Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ). २. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ). ३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित) ४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री) ५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ). ६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी) ७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ). ८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा). ९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित). …………………………………. नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 61434
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

अगदी बरोबर, छान ! ... आता पुढे सुरु....

४.खळबळाट >>> बरोबर, पण ३ नका सोडू मध्ये. ओळीनेच जाऊ.

अशा खेळात सुटी अक्षरे द्यावीत की देऊ नयेत ?

त्यामुळे खेळ फार लवकर संपतो , असे वाटते का?

नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या. • त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. अलंकार (६ अक्षरी) शेवटी ल २. कसेतरी (६) ड ३. प्राण्याचा आवाज (६) व ४. हिशेब (७) त ५. शोधक अधिकारी (६) स ६. थकीत देणे (६) की ७. माळा (४) ना ८. हात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. .........................................

१ सोपे करतो. कानातील अलंकार ***** ल

नाही. कारण पहिले अक्षर ( १ व ९ जोडी ) वेगळे आहे.

मकरकुंडल ?

मकरकुंडल >>> बरोबर ! आता सुटूद्या गाडी ....

In reply to by हेमंतकुमार

९ वा शब्द "बदनामी" असावा असे वाटले कारण , हिंट "कुप्रसिद्धी " ही इकारत्मक होती. आणि मी , "मि" पासुन शब्द शोधत बसलो . तसेच हा "अलंकार" भाषेशी संबधीत आहे का आभूषणाशी ते समजत नव्हते

In reply to by मराठी_माणूस

"कुप्रसिद्धी " ही इकारत्मक >>> होय. पण "बदनामी" नाही. "बदनाम पण नाही. वेगळा शब्द... शोधा ! ... २ घेउया ..

क्रमानेच जाऊ या ! आता २.

3 डरावडराव >>> थोडे सुधारुन हवे. शब्द शुद्ध हवा !

२. लळतलोंबत ?? रडतखडत अर्थानेआधिक जवळचा वाटला पण ल ने सुरवात नाही.

२. लळतलोंबत ?? >>> नाही. शब्द ल **** असा आहे.

कसेतरी, निष्काळजीपणाने

In reply to by हेमंतकुमार

ओबडधोबड ?

ल **** ड असा आहे ना ... समजा, आपण त्याचे दोन समान हिस्से केले आणि ते दोन्ही लागोपाठ म्हणू लागलो, तर आपला उच्चारगोंधळ होऊ लागेल !

२. कसेतरी (६) ड ==> लवडसवड ? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

२. कसेतरी, निष्काळजीपणाने असे आहे. लवडसवडी असा शब्द असून = लगबग, त्वरा असा अर्थ आहे

In reply to by हेमंतकुमार

साठी सर्वांचा चांगला प्रयत्न. आता उत्तर जवळ येत आहे !

९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. ==> मलकीर्ती ?

५. शोधक अधिकारी (६) स ==> तपासनवीस -गा.पै.

तपासनवीस >> नाही. तुम्ही हा कोशात पाहिलाय का ? ..... अंत्य 'नीस' च आहे.

मोल्स्वर्थ, वझे आणि शब्दरत्नाकर तिन्ही तपासनीस हाच शब्द देताहेत.

In reply to by हेमंतकुमार

अहो, मीच बनवलाय तो शब्द. पाच अक्षरांची सहा करायला! -गा.पै.

मग पुन्हा प्रयत्न करा. शेवट मी सांगितलाच आहे. तुम्हाला येणार ! :))

एकंदरीत कोड्यातील मराठी शब्दांवर २ इस्लामी भाषांचा पगडा आहे.....

In reply to by हेमंतकुमार

अवांतर : कुमारेक, फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत. त्यांना इस्लामिक म्हणणं कितपत सार्थ? त्यातूनही जर यांना इस्लामिक म्हंटलं तर मग त्या ख्रिश्चन भाषाही होतात. कारण ईसाई पंथ उगम पावला तो अरबस्थानात व किमान एक शाखा तरी वाढली ती पर्शियात. आ.न., -गा.पै.

फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत >>> माहितीसाठी धन्यवाद !

तजकरनीस ? २. ला मात्र पास - हात टेकले

लगडतगड ? शेवटचा प्रयत्न

In reply to by आवडाबाई

बरोबर !

५. तजकरनीस >>> बरोबर, छान

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, तजकर हा भाग तस्कर वरून आलेला वाटतो. तर नीस हा प्रत्यय फारसी आहे. हा मिश्र शब्द दिसतो, उदा. दखलपात्र सारखा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तस्करा = फिर्याद; तक्रार. तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी; तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म)

४. हिशेब (७) त ६. थकीत देणे (६) की ७. माळा (४) ना ८. हात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.

सनवदबाकी

सनवदबाकी >>> बरोबर

डरावडराव? आधी सांगितल्याप्रमाणें

डरावडराव >>> फक्त रा ऐवजी रां

४. अरबी उगम ७. घरातील नकोशा वस्तूंची जागा ८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ९. हिंदी उगम

३. प्राण्याचा आवाज (६) व ==> डरकाळीरव एका प्राण्याचा आवाज असं धरलं तरंच उपरोक्त उत्तर लागू पडेल. -गा.पै.

पर्यायी उत्तर . ठीक ते आता झालंय

४ वसूलवासलात ७ कीलखाना

बदनाम नाही म्हणता ? मग बदलाम ?

४ वसूलवासलात ७ कीलखाना बदलाम...... सर्व बरोबर !

८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ना * * * ब


नाहीसाहेब >>> आता फक्त १ अक्षर दूर आहात ......!

In reply to by हेमंतकुमार

नाडी*** असे काही आहे कि काय ? कधी पासून ही फोडच शोधते आहे

साहेब बरोबर आहे.... आता फक्त.....