अनुष्टुप छंद - सोपा करून सांगायचा प्रयत्न
जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे.
परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो-
श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्।
द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥
ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.
XXXX लगागागा
XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा
XXXX लगालगा {2}
X म्हणजे लघु किंवा गुरू काहीही.
प्रत्येक चरणामध्ये आठ अक्षरे असतात, पण नेहमीच्या वापरामध्ये आपण दोन चरण एकत्र करून सोळा अक्षरांची एक ओळ घेतो. म्हणजेच वरचा आकृतिबंध असा दिसू शकतो-
XXXX लगागागा XXXX लगालगा {1}
XXXX लगागागा XXXX लगालगा {2}
आता XXXX च्याठिकाणी लघु आणि गुरुच्या वेगवेगळ्या योजना (कंसामध्ये) करून काही उदाहरणे पाहू.
1) (लगागागा) लगागागा, (लगागाल) लगालगा
मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे
2) (गालगागा) लगागागा, (गागागागा) लगालगा
कोटिच्या कोटि उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे
3) (गागालगा) लगागागा, (गालगागा) लगालगा
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा
4) (ललगाल) लगागागा, (गालगाल) लगालगा
धनधान्य पशूवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही
5) काही ओळींमध्ये दोन लघु अक्षरे = एक गुरू असे मानून जास्त लवचिकता आणली आहे. उदा
(गालगागा) लगागागा, (गालगागा) लगालगा
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
येथे 'हनु' या दोन लघु अक्षरांचा एक गुरु मानलेला आहे.
या काही उदाहरणांमुळे इतक्या सुडौलआणि लवचिक छंदाची थोडीशी भीती गेली असेल अशी आशा आहे.
वाचने
14080
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
सुंदर
In reply to सुंदर by निनाद
धन्यवाद
रामदासस्वामींबद्दलचा आदर
In reply to रामदासस्वामींबद्दलचा आदर by कानडाऊ योगेशु
आणि करूणाष्टके मालिनी ह्या अत्यंत गेय वृत्तामध्ये लिहिली आहेत
In reply to आणि करूणाष्टके मालिनी ह्या अत्यंत गेय वृत्तामध्ये लिहिली आहेत by धष्टपुष्ट
अनुदिन अनुतापे तापलो रामराया
In reply to अनुदिन अनुतापे तापलो रामराया by कानडाऊ योगेशु
+१
उत्तम माहिती.
@ धष्टपुष्ट
In reply to @ धष्टपुष्ट by संजय क्षीरसागर
आहे ना राव!
In reply to आहे ना राव! by धष्टपुष्ट
हे मी पण करुन पाहिलं
In reply to हे मी पण करुन पाहिलं by संजय क्षीरसागर
लनानसे हे लगालगा असंच आहे ना.
In reply to लनानसे हे लगालगा असंच आहे ना. by धष्टपुष्ट
मला काय म्हणायचंय >
In reply to मला काय म्हणायचंय > by संजय क्षीरसागर
आता कळलं आपली कुठे चुकामुक झाली
In reply to आता कळलं आपली कुठे चुकामुक झाली by धष्टपुष्ट
आता बरोबरे !
In reply to आता बरोबरे ! by संजय क्षीरसागर
बरोबर!
In reply to बरोबर! by धष्टपुष्ट
मनःपूर्वक धन्यवाद !
साहेब
अनुष्टुभ छंद हा मात्रा छंद आहे की केवळ अक्षर संख्या छंद ?
In reply to अनुष्टुभ छंद हा मात्रा छंद आहे की केवळ अक्षर संख्या छंद ? by Gk
@ Gk : भारीच !
In reply to अनुष्टुभ छंद हा मात्रा छंद आहे की केवळ अक्षर संख्या छंद ? by Gk
माझ्या माहितीप्रमाणे उत्तर देतो आहे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे उत्तर देतो आहे by धष्टपुष्ट
अग्निमीळे पुरोहितं
मस्त!! शाळेत असताना फक्त