Skip to main content

बालगीत

माकडा माकडा हुप

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/10/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
माकडा माकडा हुप
माकडा माकडा हुप तुझ्या शेंडीला पावशेर तुप तुप जाय चाटीत चिंचा दे पाटीत चिंचा आहेत लांबट तोंड झाले आंबट आपण दोघ बागेत फिरू मग मला दे पेरू पेरू आहे गोड मोठा अरे पळ पळ, आला माळीदादाचा सोटा -पाषाणभेद

ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 27/07/2009 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा? ए आई......,सांग ना SSSSS! आता गोष्ट नको आम्हाला, गाण्यातला रस संपला! लुटुपुटीच्या भातुकलीचा, आला खुप खुप कंटाळा SSSS! ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? नकोच आई मजला, चॉकलेटचा तो बंगला ! अन बर्फीची ती झाडे, इथे आहेत, हवी SSSS कुणाला? ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? राजपुत्र अन परीराणीच्या, गोष्टींचा स्टॉकही संपला ! टॉम अँड जेरी, पापायनेही, बघ जीव; आमचा SSS उबला ! ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? चिवचिव करती चिमणपिले, चोचीतच घास राहीला ! असेल का गं गेला ? त्यांचाही बाबा टूर

<यज्ञधुनी>

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 29/05/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम धातुच्छादित वक्ष मिरवत सूक्ष्माग्री शहारे देतांना हसून मॅडोना म्हणाली टोचेल> टोचेल> टोचेल> प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" :''(

खेड्यातला आणि शहरी मुलगा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/05/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
खेड्यातला आणि शहरी मुलगा असशील बघत टिव्ही जरी तू विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय? नाय रे नाय, नाय रे नाय खॉत असशील ऑईस्क्रीम तू बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय?
Taxonomy upgrade extras

एक होतं ढोर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 02/05/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता परा आदी कवितांमधून प्रेरणा घेऊन ही बालकविता रचण्याचा प्रयत्न. एक होतं ढोर
एक होतं ढोर त्यानं पाहिला चोर ढोर लागले चोराच्या मागे चोर पळाला वेगे वेगे "वाचवा ! वाचवा !!" चोर ओरडला लोकं धावली ढोरालाच पकडायला अखेर लोकांनी ढोराला पकडून खुंट्याला बांधून ठेवला करकचून चोराला आनंद झाला फार म्हणे , ढोरांपेक्षा माणसेच हुशार मुक्या प्राण्याची मुकी वेदना ढोराला काहीच सांगता येईना !!

विंचवाचे वर्‍हाड

लेखक धनंजय यांनी शनिवार, 02/05/2009 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
(हे पुस्तक मी मैथिलीसाठी, म्हणजे माझ्या अडीच वर्षांच्या पुतणीसाठी बनवले होते. आता तिने बघितले आहे, मग आणखी लोकांनी गंमत लुटायला हरकत नाही. चित्रे माझी मैत्रीण आंद्रेया ग्रानादोस हिने काढली आहेत. त्यामुळे चेहरे दक्षिण-अमेरिकन आहेत, मराठमोळे नाहीत! तिला मराठी मुळीच येत नाही. माझ्या अशा-तशा अनुवादाला अनुसरून आणि वेड्यावाकड्या स्केचेसचा अर्थ लावून तिने ही चित्रे काढली आहेत!
Taxonomy upgrade extras

एक होती परी

लेखक अरुण वडुलेकर यांनी शुक्रवार, 01/05/2009 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांनी सादर केलेले विंदांच्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून, अशीच एक मनांत ठसलेली परीची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते ज्ञात नाही. पण गूळ दाण्याच्या खाऊ इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.

परीचा गाव - बालकविता

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 30/04/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
परीचा गाव - बालकविता ---------------------------------- स्वप्नांच्या राज्यात परीचा गाव तिथली गंमत काय सांगू राव ? तिथले चांदणे सोनेरी उबदार उन मात्र तिथले शीतल गारगार तिथे नाही चालायचे,नुसतेच उडायचे, दिवसा घ्यायची झोप आणि रात्री खेळायचे. शाळा नाही ,अभ्यास नाही ,ढगातून फिरायचे, चंद्राच्या झुल्यावर झोके घ्यायचे. आईस्क्रिमचे डोंगर नि थम्सअपची कारंजी, कारंजात तरंगतात कांद्याची भजी नदीतून गोडसे अमृत वहात असते, काठावर गोळ्या चॉकलेट पडलेले असते. सोन्याच्या झाडाला पाचुची पाने, गोल गोल डाळिंबात माणकाचे दाणे. 'इतक्या छान गावातून परत का आला?' त्याची सुध्दा झाली मजा सांगतो तुम्हाला. डाळिंब खाताना
Taxonomy upgrade extras

विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 30/04/2009 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
विंदा करंदीकरांनी आधुनिक मराठी कवितेवर छाप पाडली आहे. विसाव्या शतकातले बदल समाजाला भरडत होते, तसे समाजाला नवी संधी सुद्धा देत होते. यातील काही विषण्ण, काही स्फूर्तीदायक, काही वैचारिक अशी काव्ये आपण वाचलेलीच आहेत. आता आपण त्यांच्या बालकवितांबद्दल थोडी चर्चा करूया. या काळातल्या कवींनी मराठीतील प्रौढासाठीच्या कवितांनाही एक वेगळा आकारही दिला. मराठीची नैसर्गिक आघातांची जी लय आहे, प्राचीन वृत्तांऐवजी त्या लयीत विंदा करंदीकरांनी रचना केली.

बालगीत -खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 15/04/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------------------- सार्‍यांशी दोस्ती आता सार्‍यांशी गट्टी, खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी. खेळायचे घरी आता कॅरम आणि पत्ते सार्‍या खेळात होईल माझीच फत्ते. 'अभ्यास करा,' अशी आता होणार नाही कटकट टि.व्ही.
Taxonomy upgrade extras