मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणखी काय हवं?

Pratham ·

राघव 15/10/2020 - 19:20
सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉

मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

टंकबोली

प्रकाश घाटपांडे ·

चौथा कोनाडा 02/09/2020 - 13:01
तुमच्या सारखे अनेक टंकलेखक येतात अन जातात. त्या अल्पकाळात त्याची जी टंकलेखनातून व वाचकांच्या आकलनातून प्रतिमा बनते ती फार विचारपुर्वक बनलेली नसते. पण त्याचे आकलन लेखकाला होत नाही
.
कधी कधी वाचकांची दुखरी नस छेडली जाते मग तुमचे कृष्णचित्र त्याच्या मनात तयार होते. वाचक हा प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देत नसतो. पण त्याचा मानवी संबंधांवर परिणाम होत असतो. मग त्याची लाभ किंवा हानी लेखकाच्या वाट्याला येते. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बजवताना अपरिहार्य बनते.
अतिशय मार्मिक मांडणी ! +१

बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.

आली आली गौराई

महासंग्राम ·

Bhakti 25/08/2020 - 22:51
बऱ्याच घरात वंशपरंपरागत चालत आलेले पितळेचे मुखवटे असतात, हल्लीच पिओपी चे मुखवटे मिळतात पण त्या पितळेच्या मुखवट्याना असलेलं तेज निराळंच असतं. *आमच्याकडे मातीचे सुगड ओईल पेंटने रंगवलेले आहेत.६० वर्षांहून जूने, अजूनही अनोखे! *गोष्ट माहित नव्हती.ती समजली.मस्त!

श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

अनुष्टुप छंद - सोपा करून सांगायचा प्रयत्न

धष्टपुष्ट ·

निनाद 07/08/2020 - 19:16
इतक्या सुलभतेने उलगडून उदाहरणासहीत समजावून दिल्याने खरोखरच हा छंद समजायला मदत झाली. गोष्टी सोप्या करण्याची हातोटी आहे तुमच्याकडे! अनेकानेक धन्यवाद!

In reply to by निनाद

धष्टपुष्ट 07/08/2020 - 23:59
अनुष्टुप छंद किंवा श्लोक याची उदाहरणं बहुशः संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. आधीच बर्‍याच लोकांची लघु-गुरुमध्ये गल्लत होते, वरून अनेकांना संस्कृतची भीती, म्हणून भगवद्गीतेची उदाहरणं घेतली नाहीत. प्राकृतात असलेली सोपी उदाहरणं का वापरू नयेत अशा विचारानं हे लिहिलं. खरंतर विनोबांच्या गीताई मध्ये पण खूप रसाळ उदाहरणं आहेत. पण काही लघु अक्षरं उच्चारताना लांबवल्यामुळे गुरू म्हणून वापरली जातात अशी जास्तीची गुंतागुंत आहे. म्हणून भीमरूपी मधली सोपी उदाहरणं घेतली. पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता । या गीताईमधल्या उदाहरणामध्ये तेज हा शब्द तेजऽ असा लांबवल्यामुळे ज हे अक्षर गुरु बनते. याचा खुलासा करता करता लेख आटोपशीर राहिला नसता.

रामदासस्वामींबद्दलचा आदर शतगुणित झाला. मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तात तर आणि ह्या लेखावरुन समजले कि भीमरुपी स्तोत्र अनुष्टुभ छंदात लिहिले आहे त्यांनी. लेख आवडलाच हे.वे.सां.न.ल.

In reply to by कानडाऊ योगेशु

धष्टपुष्ट 07/08/2020 - 23:38
"न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते" अशी गण लक्षात ठेवायची ओळ आहे. करुणाष्टकांच्या चालीवरच म्हणायची हे उघडच आहे. पहिली सहा-सात अक्षरे ओळीने लघु असली पाहिजेत या अटीमुळे मालिनी वृत्तामध्ये लिहिणे अजून अवघड आहे.

In reply to by धष्टपुष्ट

अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदीन दयाळा नीरसी मोहमाया संतकवींच्या प्रतिभेने अगदी दिग्मूढ व्ह्यायला होते.!

In reply to by कानडाऊ योगेशु

संतकवींच्या प्रतिभेने अगदी दिग्मूढ व्ह्यायला होते.!
सहमत.. काव्य असलं पाहिजे, यमक, गेयता असली पाहिजे, अर्थ असला पाहिजे, भाव असला पाहिजे, आणि एवढं सांभाळून त्यात एका अक्षराची चूक होऊ न देता वृत्त असलं पाहिजे!! कमाल!

चित्रगुप्त 08/08/2020 - 01:50
@धष्टपुष्ट: मराठी साहित्यात जास्त प्रचलित असणार्‍या इतर अनेक वॄत्तांबद्दल अवश्य लिहावे. वाचणाराला अजिबात काही माहिती नाही असे समजून सर्वात आधी एक परिचयात्मक लेख लिहून पुढे एकेका वॄत्ताबद्दल लिहीले तर जास्त उपयोगी होईल. माझ्यासारखे या विषयात रस असणारे, पण प्रत्यक्षात त्यातले फारसे कळत नसणारे अनेक जिज्ञासू इथे असतील, अशी खात्री आहे. तसेच वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत, समर्थ रामदास इत्यादींच्या काव्याबद्दल सोदाहरण रसग्ररहणात्मक लेखही नक्की लिहा. पुढील लेखनाबद्दल अनेक शुभेच्छा.

प्रत्येक चरणामध्ये आठ अक्षरे असतात, पण नेहमीच्या वापरामध्ये आपण दोन चरण एकत्र करून सोळा अक्षरांची एक ओळ घेतो. म्हणजेच वरचा आकृतिबंध असा दिसू शकतो- XXXX लगागागा XXXX लगालगा {1} XXXX लगागागा XXXX लगालगा {2} वरचा आकृतीबंध > १. (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा २. (गालगागा) लगागागा, (गागागागा) लगालगा ३. (गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा ४. (ललगाल) लगागागा, (गालगाल) लगालगा कुठेच फॉलो होतांना दिसत नाही, फक्त लगालगा शेवटी येतंय. का हे समजून घेण्याचा काही वेगळा प्रकार आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

धष्टपुष्ट 08/08/2020 - 08:20
खाली फोड करून दोन उदाहरणे देतोय. (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा मनासीटा किलेमागे, गतीसीतु लनानसे (गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा आरक्तदे खिलेडोळा, ग्रासिलेसू र्यमंडळा

In reply to by धष्टपुष्ट

पण हा पॅटर्न > XXXX लगागागा XXXX लगालगा {1} XXXX लगागागा XXXX लगालगा {2} कुठे येतो ? ल आणि गा च्या जागा बदलत जातात तुमचा प्रतिसाद बघा : (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा १. ऑर्डरमधे लगालगा ऐवजी लगागागा आलंय, २. अंडर लाईन केलेला क्रम कुठेही नाही

In reply to by संजय क्षीरसागर

धष्टपुष्ट 08/08/2020 - 10:33
लनानसे हे लगालगा असंच आहे ना. आणि गतीसीतु हे पण लगागाल असंच आहे की. कुठेतरी आपल्या तारा जुळत नाहीयेत काय? :)

In reply to by धष्टपुष्ट

१. लनानसे हे लगालगा असंच आहे ना > हे बरोबरे पण २. गतीसीतु हे पण लगागाल असंच आहे की > हा लगागाल प्रकार लगागागा लगालगा {1} लगागागा लगालगा {2} यात कुठेच नाही शिवाय ते वरील क्रमानंच यायला हवं ना ?

In reply to by संजय क्षीरसागर

धष्टपुष्ट 08/08/2020 - 13:48
XXXX लगागागा XXXX लगालगा. जिथे XXXX असं लिहिलं आहे, तिथे लघु गुरुची कुठलीही चार अक्षरी योजना करता येते. ललगाल, लगागागा, लगागाल, गागालगा, गालगागा असलं काही पण चालतं. त्याचे वेगवेगळे पर्याय कंसामध्ये लिहिले आहेत, आणि या पर्यायांची भीमरूपी मधली उदाहरणं दिली आहेत. आता पहा बरं?

In reply to by धष्टपुष्ट

अनुष्टुप छंदात अशी अक्षर योजना असायला हवी : १,२,३,४ > काहीही ५,६,७,८ > लगागागा ९,१०,११,१२ > काहीही १३,१४,१५,१६ >लगालगा बरोबर ना ? हे स्वप्न की हसे तीचा चेहरा, चैनना मला

Gk 08/08/2020 - 20:29
अनुष्टुभ छंद हा मात्रा छंद आहे की केवळ अक्षर संख्या छंद ? माझ्या मते , अनुष्टुभ छंद अन मात्राचा काही संबंध नाही , 8 वर्ण / अक्षरे घेऊन 4 चरण रचले की अनुष्टुभ छंद होतो. म्हणजे टोटल 32 अक्षरे अनुष्टुभ हा छंद वाल्मिकी ऋषींनी सर्व प्रथम वापरला मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।। 8 , 8 , 8 , 8 त्या आधी तो वापरायची पद्धत नव्हती, पण तरीही एका वेगळ्या रुपात तो ऋग्वेदापासून वापरला आहे , तो म्हणजे गायत्री छंद , ज्यात गायत्री मंत्र आहे , यात 8 , 8 , 8 अशा तीनच ओळी असतात ,लिहिताना 3 ओळी , पण प्रत्यक्ष यज्ञ कर्मात तीन ओळी मुख्य ऋषीने म्हटल्या की शेवटची ओळ संपूर्ण टीम पुन्हा म्हणत असे म्हणजे लिहिताना 8,8,8 आणि म्हणताना 8,8,8,8 पण असा 8बाय 4 चा एक नवा छंद वापरून त्यातही काही लिहावे , ही प्रथा नव्हती , म्हणूनच ऋग्वेदात गायत्री छंद विपुल आहे , पण अनुष्टुभ छंद फारसा नाही, वाल्मीकीच्या स्फुरण्याने तो सर्वप्रथम अस्तित्वात आला आणि त्यामुळेच ऋग्वेदातील अनुष्टुभ ऋचा ह्या प्रक्षिप्त किंवा अर्वाचीन मानतात तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ( मूळचा ऋग्वेदातील गायत्री मंत्र इतकाच आहे, ते ओम वगैरे नंतर लावले आहे) हा गायत्री छंद , 7,8,8 ( 7 अपवादात्मक आहे, त्यामुळे काही लोक म्हणताना हलकेसे र्वरेSण्यं - रे लांबवून म्हणतात , युपी बिहार वाले हिंदीवाले तर सरळसरळ वरेणियम् म्हणतात , शेवटच्या ओळीतील पाय मोडकी अर्धा त मोजायची पद्धत नव्हती , म्हणून तेही चरण 8 चे) शेवटची ओळ पुन्हा रिपीट केली की , तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् हे भीमरूपीच्या चालीत बसेल. दुसरे उदाहरण , ऋग्वेद पहिली ऋचा अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ हा गायत्री छंद 8 , 8 , 8 म्हणताना तिसरी ओळ रिपीट करून 8 , 8,8,8 केलेत की तोच अनुष्टुभ छंद होईल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय // हापण टिपिकल अनुष्टुभ छंद आहे वर म्हटले तसे गायत्री छंदात एखाद दुसरे अक्षर / मात्रा कमी जास्त असले तर त्या छंदानाही निचृद्-गायत्री छंद वगैरे नावे आहेत , पण ते गायत्रीचेच प्रकार मानतात , गायत्री मंत्र खरे तर ह्यात येतो , पण पहिले चरण ओढूनताणून ते गायत्रीत 'बसवतात'

In reply to by Gk

या अँगलनं पण बघायला हवं. तुम्हाला मोगा खान वगैरे म्हणणार्‍यांनी हा प्रतिसाद आवर्जून वाचायला हवा.

