही आमची त्या दैवाला
असता मनी खरी भक्तिभावना
करावी माणूसकीची आराधना
जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....
वाचने
3671
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला...माणूसकी एक मानवी मनाची एक सपशेल अंधश्रध्दा.
माणुसकी बद्दल तुमची काय व्याख्या आहे भाऊ
In reply to माणुसकी by मयुरMK
माणुसकी नामक कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व निसर्ग(नीयम अथवा विज्ञान) मानत नाही. म्हणून असे काही अस्तित्वात आहे असे जाणणे मनाचा सर्वात मोठा भ्रम होय. ही अंधश्रध्दा जोपर्यंत टाकुन दिली जात नाही तोपर्यंत कोणीही व्यक्ती कदापी विज्ञाननीश्ट बनु शकत नाही. अशाना स्वमतांध दांभीकच गणावे लागेल.
माणुसकी ही संपुर्ण दैवी/ अध्यात्मीक बाब आहे. विज्ञानात याला कोणताही थारा नाही असेल तर फट्टाकन बाप दावा नैतर श्राध्दा घाला बरे ? म्हणजेच रेफरंस द्या म्हणतो मी.
माणुसकी ही एक प्रथा श्रद्धा अंधश्रद्धा किव्हा दैवी अध्यातिमिक बाब नाही.
ही एक भावना आहे ती दाखवू नाही शकत व्यक्त करू शकतो
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात
असो जशी दृष्टी तशी सृष्टि . धन्यवाद भाऊ
In reply to माझे विचार वेगळे by मयुरMK
ही एक भावना आहे ती दाखवू नाही शकत व्यक्त करू शकतोदेव ही एक शक्ती आहे जी दाखवुन देउ शकत नाही पण चराचरातुन व्यक्त होत आहे. ते तुम्हाला समजत नाही ?
In reply to ही एक भावना आहे ती दाखवू नाही by भाऊंचे भाऊ
सणसणीत चपराक दिलीत बाहुबली भौ!!! लेखकाला समज येईल अशी आशा आहे.
In reply to सणसणीत चपराक दिलीत बाहुबली भौ by मांत्रिक
अॉ!!!
बाहुबली??
अच्चं कच्चं जालं?
Liberty, equality, fraternity are only worlds loudly proclaimed but never yet put into practice, and they cannot be put into practice so long as men remain what they are, ruled by their ego and all its desires instead of being ruled only by the One Supreme and supremely Divine.
-- Mirra Alfassa (The Mother - the spiritual collaborator of Sri Aurobindo)
In reply to हम्म by मूकवाचक
सुंदर!!!
क्लासच्च!!!
धन्स मूवासाहेब!!!
भाऊ तुमच्या प्रश्न चिन्हात माझ उत्तर आहे असो . मी एवढा हुशार किव्हा कोणी ज्ञानी हि नाही मी जास्त जग हि पाहिलं नाही तुमच्यापेक्षा लहान असेल एवढी खात्री . धन्यवाद माहिती बद्दल
विडंबन केले तर चालेले?
कारण विदाम्बानात देव ह्या जागी दुसरा शब्द टाकावा लागणार आहे
In reply to विडंबन केले तर चालेले? by सागरकदम
सागर कदम, विडंबन करण्याआधी तुम्ही मूळ कवीची परवानगी विचारता हे वाचून इथे अजून सुसंस्कृतपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय आला.समकालीन विडंबक यापासून प्रेरणा (पेर्ना नव्हे) घेतील हीच तुकोबा न् माऊली चरणी प्रार्थना.
हरकत नाही. पण विडंबनातुन सुद्धा चांगला अर्थ निघाव एवढीच अपेक्षा. धन्यवाद
In reply to हरकत by मयुरMK
@पण विडंबनातुन सुद्धा चांगला अर्थ निघाव एवढीच अपेक्षा. धन्यवाद>> ह्या ह्या ह्या ह्या!!!!
सत्यनारायणाच्या प्रदासाची केलि रवा इडली
आणि त्यात ह्यांची चव गोडात अडकून पडली
वैधानिक इशारा:- सदर संस्थळा वर मऊ मणाच्या लोकांनी मण कड़क करुण रहावे!
खुप सुंदर ... भारतीयांमध्ये असलेली माणुसकी ही भारतीयांची जगात वेगळी ओळख आहे . जर अंधश्रद्धाच ठेवायची असेल तर ती देव भुतांचवर न ठेवता माणुसकीवर ठेवलेली केव्हाही चांगलीच
In reply to खुप सुंदर ... भारतीयांमध्ये by माहीराज
भारतीयांमध्ये असलेली माणुसकी ही भारतीयांची जगात वेगळी ओळख आहेफार चुकीचे वाक्य आहे हे...
धन्यवाद माहीराज
जिंका माणूसकीला, देव माना