मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत -

विदेश · · जे न देखे रवी...
टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत अबलख माझा घोडा - आई बाबा आजी आजोबा सरका रस्ता सोडा ! दोनच पायांच्या घोड्याची घरभर भरभर घाई पटपट झुरळे दूर पांगती खुषीत येते आई ! हातांचा हा लगाम धरुनी वेगाला मी आवरतो ऐटित मागे पुढे डोलुनी घर-मैदानी वावरतो ! घोडोबा मी घरी लाडका खेळायाला पुढे पुढे - शंभर टक्के परीक्षेत गुण अभ्यासातहि सदा पुढे ! तबेल्यात बेजार हा घोडा आठवड्यातले दिवस सहा - चंगळ घोड्याची रविवारी हैराण हे घरदार पहा !!

वाचने 2575 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अनामिक 15/10/2011 - 01:04
बालगीत तसं वाचायला चांगलं वाटलं तरी "पटपट झुरळे दूर पांगती" वाचून किती ते अस्वच्छं घर असेल असं वाटून गेलं!

शिल्पा ब 15/10/2011 - 07:03
मला कविता समजत नाहीत म्हणुन उगाच मी त्यांच्या वाटेला जात नै...पण शिर्षक वाचुन आले अन मस्त बालगीत एंजॉय केले.. :) बाकी अबलख म्हंजे काय?

किसन शिंदे 15/10/2011 - 12:44
मस्त आहे बालगीत... आवडलंय. रिंगा रिंगा रोजेसच्या जमान्यात माझ्या पुतण्याला ऐकवेन हे बालगीत.

प्रभाकर पेठकर 15/10/2011 - 20:04
पटपट झुरळे दूर पांगती 'झुरळे' ऐवजी 'सगळे' असा शब्दप्रयोग केला तर?

मिसळलेला काव्यप्रेमी 16/10/2011 - 10:15
मस्त आहे.

तिमा 16/10/2011 - 11:01
आशय चांगला व हलकाफुलका पण मीटरमधे बसत नाही असे वाटते.

विजुभाऊ 17/10/2011 - 13:09
झुरळे पांगवायला पेस्ट कंट्रोल ऐवजी घोडा घोडा मोठ्यानी देखील खेळले तर फार उपयोगी ठरेल ;)
माझ्या प्राथमिक शाळेतिल आठवणी प्रमाणे अबलख म्हणजे दोन रंग असलेला (उदा. पांढरा आणि चॉकलेटी किंवा पांढरा आणि काळा). विज्ञानाच्या भाषेत क्रॉस ब्रीड, दोन जातींचे गुणधर्म असल्यामुळे चांगला समजला जातो.