मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दवेध- भाग २

मारवा ·

मारवा 22/01/2020 - 23:26
ताज्या बातमीनुसार इसरो ने नविन humanoid robot आपल्या गगनयान प्रकल्पासाठी बनवलेला आहे. या लेडी रोबोट चे नाव त्यांनी ठेवलेले आहे " व्योमित्रा" हे सुंदर नाव जमलेले आहे. व्योम चा अर्थ आकाश असा होतो आणि त्याची मित्र व्योमित्रा व्योम चा चटकन आठवणारा मराठीतला वापर म्हणजे बालकवीच्या फुलराणी त ही ओळ तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली परस्परांना खुणवुनी नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी त्यांच्याच एका कवितेत " व्योमपटी जलदांची झाली दाटी " अशी ओळ येते कुठे ते नेमके आठवत नाही पण ही ओळ आहे. दुसर उदाहरण म्हणजे फेमस बंगाली डिटेक्टीव्ह "व्योमकेश बक्षी " यातील व्योमकेश हे नाव शंकराचे आहे कारण का तर शंकराचे मोठे मोकळे केस आकाशत उडत असतात म्हणून असे केस असणारा व्योमकेश शंकर अजुन एक शब्द आहे " व्योमचारी " त्याचा अर्थ पक्षी चिमणी जे आकाशात विहार करतात बाय द वे कवि ग्रेस यांनी पक्ष्यांना दिलेले एक सुंदर नाव आठवले ते म्हणतात पक्षी म्हणजे " आभाळछंदाचे प्रवासी "

हा भाग देखिल आवडला काही परिचीत शब्दांचे अपरिचीत अर्थ समजले. काही शब्दांचा नव्याने परिचय झाला आणि काही नवे शब्द समजले. पैजारबुवा,

मित्रांनो अगोदरच्या भागात न आलेले सर्व शब्द एकत्रित इथे देतो. १- समरसता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, १४ एप्रिल २०१६ रोजी साजरा करण्यात आलेल्या १२५व्या जयंती दिवसापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने शासकीय कामकाजात ‘सामाजिक समता’ ऐवजी ‘सामाजिक समरसता’ या शब्दाचा वापर सुरू केला असून यापुढे त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक समरसता दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे संघाचा जाणीवपुर्वक समता या शब्दाला विरोध आहे त्याच्या मते समरसता हेच अधिक योग्य असे मुल्य आहे. या मागे असलेली विचारसरणी डॉ.

शब्द वेध

मारवा ·

गणेशा 25/12/2019 - 00:18
अप्रतिम... पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे.. उद्या निवांत पुन्हा वाचणार लेख.. एकूण तुमचा शब्दवेध आणि त्यासाठीचे शब्द संचित जबरदस्त आहे.. जाता जाता : कुमार यांच्या धाग्यातील 'माळवद' हा शब्द वाचला आणि मन माझ्या आजोळी गेले, तेथील सर्व घरे माळवदाची होती.. ते बालपण... शब्दांवरून असे आठवनिंच्या राज्यात पण मस्त जाता येते.. कधी काळी थोडे लिखाण करायचो, तेंव्हा 'शब्दमेघ' नावाने लिहायचो... त्यावरून तर खूप आठवणी... धन्यवाद...

मारवा 25/12/2019 - 07:31
लेखक राजकारणी शशी थरुर हे कठिण विलक्षण असामान्य इंग्रजी शब्दांचा वापर त्यांच्या लेखनात बोलण्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधांनावरुन बरेचदा वाद होत असतात. फार पुर्वी एकदा त्यांच्या cattle class च्या विधानावर मोठी राळ उडाली होती. तर मागे एकदा त्यांनी एक ट्वीट करुन त्यांच्या अशा लांब कठीण इंग्रजी शब्दवापरासाठी वाचकांची माफी मागितलेलेली होती त्यातही त्यांनी एक विलक्षण शब्द वापरुन उपहासात्मक टोमणा मारला ते ट्वीट असे होते. I'm sorry if one of my tweets y'day gave rise to an epidemic of hippopotomonstrosesquipedaliophobia! [Don't bother looking it up: it's just a word describing a fear of long words]. But #TheParadoxicalPrimeMinister contains no words longer than Paradoxical! या शब्दाचा अर्थ ही त्यांनी दिलेला अजुन खणायचे तर या सस्थळावर बघु शकता इथे विविध प्रकारच्या फोबियांची विस्तृत माहीती आहे. या भीतीचे परीणाम या भितीच्या एका सर्वेक्षणाचा अहवाल वगैरे ही आहे. https://www.fearof.net/fear-of-long-words-phobia-hippopotomonstrosesquippedaliophobia/ People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one इथपर्यंत ठिक होते पण हे कमी होते की काय त्यांच्या या वरील ट्वीट ला जयेश गोपीनाथन नावाच्या व्यक्तीने उत्तर दिले ते म्हणजे कहर च होते ते असे Being a sesquipedalian, Mr. Tharoor is quite ebullient in gasconading about his habit of circumlocution. Little does he show any perspicaciousness or excogitate before assuming rest of the people are saxicolous. This is idiosyncratic with his personality of being anomalistic! माझी लांब शब्दांची भिती वाढुन मला सध्या घाम फुटलेला आहे मला पॅनिक अटॅक आलेला आहे. सायटीत दाखवलेली खालील लक्षणे मी अनुभवतोय काय म्हणावे या स्थितीला ? पळुन जा गडे पळुंजा !!! People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one

mrcoolguynice 25/12/2019 - 09:31
"फ़क़त" माझा मित्र(इंग्लिश मिडीयमवाला ), हा शब्द जेव्हा , ऐकायचा (गाणं हिंदी असलं तरीही ) तेव्हा लय हसायचा.. म्हटलं , का रे बाबा, यात हसण्यासारखं काय ?.. उस हसीन ने कहा, सुनो जान-ए-वफ़ा ये फ़लक़ ये ज़मीं, तेरे बिन कुछ नहीं तुझपे मरती हूँ मैं, प्यार करती हूँ मैं बात कुछ और थी, वो नज़र चोर थी उसके दिल में छुपी, चाहत और गर्ज़ी थी प्यार का, तो फ़क़त, इक बहाना था इक हसीना थी, इक दीवाना था ...

रमेश आठवले 25/12/2019 - 22:50
शासन आणि चेष्टा हे दोन मुळात संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द. पण त्यांचा अर्थ मराठी मध्ये बदलतो. संस्कृत मध्ये किंवा हिंदी मध्ये त्यांचा अर्थ शिक्षा आणि प्रयास असा आहे. पण मराठीत तेच शब्द ऍडमिनिस्ट्रेशन आणि मस्करी या अर्थाने वापरतात.

मारवा 26/12/2019 - 22:45
Queen चा प्रचलित अर्थ एखाद्या स्वतंत्र राज्याची स्त्री शासक किंवा राजाची पत्नी असा आहे. जो सर्वात जास्त प्रचलित आहे. दुसरा एक अर्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एक यशस्वी श्रेष्ठ स्त्री उदा. ब्युटी क्विन टेनिस क्विन इ. असा ही एक प्रचलित वापर आढळतो तर या व्यतिरीक्त याचा जो समलैंगिक संदर्भातील अर्थ आहे व शब्द आहेत ते बघु या. शब्दकोशात दिलेला अर्थ असा a homosexual man, especially one regarded as ostentatiously effeminate. How the Homosexuals Saved Civilization: Cathy Crimmins या पुस्तकात लेखिका या शब्दाचा मागोवा घेते.त्यात खालील शब्दांचा उल्लेख येतो. १- Drag Queen a man who ostentatiously dresses up in women's clothes. या प्रकारचा समलैंगिक पुरुष स्त्रीयांची वस्त्रे पोषाख घालुन वावरतो. २-Size Queen A man who prefers large penises 3-Curry Queen a white Caucasian man who exclusively prefers to date South Asian (Indian, Pakistani etc.) men. यात लेखिकेचे एक् असे रोचक मत आहे की Queen हा शब्द कालांतराने हेट्रोंच्या विश्वात संक्रमित झालेला आहे त्या म्हणतात की या शब्दाचा आता जो अर्थ स्थिर झालेला आहे तो असा की " To be a queen means you are particularly intense about something इथे उदा. ज्याला सिनेमाचं वेड आहे त्याला मुव्ही क्विन म्हणू शकतो. त्यांच्या मते हेट्रोंच्या हद्दीत हा शब्द ( या शब्दाचा वापर ) हा गेल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे Drama Queen हा शब्द आहे. याच्या प्रत्यक्ष वापराचे एखादे उदाहरण आढळल्यास शोधुन टाकतो

