महावीर बंडू -
हाती फिरवत गदेस गरगर
बंडू फिरतो भरभर घरभर ,
येणा-जाणाऱ्यास तडाखे
बाल महावीराचे शंभर !
सोफ्यावरून खुर्चीवरती -
खुर्चीवरून फरशीवरती ,
उड्डाणातुनी जखमी होतो
पराक्रमी तो बंडू असतो !
ढगांची गडगड कानीं येता
बंडू एकदम गडबडतो -
महावीर बंडू हा अमुचा
आईच्या पाठीशी दडतो !!
वाचने
1860
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
विदेश भौ,
तुमचा हा महावीर बंडू भारी आवल्डा बरं का आपल्याला.....
छान असतात बालगीते तुमची... पुस्तक नक्की निघू शकेल...
बंडू अगदी डोळ्यासमोर ऊभा केलात.
In reply to आवडला by पप्पु अंकल
बंडू अगदी डोळ्यासमोर ऊभा केलात.हेच बोल्तो. सुटसुटीत आणि चटपटीत बालगीत आवडले.
छान
हॅ! हॅ! हॅ!