Skip to main content

भाषा

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख. अलीकडे सोशल मीडियावर माझं नाव वगळून फिरत आहे. म्हणून हा लेख आजच्या ब्लॉगवर मुद्दाम देत आहे. या लेखाचं आता पुनर्लेखनासह संपादन करायचं होतं, पण लेखकाच्या नावाशिवाय फिरणार्‍या लेखाशी तो तंतोतंत जुळावा म्हणून जसाच्यातसा...): अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो.

३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 15/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: २. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली.

१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 10/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईच्या मरीना बीचला भटकणं एक विलक्षण अनुभव असतो. चेन्नईला कामानिमित्त राहायला असताना बऱ्याचदा या बीचवर जाणं झालं. चेन्नईकर व पर्यटक यांच्या गर्दीने बीच कायमचा गजबजलेला असतो. १०-१२ किमीची लांबलचक पुळण प्रचंड गर्दीला सामावून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, छोट्या मोठ्या जत्रा, पर्यटकांचे जत्थे, खेळणारी मुले यामुळे इथलं दृश्य रमणीय असतं. इथं येऊन नुसतं इकडं-तिकडं बघत बसण्यातही भन्नाट टाईमपास होतो.

भाषा : बोली आणि प्रमाण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) : कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो?

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 27/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! 'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा! मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिर

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

अहिराणीचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या.

स्मरणाला मदत

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 04/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे. भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते. यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. उदा.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

लेखक साहना यांनी बुधवार, 21/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say is that it is difficult to detect something that we have not already discovered ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक) दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते.