Skip to main content

बालगीत

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 14/08/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोरा मोरा नाच रे (बडबडगीत) मोरा मोरा नाच रे अंकलिपी वाच रे वाचता वाचता बोल रे पृथ्वी कशी गोल रे गोल चेंडू उडला सुर्यावरती पडला कान त्याचा कापला म्हणून सुर्य तापला ऊन, हवा आणि गरम झाले पाणी पाणी गरम झाले वाफ़ होऊन आले सोडूनिया धरती वाफ़ गेली वरती आभाळात मगं तिचे झाले ढगं ढग वाजे गडगड वीज चमके कडकड वारा सुटला सो-सो पाऊस आला धो-धो मोरा मोरा नाच रे श्रावणाचा मास रे नाचता नाचता सारा फ़ुलवून दे पिसारा गंगाधर मुटे ...................................

माझे बाबा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा
बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान ऑफीसात सारे झुकवतात मान राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त ४ डिश भेळपुरी करतात फस्त शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती मातीमधली जिंकतात कुस्ती खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी शेतात जावून उसाला पाणी भरी राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात स्कुटर कारचे ऑपरेशन करतात चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर पण नाटकात असतात अ‍ॅक्टर सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण गणू रडत

पाउस आला पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/07/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आला पाउस आला
घंटा वाजली सुटली शाळा पाउस आला पाउस आला || दप्तराचे मोठे ओझे झाले वह्या पुस्तके भिजून गेले खांद्यावरतून फेकून देवू भरभर सारे घरी पळा पाउस आला पाउस आला || पुर आलेल्या ओढी जावू पुलावरूनी पुर पाहू उगाच जावूनी काठावरती ओढ पाण्याची पाहू चला पाउस आला पाउस आला || छत्री बित्री नकाच घेवू चिंब भिजाया घरीच ठेवू चिखलाचे सारे पाणी खेळा पाउस आला पाउस आला || * मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते.
काव्यरस

कालू कौआ

लेखक सहज यांनी सोमवार, 28/06/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या भारत दौर्‍यात बायकोच्या लहानपणची काही आवडती पुस्तके, कॉमिक्स आवराआवरीत सासुबाईंना हाती लागली व लगेच आजीने ती वाचायला पाठवली. विकांताला वाचायची ड्युटी करता करता "बबन हजाम" नावाच्या एका धमाल बालकथा पुस्तकात एक छान सुंदर कविता दिसली. एकाच वेळी लहान मुलांना व मोठ्यांना (मस्त संदर्भ लागून) आवडणारी ही कविता तुमच्यासमोर मांडायचीच असे ठरवले. कवयित्री आहेत श्रीमती अनुपा लाल.
काव्यरस

मदवल माया थोली ले..

लेखक राघव यांनी सोमवार, 21/06/2010 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: ही कविता माझी नाही. कुणाची ते माहित नाही. कुणास माहित असल्यास सांगावे. तसेच काही शब्द चुकले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण लहान असतांना केव्हातरी पाठ झालेली आहे. मला वाटतं याचे कमीत कमी एक आणखी कडवे आहे.. पण काही केल्या आठवत नाहीये. *** संदर्भः ही कविता म्हणजे कृष्णाच्या एका गोकुळातल्या बोबड्या बोलणार्‍या मित्रानं मांडलेली भोळी पण प्रेमळ तक्रार आहे. त्यामुळे अगोदर बोबड्या बोलीतच लिहितो. खाली समजण्यासाठी साध्या भाषेत लिहिलेले आहेच! जमले तर माझ्या (भयानक) आवाजात इस्निप्स वर टाकून इथे लिंकेनच!
काव्यरस

आभाळबाबाची शाळा ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 12/06/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
कडाड कड कड कडाड कड आभाळबाबाची छडी कडकडे सैरावैरा मग धावत सुटले छबकडे नभाचे इकडे-तिकडे.....! नकोच मजला शाळा आता नकोच अन ते क्लिष्ट धडे गाऊ गाणी आनंदाची अन् चल जावू या बाबा भुर गडे ....! वारा मास्तर शिळ घालती कवायतींचे अन् देती धडे वीजबाई शिस्तीच्या भारी पाहूनी तया हृदय धडधडे...! निसर्गसरांचा तास मजेचा रेखाटू चित्रे मिळूनी गडे वीज घालीते गणिते अवघड ढगबाळाला मग येइ रडे...! माय धरित्री वाट पाहतसे डोळे तियेचे आकाशाकडे दांडी मारूनी शाळेला मग ढगबाळ धावती आईकडे...! माय-पुतांची भेट अनोखी सुगंध मायेचा जगी दरवळे पाऊस आला, पाऊस आला आनंद होई मग चोहीकडे ....! ऋतुंमध्ये श्रेष्ठ ऋतुराज "पावसाळा", त्याच्

आंधळ्याच नशीब

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 31/05/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा भुकेले पोट व घेउन सुका गळा रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे, रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली, गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली. "परमात्म्याने ही सजा का दीली?", कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली. गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा, दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा. आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस, पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस. असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती, म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती" परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती, काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?" Note : हे अकलीचे तारे आम्ही ईयत्ता
काव्यरस

हापिसातली कविता

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/10/2009 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
क्लायन्ट शी बोलताना चेहेर्‍यावरचे उसने हसू सांडत जाते. वीकएंडचे प्लॅनिंग गंडत जाते तेवढ्यात ती बातमी येते. कोणी एक आपल्यातलाच रोजच्या पहाण्यातला एक मेल धाडतो तुमचे सहकार्य मिळाले म्हणूनच मी इथवर पोहोचलो. अन्यथा होतोच काय मी?
काव्यरस