मारवा 26/12/2019 - 22:46
१ श्री अनिरुद्ध कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगमध्ये Toska या रशियन शब्दा संदर्भात झपुर्झा चा उल्लेख करतात हे रोचक आहे अवश्य पहावे. त्यांच्या मते Toska एक it is a sensation of great spiritual anguish आहे. आणि झपुर्झा हा मराठी शब्द याच प्रकारची अर्थछटा दाखवतो. http://searchingforlaugh.blogspot.com/2012/09/is-toska-zapurza.html २ उगमा बद्दल बोलायच तर माझ्या मते हा शब्द केशवसुतांनी नव्यानेच निर्माण केलेला आहे. यामागे कारण असे असावे की सहसा आध्यात्मिक अनुभुती च्या प्रांतात किंवा त्या श्रेणीतला अनुभव कवीला आलेला असेल तर तिथे एक समस्या असते. म्हणजे असा जो " पल्याड चा अनुभव " असतो तो भाषेतील उपलब्ध शब्दांच्या व त्यांना चिकटलेल्या रुढ अर्थांमधुन व्यक्त च होऊ शकत नाही असे कवीला वाटत असावे. म्हणुन त्यांना उपलब्ध जुन्या शब्दापैकी एक वापरण्यात अडचण असावी कारण तो चुकीचा अर्थ पोहोचवेल. मग आपली अनुभुती पोहोचवण्यासाठी कवीला नवाच शब्द निर्माण करण्याची गरज निर्माण होत असावी. या उर्मीतुन अशा विलक्षण शब्दाची निर्मीती झाली असावी होत असावी. नेती नेती या मार्गानेही जसा ते हे नाही ते ते हे ही नाही असे करत करत ते काय असावे याकडे निर्देश करत तिथपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. इथेही कवी त्याचा अनुभव पोहोचवण्याचा डेस्परेटली प्रयत्न करत आहे. मात्र इथे तो नविन शब्दनिर्मीती ही करुन मदत करतोय. हर्षखेद ते मावळते, हास्य निवालें अश्रु पळाले; कण्टकशल्यें बोंथटलीं, मखमालीची लव वठली; कांही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला, तिमिर हरपला; काय म्हणावें या स्थितिला ?- झपूर्झा ! गडे झपूर्झा ! १ आता झपुर्झा हा शब्द कुठुन सुचला असेल ते फारसे महत्वाचे यासाठी वाटत नाही की त्यांना एक युनिक लेबलींग त्यांच्या युनिक अनुभुतीसाठी हवे होते हे महत्वाचे आहे तरी गुगलल्यावर हे सापडले. उद्गा . ( काव्य ) जा , पोरी , जा , हें वाक्य झपाटयानें उच्चारलें असतांना होणारा ध्वनि , शब्द . हा शब्द केशवसुत कवीनें प्रत्यानंदाच्या सीमेचा वाचक याअर्थी रूढ केला . झपूर्झा ! गडे झपुर्झा ! - केक १०६ . अजुन एक पर्याय असतो That whereof we cannot speak, thereof we must remain silent’, पण असे कवीच्या बाबतीत अवघड असावे कदाचित. एक "गुंगे का गुड" संकल्पना आहे ती अशीच एखाद्या मुक्या माणसाने गुड खाल्ला तर आता त्याने त्याचा गोडवा कसा वर्णावा ?

In reply to by मारवा

मारवा 26/12/2019 - 22:54
या कवितेत ज्या विरोधाभासाच्या जोड्या केशवसुतांनी दाखवलेल्या आहेत त्यातील हर्ष खेद आसु हसु या कॉमन आहेत पण सर्वात विलक्षण जी जोडी आहे ती कण्टकशल्ये आणि मखमालीची लव त्यातही अजुन स्पेसीफिक निर्देश करण्यासारखा म्हणजे कण्टकशल्ये चे बोथटणे पण कॉमन वाटते पण मखमालीची लव " वठणे" चा जो कॉन्ट्रास्ट वरील कण्टकशल्ये ला दिलेला आहे तो निव्वळ अप्रतिम काव्याचा नमुना आहे

मारवा 26/12/2019 - 22:50
शिवकालीन महसुल व्यवस्थेवरील एका पुस्तकात खालील माहीती आढळली.शिवरायांच्या राज्यकारभारात त्याचे अष्टप्रधान मंडळ होते. या अष्टप्रधान मंडळाच्या हाताखाली खालील १८ कारखाने होते त्यांची नावे अशी १-खजिना २- जवाहिरखाना ३-अंबरखाना ४-शरबतखाना ५- तोफखाना ६-दफ्तरखाना ७- जामदारखाना ८-जिरातखाना ९- मुतबखखाना १०-उष्टरखाना ११-नगारखाना १२- तालीमखाना १३-पीलखाना १४-फरासखाना १५-दारुखाना १६-शरतखाना या व्यतिरीक्त या व्यवस्थेत १२ महाल होते ते असे १- पोते २- सौदागिर ३- पालखी ४-कोठी ५- इमारत ६ -बहिली ७-पागा ८-शेरी ९- दरुनी १०-थट्टी ११-टांकसाळ १२-छबिना यातील वेगळा वाटला व आजही रीलेट करता येइल असे दोन अगोदर घेउ. पीलखाना -फिलखाना हैद्राबादेत जुन्या हैद्राबादेत एक भाग आहे बहुधा बेगम बजार च्या जवळ त्याचे नाव पीलखाना असे आजही आहे. तेथे प्लास्टीक जनरल ट्रेडींग चे मोठे सेंटर आहे अनेक ठोक किरकोळ दुकाने असलेला हा व्यापारी भाग आजही आहे. तर याचा अर्थ हत्ती ठेवण्याची जागा असा होतो. म्हणजे इथे सैन्यासाठी वा इतर राज्याचे जे हत्त्ती आहे ते इथे ठेवले जात असावेत. याचा अचुक उच्चार फिलखाना असा आहे फिल हा अरेबिक फारशी उगम असलेला शब्द आहे फिल चा अर्थ हत्ती असा दिलेला आहे. यावरुन हा शब्द फिलखाना असा आहे. आता वरती अजुन एक अंबरखाना हा शब्द आहे.याठिकाणी हत्तीवरील सामान अंबारी संबंधित शस्त्रे इत्यादी बाळगणे साठी हा आहे ( उत्पादनही होत असावे कदाचित माहीत नाही ) फरासखाना पुणे नगरीत एका पोलिस चौकीचे नाव " फरासखाना पोलिस चौकी " असे आहे. फरासखाना चा अर्थ जो मला सापडलाय एका शब्दकोशात तो वस्तुभांडार या अर्थाने आहे.म्हणजे मंडप सामाना या अर्थाने मला वाटते कदाचित सैन्या साठी चे तंबु व ते उभारण्यासाठीचे कापड दोरखंड बांबु हा सेट फरासखान्यात ठेवला बनविला जात असावा. उष्टरखाना म्हणजे उंट व त्याच्या संबंधित सामानाच्या कारखान्याचे नाव. शरबतखाना हा शब्द रोचक वाटला. शरबत ही आपली मर्यादीत ओळख सध्याची आहे. एक प्रकारचे फळाचा अर्क असलेले गोड पेय जसे रुह अफजा इत्यादी. पण शरबत चा म्हणजे या द्रावणाचा या शरबत ला एक औषधी अर्थाची छटाही आहे. खर म्हणजे शरबत ची व्याख्या फार व्यापक आहे. शब्दकोशात शरबत चा अर्थ डिस्पेन्सरी असाही दिलेला आहे. हा इथे डिटेल अर्थ बघावा पुर्ण अर्थ अनेक बाबी दाखवतो न्ह्वाव्या कडील एक परंपराही त्यात येते. P شربت sharbat (for A. شربة, n. of un. fr. sharb, inf. n. of شرب 'to drink'), s.m. A draught (of water, &c.), drink, beverage, cup; sherbet, sugar and water (the most com. signification); a dose of medicine, draught, potion:—sharbat pilānā (-ko), To give (a barber) sherbet to drink (and so seal the betrothal which he has arranged):—sharbat-pilāʼī, s.f. The present made by a bride and bridegroom to the barber who arranged the marriage:—sharbat-ḵẖāna, s.m. A dispensary:—sharbat-dār, s.m. A servant who has charge of the water, wine, &c.; a butler:—sharbat-ke-se ghūṅṭ pīnā, To gulp down as sherbet; (fig.) to suffer meekly. यातील एक किती छान आहे बघा शरबत के से घुट पीना चा अर्थ तो म्हणतो to suffer meekly. ( हे सिद्ध करते की शरबत हा कडु औषधी काढा सारखेही असेल की जे सहन करणे अवघड असावे त्यावरुन हा वाकप्रचार आलेला असावा. सध्याच्या शरबत च्या रुह अफजा इमेज चे हे शरबत नाही ) तर वरील शरबत चा व्यापक अर्थ बघितल्यावर शरबत खाना हा १८ पैकी एक कारखाना असण्याइतका महत्वाचा विषय का होता याची कल्पना येते. महालापैकी बहिली चा अर्थ रथ असा दिलेला आहे याचा अर्थ रथाशी संबंधित काही कारखाना असावा इतकेच आकलन होते. तसेच थट्टी चा अर्थ गोठा इतकाच दिलेला आहे यावरुन फारसा बोध होत नाही दरुनी महाल मात्र लक्ष वेधुन घेतले ते दरुनी ने अर्थ दिलेला आहे अन्त:पुर या शब्दाचा शोध घेतला तर मजेदार माहीती कळते. एक दरुनी म्हणजे आंतील असा एक लिटरल अर्थ उर्दु शब्दकोश दाखवतो आता बघा अंदरुनी हा प्रचलित शब्द पण हाच अर्थ दाखवतो म्हणजे लिंक बरी लागते. दुसरा अर्थ उर्दु शब्दकोशात सरळ सरळ जनाना जनानखाना असाच दिलेला आहे. गंमत म्हणजे अंत;पुर हा ही शब्द सरळ सरळ सारखाच अर्थ दाखवतो. ते काही त्याला जनानखानाच आहे असे म्हणत नसावेत त्यांच्या दृष्टीने आंतील कार्ये करण्याची जागा स्थान इतकेच् महालातील पोते चा निर्देश खजिना असा केलेला आहे. हे सांभाळणारा व्यक्ति "पोतदार" हा म्हणजे धातुपरीक्षक अधिकारी होता अशी जुजबी माहीती मिळते. सध्या पण पोतदार हे आडनाव आढळते. पण रोचक बाब म्हणजे दरुनी महाल शिवाजी महाराजांच्या ऑफिशीयल कारभाराचे एक अभिन्न अंग होते.

