भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)
- डॉ. सुधीर रा. देवरे
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे.
उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत.
मिसळपाव