Skip to main content

भाषा

बखरीतून निसटलेलं पान..

लेखक पाटिल यांनी रविवार, 03/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..

बोली टिकल्या तर टिकेल मराठी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं?

ब्रेथलेस

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे...

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 26/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

इंग्रजी भाषेचा अन्य भाषांवर प्रभाव

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 10/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले. १) जगातील भाषांची आकडेवारी एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 30/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

लेखक मनो यांनी सोमवार, 14/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.