श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली. अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच.

उडु - उडी उड्डाण ते पाणी आणि वनस्पती नाम

माहितगार ·

माहितगार 24/12/2019 - 14:52
__/\__ अनेक आभार काही उल्लेख लेख लिहिताना वेळ कमी पडल्याने राहुन गेले. हिंदी भाषेतील 'कुदी' हा 'उडी' शब्दाशी संबंधीत आहे हे चटकन लक्षात येत नाही पण 'कुदी' शब्दातील 'उदी' हे उच्चारण लक्षात घेता यावे. मराठीत उदो बोला उदो बोला ....उदोकारें गर्जती हा जयजयकार स्वरुप 'उद्घोष' उच्चारण मुळात आदीवास कालीन समुह मोहीमांचे सुतोवाचक राहीले असू शकेल का? सोबत देवता पुजेसोबतचा संबंधतर स्पष्टच अधोरेखित होतो अनेक देवतांचे पुजन वनस्पती स्वरुपातही होत आले हेही लक्षात घेता येते. हिन्दीत उदो/उदौ म्हणजे उदय आणि त्याशी संबंधीत उदोत, उदित, उदोती, उदोतकर हे प्रकाशाशी संबंधीत शब्द योजना येते. हिन्दी उदुआ : पुं० [?] एक तरह का मोटा जड़हन धान। हा वनस्पती संबंधीत शब्द मिळतो हिन्दी उदुंबर मराठी औदुंबर संस्कृत उडुम्बर हे आपल्या परिचयात आहेच. आणि मग दाळीतील 'उडीद' - (हिन्दीत अन्न) शब्दाच्या व्युत्पत्तीचा आणि वनस्पतींच्या प्राचीनतेचा अंदाज येतो. उदंड या शब्दाच्या व्युत्पत्तीचाही अंदाज यावा.

महाराष्ट्रीय गुढी परंपरेच्या अभ्यासाच्या निमीत्ताने प्राचीन काठीपुजांच्या दुव्यांचा अधून मधून धांडोळा घेत असतो. गुढी या शब्दाचा मुळ अर्थ काठी कसा आहे आणि कुडी शब्दाशी असलेला संबंध मी माझ्या मागील गुढी उभारनी या लेखाच्या माध्यमातून करुन दिला होता. कर्नाटक आणि ओडीशा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि देवालयांसाठी 'गुढी' शब्द बर्‍यापैकी प्रचलीत आहे. याचा अर्थ दगड वीटांच्या मंदिरांचा विकास होण्यापुर्वी उघड्यावर दिसणारे सर्व साधारण दगड , वृक्ष तसेच काठी यांची पुजा होत असणार.

चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

हेमंतकुमार ·

स्मिताके 19/12/2019 - 21:23
नेहमीप्रमाणे छान माहितीपूर्ण आणि रंजक लेख. एक चांगला छंद अनेक वर्षे जोपासून त्यात प्राविण्य मिळवण्याच्या आपल्या चिकाटीला सलाम!

मारवा 19/12/2019 - 21:31
तुमचे लेख वाचुन मला आवडलेल्या काही रोचक शब्दांवर लेख लिहिण्याची इच्छा वाढत चालली आहे. कधी कधी काही शब्द जरी नेहमीचे असले तरी त्याचे वापर प्रांतागणिक बदलतात यात खुप मजा असते. तुमचे शब्दप्रेम लोभसवाणे आहे.

In reply to by मारवा

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:07
मु वि, याही भागातील उद्घाटन प्रतिसादाबद्दल आभार ! खेळातील पहिली धाव खूप महत्वाची असते ! स्मिताके, प्रोत्साहनाबद्दल आभार . मारवा, रोचक शब्दांवरील लेख जरूर लिहा. प्रतीक्षेत !

कंजूस 20/12/2019 - 06:20
नेहमीप्रमाणे छान माहितीपूर्ण आणि रंजक लेख. +१ __________ तुमचे इंग्रजी कोड्यांचे उपाय वाचून सुचलं की कोडं आणि त्याचं उत्तर असे एका पिडीएफमध्ये* एका पानावर कोडे आणि दुसऱ्या पानावर उत्तर असं मोबाईलमध्ये साठवायचे. प्रश्न आणि उत्तर लगेच पाहायचे. हे सोपेही पडेल आणि प्रवासात कामाला येईल. निरनिराळ्या विषयावरचे प्रश्न असतात आणि ते आपल्या बटरफिंगर्समधून निसटणारच आहेत तर धडपड कशाला करायची! गंमत चालू ठेवायची. *- फोटो काढायचे कोडे आणि उत्तराचे आणि एप वापरून पिडीएफ करायची. दोन्ही एकाच पिडीएफमध्ये येणार.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:13
जॉन, स्क्रीबल फक्त लांबून पाहिले आहे ! तुम्ही लिहा ना एखादा परिच्छेद त्यावर. शेखर, बराच काळ तुम्ही लुप्त होतात. तुमच्या भेटीने कोडे पूर्ण सुटण्याइतकाच आनंद झालेला आहे ! कंजूस, तुम्ही सुचवलेल्या तांत्रिक युक्त्या रोचक आहेत. छान !

मात्र कोड्यातील इतर जे प्रांत आहेत त्यात आपण जेमतेम रांगणारे बाळ आहोत !
हे आवडले. थिएटर आणि बटरफिंगर्स आवडली. झेल सोडणार्‍याला चिकनफार्मर असेही म्हणतात. मराठीत आम्ही कोंबडीपकड म्हणत असू. हत्ती आवडलाच. १ आणि २ असे दोन्ही अ‍ॅनाग्राम्स सुरेख.
ही पातळी आनंद आणि समाधानाची आहे. याहून अधिक कोड्यांत बागडून ‘कोडे-किडा’ होण्याची इच्छा नाही !
ही पातळी अत्युच्च समाधानाची आहे. त्याबद्दल अभिनंदन. फारच थोड्यांना हे जमते. दोन चित्रातील फरक ओळखा इ. छोट्यांची कोडी पण आनंद देऊन जातात. एखादे गाणे कोणत्या शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारित आहे हे ओळखणे या गोष्टी पण असाच निर्भेळ आनंद देऊन जातात. या सर्वातला आनंद कळला की मग आपण किरकोळ राजकारण, डावपेच, शह-काटशह यापासून दूर होतो आणि आयुष्यच सुंदर बनून जाते. या नितांतसुंदर लेखद्वयाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

गणेशा 20/12/2019 - 08:46
अप्रतिम.. मस्त. पण इंग्लिश कोडे अवघड आहे.. तुम्ही सुंदर लिहिले आहे.. असेच लिहीत रहा... वाचत आहे..

