गाढवदादा गाढवदादा -
काव्यरस
गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ? |१|
मासेभाऊ मासेभाऊ -
नापास झाला का हो ?
रडून रडून सगळा
टँक भरला की हो ! |२|
पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो
एकदा तरी वळून बघाव ? |३|
कासवपंत कासवपंत -
लढायला किती हळू जाता ?
ढाल पाठीवरती घेता
तलवार कुठे विसरता ? |४|
भोलानाथ भोलानाथ -
गुब्बू गुब्बू गुब्बू
पैशाचं मी पेरलं झाड
पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|
वाचने
2272
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
@ विदेश जी रोज तुम्हाला नविन नविन कविता कश्या काय सुचतात बर !
मानायला पाहीजे यार तुला :)
In reply to @ विदेश जी रोज तुम्हाला नविन by पियुशा
पियुशाला हे बालगीत आवडणार ह्याची खात्रीच होती.
मूक्त कल्पनेचा अत्यंत लोभस, मनमोहक, आर्द्रतापूर्ण असा तरल व अभूतपूर्व आविश्कार ही कवीता वाचताना अनूभवाला आला... असचं लिहीत रहा. पूलेशू.
मस्तं कविता आहे. :)
आवडली कविता
कविता आवडली!
@ विदेश जी रोज तुम्हाला नविन