Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150503
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

1 ऐच्छिक : वैकल्पीक 2 अपूर्णता :वैगुण्य 3 विष्णूचे स्थान :वैकुंठ 4 वाचा :वैखरी 5भिन्नता :वैविध्य 6काळी तुळस : पास 7 सावत्र :----- 8धन्वंतरी :वैद्य 9कायदेशीर :वैध 10 आश्चर्य :वैचित्र्य ? 11गरूड :वैनतेय 12 समृद्धी : वैभव? 13 सीता :वैदेही 14 ऐश्वर्य :वैभव 15 निष्फळता :वैफल्य 17 शत्रू :वैरी 18 चारा : वैरण 19 संन्यासी :वैरागी 20 ओसाड :वैराण 21 कुबेर : वैश्वदेव ?? २२. चतुर्वर्णापैकी एक : वैश्य (व्यापारी ) 23. विष्णूभक्त :वैष्णव 24 निज 25 सूड उगवणे :vendetta (इंग्लिश )??? 26 लग्नाची एक पद्धत :वैदिक 27 अग्नी : वैश्वानर ?

२१, २५ चूक. बाकी बरोबर. आता थोडेच राहिलेत धन्यवाद !

एव्हडे अवघड शब्द एव्हड्या पटकन, आमचा खुप विरंगुळा झाला असता.. प्राजक्ता जी ना ___^___ असला तरी त्यांनी आमचा विरंगुळा घालवला.. :- ))

कोणीतरी कुबेराला शब्द सुचवा प्लिज वैमनस्य -वैराला जास्त उपयुक्त वाटतोय (बातम्यात असते ना पूर्व वैमनस्यातून वगैरे ) सूड उगवणे -वैर साधणे ? सावत्र -पास

वैवस्वत पण हे मनूचे नाव आहे एका

१.सूड उगवणे -वैर साधणे ? >>> नाही. एकच शब्द पाहिजे. २. तुळस > बरोबर ३. कुबेर >> चूक. ४ अक्षरीच आहे.

नाही ! प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.

विश्रवा ऋषींचा मुलगा (रावणाचा भाऊ ) ओह्ह हे नाही आठवले धन्यवाद

मंडळी, चला आता ७ व २५ असे दोनच राहिले. नक्की येतील तुम्हाला...... !

२५. वैर निभावणे पैजारबुवा,

उत्तर एकशब्दीच हवे.

7 सावत्र := वैमात्र >>> वैमात्रेय 25 सूड उगवणे = वैरशोधन >>> नाही. हा शब्द तुम्ही कोशात पाहिलाय का ?

हरकत नाही. हेही पर्यायी उत्तर धरू. माझे उत्तर ४ अक्षरी आहे. कोणाला येतंय का बघू. थोड्या वेळाने उत्तर लिहितो.

25. सूड उगवणे : वैरोद्धार

म्हणी ओळखा एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा. १. शरीर, नकार, दौड. २. अवयव, भंग, प्राणी ३. बोट, पहाड, वाढ. ४. कप्पा, दाम, सम्राट. ५. कलत्र, ईश्वर, ती. ...... एक उदा. देतो. (चादर, अवयव, कृती ) याचे उत्तर : अंथरूण पाहून पाय पसरावे.

In reply to by हेमंतकुमार

खुप अवघड जाते आहे.. काम सोडून हाच विचार चालू आहे :-)) ३. बोट, पहाड, वाढ. - डोंगर पोखरून उंदीर काढणे बरोबर आहे का? पण एकच शब्द जुळतोय..

In reply to by हेमंतकुमार

अवयव, भंग, प्राणी
शिंग मोडून वासरांत शिरणे किंवा वासरांत लंगडी गाय शहाणी ??

In reply to by गवि

गवि, “शिंग मोडून वासरांत शिरणे” हे पर्यायी उत्तर म्हणून योग्य. (फक्त ३ शब्दच सूत्र म्हणून दिलेले असल्यामुळे). माझे उत्तर होते : एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.

नाही, दोन्ही चूक . २ मधला प्राणी 'छोटासा' आहे ! ३ मध्ये प्राणी नाहीच .

In reply to by हेमंतकुमार

मला वाटलेच होते चूक असेल.. बघतो.. एक विनंती.. शनिवार रविवारी साठी स्पेशल असे काही नवीन आठवून ठेवा.. आता काम करताना इकडे पूर्ण लक्ष देता येईना.. आणि तिकडे हि नकोच वाटते आहे म्हणा :-))) प्रयत्न करतो..किंवा रिप्लाय वाचतो..

४. कप्पा, दाम, सम्राट. मला माहीत आहे हे पण उत्तर चुकेल.. पण चुकलो तरी मज्जा येते आहे.. माझे विचार असेच का फिरतात चुकीच्या दिशेने माहीत नाही.. -> राजा तीन्ही जगाचा.. आई विना भिकारी...

चूक. हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय याचा आनंद आहे !

३. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होत नाही (हे गूगल वर शोधले) ५. रामायण वाचून विचारतो कि रामाची सीता कोण?

किंवा अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

१.हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ????? ४.राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते

In reply to by Prajakta२१

उत्तर देताना मुळ प्रश्न पण द्या ना.. म्हणजे स्क्रोल करावे लागणार नाही की 1. काय होते आणि 2. काय होते.. धन्यवाद

In reply to by Prajakta२१

. करंगळी सुजली म्हणजे काय डोंगराएवढी होईल का ? बाकी चूक. कप्पा >>> हा वस्त्रालाही असू शकतो , असा विचार करा ! छान प्रयत्न.