मनो 20/12/2019 - 09:10
माझ्या आजोबांना मराठी कोडी सोडवण्याचा फार नाद होता. त्याकाळी म्हणजे १९८० च्या दशकात मासिकातून येणारी कोडी सोडवण्यासाठी बक्षिसे असत. त्यातल्या त्यात थोडेफार चावट म्हणून प्रसिद्ध असलेले 'जत्रा' मासिक, विशेषतः त्याचा दिवाळी अंक यात येणारे कोडे बहुतेक मोठ्या बक्षीसाचे असावे. आजोबांना त्यात गती असल्यानं बहुदा बरीच बक्षिसे मिळतही असावीत. त्यामुळे कोड्याच्या निमित्ताने ते अंक घरात येत. तसेच बाकी मजकूर पाहून आपण घेणार नाही असे पेपर, मासिके कोड्यांसाठी घरात येत - 'दक्षता', पोलीस टाइम्स अशी काही नावे आता आठवतात. एकदा कोडी सोडवून झाली की जुने अंक आम्हा लहान मुलांच्या हातात लागत. त्या लेखामधील बरेच काही कळायचे ते वय नव्हते, पण त्या लेखांचे आणि शब्दांचे अर्थ कुणाला विचारण्याची हिम्मत होत नसे हे ही खरे. तुमच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, धन्यवाद, असेच लिहीत रहा.

हेमंतकुमार 20/12/2019 - 10:15
सुधीर,चिकनफार्मर असेही म्हणतात. मराठीत कोंबडीपकड म्हणत असू. >>>> चिकणे शब्द ! •
एखादे गाणे कोणत्या शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारित आहे हे ओळखणे या गोष्टी पण असाच निर्भेळ आनंद देऊन जातात. ......आणि आयुष्यच सुंदर बनून जाते.
>>>> क्या बात है ! गणेशा, मराठीपेक्षा इंग्लिश कोडे अवघड हे मान्यच. मनो,
बाकी मजकूर पाहून आपण घेणार नाही असे पेपर, मासिके कोड्यांसाठी घरात येत –
>>>>> अगदी ! रोचक आठवणी

हेमंतकुमार 20/12/2019 - 12:18
वामन, धन्यवाद. .................... या विषयाचे सादरीकरण मुद्दाम २ भागांत ( मराठी व इंग्लिश कोडी) केले होते. ज्यांना लेख आवडले असतील त्यांनी या दोनपैकी कोणता भाग अधिक भावला, हे सांगितल्यास आभारी होईन. (आत्मपरीक्षण हा हेतू).

कंजूस 20/12/2019 - 13:46
दोनपैकी कोणता भाग अधिक भावला, >> दोन्हीही. छंदासाठी, पुस्तकवाचनासाठी कुणीतरी वेळीच डिवचावे लागते. अरेच्चा अशीही गंमत असते काय? आणि मग ती आपण करून बघतो. आयुष्यात जेवढ्या लहानपणी डिवचलो जाऊ तेवढे चांगले. नाही जमलं तर सोडून देतो पण वेळ निघून गेल्यावर पिपाण्या वाजवण्यात शिकण्यात गंमत निघून जाते. आता ते का तुम्ही केलेत. छान.

इंग्रजी कोड्यांच्या वाट्याला जायची कधी हिम्मत झाली नाही. पण स्क्रॅबल मात्र भरपुर खेळलो आहे. मी आणि माझा लहान भाउ डिक्षनरी घेउन बसायचो स्क्रॅबल खेळायला. मोबाईल वर एक हॅगमॅन नावाचा गेम होता तो पण खेळायला मजा यायची. पैजारबुवा,

हेमंतकुमार 20/12/2019 - 14:52
वामन, बरोबर. मराठीचा भाग लिहिताना आत्मीयता जरा जास्तच राहते. कंजूस, अगदी बरोबर. सहमत. ज्ञा पै , अनुभव आवडले. इंग्लीशच्या नादी लागण्याअही माझाही एक पाय मागे ओढला जात होता !

हेमंतकुमार 20/12/2019 - 19:31
गा पै, छान ! Anagram ला ‘विपर्ययी नवशब्द’ असे नाव मी भाषातज्ञांच्या लेखात वाचले होते. ..... बघूया आता १-२ मोठे मराठी शब्द जमतात का.

श्वेता२४ 20/12/2019 - 20:57
तुमचे दोन्ही भाग चांगले आहेत. खरं तर तुमच्या सगळेच लेखन हे अतिशय दर्जेदार लेखना पैकी आहे असे म्हणले गेले पाहिजे .तुमचे सर्वच लेख माहितीपूर्ण व सर्वांना समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. तुमच्या सर्वच लेखांची मी पंखा आहे. मी इंग्रजी शब्द कोड्यांच्या वाट्याला फारशी गेलेली नाही .तरीही हा भाग आवडला.

वामन देशमुख 20/12/2019 - 21:09
दोन्ही लेख एकेकाळच्या रम्य विश्वात घेऊन गेले. लहानपणी लोकसत्ता,लोकमत, तरुण भारत, मार्मिक, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ नंतरच्या काळात पुण्यनगरी, मुंबई चौफेर अश्या अनेक वृत्तपत्रांमध्ये कोडे मी सोडवायचो. In fact, आज कोण शब्दकोडे सोडवणार यावरून आम्हा भावंडांमध्ये वादंग व्हायचं. मामांकडे, काकांकडे गेल्यानंतर त्यांच्याइथले जुने पेपर्स शोधून काढून त्यातले शब्दकोडे आम्ही सोडवायचो. अर्थात हे सगळं मराठीपुरतंच मर्यादित होतं. त्याकाळात चित्रलेखा वृत्त समूहाचं "जी" ह्या नावाचं मराठी फिल्मी मासिक यायचं. त्यात सिनेमासंबंधी शब्दकोडी असायची. ती आम्ही सोडवायचो. शब्दकोड्यांमुळे शब्दसंपत्ती वाढायला खरंच खूप हातभार लागला. कधीकधी गंमतीनं, शब्दकोड्यांना मी शब्दकोंडा म्हणतो. म्हणजे,ज्याप्रमाणे काळा केसांमध्ये पांढरा कोंडा असतो त्याप्रमाणे काळ्या चौकटींच्या दरम्यान कोंड्यासारखे शब्द पसरलेले असतात!

हेमंतकुमार 21/12/2019 - 07:56
श्वेता, तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच लेखनातील सातत्य राहते. धन्यवाद. वामन, शब्दकोंडा >>>>> मस्तच !
भावंडांतील वादंग
>>> माझ्या माहितीतील एक एकत्र कुटुंब आहे. तिथे २ वेगळे मराठी व १ इंग्लिश दैनिके घेतात. दोन्ही मराठीत कोडी असतात. त्या दोघांची सक्त विभागणी झालेली आहे – एक आजोबांचे व दुसरे आजीचे. एखादे वेळीस जर आजोबांनी चुकून आजीच्या पेपरातले कोडे सोडवून ठेवले, तर मग त्या दिवशी त्यांचे काही खरे नसते !

जॉनविक्क 22/12/2019 - 20:36
जॉन, स्क्रीबल फक्त लांबून पाहिले आहे ! तुम्ही लिहा ना एखादा परिच्छेद त्यावर.
कसे खेळावे ते नियम जालावर आहेतच. सोळाव्या वर्षी मला हट्टी मुलगा म्हणून मानसोपचार तज्ञाकडे समुपदेशनाला न्हेण्यात आले होते तेथे त्याने माझ्याशी गप्पा मारायला हा खेळ बाहेर काढला, इंग्रजीचा इ सुद्धा ओळखीचा नसल्याने जाम गडबडलो होतो पण अर्धा तास म्हणता म्हणता दीड तास कसा गेला ते कळले नाही मला विशेष आवड वा नावडही नंतर निर्माण झाली नाही पण HIGHLY INTELECTUAL PERSON असे इंप्रेशन जमा करायला हा खेळ मी विकत घेतला व समोरच्याला खेळायला बसायलाही भाग पाडायचो :)

हेमंतकुमार 23/12/2019 - 17:24
* कोड्याचे उत्तर : लांबलचक कंटाळा आणणारे भाषण >>>> लापणिका जॉन, पूरक माहितीसाठी आभार !

हेमंतकुमार 03/01/2020 - 11:32
इंग्लिश कोड्यांत आपल्याला गंडवणारी एक शब्दजोडी आहे : salon & saloon . आपण बहुतेक दोघांचा उच्चार 'सलून' असाच करतो व त्यानुसार स्पेलिंग करायला जातो. आता दोन्हीच्या अर्थातला फरक पहा. salon - दुकान किंवा प्रदर्शनाची खोली. saloon - मद्यविक्री आणि मद्यपानाचे ठिकाण !