In reply to by Gk

धष्टपुष्ट 09/08/2020 - 10:00
तपशीलवार प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अनुष्टुप हा छंद आहे आणि वृत्त नाही. वृत्तामध्ये अक्षरगणवृत्त (बंधाग्रही) आणि मात्रावृत्त (थोडा अधिक लवचिक) असे प्रकार असतात, पण माझ्या माहितीप्रमाणे छंद वृत्तापेक्षा अधिक लवचिक असतो. म्हणून ओवी हा एक छंद प्रकार आहे, वृत्त नाही. मला गायत्री आणि त्रिष्टुभ याबद्दल जिज्ञासा आहे; ज्ञान नाही. अनुष्टुभ छंदाचा आकृतिबंध (XXXX लगगागा XXXX लगालगा, XXXX लगगागा XXXX लगालगा) वरकरणी पाहता गायत्री छंदाची शेवटची ओळ पुन्हा गायली असता अनुष्टुभ बनेल असे वाटत नाही. तुम्ही दिलेलं उदाहरण भीमरुपी चालीत मला म्हणता आलं नाही. त्रिष्टुभ व गायत्री या छंदांबद्दल अजून खुलासा करता येईल काय? चर्चेमध्ये खोली आणि रंग आणल्याबद्दल धन्यवाद. वेगळा विषय - कोणाला आर्या वृत्ताची चाल माहिती आहे काय?

In reply to by धष्टपुष्ट

Gk 09/08/2020 - 12:22
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ होतारं रत्नधातमम् ॥ भीमरूपीच्या चालीत म्हणून बघा. गायत्री छंदात गायत्री मंत्र आहे , त्याची निर्मिती महर्षी विश्वामित्र ऋषींनी केली असे म्हणतात , सकाळी नदीवर सूर्याला पाहून त्यांना गायत्री मंत्र स्फुरला

जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे. परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो- श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्। द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.

घाव.....गजलेमधून

तिरकीट ·

मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत
एक्झ्याटली पर्फेक्ट!
उणीपुरी सोळा वर्षांची नजर तुझी बा त्यातही खोटे, क्रूर, निर्दयी गाव कशाला?
हे आणि वर... वाढीवपणा नवगजलकारांचा! असो, ही गजल आवडली! :) सं - दी - प

मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 23/07/2020 - 15:00
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या. • त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. अलंकार (६ अक्षरी) शेवटी ल २. कसेतरी (६) ड ३. प्राण्याचा आवाज (६) व ४. हिशेब (७) त ५. शोधक अधिकारी (६) स ६. थकीत देणे (६) की ७. माळा (४) ना ८. हात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. .........................................

In reply to by हेमंतकुमार

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:13
९ वा शब्द "बदनामी" असावा असे वाटले कारण , हिंट "कुप्रसिद्धी " ही इकारत्मक होती. आणि मी , "मि" पासुन शब्द शोधत बसलो . तसेच हा "अलंकार" भाषेशी संबधीत आहे का आभूषणाशी ते समजत नव्हते

हेमंतकुमार 24/07/2020 - 17:08
ल **** ड असा आहे ना ... समजा, आपण त्याचे दोन समान हिस्से केले आणि ते दोन्ही लागोपाठ म्हणू लागलो, तर आपला उच्चारगोंधळ होऊ लागेल !

हेमंतकुमार 25/07/2020 - 12:30
तपासनवीस >> नाही. तुम्ही हा कोशात पाहिलाय का ? ..... अंत्य 'नीस' च आहे.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 25/07/2020 - 20:20
अवांतर : कुमारेक, फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत. त्यांना इस्लामिक म्हणणं कितपत सार्थ? त्यातूनही जर यांना इस्लामिक म्हंटलं तर मग त्या ख्रिश्चन भाषाही होतात. कारण ईसाई पंथ उगम पावला तो अरबस्थानात व किमान एक शाखा तरी वाढली ती पर्शियात. आ.न., -गा.पै.

हेमंतकुमार 25/07/2020 - 20:25
फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत >>> माहितीसाठी धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 25/07/2020 - 22:31
कुमारेक, तजकर हा भाग तस्कर वरून आलेला वाटतो. तर नीस हा प्रत्यय फारसी आहे. हा मिश्र शब्द दिसतो, उदा. दखलपात्र सारखा. आ.न., -गा.पै.

हेमंतकुमार 26/07/2020 - 12:00
४. अरबी उगम ७. घरातील नकोशा वस्तूंची जागा ८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ९. हिंदी उगम

गामा पैलवान 26/07/2020 - 12:15
३. प्राण्याचा आवाज (६) व ==> डरकाळीरव एका प्राण्याचा आवाज असं धरलं तरंच उपरोक्त उत्तर लागू पडेल. -गा.पै.

In reply to by आवडाबाई

हेमंतकुमार 27/07/2020 - 08:02
नालसाहेब : पंजा; मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात.

हेमंतकुमार 26/07/2020 - 18:58
अखेर हा ३ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला. सर्व छान खेळले. आवडाबाई = सचिन/विराट ! एकहाती ! म मा यांचा विजयी चौकार ! बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य. डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू . धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

आवडाबाई 26/07/2020 - 21:56
... तरी मजा आली खरच डोक्याला खुराक मिळाला आणि तो भरपूर दिवस पुरला ह्या सगळ्या शब्दांसोबत अजून कितिक शब्द डोळ्याखालून गेले

हेमंतकुमार 29/07/2020 - 18:23
विषय : शिक्षणशास्त्र खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे: १. शब्दाची अक्षरसंख्या आणि २. त्या शब्दातील तिसरे अक्षर. काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील अक्षरसंख्या व तिसरे अक्षर ताडून पाहावे. . ............................................................................ प्रश्न: १. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, त्रि) २. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) .....................................................

गामा पैलवान 29/07/2020 - 20:23
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ==> दृकश्राव्यपद्धती ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ==> उपदेशन ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ==> ? ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ==> ज्ञानवर्धनकारी ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ==> बुद्धीमापन ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ==> मनुष्यविकासखाते (पण आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललंय) ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ==> महामहोपाध्याय ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> ? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 29/07/2020 - 20:24
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> अनौपचारिक -गा.पै.

हेमंतकुमार 29/07/2020 - 20:34
दृकश्राव्यपद्धती >>> दृकश्राव्यमाध्यमे ३, ५, ६ >> नाही. जरा वेगळी आहेत. बाकी बरोबर. छान !

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 30/07/2020 - 02:25
कुमारेक, मूल्यमापन म्हणजे assesment. ही एक सर्वसाधारण संज्ञा आहे. शैक्षणिक प्रगती मोजण्याची असेल तर माझ्या मते अधिक समर्पक शब्द हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 30/07/2020 - 07:42
या कोड्यात केवळ एकाच शब्दात उत्तर द्यायचे असल्याने अशा काही मर्यादा आहेत. प्रश्न 5 व 6 याचे उत्तर जोडीने द्यायचे आहे. या दोघांची उत्तरे मी एका शिक्षणतज्ञांच्या लेखातून घेतली आहेत. एका शब्दाचे बंधन घातल्याने एकंदरीत कोड्याला मर्यादा आहेत हे कबूल. तेव्हा पर्यायी शब्द जरूर असतील आणि सुचवा.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 30/07/2020 - 13:11
कुमारेक, कलमापन हा पर्यायी होऊ शकेल काय? अन्यथा ही संज्ञा नव्याने उत्पन्न करावी लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शोभून दिसावी. मी प्रयत्न करेन. बघूया काय होतं. सूचनेबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे.

हम जल्द ही लौटेंगे एक ब्रेकके बाद.. तोपर्यंत घाला पिठामध्ये तेल..

आजी ·

मस्त कॉमेडी लिहिलंय! मज्जा आली. लहानपणीच्या जाहिराती आतापेक्षा मजेशीर वाटतात. कदाचित लहानपणी टिव्हीत येणारी प्रत्येक गोष्ट मन लावून बघत असल्यामुळे. आता माझ्या मुली रोज घरात स्वयंपाक चालू असताना कणीक घेऊन खेळतात आणि खेळताना, "घाला पिठामध्ये तेल, मग कोन बनवा रे...." म्हणत असतात. =)) सं - दी - प

वीणा३ 18/06/2020 - 22:12
मस्त लिहिलंय आजी. आपण नाही पण लहान मुलं प्रचंड मन लावून जाहिराती बघतात. मला भारतीय जाहिराती खरं तर आवडतात, अमूल, फेविकॉल, टायटन (मेंन विल बी मेन सिरीज ). छोटीशी कॉमेडी गोष्ट ३०-४० सेकंड मध्ये सांगितलेली असते.

