खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे.
१९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...