बाबंकडे हट्ट करून घेतली वेगळी माझी खोली
आतातर मी मोठा झालो, ४ वर्ष पूर्ण झाली
दंग-मस्ती करतो, ठेवतो खेळणी पसरून सारी
एकटे खोलीत राहण्याची, मजाच काही न्यारी
वेगळी माझी खोली, वेगळी माझी कॉट
माझे छोटेसे कपाट, असा माझा थाट
छोटीशी खिडकी, त्याला छोटेसे दार
थोडे दार उघडले, तर वारा येतो फार
मी माझ्या खोलीत मोठ्या ऐटीत राहतो
संध्याकाळी दुध पिताना खिडकी बाहेर पाहतो
काऊ करतो कावकाव, चिऊ गोड गाणे गाते
खारुताई मारते उडी, तेव्हा खूप मजा येते
बागेत खेळून घरी येताच मी माझ्या खोलीत येतो
रात्री जेवण होताच माझ्या कॉटवर झोपू पाहतो
मला झोपच येत नाही, रात्री थंडी पडते गार
किर्र काळोख होतो, मला भीती वाटते फार