सुबोध खरे 19/06/2020 - 10:28
पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला - जाहिरात कला असे याचे सार्थ नामाभिमान आहे. एवढ्या प्रचंड जाहिराती करून टिनपाट सिनेमे एक दोन आठवड्यात १००-२०० कोटींचा गल्ला जमवतात यात काय तें समजून घ्या. आजही मोठ्या मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून यशस्वी झालेले अभियंते व्यवस्थापनाच्या संस्थांमध्ये व्यवस्थापकीय विषयात विपणन (एम बी ए -मार्केटिंग) घेऊन पदवी / पदविका घेऊन आपल्या बुद्धीचा वापर लोकांच्या गळी आपला माल उतरवताना पाहून आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. पण ते WPM (whosoever pays me more) या नात्याने आपली अभियांत्रिकीची ४ वर्षे फुकट घालवून आवडीचे उत्पादन सोडून नावडीच्या विपणनाच्या मागे लागतात याचे मूळ कारण त्यात असलेला पैसा

चौथा कोनाडा 19/06/2020 - 16:28
आजच्या जाहिरातींबद्दल काय बोलणार ? जुन्या जाहिराती पहिल्या , ऐकल्या की ओल्ड इज गोल्ड याची खात्री पटते ! नॉस्टेल्जिक करणारा लेख ! जुन्या जाहिराती क्लासिक गाण्यांप्रमाणे ऐकतो/पाहतो !

गवि 19/06/2020 - 16:58
जाहिरातींमुळे काय ओळ तोंडात घट्ट बसेल सांगता येत नाही. अगदी खूप वर्षांपूर्वी "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना" बसलं होतं. त्याआधी "डाबर जनम घुट्टी" आता आता "आल्या बांगरच्या गोणी" आणि अगदी लेटेस्ट "घाला पिठामध्ये तेल" चालायचंच. नवीन काहीतरी आल्यावर आधीचं आपसूक बंद पडतं.

In reply to by गवि

गामा पैलवान 19/06/2020 - 18:16
गवि, अगदी नेमकं बोललात पहा. आमच्या वेळेस कोणी 'काय झालं' म्हणून प्रश्न विचारला तर 'बाळ रडंत होतं' असा प्रतिसाद यायचा. कोणी जर विचारांत गढून गेला असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारून विचारायचो की 'कसला विचार चाललाय रामू, गोठ्याला पत्रे कोणते बसवून घेऊ?'. आ.न., -गा.पै.

In reply to by गवि

पहाटवारा 19/06/2020 - 23:34
अजून थोडे असेच जुने ... अरे ये पीएसपीओ नही जानता ! पूरे घर के बदल डालूंगा ! आपकी पारखी नजर और निरमा सुपर ... अन रेडिओवरचे अगदी लहानपणी ऐकलेले .. "शिनोलेट नं आनलं पाणी .. शेतं पिकली सोन्यावाणी ! शिनोलेट ! " .. हे खरं तर फिनोलेक्स होतं पण लहानपणी शिनोलेट असंच ऐकु यायचं :)

गवि 19/06/2020 - 19:46
बोगस किंवा बोरिंगशिरोमणी जाहिरातींत खालील काहींना ऐतिहासिक स्थान द्यावं: एकेकाळी या जाहिराती एका ब्रेकमध्ये चार चार वेळा लावून लावून मेंदू बधीर करून टाकला होता. एअरटेल , और ये दुनिया जो गोल नही है. एकूण एअरटेल आणि साशा चेत्री कॉम्बिनेशन. आणि सब कुछ उड गया लेकिन आपका परफ्युम नही उडा

Prajakta२१ 20/06/2020 - 00:05
कॅडबरी फाईव्ह स्टार ची thankyou बेटा तू ने कुछ नाही किया अशक्य लॉजिक आहे हॉर्लिक्स ची नवरा बायकोची बाटली भरताना ची जाहिरात कल्पना चांगली आहे dettol liquid ची जाहिरात चांगली आहे

जेडी 20/06/2020 - 08:30
वोडाफोन चे जुजू चांगले लक्षात राहिले, त्यांचा कुत्राही. फेव्हिकॉल च्या अॅडस पण भारी वाटतात. लिज्जतचा कार्रुम कुर्रम म्हणतानाचा ससा नक्की लक्षात आहे, रसनाची मुलगीही गोड होती.

mrcoolguynice 20/06/2020 - 09:10
पण काही जाहीराती तर प्रबोधनात्मक वाटाव्यात.... उदा. (जाहिराती तील सिच्युएशन) धार्मीक दंगली नंतर त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर... गावातील लोक आपल्या फालतू अस्मिता कुरुवाळत बसण्या एवजी स्वतःची आयडेंटिटी आपला मोबाईल नंबर करतात... सिंगल मदर्सच्या लग्नातील तिच्या मुलीचा सन्मानजनक सहभाग... मासिक पाळ्यांचा अनाठायी केला जाणारा बाऊ... बुलिंग करणाऱ्या विरुद्ध उठवलेला आवाज... गलेकी खिचखीच बाजूला सारून. रिक्षाचालकाच्या मुलीने गरीब परिस्थितीत संघर्ष करून, बँकेत मिळवलेली नोकरी, आणि त्यामागील आपल्या गरीब बापाबद्दल आदर. शाळेतील शिक्षक यांना त्यांच्या म्हातारपणी , विद्यार्थ्यांनी दिलेली भेट.. शहरी भागातील पाण्याचा अंदाधुंद वापर, तर ग्रामीण भागात ओंजळभर पाणी मिळण्यासाठी लागणारे भाग्य... हा विरोधाभास... ५ वर्ष्या पूर्वी फेकुगिरी करून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या , येऊ घातलेल्या निवडणूक पूर्व दर्शना वर, त्याला गेल्या ५ वर्ष्यात काय दिवे लावले ? असं विचारण्याचा कर्तव्याचे स्मरण (कडक चहा पिल्याने) आपल्या आनंदी सन समारंभात, एकट्या शेजाऱ्यां, इतर धर्मियांना, घरगडी/ड्रायवर/पोलीस/अग्निशामक दल अश्या अहोरात्र झटणारे परंतु फेसलेस गटाला, आपल्या आनंदात सहभागी करण्याचे म्यांनर्स, जाणीव, कृती.. स्वतः विदेशात राहून भारतीयांना देशभक्ती शिकवणाऱ्या दीड शहाण्यांपेक्षा, भारतात सध्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून खेड्यातील मुलांना अभ्यासा साठी लाईट पुरवण्याचे इनोव्हेशन करणाऱ्या बद्दल आदर. रक्तदान, अवयव दान, स्वच्छता अशे अनेक फुटकळ सोशल मेसेज तर ढिगाने मिळतील जाहिरातीत...

अभ्या.. 20/06/2020 - 09:16
कफ कॉलर अंडर आर्म गंदे करते सुबह शाम. . तो क्या मै खेलू नाहि कुदू नाही बन जाऊ मै भोंदुराम

भीमराव 20/06/2020 - 23:38
रेड लेबल च्या हिंदू फोबिया ने भरलेल्या झैराती औकातीबाहेरचा स्टंट होता. सरकारी झैराती सुद्धा कमी नसतात. बलबीर पाशा कोण होता अजून नाही समजलं. गुड न्यूज लाला गुड न्यूज मधे नाचरा मोर्चा अजुन सुद्धा आठवतोय. झैराती इतक्या महत्त्वाच्या आहेत ना, सरकार आलं अब की बार म्हणत. बेंबी सुद्धा पेप्सी बघुन बोलायला लागते ही क्रियेटीविटी जबरा होती. सौंदर्य साबुण निरमा म्हटलं कि आख्खा गाणं आठवतो राव. फेवीक्वीक, फेवीकॉल आणि सिमेंट वाले सुद्धा भरपूर मनोरंजन करायचे. सैराट पिच्चर आला तेव्हा बघावं तिकडे जाहिरात सोडून चित्रपटाची गाणी च वाजत होती, मराठी चित्रपटांची इतकी जाहिरात ना कधी झाली ना कधी होणार. नेमकं सांगायचं तर झैरात म्हणजे झोलझपाटा आहे. आणि करणं भाग आहे. कारण बोलणार त्यच्या एरंड्या विकणार, गप बसणार त्याचे गहु सडणार.

शेर भाई 24/06/2020 - 18:19
बरेच तास खरेदीसाठी एखाद्या मॉल मध्ये वेळ खर्चून जेव्हा आमचा नंबर येतो, आणि काउंटरची ताई आकडा सांगते, तेव्हा तिला Card देताना Visa ची ही जाहिरात हटकून आठवते आणि एकदम जेम्स बॉंड झाल्याची feeling येते. Link: - https://www.youtube.com/watch?v=x73x8sv4zE8

बेकार तरुण 25/06/2020 - 13:10
छान लिहिले आहे. वरील उल्लेखलेल्या बर्‍याच जहीराती खूप आवडतात. ह्यात भर अमूल च्या जहीरातींची. तसच मोबाईल फोन नवे होते तेव्हा एक जहीरात यायची - एक बाई कानावर उजवा हात ठेवुन बोलत असते. ती कोणाशी बोलत आहे हे न समजल्याने एक मध्यमवयीन पुरुष त्याच्याशीच बोलत आहे हे समजुन बोलायला जातो तर ती बाई फोन थांबवुन त्याला "वन ब्लॅक कॉफी"ऑर्डर करते.... कोणाला आठवत आहे का ही जहीरात.

आजी 29/06/2020 - 19:29
चांदणे संदीप-लहानपणी पाहिलेल्या जाहिराती मजेदार होत्या कारण त्या मन लावून बघितल्यामुळे लक्षात राहिल्या"हे तुमचं म्हणणं खरंच आहे.आत्ताच्या बऱ्याचशा जाहिराती मला आवडत नाहीत. वीणा३-छोटीशी कॉमेडी गोष्ट तीस,चाळीस सेकंदात सांगतात."हे तर खरंच.तेच तर स्कील आहे. दहा सेकंदाच्या सुद्धा जाहिराती असतात. पहाटवारा-जाहिराती बनवणं हे कौशल्याचं काम हे तुमचं म्हणणं पटलं Prajkta२१-तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सुबोध खरे-'त्यात असलेला पैसा'हे तुमचं कळीचं वाक्य आहे. धन्यवाद. चौथा कोनाडा- 'नॉस्टल्जिक करणारा लेख". - तुम्ही जुन्या जाहिराती क्लासिक गाण्याप्रमाणे ऐकता,पाहता हे ऐकून कौतुक वाटलं. गवि-नवीन काहीतरी आल्यावर आधीचं आपसूक बंद पडतं." हे खरंच. लोकांची स्मरणशक्ती अल्पजीवी असते. गामा पैलवान-'बाळ रडत होतं'आणि 'कसला विचार करताय रामण्णा'हे मलाही अजून आठवतं. पहाटवारा-शिनोलेट(फिनोलेक्स)हा.हा.हा. जेडी- मान्य. Mrcoolguynice-तुम्ही सांगितलेल्या प्रबोधनात्मक जाहिराती खरंच चांगल्या होत्या. अभ्या-भोंदुरामची जाहिरात मला आवडते.विशेषतः आई आणि मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव. ईश्वरदास-"गप बसणार त्याचे गहू सडणार,बोलणार त्याच्या एरंड्या विकणार."हे तुमचं मत रोचक. शेरभाई-गमतीदार कॉमेंट मि.जेम्स बॉंड. शाम भागवत-धन्यवाद. बेकार तरुण-मला आठवते. आवडलीही होती तुम्ही सांगितलेली जाहिरात. Mrcoolguynice- तुम्ही तर फोटोच पाठवलाय जाहिरातीचा!तुमच्या तत्परतेला दाद द्यावीशी वाटते.आणि जरा एखादं सोपं स्पेलिंग असलेलं नाव घ्या ना. मदनबाण: धन्यवाद