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 06/01/2020 - 03:29
कटिंग सलून माहीत आहे. ज्या प्रमाणे चहा ३/४ करून कटिंग चहा होतो त्याप्रमाणे पेग ३/४ (कटिंग) करून "बार" ला देखील कटिंग सलून म्हणता येईल काय? :))

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 06/01/2020 - 18:03
कुमारेक, salon शब्द ओळखीचा वाटला म्हणून जाळ्यावर धुंडाळला तर तो फ्रेंच निघाला : https://en.wikipedia.org/wiki/Salon_(gathering) याचा उच्चार सॅलाँ होतो व याचा अर्थ काहीएका उद्दिष्टाने एखाद्या खोलीत जमलेली लोकं असा होतो. हा अर्थ लॅटिन वरनं आलेला असावा. भारतात आपण ज्याला नमाज म्हणतो त्याला अरबी मध्ये सलाह म्हणतात. त्यातही एका विशिष्ट हेतूने जमलेला माणसांचा जमाव असाच अर्थ अभिप्रेत आहे. अरबी व लॅटिन शब्दांत असं साम्य सापडावे हे नवल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 06/01/2020 - 19:19
उपयुक्त माहिती, धन्यवाद. अरबी व लॅटिन शब्दांत असं साम्य >>>> होय, आहेत अशी काही उदा. हे एक थोडे वेगळे बघा: music आणि मौसीकी ( उर्दू)

In reply to by हेमंतकुमार

>>saloon - मद्यविक्री आणि मद्यपानाचे ठिकाण ! अरेच्चा आता समजले बर्याच काऊ बॉय टाईप वेस्टर्न चित्रपटात संभाषणात उल्लेख असायचा कि मी अमुक अमुक गावी सलून मध्ये गेलो तेव्हा त्या काऊबॉयची वेशभूशा पाहुन मला वाटायचे तो दाढी करायला गेला असावा व त्या सलून मध्ये दारू वगैरेही मिळत असावी असे काहीसे. पण आता योग्य अर्थ वाचुन उलगडा झाला.

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:21
भारतीया रेल्वे च्या खास अधिकार्यांसाठी असलेल्या डब्यांना सुद्धा सलून म्हणतात. आता प्रवासी सुद्ध आरक्षण करु शकतात. https://twitter.com/IRCTCofficial/status/1066552661716201472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1066552661716201472%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Fbusiness%2Firctc-saloon-coach-ticket-prices-routes-schedule-of-railway-home-on-wheels-in-pictures-1953589 image

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:22

Nitin Palkar 03/01/2020 - 14:49
दोन्ही लेख आवडले तरीही पहिला अधिक आवडला कारण मराठी नाळ. मी स्वतः शब्द कोड्यांचा बऱ्यापैकी छंदिष्ट आहे. सुडोकुचीही आवड आहे. महानगर मधील शनिवारचे महा शब्द कोडे आम्ही काही मित्र शर्यत लावून सोडवत असू. चित्रलेखा साप्ताहिकातिल शब्द कोडे सोडवून दोन वेळा बक्षीसही मिळाले आहे... सुडोकू सारखी कोडी सोडवून logical thinking सुधारते असं मला वाटतं. गमतीची एक वैयक्तिक गोष्ट सांगावीशी वाटते.... शब्द कोडे सोडवण्याची आवड बायकोलाही आहे. वयाच्या पंचावन्न नंतर(तिच्या) अलीकडेच तिला सुडोकू सोडवण्यातली गंमत समजावून सांगितली आणि आता तीही आनंदाने सुडोकू सोडवत असते. हे दोन्ही लेख अंमळ उशिरा वाचले गेले. अशाच रोचक लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.

हेमंतकुमार 07/01/2020 - 08:14
अ आ, धन्यवाद ! तुमचे चलतचित्र सुरेख आहे. अथांग जालसागरात डुबकी मारून तुम्ही जे अनुरूप चित्र शोधून काढता, त्याबद्दल कौतुक वाटते. म्हणतात ना, की एका चित्रातून १००० शब्दांचा आशय व्यक्त होतो. याची प्रचिती तुमचे चित्र नक्कीच देते. जर एखाद्या वाचकाने तुमचे चित्र आधी पाहिले तर मग त्याने हा लेख वाचला नाही तरी चालेल ! ☺️

हेमंतकुमार 07/01/2020 - 15:28
इंग्लिश कोड्यांत काही रंजक वाक्प्रचार वारंवार येतात. त्यांचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे. तेव्हा इंग्रजांचे आजूबाजूच्या देशांशी वैर होते; त्यातल्या काहींशी तर त्यांची युद्धे झाली. त्यामुळे इंग्लिश माणूस टीका करताना किंवा नकारात्मक / कुत्सित बोलताना त्या देशांची नावे असलेले वाक्प्रचार वापरतो. अशा काहींचा परिचय करून देत आहे. आता Dutch चा वापर असलेले २ बघू. १. Go Dutch : जेव्हा एखाद्या समूहाने केलेला खर्च सर्वांनी वाटून घ्यायचा असतो तेव्हा असे म्हणतात. २. double Dutch : जेव्हा एखादा मूर्खासारखी बडबड करत असतो, तेव्हा He just speaks “double Dutch“ !

हेमंतकुमार 08/01/2020 - 11:15
आता फ्रेंचांना उद्देशून असलेले वाक्प्रचार पाहू: १. French leave : याचा मूळ अर्थ असा. जेव्हा समारंभाला आलेला एखादा पाहुणा यजमानांचा निरोप न घेताच निघून जातो तेव्हा असे म्हणतात. पुढे कालौघात असा अर्थ झाला. 'विना परवानगी कामावर सुटी घेणे" = दांडी मारणे ! २. French shower: स्वच्छ अंघोळ करण्याऐवजी अंगावर सुगंधी फवारा मारून काम भागवणे.

हेमंतकुमार 27/03/2020 - 09:45
सध्या छापील पेपर बंद आहेत. सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे कोड्यांची गरज अजूनच वाढली आहे. म्हणून मग जालावरच्या क्रॉसवर्ड्सकडे वळलो. टिचकी मारून सोडवायची पद्धत छान असते, पण सतत पडद्याकडे पहावे लागल्याने डोळ्यांना ताण येतो. एका कोड्यात एक छान इंग्लीश वाक्प्रचार मिळाला. शोधसूत्र होते : प्रेमपत्रातील खास शब्द. उत्तरासाठी तब्बल १५ जागा सोडलेल्या. चांगले आव्हान होते. प्रयत्न करता आधी शेवटची ४ अक्षरे जमली ‘kiss’. मग एकदम उत्साह संचारला ! इतर शब्द जुळवत शेवटी उत्तर गावले : Sealed with a kiss . मस्तच ! प्रथमच ऐकला. इंग्लीश जगतात याला SWAK असे लघुरूप आहे. काही वेळेस अशा पत्रावर बाहेरून लिपस्टिकची खूण उमटवली जाते !

हेमंतकुमार 03/04/2020 - 11:39
काही खेळांच्या सामन्यांत जेव्हा एखादा खेळाडू असामान्य कामगिरी करतो, त्याचे वर्णन करण्यासाठी काही खास वाक्प्रचार आहेत. ते कोड्यातून समजले. ते मनोरंजक वाटले. हे पाहा नमुने : १. बॉक्सिंग : punched the clock २. व्हॉलीबॉल : Spiked a drink ३. बेसबॉल : pitched a tent ४. फुटबॉल : Passed the butter

In reply to by हेमंतकुमार

१. बॉक्सिंग : punched the clock २. व्हॉलीबॉल : Spiked a drink ३. बेसबॉल : pitched a tent ४. फुटबॉल : Passed the butter या सर्व वाक्प्रचारांचा आणि खेळांचा काही संबंध नाही. विशेषतः #३. पिचिंग अ टेंट चा एक अर्थ अश्लील आहे.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

हेमंतकुमार 20/01/2022 - 09:12
संबंधित खेळाशी त्यांचा शब्दशः संबंध नाही हे बरोबर. ते लाक्षणिक अर्थाने बोलीभाषेत वापरले जातात. आपल्याकडचे एक उदाहरण देतो : समजा, एखाद्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघातील सर्व गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला असेल आणि भरपूर धावा काढल्या असतील ,तर आपण जसे म्हणतो की, त्याने गोलंदाजांना ‘तुडवले’, धुलाई केली, त्यांचा ‘कचरा केला’... इत्यादी. त्या धर्तीवर ते वाक्प्रचार आहेत

हेमंतकुमार 11/05/2020 - 12:30
दोन मजेदार शोधसूत्रे : १. ‘current problem?’ हे सूत्र होते. मी आपला करोना, कोविड, आर्थिक मंदी असे उत्तर शोधत बसलो. पण शेवटी सोडवताना उत्तर आले ‘short circuit’ ! २. ‘food processor’ साठी मी mixer, blender वगैरे शोधत बसलो. पण उत्तर आले ‘stomach’ ! .....यातूनच निखळ आनंद मिळतो.

