हा सगळा रिव्यू फक्त 'जिस्म' या एकाच चित्रपटाचा नाही, 'जिस्म', 'रोग', 'क्रिमिनल' व इतर अनेक महेश भट किंवा विक्रम भट आणि इतर नेहमीचेच (अ)यशस्वी यांचे चित्रपट पाहिले आणि त्यात ज्या कायम दिसणार्या गोष्टी आहेत त्याबद्दल हे आहे. असे चित्रपट पाहताना सतत जो वैताग येत असतो त्याचे असंबद्ध वर्णन समजा:-)
या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. नायिकाही तशाच. यांना इतर कोणते रोल झेपणार नाहीत म्हणून शक्यतो कोरडा ठण्ण चेहरा करून वावरण्याचे रोल त्यांना देतात, म्हणजे फॅशन डिझाइनर, यशस्वी बॅचलर , बिझिनेसमन वगैरे.