योगविवेक 29/06/2020 - 23:18
एवढे कष्ट करुन,एवढे पैसे खर्च करुन बनवलेल्या जाहिराती प्रेक्षक बघतात का? तर बहुधा नाही. ते ब्रेक आला की टीव्ही म्यूट करतात. लहानलहान कामं उरकतात. ताटं वाढून आणणे, गादी घालणे, पाणी पिणे, शू ला जाऊन येणे, फोन करणे, मेसेज पाठवणे, प्लेटस् सिंकमधे ठेवणे, रात्रीचे ब्रशिंग करणे. खरं की नाही? तुम्हीही करता ना? हाईट ऑफ इट म्हणजे अँकर म्हणतो "कही जाईएगा मत। हम जल्दही वापस आ रहे है।"
याला म्हणतात निगरगट्टपणा! त्या जाहिरातीत ते अमक्या अमक्या असे म्हणतात म्हणून मी ती वस्तू, सेवा घ्यायला उत्सुक होतो ही पण एक काल्पनिक अपेक्षा असते... असो.

जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता!

शब्दखेळ : विरंगुळा

हेमंतकुमार ·

Prajakta२१ 24/05/2020 - 16:00
1 ऐच्छिक : वैकल्पीक 2 अपूर्णता :वैगुण्य 3 विष्णूचे स्थान :वैकुंठ 4 वाचा :वैखरी 5भिन्नता :वैविध्य 6काळी तुळस : पास 7 सावत्र :----- 8धन्वंतरी :वैद्य 9कायदेशीर :वैध 10 आश्चर्य :वैचित्र्य ? 11गरूड :वैनतेय 12 समृद्धी : वैभव? 13 सीता :वैदेही 14 ऐश्वर्य :वैभव 15 निष्फळता :वैफल्य 17 शत्रू :वैरी 18 चारा : वैरण 19 संन्यासी :वैरागी 20 ओसाड :वैराण 21 कुबेर : वैश्वदेव ?? २२. चतुर्वर्णापैकी एक : वैश्य (व्यापारी ) 23. विष्णूभक्त :वैष्णव 24 निज 25 सूड उगवणे :vendetta (इंग्लिश )??? 26 लग्नाची एक पद्धत :वैदिक 27 अग्नी : वैश्वानर ?

Prajakta२१ 24/05/2020 - 18:35
कोणीतरी कुबेराला शब्द सुचवा प्लिज वैमनस्य -वैराला जास्त उपयुक्त वाटतोय (बातम्यात असते ना पूर्व वैमनस्यातून वगैरे ) सूड उगवणे -वैर साधणे ? सावत्र -पास

हेमंतकुमार 24/05/2020 - 18:46
१.सूड उगवणे -वैर साधणे ? >>> नाही. एकच शब्द पाहिजे. २. तुळस > बरोबर ३. कुबेर >> चूक. ४ अक्षरीच आहे.

Prajakta२१ 24/05/2020 - 23:36
विश्रवा ऋषींचा मुलगा (रावणाचा भाऊ ) ओह्ह हे नाही आठवले धन्यवाद

हेमंतकुमार 25/05/2020 - 07:40
मंडळी, चला आता ७ व २५ असे दोनच राहिले. नक्की येतील तुम्हाला...... !

हेमंतकुमार 25/05/2020 - 12:00
7 सावत्र := वैमात्र >>> वैमात्रेय 25 सूड उगवणे = वैरशोधन >>> नाही. हा शब्द तुम्ही कोशात पाहिलाय का ?

हेमंतकुमार 25/05/2020 - 12:26
हरकत नाही. हेही पर्यायी उत्तर धरू. माझे उत्तर ४ अक्षरी आहे. कोणाला येतंय का बघू. थोड्या वेळाने उत्तर लिहितो.

हेमंतकुमार 27/05/2020 - 07:28
म्हणी ओळखा एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा. १. शरीर, नकार, दौड. २. अवयव, भंग, प्राणी ३. बोट, पहाड, वाढ. ४. कप्पा, दाम, सम्राट. ५. कलत्र, ईश्वर, ती. ...... एक उदा. देतो. (चादर, अवयव, कृती ) याचे उत्तर : अंथरूण पाहून पाय पसरावे.

In reply to by हेमंतकुमार

गणेशा 27/05/2020 - 09:41
खुप अवघड जाते आहे.. काम सोडून हाच विचार चालू आहे :-)) ३. बोट, पहाड, वाढ. - डोंगर पोखरून उंदीर काढणे बरोबर आहे का? पण एकच शब्द जुळतोय..

In reply to by गवि

हेमंतकुमार 27/05/2020 - 11:07
गवि, “शिंग मोडून वासरांत शिरणे” हे पर्यायी उत्तर म्हणून योग्य. (फक्त ३ शब्दच सूत्र म्हणून दिलेले असल्यामुळे). माझे उत्तर होते : एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.

In reply to by हेमंतकुमार

गणेशा 27/05/2020 - 10:38
मला वाटलेच होते चूक असेल.. बघतो.. एक विनंती.. शनिवार रविवारी साठी स्पेशल असे काही नवीन आठवून ठेवा.. आता काम करताना इकडे पूर्ण लक्ष देता येईना.. आणि तिकडे हि नकोच वाटते आहे म्हणा :-))) प्रयत्न करतो..किंवा रिप्लाय वाचतो..

गणेशा 27/05/2020 - 10:46
४. कप्पा, दाम, सम्राट. मला माहीत आहे हे पण उत्तर चुकेल.. पण चुकलो तरी मज्जा येते आहे.. माझे विचार असेच का फिरतात चुकीच्या दिशेने माहीत नाही.. -> राजा तीन्ही जगाचा.. आई विना भिकारी...

Prajakta२१ 27/05/2020 - 19:10
१.हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ????? ४.राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते

In reply to by Prajakta२१

गणेशा 27/05/2020 - 19:17
उत्तर देताना मुळ प्रश्न पण द्या ना.. म्हणजे स्क्रोल करावे लागणार नाही की 1. काय होते आणि 2. काय होते.. धन्यवाद

In reply to by Prajakta२१

हेमंतकुमार 27/05/2020 - 19:21
. करंगळी सुजली म्हणजे काय डोंगराएवढी होईल का ? बाकी चूक. कप्पा >>> हा वस्त्रालाही असू शकतो , असा विचार करा ! छान प्रयत्न.

Prajakta२१ 27/05/2020 - 19:21
१. शरीर, नकार, दौड.-हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ????? २. अवयव, भंग, प्राणी-हे सांगितलेच आहे ३. बोट, पहाड, वाढ.-अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? ४. कप्पा, दाम, सम्राट.- राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते ५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

हेमंतकुमार 27/05/2020 - 19:28
५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?
>>>>> राम-सीतेचे युग नको ! 'घरची' आणि 'दारची' या दिशेने बघा.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 04/06/2020 - 07:52
१. शरीर, नकार, दौड >> अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ . ....... ५. कलत्र, ईश्वर, ती घरची म्हणती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा. धन्यवाद !

हेमंतकुमार 30/05/2020 - 14:32
नवा खेळ: यात तुम्हाला सहा चित्रपटांची नावे ओळखायची आहेत हे सर्व चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत. क्रमांक १ व २ मराठी, ३ व ४ हिंदी आणि ५ व ६ इंग्लिश भाषिक चित्रपट आहेत. त्यांचे कथानक असे आहे: १. जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेल्या भारतीय समाजाचे चित्रण. तळागाळातून वर आलेला तरुण, त्याचे खेड्यातून महानगरातले स्थलांतर आणि त्याला आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो, याचे उत्तम चित्रण. या तरुणास पुढे मोठा राष्ट्रीय पुरस्कार. २. एक कुस्तीगीर, गरीब घरातला, मूकपटापासून अभिनयास सुरवात, पुढे चित्रनिर्माता आणि खूप श्रीमंत झालेला माणूस. त्याचे चित्रण. ……………….. ३. एक जोडपे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध. भारतातील खेडी सुधारायचा ध्यास घेतलेले. तंत्रकुशल. कमी खर्चातील सोप्या विद्युत जनित्राची निर्मिती. स्वयंसेवी कार्यास वाहून घेतलेले. ४. भारतातील नैसर्गिक प्रकोप ही सत्यघटना. त्याच्यात भर घालून आंतरधर्मीय व्यक्तींची प्रेमकथा. अर्थातच पुढे प्रचंड अडथळे. सुखी शेवट नाही. ..................... ५. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला हे सूत्र. ही व्यक्ती मोठे आर्थिक घोटाळे करण्यात तरबेज आणि तोतयेगिरी. तोतया भूमिकांची व्याप्ती स्तिमित करणारी. पुढे तुरुंगवास. शिक्षा भोगल्यावर चक्क सरकार दरबारी मानाची नोकरी ! ६. एक अपहरण. शोधण्यास पोलिसांचे अपयश. एका महिलेने स्वतःच शोधमोहीम हाती घेणे. त्यातून एका बेटावरील अनेक वेश्यांचे खूनसत्र उघडकीस येणे.