हेमंतकुमार 30/06/2020 - 14:25
इंग्लीश क्रॉसवर्ड्सच्या उगमाबद्दलचा एक रोचक लेख इथे: मुळातील त्या खेळाचे नाव होते “FUN’s Word-Cross Puzzle.” पण नंतर छपाईतील चुकीने क्रॉसवर्ड असे झाले. पुढे तेच नाव कायम राहिले !

हेमंतकुमार 04/10/2021 - 11:22
सर्वात लांब असलेला इंग्लिश शब्द असा आहे. या मूळ ग्रीक शब्दात 175 अक्षरे असून त्याच्या इंग्लिश रूपांतरात 183 अक्षरे आहेत: Lopado­temacho­selacho­galeo­kranio­leipsano­drim­hypo­trimmato­silphio­karabo­melito­katakechy­meno­kichl­epi­kossypho­phatto­perister­alektryon­opte­kephallio­kigklo­peleio­lagoio­siraio­baphe­tragano­pterygon पण याचा अर्थ काय? तर हा एक खाद्यपदार्थ आहे , जो सोळा विविध घटक वापरून तयार केला जातो ! असा हा चित्रविचित्र शब्द सर्वात लांब म्हणून गिनिज बुकात नोंदलेला आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Lopado%C2%ADtemacho%C2%ADselacho%C2%ADgaleo%C2%ADkranio%C2%ADleipsano%C2%ADdrim%C2%ADhypo%C2%ADtrimmato%C2%ADsilphio%C2%ADkarabo%C2%ADmelito%C2%ADkatakechy%C2%ADmeno%C2%ADkichl%C2%ADepi%C2%ADkossypho%C2%ADphatto%C2%ADperister%C2%ADalektryon%C2%ADopte%C2%ADkephallio%C2%ADkigklo%C2%ADpeleio%C2%ADlagoio%C2%ADsiraio%C2%ADbaphe%C2%ADtragano%C2%ADpterygon

हेमंतकुमार 18/01/2022 - 10:57
ज्यांना ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळ आवडतात त्यांच्यासाठी हा एक मस्त खेळ इथे आहे दररोज एक पाच अक्षरी शब्द ओळखायचा असतो. खेळण्याची प्रक्रिया खूप छान आहे. जरूर खेळुन बघा !

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:13
गेले पाच दिवस खेळत आहे. छान आहे. सध्या याची सोशल मिडिया वर हवा आहे.

हेमंतकुमार 29/01/2022 - 08:54
2021 हे वर्ष जागतिक स्तरावर कोविडमय होते. त्या काळात अमेरिकी संगणक अभियंता Josh Wardle आणि त्याची शब्दप्रेमी प्रेमिका पलक शाह यांनी मिळून Wordle हा खेळ विकसित केला. पुढे तो जालावर उपलब्ध झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. या खेळाची एक पुढची पायरी म्हणून या द्वयीने Absurdle या खेळाची निर्मिती केली. या दोन्ही खेळांची लोकप्रियता बघून अन्य लोकांनी त्या खेळासारखी काही प्रारूपे तयार केली. ती सुद्धा जालावर खेळण्यास उपलब्ध आहेत. ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळांच्या विश्वातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यानिमित्ताने या सर्व खेळांची एकत्रित यादी इथे करून ठेवणे महत्त्वाचे वाटते. १. Wordle याची माहिती वरील प्रतिसादात आलीच आहे. २. Absurdle याची सर्व माहिती इथे मिळेल. ३. Primel : हा अंकप्रेमींसाठी असून त्यात पाच अंकी मूळ संख्या तयार करायची असते. (https://converged.yt/primel/) ४. Sweardle : हे चार शब्दांचे Wordle असून इथे फक्त बोलीभाषेतील उद्धट शब्दांचा वापर केला जातो. ५. Lewdle : या खेळात बोलीभाषेतील लैंगिक शब्दांचा वापर केला जातो. अशा तर्‍हेने एका सूत्रावर आधारित वरील प्रकारचे विविध खेळ जालावर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे हवा तो खेळ निवडता येईल. धन्यवाद !

पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45825 ******************************************************** या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच.

चौकटींतील रत्ने

हेमंतकुमार ·

सुडोकू पण उत्तम आहे. सध्या तरी सुडोकूच सोडवत बसतो. www.websudoku.com ही उत्तम साईट आहे. ... केवळ शब्दकोडी सोडवायला म्हणून, दर शनिवारी "महानगर" घेत होतो.

मी पण एसटीत वा आगगाडीत बसतांना कोड्यांसाठी वर्तमानपत्रे घेतो. बातम्या पाचदहा मिनिटात वाचून होतात. पण एक कोडे तासभर पुरते. एक मात्र नक्की. शब्दकोडी नित्यनेमाने सोडवल्यामुळे मेंदूचे 'शब्द सर्च इंजिन' मस्त कार्यक्षम राहते अणि इतर सर्व कामात त्याचा उपयोग होतो. बहुतेक मराठी वृत्तपत्रातील कोड्यांमधले शब्द बहुधा एकाच डाटाबेसमधून घेतलेले असतात आणि तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात. कधीकधी लबाडी पण असते. तरी रटाळ बातम्यांपेक्षा कोडे नक्कीच मनोरंजक असते. एक शब्दकोडेकार महाशय तर दर कोड्याच्या बाजूला स्वत:चा फोटो पण छापून आणतात. पुढील भागाची वाट पाहतो आहे.
गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे.
चविष्ट मुरांबा कसा आहे याची उत्सुकता आहे.

हेमंतकुमार 16/12/2019 - 18:20
वरील सर्वांना धन्यवाद. मु वि, उपयुक्त माहिती. पण मी अंककोड्याच्या अजिबात नादी लागलेलो नाही. एकदोनदा प्रयत्न केलाय पण मला आपले शब्दांचेच राज्य बरे वाटते. सुधीर, अनुभवाशी सहमत. मेंदूचे इंजिन मस्त पळते खरे. चौरा, तुमच्या क्र. १ चे उत्तर ‘महानगर’.

हेमंतकुमार 17/12/2019 - 08:39
अल्झायमर व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का? व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का?
>>> मु वि, तुमचा प्रश्न चांगला आहे. पण त्याचे उत्तर जरा चाचपडतच ‘हो’ असे द्यावे लागेल. यावर अजून बऱ्याच संशोधनाची गरज आहे. तूर्त असे म्हणता येईल: १. काही तज्ञांचे मते विविध कोडी नियमित सोडविण्याने या आजाराचा धोका कमी होऊ शकतो. २. अशी कोडी ही व्यक्तीनुसार ‘झेपेल’ इतक्याच कठीणतेची असावीत. ३. फक्त एकट्याने कोड्यात डोके घालून बसण्यापेक्षा दोघातिघांत मिळून काही बौद्धिक खेळ खेळल्यास अधिक फायदा होतो. ४. यासंबंधी अजून बरेच प्रयोग आणि त्यांचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 17/12/2019 - 09:46
माझ्या आईला शब्द कोडी सोडवायचा नाद अगदी ७५ वयापर्यन्त होता तरीही तिला त्या नन्तर अल्झायमर हा आजार झाला . तो अलझायमर फारसा गम्भीर नव्हता हे खरे पण अल्झायमरच होता . ती ८५ वर्शे पूर्ण करून गेली.

कंजूस 18/12/2019 - 05:30
पावसाळ्यात मुंबई होते तुंबई. महानगर वाराणसीला म्हणण्याची चाल आहे. मुंबई नगरी बडी बांका। मग दिल्ली? असो. इंग्रजी कोड्याचं उत्तर समोर ठेवून प्रश्न पाहिला तरी याचं उत्तर हे का हे कळत नाही इतकं (क्रिप्टीक )गूढ असतं. चौकटराजांची आइडिआ सुरू करायला हवी. प्रथम सर्वांनी आपापले प्रश्न आणि उत्तर कुणा एकाकडे संदेशाने पाठवायचे, त्याने प्रश्न एका धाग्यात मिपाकोडे १/२/३प्रसिद्ध करून आठवड्याने उत्तर प्रसिद्ध करायची.

