लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भाग १
नव्या धाग्यावर स्वागत.
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).
२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).
३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)
४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)
५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).
६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)
७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).
८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).
९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….
नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
प्रतिक्रिया
५. तजकरनीस >>> बरोबर, छान
कुमारेक,
तजकर हा भाग तस्कर वरून आलेला वाटतो. तर नीस हा प्रत्यय फारसी आहे. हा मिश्र शब्द दिसतो, उदा. दखलपात्र सारखा.
आ.न.,
-गा.पै.
तस्करा = फिर्याद; तक्रार.
तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी;
तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म)
४. हिशेब (७) त
६. थकीत देणे (६) की
७. माळा (४) ना
८. हात (५) ब
९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.
सनवदबाकी
सनवदबाकी >>> बरोबर
डरावडराव? आधी सांगितल्याप्रमाणें
डरावडराव >>> फक्त रा ऐवजी रां
४. अरबी उगम
७. घरातील नकोशा वस्तूंची जागा
८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर
९. हिंदी उगम
३. प्राण्याचा आवाज (६) व ==> डरकाळीरव
एका प्राण्याचा आवाज असं धरलं तरंच उपरोक्त उत्तर लागू पडेल.
-गा.पै.
पर्यायी उत्तर .
ठीक ते आता झालंय
४ वसूलवासलात
७ कीलखाना
बदनाम नाही म्हणता ? मग बदलाम ?
४ वसूलवासलात
७ कीलखाना
बदलाम......
सर्व बरोबर !
८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ना * * * ब
येत "नाहीसाहेब" :-)
नाहीसाहेब >>>
आता फक्त १ अक्षर दूर आहात ......!
नाडी*** असे काही आहे कि काय ? कधी पासून ही फोडच शोधते आहे
साहेब बरोबर आहे....
आता फक्त.....
नालसाहेब ?
नालसाहेब च !
छान हो
माहित नाही . डिटेल्स ?
नालसाहेब : पंजा;
मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात.
अखेर हा ३ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला. सर्व छान खेळले.
आवडाबाई = सचिन/विराट ! एकहाती !
म मा यांचा विजयी चौकार !
बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य.
डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू .
धन्यवाद !
... तरी मजा आली
खरच डोक्याला खुराक मिळाला आणि तो भरपूर दिवस पुरला
ह्या सगळ्या शब्दांसोबत अजून कितिक शब्द डोळ्याखालून गेले
विषय : शिक्षणशास्त्र
खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील अक्षरसंख्या व तिसरे अक्षर ताडून पाहावे. .
............................................................................
प्रश्न:
१. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, त्रि)
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा )
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे)
४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ )
५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व)
६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा).
७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ).
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म).
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प )
.....................................................
१. सार्वत्रिकशिक्षण ?
चालेल.
‘सार्वत्रिकीकरण’ असे उत्तर आहे.
छान !
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ==> दृकश्राव्यपद्धती
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ==> उपदेशन
४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ==> ?
५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ==> ज्ञानवर्धनकारी
६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ==> बुद्धीमापन
७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ==> मनुष्यविकासखाते (पण आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललंय)
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ==> महामहोपाध्याय
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> ?
-गा.पै.
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> अनौपचारिक
-गा.पै.
दृकश्राव्यपद्धती >>> दृकश्राव्यमाध्यमे
३, ५, ६ >> नाही. जरा वेगळी आहेत.
बाकी बरोबर.
छान !
५. मूल्यमापन ?
५. चारित्र्यसंवर्धन
६. मूल्यमापन
६. मूल्यमापन >>> बरोबर.
५ चूक ....( 7, व) असे बघा.
कुमारेक,
मूल्यमापन म्हणजे assesment. ही एक सर्वसाधारण संज्ञा आहे. शैक्षणिक प्रगती मोजण्याची असेल तर माझ्या मते अधिक समर्पक शब्द हवा.
आ.न.,
-गा.पै.
या कोड्यात केवळ एकाच शब्दात उत्तर द्यायचे असल्याने अशा काही मर्यादा आहेत. प्रश्न 5 व 6 याचे उत्तर जोडीने द्यायचे आहे. या दोघांची उत्तरे मी एका शिक्षणतज्ञांच्या लेखातून घेतली आहेत. एका शब्दाचे बंधन घातल्याने एकंदरीत कोड्याला मर्यादा आहेत हे कबूल.
तेव्हा पर्यायी शब्द जरूर असतील आणि सुचवा.
कुमारेक,
कलमापन हा पर्यायी होऊ शकेल काय? अन्यथा ही संज्ञा नव्याने उत्पन्न करावी लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शोभून दिसावी. मी प्रयत्न करेन. बघूया काय होतं. सूचनेबद्दल धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
संपले की शांतपणे विचार करतो.
३ ४ ५ राहिलेत.
उद्या भेटू.
३ अनुदेशन
४ अनुभवाधारित
५ गुणवत्ताविकास
……
अक्षरसांगड हा एक नवा खेळ सुचवतो.
आपण यात ९ सुटी अक्षरे देतो. त्यापासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करायचे.. (जास्तीत जास्त ९ पर्यंत कितीही अक्षरी शब्द चालेल ).
कोडेनिर्माता आधी शब्दांची किमान संख्या जाहीर करतो.
काही तासानंतर सहभागीं नी त्यांची यादी द्यायची.
३-४ जण इच्छुक असतील तर खेळू.
तसे लिहा
धन्यवाद.
बरेच दिवस वाटच बघत होतो नव्या खाद्याची
टाका लवकर टाका
पैजारबुवा,
अक्षरसांगड खेळ
खाली दिलेल्या ९ अक्षरांतून किमान १५ सामान्य शब्द बनवा. सर्व शब्द किमान ३ अक्षरी. पण एक ७ अक्षरी हवा. बाकी कसेही. १ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता.
न त इ
डी इ बा
मा र स
उत्तरे तुमच्याकडे फक्त तयार ठेवा. ४ तासांनी उघड करू.
……
काही नियम :
१. सर्व शब्द सामान्यनामे हवीत आणि मूळ रूपातले शब्द.
२. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.
३. सर्व शब्द अर्थातच अधिकृत हवेत.
४. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.
५. हृस्व दीर्घ महत्त्वाचे.
........
एकेक शब्द इथे लिहू नका
एवढा वेळा डोके फोडून फक्त दोन शब्द मिळाले
पैजारबुवा,
४ तास दिलेत !
नंतर मजा समजेल .
यादी सादर करू शकता.
खुप दिवसांनी आलो धाग्यावर..
प्रयत्न करून व्यनि करून ठेवतो तुम्हाला
थोडा घाईत आहे, कॉल आहे..
15 शब्द आणि त्यातील एक 7 अक्षरी शब्द झालेत.
व्यनि करतोय.. येथे नंतर ड्या तुम्ही
चालेल !
20 शब्द व्यनि केलेत.. नंतर बोलू.. :-)
काही चुकले असतील
अगदी