३. स्वदेस ५. कॅच मी इफ यू कॅन बाकी चित्रपटांबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहे. सं - दी - प

Prajakta२१ 30/05/2020 - 17:33
१. नटरंग ? ३. स्वदेस ---पण त्याच्यात ते जोडपे नंतर बनते आणि खेडी नाहीतर एकच खेडे सुधारतात तंत्रकुशल फक्त शाहरुख खान दाखवलं आहे हिरोईन शिक्षिका असते

हेमंतकुमार 30/05/2020 - 17:51
प्राजक्ता, स्वदेस बद्दल सहमत. मी खरी घटना जास्त लिहिली ! नंतर सुधारणा लिहीण्यास आलो होतो, पण त्याच्या आत बरोबर उत्तर आलेले होते. क्रमांक २ च्या नायकाची ‘खरी’ माहिती थोडी वाढवतो: आधी कामगार >> अभिनेता >> चित्रनिर्माता >>मुंबईत ऐशोआरामी जीवन >> आर्थिक उतरण व गरीबी

In reply to by Prajakta२१

गणेशा 30/05/2020 - 18:30
मला माहित नाही हा सिनेमा.. पहायला पाहिजे.. अवांतर : बायोपिक मध्ये आपला सगळ्यात आवडता पिक्चर आहे, भाग मिल्खा भाग.. कधी ही लागला की पाहतो अति अवांतर : कुमार सर, तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली .. समोर असते पण आठवतच नाही काही :-))

In reply to by गणेशा

हेमंतकुमार 30/05/2020 - 18:35
तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली
अहो, तुम्हीच नाही फक्त. आपल्या बहुतेकांचे असेच होते ! कोडी तयार करून मेंदूला तरुण करत राहायचे ....

Prajakta२१ 31/05/2020 - 18:06
मी पण ६. abducted ?????????पण स्टोरी जुळत नाहीये एवढी १. डॉ बाबासाहेब आंबेडकर ???

हेमंतकुमार 31/05/2020 - 18:54
या खेळात भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली. साधारणपणे सध्या कायप्पावर फिरणारी कोडी ही तशी ‘एक छाप’ प्रकारची असतात. म्हणून इथे कोडी देताना जरा विचार करून वेगळ्या पद्धतीची केली. जरी उत्तर आले नाही, तरी सोडविण्याच्या प्रक्रियेतच मजा येते. इथे भाग घेणारे आपण सर्व भाषादर्दी आहातच. आपणही असे खेळ तयार करून जरूर द्या.

खालील कोड्यातीला सर्व शब्द मु या अक्षराने सुरु होणारे रोजच्या बोलीभाषेतले सोपे मराठी शब्द आहेत. इतके सोपे की कदाचित मला कोणत्याच शब्दाचे उत्तर सांगायची गरज पडणार नाही. तेव्हा नक्की प्रयत्न करा.... मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात मु २ – पुण्यातून वहाणार्‍या दोन नद्या मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ मु ४ – ज्ञानदेवांची बहिण मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला मु ६ – उंदीर मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख मु ११ – मोठा कळा किंवा कलिका किंवा घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्‍हेचे दुसरे धान्य मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती मु १६ – सापांचा शत्रू मु १७ – एका उपनिषदाचे नाव मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे मु २१ – मोहोर, शिक्का, छाप मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी मु २३ सुळे नसलेला हत्ती मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग पैजारबुवा,

हेमंतकुमार 01/06/2020 - 14:53
मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात >>> मुखमार्जन मु ४ – ज्ञानदेवांची बहिण >>> मुक्ताबाई मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला >> मुका मु ६ – उंदीर >>मूषक मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण : मुकुट मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र >> मुकटा मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा > मुंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध >मुंज मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती > मूठ मु १६ – सापांचा शत्रू >मुंगुस

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रातराणी 02/06/2020 - 11:16
मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता. >> मुख्य ??? १९. मुद्दल ?

In reply to by हेमंतकुमार

२० चे जरा उत्तर वेगळॅ आहे तुम्ही बरेच जवळ आहात २३ मुकाणा किंवा मुकणा दोन्ही बरोबर आहेत पैजारबुवा,

हेमंतकुमार 02/06/2020 - 10:20
१७. मुक्तिकोपनिषद ..आता ११ , १२ सांगून टाका ! मग मी पुढचे कोडे देतो.

मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण मु या शब्दापासून सुरु होणारी दोन उपनिषदे आहेत १ गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद असलेले मुंडकोपनिषद आणि दुसरे हनुमान व राम यांच्या संवादातले मुक्तिकोपनिषद सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि आभार पैजारबुवा,

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात – मुखमार्जन मु २ – पुण्यातून वहाणार्या नद्या- मुळा, मुठा मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ – मुरमुरा मु ४ – ज्ञानदेवांची बहिण - मुक्ताबाई मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला – मुका मु ६ – उंदीर – मुषक मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा – मुकुंदराज मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण – मुकुट मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र – मुकटा मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख – मुख्य मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा – मुंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध, - मुंज मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती – मुठ मु १६ – सापांचा शत्रू – मुंगुस मु १७ – एका उपनिषदाचे नाव – मुंडक, मुक्तोपनिषद आणि तिसरे मुद्गल (मु द ग ल) उपनिषद मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी – मुत्सद्दी मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम – मुद्दल मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे – मुदाळ मु २१ – मोहोर, शिक्का, छाप – मुद्रा मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी - मुळाक्षरे मु २३ सुळे नसलेला हत्ती – मुकाणा मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा - मुकनाटय मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग – मुळ पैजारबुवा,

हेमंतकुमार 02/06/2020 - 12:00
खाली प्रत्येक प्रसिद्ध मराठी लेखकाचे एक वाक्य दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संबंधित लेखक ओळखावा. (लेखक शोधायला मदत म्हणून सर्व लेखकांची काही वैशिष्ट्ये वाक्यांच्या शेवटी देत आहे. अर्थातच ती वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत. एक वैशिष्ट्य एकाच लेखकासाठी आहे). वाक्ये: १. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे. …………….. (इथे ज्यांना खालील माहिती न बघताच उत्तर येत असेल, त्यांनी जरूर द्यावे ! ) ...... ........ लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत) : • यांची विचारधारा कामगारधार्जिणी. • खूप जंगलप्रेमी. • साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त. • हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. • सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित. • कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले. • स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द. ……………………………………………………

In reply to by हेमंतकुमार

गणेशा 02/06/2020 - 18:48
अहो, माझे वाचन मर्यादित.. काम खुप असल्याने आता वेळ देता येईना.. आज share मार्केट मुळे काम मागे ठेवले तर 11 वाजतील आज त्याला :-)) काय करणार.. मजबुरी... पण 15 मिनटात दिला प्रतिसाद.. ब्रेक घेऊन.. शब्दांच्या जादूगाराला सलाम :-))

शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

शूद्दलेकन.

आजी ·

कंजूस 27/04/2020 - 14:31
प्रश्न येतो 'प्रमाण'भाषेचा वापर होतो तेव्हा! अशा लेखनात मात्र ती शुद्धच हवी. शिक्षकानं, प्राध्यापकानं, निवेदकानं,समालोचकानं शुद्धच (प्रमाण म्हणू) आणि बिनचूक बोललं पाहिजे. तरीही बोली भाषा संवाद स्वरूपात घुसडणे योग्य ठरेल. अन्यथा ती हरवेल.

जेव्हा व्यवहारात त्या लिहिण्या बोलण्यामागील भावना शुद्ध असतात त्यावेळी हा प्रमाण भाषेचा मुद्धा गौण बनतो. नीतीन केळकर यांनी एकदा साहित्य संमेलनाच्या भाषणात बोली प्रमाण भाषा हा मुद्दा आणला होता.स्थानिक बोली कुठलीही असली तरी बातम्या देताना प्रमाण भाषा वापरली पाहिजे कारण सर्व महाराष्ट्रात एकच आशय व एकच अर्थ पोहोचला पहिजे. साहित्यिक कार्यक्रमात बोली भाषेचे आविष्कार समृद्धी देतात हे ठीक आहे. बोली भाषेत अनेक छटा संस्कार,मेंदुचा भाषेशी संबंधीत भाग, जीभेची लवचिकता,स्थानिक संस्कृतीचा पगडा वयाच्या कुठल्या टप्प्यात भाषा अवगत झाली असे अनेक मुद्दे त्या संबंधी येतील

सचिन 27/04/2020 - 16:56
या विषयाला हात घालणे आवश्यक आहे. आजकाल "राडा" वगैरे शब्द सर्रास मराठी वृत्तवाहिन्या हेडलाईनमधे वापरतात. प्रमाणभाषा व्यवस्थितपणे धाब्यावर बसवली जाते. कोणतीही वाहिनी ५ मिनिटे जरी पाहिली तरी १० चुका सापडतील.

१. इंग्रजीत स्पेलिंगच्या चुका झाल्या तर आपण वैतागू ना? २. आशय हा आत्मा आहे तर शुद्धलेखन हा त्याचा पेहराव आहे. त्याचं प्रसाधन आहे बरोब्बर ! (हे बरोबर असं हवं)

गणेशा 27/04/2020 - 17:21
तुमच्या बहुतांश मतांशी सहमत.... शुद्धलेखन महत्वाचे आहेच.. बातम्या, निवेदिका आणि तत्सम ग्लोबल ठिकाणी भाषा / शुद्धलेखन यांची मागणी योग्यच. पण शुद्धलेखन , व्याकरण हे योग्य नसल्यास बर्याचश्या अश्या व्यक्तींना साडेतीन टक्केवाल्यांचा हा दुराग्रह आहे असे वाटते हे मला योग्य वाटत नाही. उलट असा गैरसमज तुम्ही पहिला मनातुन काढला पाहिजे. उलट ज्यांची लिखानात भाषा शुद्ध असते त्या लोकांचा हेवाच वाटत असतो अश्या अशुद्ध लिहिणार्‍या लोकांना. जाती पाती वर काही नसते..शुद्धलेखनाचा आग्रह कोणीही करु शकते, शाळेतले शिक्षक पण करायचेच.. मी स्वता खुप अशुद्ध लिहितो, कदाचीत खेडेगावात झेडपीला शिकलो असल्याने आणि तेंव्हा घरात कोणी जास्त शिकलेले नसल्याने कोणी माझ्याकडे लक्ष दिले नसेल... पण भाषा शुद्ध नसल्यास त्याने व्यक्त होऊच नये काय ? समजा ज्याची भाषा शुद्ध आहे, पण गणित कच्चे आहे, त्याने फायनान्स आणि आकडेमोड करुच नये असे कोणी म्हणते का ? एखादा भाषेत हुशार असतो .. एखादा गणितात.. एखादा इतिहासात... पण कश्यात ही विशारद असला तरी त्याला व्यक्त व्हायला भाषा लागते, मग एखादा गणितातला माणुस त्याचे प्रमेय भाषेच्या माध्यमातुन सांगु लागला तर तुझी भाषा सुधार मग बोल असे म्हणुन चालेल काय ? असो .. त्यामुळे शुद्धलेखनाचा आग्रह हवाच, पण तो कुठे , कुठपर्यंत आणि कशासाठी हे ही महत्वाचे वाटते, आणि जात पात मग ते शिकलेले असो वा नसो मध्ये आणलीच नाही पाहिजे, तो जी मध्ये आणातो त्याच्याच मनात जास्त दुराग्रह असतो असे माझे स्पष्ट मत आहे.. आपल्याला शुद्धलेखनात आणि बोलण्यात शुद्ध असलेले सगळे मित्र प्रिय आहेत, आणि त्यांना पण माझा इतिहास, गणित आणि प्रोग्रॅम चा आनंदच होता.. त्यामुळे आवशकता असेल तेथे योग्य, नसेल तथे नाही..