अनिंद्य 18/12/2019 - 10:56
@ कुमार१, 'चौकटीतील रत्ने' समर्पक शीर्षक आहे लेखाला. असे छंद भाषा समृद्ध करतात. शब्दसंग्रह तोकडा असल्यामुळे एकट्याला शब्दकोडे क्वचितच सोडवता येते, पण 'एन्जॉय द प्रोसेस' म्हणतात तसे आहे. घरी येणाऱ्या तीनही वृत्तपत्रांमधली मराठी आणि इंग्रजी शब्दकोडी पिताश्री काही मिनिटातच सोडवतात, हेवा वाटतो. इंग्रजी शब्दकोडी लीलया सोडवणाऱ्या माझ्या धाकट्या काकांचेही असेच कौतुक वाटत राहते, स्वतःला कधी जमत नाही :-) पुभाप्र

श्वेता२४ 18/12/2019 - 13:25
माझ्या बहिणीमुळे मलाही मराठी शब्दकोडे सोडवायची सवय लागली. त्याचा फायदा म्हणजे शब्दसंग्रह वाढून भाषेवर एकप्रकारची हुकुमत आली. त्याचा फायदा पुढे वक्तृत्व स्पर्धांमध्ये झाला. आम्ही बहिणी नेटाने पूर्ण शब्द कोडे सोडवितच असू. माझी सवय पुढे अभ्याासत सुटली पण बहिण अजुनही सोडवते. मध्यंतरी एका ऑफीसमधल्या सरांना कोणी कायप्पावर शब्दकोडे टाकले होते. पण एक दोन अक्षरी शब्द अडला होता- पान थुंकायचे तबक/भांडे असा. मला शब्द माहित असूनही नेमका आठवेना पण खात्री होती बहिणीला माहित असेल. तीला लगेच कायप्पावर संदेश पाठविला व अपेक्षेप्रमाणे तीने तात्काळ प्रतिसादर पाठविला- तस्त. खूप वाईट वाटले मला त्यावेळी या आनंदापासून मी आता दू गेले आहे. तुमच्या लेखामुळे माझे मस्त स्मरणरंजन झाले. धन्यवाद. पु.भा.प्र.

हेमंतकुमार 18/12/2019 - 13:59
श्वेता, धन्यवाद
पान थुंकायचे तबक/भांडे = तस्त.
>>> अगदी ! हा शब्द खूप वेळा येतो कोड्यात. हे तस्त मी फक्त चित्रपटातच पाहिले आहे.

In reply to by हेमंतकुमार

शेखरमोघे 08/05/2020 - 20:08
मी बर्‍याच काळापूर्वी "तस्त" बर्‍याच वेळा पाहिलेले आहे. एखाद्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे किन्वा काही गायक, वादक, वक्ते पान खाणारे आहेत हे जर माहित असेल तर त्यान्च्या करता लावलेल्या "बैठकी" करता चकचकीत पितळेचा पानाचा "सज्ज" डबा, अडकित्ता आणि तस्त या जरूरीच्या गोष्टी असत.

गामा पैलवान 18/12/2019 - 18:54
कुमारेक, एका वयात मलाही मराठी शब्दकोडी सोडवायचा छंद लागला होता. तो आता सुडोकूत रुपांतरीत झाला आहे. :-) एक गंमत करता येते ती म्हणजे लेखणी न वापरता कोडे सोडवणे. कोड्यातल्या चौकटी रिकाम्याच ठेवायच्या. फक्त मनातल्या मनात अक्षरांची नोंद करायची. तुम्हाला कदाचित पुढचा टप्पा म्हणून प्रयत्न करून पाहता येतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुडोकू सोडवायचा प्रयत्न केला. .. पण माझ्या मेंदूला ते प्रकरण झेपले नाही... आमची मजल जास्तीत जास्त, medium level पर्यंतच. . www.websudoku.com

In reply to by गामा पैलवान

नगरी 18/01/2022 - 16:29
मान्य, पूर्णपणे मान्य कारण आमच्या कडे टोटल 4 डोकी कोड्याच्या मागे पडलेली असतात आणि प्रत्येकात चढाओढ असते

हेमंतकुमार 18/12/2019 - 19:27
गा पै व मु वि +१. ............ मितवा : हिंदीतला आणि मराठीतला ! आज ‘मितवा’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि या शब्दाची मजा त्यात ऐकून मग जालावर वाचली. मितवा चा हिंदी भाषेतला अर्थ आहे : अगदी जवळचा, आपला माणूस. मराठीत या शब्दाचा एक वेगळाच अर्थ शोधण्यात आलाय: मित्र, त्त्वज्ञ व वाटाड्या या ३ शब्दांतील पहिले अक्षर घेऊन मितवा हा संयोग शब्द तयार केलाय ! म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो ना फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड. त्याचेच हे रुपांतर .

जॉनविक्क 19/12/2019 - 00:53
आपण सर्वात पहिली गोष्ट कोणती शिकत असू तर ते म्हणजे शब्द म्हणूनच मेंदूमधे याचे मॅपिंग भरपूर झालेले असते व जेंव्हा आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा, प्रयत्न करतो आजपासून :) धन्यवाद.

शब्द कोडे सोडवायला मजा येते पण एखाद्या शब्दावर अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. काही दिवसांपूर्वी अडलेले एक कोडे :- राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) सगळे कोडे सोडवून झाले तरी हा एक शब्द काही केल्या सापडत नव्हता. जेव्हा उत्तर समजले तेव्हा अगदी "ह्या" वाटले. अजून एक :- कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) या वरही बराच काळ असाच अडलो होतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

श्वेता२४ 19/12/2019 - 10:52
राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) - डबिर, दफ्तरी कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) - कैकाडिण्,कैदाशिण्,महामाया

In reply to by श्वेता२४

हेमंतकुमार 19/12/2019 - 12:05
काही महिने माझ्या कोड्यांत ३ शोधसूत्रांनी अगदी धुमाकूळ घातला होता. या तिघांचे उत्तर एकच आहे. सूत्रे अशी: १. लसणाची पाकळी २. लिंबाची फोड ३. दह्याची कवडी. यांचे उत्तर असलेला शब्द मी कधीच ऐकला नव्हता. कोड्यांमुळेच कळला. बघताय प्रयत्न करून ?

In reply to by श्वेता२४

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:00
श्वेता, ‘बोई’ चे तीनही अर्थ शब्दरत्नाकरमध्ये आहेत. व्युत्पत्ती माहित नाही. सहज आठवले. इंग्लीशच्या ‘set’ चे तब्बल १५६ अर्थ आहेत ! त्यापुढे आपली ‘बोई’ बरीच म्हणायची !!

राघव 19/12/2019 - 09:23
हायला.. लोक्स एवढं सिरियसली घेत असतात कोड्यांना? :D मी कधी एवढा विचार करून वगैरे कोडं सोडवलं नाही तसं.. जमेल तसं आणि तेवढं सोडवत जायचं, असंच माझं "जिओ और जीने दो" वालं धोरण! सुडोकू आवडतं, पण काही कठीण म्हणजे फारच कठीण असतात. त्यामुळं फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. पण त्यातून एक कळलं, एखाद्या ठिकाणी कोणता अंक येणार यासोबतच कोणता येणार नाही हेही ओळखता आलं पाहिजे. This goes close to the "Theory of Deduction" by the great Sherlock Holmes!! तरीही अजून फार पुढची सुडोकू नाही सोडवता येत. अर्थात् तेवढा वेळही दिला पाहिजे म्हणा.. :-)

In reply to by राघव

ह्या बद्दल एक सुंदर लेख वाचनात आला होता... त्या लेखात पहिल्या शब्दकोड्या पासून बर्याच गोष्टींचा आढावा घेतला होता. https://googleweblight.com/i?u=https://www.crosswordtournament.com/more/wynne.html&hl=en-IN

In reply to by हेमंतकुमार

शोधता शोधता अजून एक माहिती मिळाली. अमेरिकेत शब्दकोडी सोडवायची स्पर्धा असते. खाली लिंक देत आहे. खूपच मनोरंजक माहिती मिळेल. https://googleweblight.com/i?u=https://en.m.wikipedia.org/wiki/American_Crossword_Puzzle_Tournament&hl=en-IN

हेमंतकुमार 19/12/2019 - 10:30
* आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा * अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. * फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. या सगळ्याशी अगदी सहमत.

गणेशा 19/12/2019 - 23:25
काय सुंदर पणे लिहिले आहे.. खूप आवडले. शाळेत असताना, किंवा कॉलेज मध्ये असताना घरी गेल्यावर हे सोडवत असे. आई वडीलां बरोबर बसून. हे सर्व आठवले आणि हळू हळू तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीत अक्षरश: तुम्हीच दिसू लागला, रेल्वे मध्ये बसलेला, एकटा असलेला.. समरसुन जायला झाले..

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:01
गणेशा, मनापासून आभार ! तुम्ही जी दाद दिली आहे त्यातून पुढील लेखन अजून समरसून करायला प्रेरणा मिळाली आहे.

हेमंतकुमार 01/01/2020 - 14:04
कोडे शौकिनांना आवाहन: तुमच्या कोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा. मी असे २ लिहितो गळू, बेंड = करट संशयी = दिकतखोर

हेमंतकुमार 08/01/2020 - 08:33
कडधान्या संबंधी दोन वेगळे शब्द मध्ये सापडले. शोधसूत्रे: १. अजिबात न भिजणारे ( मोड आणताना) २. अर्धवट शिजलेले दोन्ही शब्द ३ अक्षरी. ओळ्खताय ?