१. शरीर, नकार, दौड.-हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ????? २. अवयव, भंग, प्राणी-हे सांगितलेच आहे ३. बोट, पहाड, वाढ.-अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? ४. कप्पा, दाम, सम्राट.- राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते ५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?
>>>>> राम-सीतेचे युग नको ! 'घरची' आणि 'दारची' या दिशेने बघा.

काय राव, ते शब्दांचे मोती हा प्रांत तर तुमचाच !

In reply to by हेमंतकुमार

हा हा, तुम्ही जादुगारच.. बाकी मी हारलो.. उत्तरांची वाट पाहीन.. शनिवार रविवारी पण खास राहूद्या काही असे जमल्यास...

४. कप्पा, दाम, सम्राट-खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा (गूगल बाबा कि जय !) ???????? खिशाच्या हिंट बद्दल धन्यवाद

In reply to by हेमंतकुमार

१. शरीर, नकार, दौड >> अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ . ....... ५. कलत्र, ईश्वर, ती घरची म्हणती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा. धन्यवाद !

नवा खेळ: यात तुम्हाला सहा चित्रपटांची नावे ओळखायची आहेत हे सर्व चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत. क्रमांक १ व २ मराठी, ३ व ४ हिंदी आणि ५ व ६ इंग्लिश भाषिक चित्रपट आहेत. त्यांचे कथानक असे आहे: १. जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेल्या भारतीय समाजाचे चित्रण. तळागाळातून वर आलेला तरुण, त्याचे खेड्यातून महानगरातले स्थलांतर आणि त्याला आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो, याचे उत्तम चित्रण. या तरुणास पुढे मोठा राष्ट्रीय पुरस्कार. २. एक कुस्तीगीर, गरीब घरातला, मूकपटापासून अभिनयास सुरवात, पुढे चित्रनिर्माता आणि खूप श्रीमंत झालेला माणूस. त्याचे चित्रण. ……………….. ३. एक जोडपे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध. भारतातील खेडी सुधारायचा ध्यास घेतलेले. तंत्रकुशल. कमी खर्चातील सोप्या विद्युत जनित्राची निर्मिती. स्वयंसेवी कार्यास वाहून घेतलेले. ४. भारतातील नैसर्गिक प्रकोप ही सत्यघटना. त्याच्यात भर घालून आंतरधर्मीय व्यक्तींची प्रेमकथा. अर्थातच पुढे प्रचंड अडथळे. सुखी शेवट नाही. ..................... ५. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला हे सूत्र. ही व्यक्ती मोठे आर्थिक घोटाळे करण्यात तरबेज आणि तोतयेगिरी. तोतया भूमिकांची व्याप्ती स्तिमित करणारी. पुढे तुरुंगवास. शिक्षा भोगल्यावर चक्क सरकार दरबारी मानाची नोकरी ! ६. एक अपहरण. शोधण्यास पोलिसांचे अपयश. एका महिलेने स्वतःच शोधमोहीम हाती घेणे. त्यातून एका बेटावरील अनेक वेश्यांचे खूनसत्र उघडकीस येणे.

३. स्वदेस ५. कॅच मी इफ यू कॅन बाकी चित्रपटांबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

३. स्वदेस ५. कॅच मी इफ यू कॅन ...दोन्ही बरोबर

१. नटरंग ? ३. स्वदेस ---पण त्याच्यात ते जोडपे नंतर बनते आणि खेडी नाहीतर एकच खेडे सुधारतात तंत्रकुशल फक्त शाहरुख खान दाखवलं आहे हिरोईन शिक्षिका असते

प्राजक्ता, स्वदेस बद्दल सहमत. मी खरी घटना जास्त लिहिली ! नंतर सुधारणा लिहीण्यास आलो होतो, पण त्याच्या आत बरोबर उत्तर आलेले होते. क्रमांक २ च्या नायकाची ‘खरी’ माहिती थोडी वाढवतो: आधी कामगार >> अभिनेता >> चित्रनिर्माता >>मुंबईत ऐशोआरामी जीवन >> आर्थिक उतरण व गरीबी

In reply to by Prajakta२१

मला माहित नाही हा सिनेमा.. पहायला पाहिजे.. अवांतर : बायोपिक मध्ये आपला सगळ्यात आवडता पिक्चर आहे, भाग मिल्खा भाग.. कधी ही लागला की पाहतो अति अवांतर : कुमार सर, तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली .. समोर असते पण आठवतच नाही काही :-))

In reply to by गणेशा

तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली
अहो, तुम्हीच नाही फक्त. आपल्या बहुतेकांचे असेच होते ! कोडी तयार करून मेंदूला तरुण करत राहायचे ....

क्या बात है, २ अगदी बरोबर !

जातीभेदाने पोळलेली व्यक्ती

आता दोनच उरली आहेत. म्हणून थोडी भर: . हे दलित लेखनावर आधारित. ६. हा २०२० मधील चित्रपट.

मी पण ६. abducted ?????????पण स्टोरी जुळत नाहीये एवढी १. डॉ बाबासाहेब आंबेडकर ???

१. बलुतं >>> अत्याचार हा चित्रपट. ६. lost girls. ........धन्यवाद !