In reply to by गणेशा

शुद्ध भाषा ही निर्वयैक्तिक गोष्ट आहे, ज्याला आवड आहे तो निव्वळ वाचन, बोलणं आणि लेखन यातून ती विकसित करु शकतो. त्यामुळे शुद्ध भाषेवर मालकी सांगणं किंवा ज्यांच्याकडे ती आहे त्यांचा उपहास करणं दोन्हीही गैर आहे.

कंजूस 27/04/2020 - 19:18
सुद्दलेकन वेगळं, प्रमाणभाषा वेगळी. ------------ १) मला धा रूपे भेटले. २) फाटल्या वेळी तो म्होटी टोपली घेऊन आलता. चालतंय. पण ३) त्याच्यासोबत काय झालं ते या विडीयोत पाहा; ४) ही गोष्ट बरोबर नाही आहे; ५) माझी मदद करा. हे मराठी नाही.

In reply to by कंजूस

लेखिकेनं प्रमाण भाषा आणि तिचं लेखन या विषयी लिहीलं आहे. बोली भाषेचं लेखन तदनुसारच असणार, त्यात अशुद्धचा प्रश्न येणार नाही. मला धा रूपे द्या, मला ध्हा रुप्ये द्या, मला धा रुपे द्यावा..... यात अशुध्दचा प्रश्न नाही ! कारण ती प्रमाण भाषा नाही.

मीअपर्णा 27/04/2020 - 21:58
सर्वप्रथम आजी, तुमचं लेखन फार आवडतं. नेहमी प्रतिक्रिया दिली गेली नसेल म्हणून हे लिहून घेते :) मला वाटतं तुमचा मुद्दा. जिथे भाषा लेखन मग ते मायाजाल किंवा पुस्तकांसाठी असेल आणि इतर ठिकाणे जसं बातम्या इ. तिथे शुद्ध असावे हा आहे तो पटला आहे. माझा ब्लॉग अगदीच बाळ असतानाच्या काळात एक पोस्ट लिहिली होती तिची लिंक द्यायचा मोह आवरत नाही.त्या पोस्टच्या प्रतिक्रियांमध्ये वादही झाले होते आणि मला वाटतं तेव्हा तर काही इतर ब्लॉगर्सना मी त्यांना उद्देशून लिहिले असा स्वतःच गैरसमजही करून घेतला असंही ऐकलं होतं. असो. त्यानंतर मी स्वतःच या विषयावर कुणाशीही बोलणे इ. बंद केले. आज ते सर्व आठवलं. http://majhiyamana.blogspot.com/2009/11/blog-post_06.html

Sanjay Uwach 27/04/2020 - 22:49
आपली भाषा शुद्ध असावी किंव्हा आपले लिखाण शुद्ध असावे असे प्रत्येकाला निश्चितच वाटते, मात्र आपण जे लिहतो किंव्हा बोलतो हे शुद्ध आहे कि अशुद्ध आहे हे कदाचित लक्षात येत नाही . याला तशी कारणे हि आनेक आहेत . मुळ बोली भाषा ,इंग्रजी शिक्षणाचा परिणामी किंव्हा आपण लिहलेला शब्द बरोबर आहे कि नाही हे तपासण्यास लागणारी कोणतीही सुलभ सुविधा नसणे . आपण एकादा लिहीलेला शब्द मनांत बऱ्याच वेळी द्विदा उत्पन करतो . सर्वच शाळेत या गोष्टी व्यवस्थीत शिकवले जाते असे पण नाही . या साठी एक सॉफ्टवेअर आहे व ते मी वापरतो असे कुणीतरी मिपाच्या लेखात म्हंटले होते . आजी खरोखरच भाग्यवान म्हणाव्या लागतील कि त्यांना छापखान्यात ,रेडिओ केंद्रात याचे प्रशिक्षण मिळाले त्या मुळे या दुर्लक्ष होणाऱ्या गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या . अशुद्ध शब्द कसा चुकीचा आहे हे कळल्यावर परत चूक होणार नाही . माझी बायको मला नेहमी म्हणते "दागिणा "म्हणू नका "दागिना " म्हणा पण मी जन्मभर दागिणा हाच शब्द ऐकला .

In reply to by चामुंडराय

गामा पैलवान 28/04/2020 - 13:43
चामुंडराय, त्यम्च्याशी सहमत आहे. तुम्ही लिहिलंय ते अप्रमाण भाषेतली शुद्ध लिपीच आहे. तेच जर : अकशी ब्राबर हाये आज्जे तुज्जे सूद्दलेकन येयालाच पैजेले. असं लिहिलं तर अशुद्ध लेखन होईल. लेखनाचा संबंध लिपीशी आहे. त्यामुळे शुद्धलेखन म्हणजे ऱ्हस्वदीर्घ यथोचित पद्धतीने लिहिलेत का इतकंच तपासणे होय. व्याकरणादि नियम व उचित शब्दयोजना या गोष्टी प्रमाणभाषेशी निगडीत आहेत. आ.न., -गा.पै.

हेमंतकुमार 03/05/2020 - 10:47
ला ध. ते लिहायच्या २ पद्धती आहेत : १. द च्या पोटात ध , किंवा २. द चा पाय मोडून पुढे ध.

आजी 10/05/2020 - 14:58
कंजूस-प्रमाण भाषा शुद्ध हवीच हे तुमचं मत माझ्या मताशी जुळतंय. प्रकाश घाटपांडे-तुमचं मत पटलं. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे-लेख आवडल्याचं वाचून बरं वाटलं. सचिन-वाहिन्यांवरील भाषा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कधी लिहिताय बोला. संजय क्षीरसागर-तुमचंं मत पटलं. गणेशा-शुद्धलेखनाचा दुराग्रह नको.प्रत्येकाला मार्गदर्शक लाभतोच असे नाही. हे तुमचे म्हणणे पटले. कुमार१-धन्यवाद. कंजूस-तुम्ही दिलेली उदाहरणं पटली.वाहिन्यांवर अशीच भाषा वापरतात. "माझ्या वर हसू नकोस."वगैरे. सुचिता१-एकदम सहमत. मीअपर्णा-आज हा विषय निघाला ना पण! संजय उवाच-शुद्धलेखन व शुद्ध भाषा शिकवणारा मार्गदर्शक मिळणं दुर्लभ आहे.हे तुमचे मत खरे आहे. चामुंडराय-येकदम पटलं बगा! गामा पैलवान-बरोबर आहे तुमचं. गामा पैलवान-भाषा आणि लिपी यांच्यात योग्य जागी फुली मारावी. मदनबाण-धन्यवाद. योगविवेक-शुद्धलेखनाच्या नियमांची पुस्तकं बाजारात विकत मिळतात.अगदी पॉकेट बुक्स सुद्धा. स्नेहांकिता-द् चा पाय मोडून ध. कुमार१-द् चा पाय मोडून ध लिहिणं बरोबर,पण मोबाईलवर टाईप करताना द् च्या पोटातच ध येतो. सर्वांचे आभार.

In reply to by आजी

सचिन 13/05/2020 - 11:59
मी हे वाहिन्यांना लिहिले आहे अनेकदा. स्क्रीनच्या फोटोसहित आणि काहीवेळा वृत्तनिवेदकाचा आवाजही रेकॉर्ड करून. आजकाल अनेक वृत्तनिवेदक वा "ग्राऊंड झीरो" वाले रिपोर्टर्स "न - ण" वाले आहेत. पण काहीही फरक पडलेला नाही. असो ...

सौन्दर्य 13/05/2020 - 23:44
आजी तुमच्या लेखाशी शंभर टक्के सहमत. तुमच्या लेखात उल्लेखलेल्या व्याकरणाच्या अनेक चुका आपण दैनंदिन जिवनात करत असतो व दुर्दैवाने त्या आपल्याला एखाद्या जाणकाराने दाखवून दिल्याशिवाय कळतंही नाहीत. मी माझ्या परीने शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करतो पण कित्येक वेळा ते चूक की बरोबर हेच कळत नाही. मग अश्यावेळी मुंबईतील माझ्या काही जाणकार मित्रांची मदत घेतो. व्याकरणाच्या नियमांचे काही सोपे पुस्तक कळविल्यास मदत होईल. माझ्या मते अश्या चुका होण्याची ही काही मुख्य कारणे - १) पुस्तक वाचन कमी झाले आहे किंवा बंद झालंय. क्षमा करा, झालं आहे. (झालंय, केलंय, पाहिलंय हे शब्द बरोबर आहेत का ?) २) आसपासच्या विवीध भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे चुकीची मराठी भाषा सतत कानावर पडणे. ३) मराठी बोलणाऱ्या लोकांची शुद्ध मराठी बोलण्याचा, लिहीण्याचा आग्रह धरण्याविषयी अनास्था. ४) “समोरचा जे सांगू ईच्छितो आहे ते कळल्याशी मतलब, भाषेचा तोच ऊपयोग आहे त्यामुळे भाषा शुचिर्तेचा आग्रह धरणे चुकीचे आहे” हा पसरलेला गैरसमज. ५ ) टिव्ही, सोशल मिडीया, वृत्तपत्रे, विवीध फलक (ही यादी भरपूर लांब होईल) ह्यातील चुकीच्या मराठीमुळे चुक काय ? बरोबर काय ? हेच कळेनासे झाले आहे. ६ ) समोरची व्यक्ती चुकीचे मराठी शब्द, व्याकरण वापरत असेल तर तीला न सुधरवणे. ह्यात आपले कुटूंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी व मित्रही आले. असे न करण्यामागची अनेक कारणे आहेत. मी जवळजवळ १८ वर्षे गुजरातमध्ये काढली, व मागची दहा वर्षे ह्युस्टनमध्ये आहे. येथे फारसे मराठी बोलणारे नाहीत, मराठी पुस्तके मिळत नाहीत, ती भारतातून मागवावी लागतात व त्यांच्या वजनामुळे ती खर्चिक ठरतात. प्रदीर्घ काळ जर आपण आपली भाषा शुद्ध स्वरूपात ऐकली नाही, वाचली नाही तर त्याचा आपल्या भाषेवर वाईट परिणाम होतो हा माझा अनुभव आहे. हिंदीत विभक्ती प्रत्यय वेगळा लिहिला जातो, उदा.: हिमालय की शुभ्रता, तेच मराठीत तो जोडून लिहिला जातो, (हिमालयाची शुभ्रता). माझे कित्येक मराठी मित्र मराठीत लिहिताना हा विभक्ती प्रत्यय हिंदी सारखा वेगळा लिहितात. मी माझ्या मराठी मित्रांना, नातेवाईकांना व्हाट्सअप, ईमेल, टेक्स्ट मेसेज हे सर्व मराठीतूनच (देवनागरी लिपी) पाठवतो व त्यांनी देखील उत्तर मराठीतूनच द्यावे हा आग्रह व कित्येक वेळा हट्ट धरतो. मी ह्या सर्वाना मराठी फॉन्ट्स (अक्षरे ?) डाउनलोड करायला लावतो. जवळच्या मित्रांच्या मराठीतील चुका (माझ्यापरीने) सुधारवण्याचा प्रयत्न करतो. एखादा व्याकरणाच्या चुका असलेला मेसेज आला तर तो शुद्ध करूनच पुढे पाठवतो. तेव्हढीच आपल्या माय मराठीची सेवा. आपण सर्वानी आपापल्या परिने शक्य तितकी काळजी घेतली तर मराठीची ही अनावस्था काही अंशी तरी दूर होईल अशी खात्री आहे.