हेमंतकुमार 11/01/2020 - 05:14
या धाग्याच्या निमित्ताने आपल्यातील शब्दप्रेमींची भेट झाली याचा आनंद वाटतो. सर्वांचे अनुभव रोचक आहेत. तसेच काहीजण अंक कोडेप्रेमी आहेत हेही दिसले. एक विनंती: तुमच्या शब्दकोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा. त्याचा सर्व इच्छुकांना उपयोग होईल. धन्यवाद !

हेमंतकुमार 11/03/2020 - 07:51
नुकताच होळीचे दरम्यान शब्दकोड्यात एक मजेदार शब्द आला: होळीचे होळकर = (लाक्षणिक अर्थाने) उडाणटप्पू लोक

लई भारी 13/03/2020 - 16:21
हा धागा राहिलाच होता. चांगला छंद आहे! मराठी कधीमधी करायचो, पण इथे दिलेले काही शब्द वाचून कळलं कि बहुधा मी 'महाशब्दकोडे' च सोडवले असेल :-D इंग्रजी तर कधीच जमलं नाही.

हेमंतकुमार 13/03/2020 - 19:22
धन्यवाद.
बहुधा मी 'महाशब्दकोडे' च सोडवले असेल
>>> काही हरकत नाही. सोडवले हे महत्वाचे !

हेमंतकुमार 17/03/2020 - 13:31
आजच्या एका शब्दकोड्यात ‘खवलेमांजर’ शब्द आला आहे. सध्याच्या करोना वातावरणाशी हे सुसंगत आहे ! कसे ते सांगतो. खवले मांजर (पँगोलिन) चीनमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या मांसातून करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता पडताळली जात आहे. ( संदर्भ : नेचर’ नियतकालिक)

हेमंतकुमार 08/05/2020 - 11:38
अजून छापील वृत्तपत्र घरी येत नसल्याने मराठी कोडी सोडविण्याची उपासमार होत आहे ! इंग्लिश शब्द कोडे जालावर सहज मिळते, ते सोडविणे चालू आहे. पण छापील मराठी शब्दकोड्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ....

हेमंतकुमार 11/06/2020 - 07:53
'क्षितिज' चा नेहमीचा अर्थ आपण जाणतोच. परवा कोड्यात याचे अन्य दोन अर्थ समजले आणि स्तिमित झालो. 'क्षितिज = झाड, गांडूळ . ( 'क्षिति = जमीन . म्हणून त्यातून जन्मलेले ते, अशा अर्थाने).

हेमंतकुमार 11/06/2020 - 09:07
ती माहिती अशोक श्री. रानडे यांच्या 'शब्दयात्रा' या दै. सकाळ मधील सदरातून घेतली आहे.

हेमंतकुमार 15/09/2022 - 09:01
‘लट’ चे विभिन्न अर्थ स्तिमित करतात. १. गुह्येंद्रियावरील केंस २. साठ कागदांचा संच ३. लाट ४. गुंतागुंत ( केसांची , लोकरीच्या , सुतांची , तंतूंची ) https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B2%E0%A4%9F/word …. कागद मोजण्याची दस्ता, रीम आणि quire ही परिमाणे माहिती होती. लट हे नवे समजले. दोन लटांची एक जोडी , चार जोड्यांची एक गड्डी होते .

nutanm 16/09/2022 - 02:57
ही म्हण माहित ी कोणाकोणाला आहे व तिचा अर्थ ?? आला गेला गोसावी दाढेला दिला. माझी आई ही म्हण नेहमी वापरत असे. कोणाची दाढ व कोणाला दिले या काही hints . hints समानार्थी शब्द ? आठवत नाही.

In reply to by nutanm

हेमंतकुमार 16/09/2022 - 07:52
हा अर्थ : ज्या मनुष्याचा आगा पिच्छा नाही त्याला कोणाच्याही तोंडी द्यावयास हरकत नाही कारण त्याला कोणी वाली नसतो. पण हा अन्याय आहे.

लेखाचा पूर्वार्ध: रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो.

अहिराणीनी बात

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

जालिम लोशन 17/12/2019 - 21:32
त्याना आई मरिन खाल्ल बुचक बाखोड. अर्थ कधी कळला नाही पण एक म्हातारी आम्हा मुलांना नियमीत ओरडायची.

- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रमा मराठीन्या तशे पाह्य त्ये पासष्ट बोलीभाशा दखातीस. त्या बठ्ठास्मा अहिराणी भाशाना पट्टा आडवा उभा भयान मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आनि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाशा इमाने इतबारे बोली र्‍हायनात- समाळी र्‍हायनात. नाशिक सिडको, औरंगाबाद, पुना, मुंबई, सुरत आशा काही शहरस्माबी आज अहिराणी भाशा हात पाय पसरी र्‍हायनी. (आज अहिराणी बोलनारा लोक येक कोटीना आसपास दखातंस.) शिकेल सवरेल लोकसतीन अडानी लोकस्ले अहिराणीवाचू दुसरी भाशा येत नही म्हनीसन का व्हयेना त्या नाइलाजे आपापला घरमा- गावमा अहिराणीमा यव्हहार करतंस.

समीक्षा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
(सामना 17 नोव्हेंबर 2019 च्या ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख) अवघड आशयाची सोपी अभिव्यक्ती: - प्रा. लक्ष्मण पाटील ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही एक कादंबरी आहे असं प्रकाशकाने सोयीसाठी म्हटलं असलं तरी या पुस्तकाचं वाचन करताना असं लक्षात येतं, की ही एक केवळ कादंबरी नसून अनेक साहित्य प्रकारांचा एक अनोखा संगम आहे. साहित्याच्या कोणत्या कॅटेगरीत बसवावा असा प्रश्न उपस्थित करणारा हा एक साहित्य प्रकार म्हणता येईल. या नवकादंबरीबद्दल लेखक डॉ. सुधीर देवरे यांचे अभिनंदन. कादंबरीचा नायक स्वधर्म देवकिरण नावाचा असून तो एक साधा कर्मचारी आहे.

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

जॉनविक्क 15/11/2019 - 16:54
भाषेवर बोलताना काही लोक व्यासपीठांवरून म्हणतात, ‘आमची भाषा शुध्द आहे.’ (म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की आमच्या परिसरातली भाषा सोडून बाकीच्या भाषा अशुध्द आहेत.)
याचा अर्थ आमची बोलीभाषा ही व्याकरण नियमाच्यादृष्ट्या बिनचूक आहे आणी इतरांच्या बोलीभाषेत व्याकरणाचा विरोधोभासी वापर जाणावण्याइतपत उठून दिसतो. शुद्ध हा शब्द व्याकरणदृष्ट्या शुद्ध या अर्थाने वापरला जातो. तरीही बोली भाषेत शुद्ध अशुद्ध हुडकणे बिनडोकपणाच आहे कारण बोली भाषा ही संस्कार आणी अभिव्यक्तीचा मुक्त आविष्कार यांचे मिश्रण असते आणी असलेच पाहिजे. मी सकाळी आली हे व्याकरणदृष्ट्या चूक आहे पण हे जेंव्हा मुंबईकर पोरगी लाडीळवाणेपणे सांगून जाते तेंव्हा फक्त चू*च त8चो बोली भाषा चुकीची होऊ रायले म्हणताल

- डॉ. सुधीर रा. देवरे अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.

समीक्षा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
(‘भाषा आणि जीवन’ उन्हाळा 2018 च्या पण आता प्रकाशित झालेल्या नियतकालिकात डॉ. सयाजी पगार लिखित लेख.) अहिराणीच्या निमित्ताने समग्र भाषांची संहिता - डॉ. सयाजी पगार एखाद्या बोलीच्या निमित्ताने सर्वच भाषांना लागू होणारी संहिता कशी तयार होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ हे पुस्तक. लोकसाहित्याभ्यासाची असली तरी त्यातही स्वत:ची अशी वेगळी वाट निवडणारे व त्यासाठी रात्रंदिवस चिंतन-मननासह अभ्यास करणारे, अहिराणी भाषेचे निष्ठावंत पाईक डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकवाड्‍.मय व लोकजीवनाचे संशोधक आहेत.

बोलीभाषा: समज आणि आक्षेप

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

शा वि कु 01/11/2019 - 23:43
अशा विचारांच्या लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावं आणि मराठीत का लिहावं? कारण मराठी सुध्दा महाराष्ट्रापुरती एक बोलीभाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्त. इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी असणं इष्ट ठरेल.
उचित प्रत्त्युत्तर

In reply to by सतिश गावडे

मुळचा खूप मोठा-दीर्घ लेख. त्याचा तिसरा भाग इतकाच इथं दिला. वेळ काढून वाचावा ही विनंती.

- डॉ. सुधीर रा. देवरे अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्ते प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्याा लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्याला मा‍हीत नसतं.