सौन्दर्य 22/05/2020 - 18:27
चांगला मार्ग सुचविलात मात्र नुसत्या ऐकण्याने लिहिताना ऱ्हस्व, दीर्घच्या चुका कशा टाळता येतील ?

"तूमचे लीखाण अतीषय आवडते.नेहमि लीहीत रहा." मी वाक्य वाचले. वाक्याचा अर्थ समजून खरंतर आनंद व्हायला पाहिजे. पण झालं असं की, तो अर्थ मला समजलाच नाही. वाक्यांत झालेल्या 'शीद्दूलेकना'च्या चुकाच आधी डोळ्यांत आणि डोक्यात घुसल्या. वाक्य दुरुस्त करुन घेतलं. पुन्हा वाचलं तेव्हा आशय ध्यानात आला, आणि मग मनाला समाधान वाटलं. माझं नेहमी असंच होतं. शुद्धलेखनातल्या चुका आधी दिसतात. ह्याला मुख्य कारणं दोन. एक म्हणजे लहानपणी कडवेकरसरांनी शुद्धलेखन चांगलं घटवून घेतलं. अक्षर तर सुवाच्य आणि वळणदार झालंच, पण लेखनही शुद्ध झालं. त्यांचं ऋण विसरता न येण्याजोगं.

लेखनक्रिया : लिहून की बोलून ?

हेमंतकुमार ·

चांगलं आहे, लॅपटॉपला कसं युज करताते त्याचं अ‍ॅप्लीकेशन कोणतं तेही सांगा. माझ्या मोबाईलवर टेक्स्ट टू स्पीच वरुन मराठी टंकन करतो पण मला स्वतःला असं वाटतं की, लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर टंकन करतांना माझ्या मेंदूत जो शब्द उमटला की तो टाईप होतो, असा माझा समज आहे. टंकनस्पीड म्हणा किंवा अन्य काय म्हणा. पण, जेव्हा मी मोबाईलवर बोलून जी अक्षरं उमटतात त्यात मला 'माझा टच' असत नाही, अर्थात हे सर्व समज असावेत. पण भविष्य काळात अशा सुविधा आवश्यकच आहेत. एकदा सवय झाल्या की ते सर्वांना जमून जाईल. -दिलीप बिरुटे

बोलसुविधेत पुरेसा खाजगीपणा आवश्यक ठरतो.
हाच या सुविधेतला सर्वात जास्त कळीचा मुद्धा आहे. सध्या व्हॉटसअ‍ॅप किंवा तत्सम अ‍ॅप्सवर लोक लिहिण्याचा कंटाळा करतात आणि आपले बोलणे मुद्रित करुन पाठवितात. मात्र त्यामुळे जास्त डेटा खर्च होतो, मोबाईलवरील साठवणूकीच्या जागेवर (स्टोरेज) परिणाम होतो आणि समोरचा बोलत असताना त्यात आजूबाजूचे आवाज मिसळून जो कोलाहल होत असतो त्यातून नेमके काय बोलला आहे हे शोधण्यासाठी श्रम पडतात. माझ्या पाहण्यातील बरेच जण मोबाईल वर गुगल सर्च देखील अशाच पद्धतीने करतात. अर्थात याचा एक फायदा आहे. जे लोक इंग्रजीतून मराठी किंवा हिंदी लिहित असतात ते समजून घेण्यासाठी देखील मेंदूला तितकेच श्रम द्यावे लागतात. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ असा हा एक फायदा आहेच. काही लोक केवळ गुगल बाईंचा आवाज ऐकण्यासाठी देखील ही सुविधा वापरतात अशाही बातम्या वाचनात आल्या आहेत. बोलून टंकलेखन करणार्‍या मिपाकरांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत मी देखील आहेच.

वामन देशमुख 20/04/2020 - 14:32
लेखनाचे नवीन तंत्र शिकल्याबद्दल अभिनंदन, कुमार१. पीसीवर किंवा मोबाईलवर लिहिताना गुगल डॉक्स, (किंवा कोणतीही गूगल उत्पादने), स्पीच टेक्स्टर् आणि अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलवर जीबोर्ड हे वापरायला अगदी सोपे आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये बरंच लिखाण मी असे स्पीच-टू-टेक्स्ट ॲप्प्स वापरूनच केलंय. परवाचा हा लेख (झैरात) मी पूर्णतः लिहून बोलून काढला आहे. what is your name, phone and salary? हे वाक्य त्यातील विरामचिन्हांसहित मी आताच स्पीचटेक्सटरवर लिहून इकडे पेस्ट केलंय. ... नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing) ह्या तंत्रावर गूगल, ॲप्पल, ॲमेझॉन,यांसारख्या कंपन्या प्रचंड काम करत आहेत. माझ्या अंदाजानुसार, २०२५ च्या आधीच सध्याचे कीबोर्डस वगैरे (टाईपराईटर सारखे) कालबाह्य होतील आणि सगळेच सॉफ्टवेअर्स तोंडी आज्ञा स्वीकारू लागतील.

In reply to by वामन देशमुख

२०२५ च्या आधीच सध्याचे कीबोर्डस वगैरे (टाईपराईटर सारखे) कालबाह्य होतील आणि सगळेच सॉफ्टवेअर्स तोंडी आज्ञा स्वीकारू लागतील
कालबाह्य नाही होणार कारण ऑफिसमध्ये तर कीबोर्डच हवं ना नाहीतर सगळ्यांच्या आवाजाचा कलकलाट होईल. शिवाय काही वेळा (खासकरुन मॅनेजर वगैरे लोक) काय टाईप करत आहेत हे आजूबाजूच्या लोकांना समजणे अपेक्षित नसते. मला मोबाईलवर मराठी टंकनापेक्षा बोलून-टंकन जास्त सोईस्कर वाटते , अनेकदा वापरतोही पण तरी ऑफिसमध्ये असताना मी ते कधी करत नाही (कारण मजकूर खासगी असतो) तसंही बहूधा कामात टंकन इतके जास्तही नसते टंकनाचा वेग कमी पडल्याने वा टंकन करुन थकल्याने कामाचा वेग कमी व्हावा (मी निदान आय टी पुरते बोलतो आहे). ज्या क्षेत्रात टंकन खूप जास्त आहे तिथे अशा सॉफ्टवेअर्सचा फायदा नक्कीच होईल.

हेमंतकुमार 20/04/2020 - 14:46
वा दे, धन्यवाद.
हे वाक्य त्यातील विरामचिन्हांसहित मी आताच स्पीचटेक्सटरवर लिहून इकडे पेस्ट केलंय.
>>> फक्त इंग्लिश ना? मराठीत चिन्हे कधी येतील ?

हेमंतकुमार 20/04/2020 - 15:30
वरती वादे यांनी नैसर्गिक भाषा प्रक्रियेचा उल्लेख केला आहे. त्या अनुषंगाने एक विचार मांडतो. Koparda यांचे एक एक वचन असे आहे: “ कथा ही ही सांगायची वस्तू आहे, लिहायची नव्हे”. याहून पुढे जाऊन असे म्हणता येते की भाषा हीच मुळात बोलायची गोष्ट आहे. लिहिणे एक प्रकारे कृत्रिम आहे. याहून पुढचा एक अतिरेकी विचार: काही शतकानंतर जर लिहिणेच बंद झाले तर….. ? हातांची विविध कामे तोंडच करू लागले तर हात निरुपयोगी होणार का ? उत्क्रांती दरम्यान काहीही होऊ शकेल, अशी एक शक्यता. ....हे माझे मुक्तचिंतन !

चौथा कोनाडा 21/04/2020 - 11:21
थोडेसे "स्पीच टू टेक्स" ह अ‍ॅप वापरलेय मोबाइल वर, खुपच सुधारणा करायला लागल्या म्हणुन टंकन सुरु केले परत. सध्यातरी टंकन करायलाच आवडते. "बोलून-लेखन" हाच भविष्यकाळ असेल तर हे तंत्र शिकायलाच लागेल !

हेमंतकुमार 22/04/2020 - 08:37
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! एक विचार चर्चेसाठी ठेवतो: साधारण आपण असे समजतो की – १. बोलणे हे ऐकण्यासाठी असते आणि २. लिहिणे हे वाचण्यासाठी. आता या नव्या सुविधेने आपण बोलणे >> लिखित स्वरूप >> वाचणे , असे करतोय. पण... भविष्यात जर प्रत्येक संगणकीय आज्ञा बोलूनच करायची ठरली (कारण कळफलक नाहीच) तर मग अये होऊ शकेल का .... बोलणे >>> संगणकीय ध्वनिमुद्रण >>> दुसऱ्याने ऐकणे . मधली ‘लिहिणे’ ही प्रक्रियाच बाद ठरू शकते का? काय वाटते तंत्रज्ञांना ?

टर्मीनेटर 06/05/2020 - 16:51
टंकन: एक कंटाळवाणी क्रिया. ह्या जगात (अर्थातच माझ्यापुरती) सर्वात कंटाळवाणी क्रिया जर कुठली असेल तर ती म्हणजे टंकनक्रिया! सातवी-आठवित असताना टायपिंग इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला होता, पण हे काम आपल्याला ह्या जन्मात जमणार नाही हे चार-पाच दिवसांतच लक्षात आले आणि तिकडे फिरकणे बंद केले! मुळात टायपिंग हे दोन्ही हातांच्या बोटांनी करायचे असते ही संकल्पनाच मला अजून पर्यंत पटलेली नाही 😀 डेस्कटॉप असो की लॅपटॉप त्यावर टंकन करण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा आणि मोबाईलवर (केवळ इंग्रजी; मराठी टंकण्याच्या भानगडीत मी पडत नाही, रादर तेवढी माझी क्षमताच नाही) टंकताना उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर करूनच आत्तापर्यंत जे काही लिहिले आहे ते लिहिले आहे. टायपिंग स्पीड वगैरे गोष्टींची तमा कधी बाळगली नाही आणि ह्यापुढेही कधी बाळगणार नाही 😁 मागे इजिप्त वरील लेख मालिका लिहिताना पहिल्या दोन-तीन भागांनंतर टंकनाचा प्रचंड कंटाळा आल्याने ह्या बोल-लेखन सुविधेचा (Speech to Text) वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पहिली अडचण होती ब्राऊजरची! एकतर ही सुविधा फक्त गुगल क्रोम ब्राऊजरवर उपलब्ध होती आणि तो माझा सगळ्यात नावडता ब्राऊजर! तरीपण करून बघू; झाला उपयोग तर झाला म्हणून क्रोम इन्स्टॉल करून प्रयोगाला सुरुवात केली आणि भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिति निर्माण झाली होती! वरती लेखात आपण म्हंटल्या प्रमाणे आपले उच्चार आणि त्यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द यांच्यातली तफावत दुरुस्त करण्यात जेवढा वेळ जात होता त्यापेक्षा नक्कीच कमी वेळात मी एका बोटाने का होईना पण वेगात लिहू शकत होतो. AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले असल्याने गुगलची किंवा आपण प्रतिसादात दिलेली www.speechtyping.com ही क्रोम बेस्ड सुविधा पुन्हा वापरण्याची वेळ बहुदा येणार नाही. असो, लेख आवडला.. नवीन गोष्टी शिकण्याच्या प्रयत्ना साठी तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा! यापुढेही आपले ह्या सुविधेविषयीचे अनुभव शेअर करत रहा ही विनंती.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 06/05/2020 - 21:10
माझं सुद्धा तुमच्या सारखंच झालं बोलून टंकणे या बाबतीत ! बोलून टंकणे याचा मी देखिल काही कालावधीसाठी मोबाईल वर प्रयोग करून पाहिला, पण चुका दुरूस्त करण्यात वेळ जाऊ लागला. मग बंद केले ते. त्यापेक्षा मराठी टंकन करणे मला जास्त सोयीस्कर वाटले.

हेमंतकुमार 06/05/2020 - 18:29
विस्तृत प्र आवडला !
AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले असल्याने
हे एक भारीच ! धन्यवाद .

Nitin Palkar 06/05/2020 - 20:24
लेख थोडा उशिरा वाचला... त्यामुळे काही चांगल्या प्रतिक्रिया देखील वाचायला मिळाल्या. वैयक्तिक माझा तसा लिखाणाशी, टंकण्याशी खूप कमी संबंध येतो (आळसामुळे मी तो येऊ देत नाही हे त्याचे मुख्य कारण). मीसुद्धा हा प्रयत्न करून बघेन...... लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे.

हेमंतकुमार 12/05/2020 - 11:00
वरील चर्चेतून पण आपण डिजिटल तंत्रज्ञानाची कमाल पाहिली. याच दरम्यान एक लघुलेख वाचण्यात आला त्याचा विषय आहे की, भविष्यात कागदावरील हस्तलेखन टिकून राहील नाही ? त्यात एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणाचा उल्लेख आहे. Forrester ही अमेरिकी व्यापारी संशोधन संस्था, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, यावर अभ्यास करीत असते. त्यांच्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की, विविध उद्योग जगतातील ८७% अधिकारी वर्ग डिजिटल लेखनाच्या बरोबरीने हस्तलिखित टिपणे देखील आवर्जून काढीत असतो ! त्यांच्या या सवयीचा कार्य-समन्वय आणि कार्यक्षमता वाढीसाठी चांगलाच उपयोग होतो, असे दिसले आहे.

हेमंतकुमार 17/07/2020 - 13:19
एक आश्चर्यकारक अनुभव . मराठी बोल लेखन सुविधेत अजून विरामचिन्हे येत नाहीत हे माहिती आहे. काल मी speechtyping.com इथे एक वाक्य बोलल्यावर त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह आपोआप उमटले ! कसे ते काय माहित ? नंतर पुन्हा प्रयत्न करून पाहिला, तर मात्र काही आले नाही.

हेमंतकुमार 04/08/2020 - 18:40
आज या सुविधेची काही विशेष शब्द वापरून परीक्षा घेतली. त्यात असे दिसले : शहामृग षटकोन कोश कोषातून विशेष शहा शोषण शेषाद्री मेष पोषण ……………………. ऋषिकेश ( पण हृषिकेश नाही येत). हृदय वांग्मय ( हे मार खाते ) सुशेगात घर्षण .......बऱ्यापैकी छान होतंय .

नऱ्याभाऊ 04/08/2020 - 18:57
खरंतर मराठी टंक लेखनासाठी याचा उपयोग फार मर्यादित आहे. बरेचसे शब्द स्पष्ट उच्चारूनसुद्धा भलतेच शब्द उमटतात. केलेले लिखाण पुन्हा नीट लक्ष देऊन झालेल्या चुका सुधारायची तयारी असेल तरच अशी app उपयुक्त ठरतात.

In reply to by नऱ्याभाऊ

चौकस२१२ 11/05/2022 - 12:07
बरेचसे शब्द स्पष्ट उच्चारूनसुद्धा भलतेच शब्द उमटतात हायला आम्ही देवनागरीत टंकलेखन करताना पण मुद्राराक्षचे विनोद खूप होतात स्पीच आप नंतर !

Rajesh188 04/08/2020 - 21:58
सर्वच काही ज्ञान वाटत नाहीत. किती तरी लोक अत्यंत खासगी संदेश लिहतात . त्यांना ह्या सुविधेचा काडी िचा उपयोग नाही. फक्त 2 percent लोकांना फायदा होईल.

हेमंतकुमार 17/05/2021 - 10:30
(टंकनाशी संबंधित आहे म्हणून इथे लिहितो) एक चांगला लेख "Roman Lipit Lihinarya मराठी बहाद्दरांविषयी… इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं?"

हेमंतकुमार 11/05/2022 - 10:31
गेली दोन वर्षे मी नियमित बोलून टंकन speechtyping.com येथे करीत आहे. आताचे काही अनुभव : १. अजूनही बोलायला सुरुवात केल्यानंतरचा पहिला शब्द बऱ्याचदा उमटत नाही. मग दोन-तीनदा जोरात उच्चारल्यावर एकदम तो दुहेरी तिहेरी स्वरूपात उमटतो. २. अंक मराठीतून बोलले असताही रोमन लिपीतच उमटतात. ३. जी मराठी नावे आकारांत आहेत व त्यांना जर प्रत्यय लावला (उदा. आवरणातील) तर ते बहुतेक वेळा “आवरण आतील” असे उमटते. त्यामुळे नंतर संपादनाचे काम बऱ्यापैकी पडते. ४. नुसत्या ‘कोविड’ शब्दाची गम्मत अजूनही चालूच आहे ! ते ‘कोबी ड किंवा कॉमेडी’ असे उमटते. (आपण लिहितोय आजाराबद्दल आणि याला पडलय कोबीच्या भाजीबद्दल ! ). मात्र covid-19 असे उच्चारल्यावर ते रोमन लिपीत बरोबर उमटते. ५. मराठीत विरामचिन्हे अजूनही नाही उमटत. तुमच्याही अनुभवांच्या गमतीजमती लिहा. याहून अधिक सरस संस्थळ असल्यास सुचवा.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 11/05/2022 - 12:47
"स्पीच टू टेक्स्ट "चे काही मोजके अ‍ॅप्स वापरून पाहिले, कुठलंच पर्फेक्ट नाही. एखादे विशिष्टच वापरायचे ठरवले तर त्याचे गुणदोष पाहून त्याच्याशी अ‍ॅजेस्टमेंट करणंच उत्तम. मला आपलं थेट टंकनच बरं वाटतं, आणी मिपा टंकन बेष्ट आहे !

हेमंतकुमार 26/11/2022 - 12:59
बोलणाऱ्या व्यक्तीच्या निव्वळ ओठांच्या हालचालीवरून बोलणे ओळखणारे तंत्रज्ञान: VSR यातले जाणकार अधिक काही सांगू शकतील.

In reply to by हेमंतकुमार

बाबुराव 26/11/2022 - 13:04
जाणकार बोलतील काका. आपले स्वतःचे धागे वर काढायचं तंत्रज्ञान लय जब्रा.

In reply to by बाबुराव

हेमंतकुमार 26/11/2022 - 13:36
तंत्रज्ञान लय जब्रा.
धन्यवाद काका.
विषयानुरूप नवीन माहिती दिली आहे.
हाच हेतू आहे.

In reply to by हेमंतकुमार

गवि 26/11/2022 - 13:44
डॉ कुमारेकसर, तुम्ही ज्ञानयज्ञ चालू ठेवा. खोडसाळ प्रतिसादांकडे लक्ष देऊ नका.

हेमंतकुमार 14/12/2022 - 10:05
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या साधनाचा सगळ्या मोठा दुष्पपरिणाम लेखनकलेवर होऊ शकतो. ही कलाच संपुष्टात येऊ शकते
मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या साधनाचा सगळ्या मोठा दुष्पपरिणाम लिहिण्यावर म्हणजे लेखनकलेवर होऊ शकतो. चॅट-जीपीटी हे साधन वापरून कोणीही विनासायास कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःचा म्हणून खपवू शकतो.
.. विचारप्रवर्तक.

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ? ठीक आहे. आता सांगतोच. ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी अजून प्रगत झालेली नाही.